Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिला खरं तर बालकलाकार म्हणून
तिला खरं तर बालकलाकार म्हणून मिळालं पाहिजे नामांकन, तिचं ते उड्या मारत चालणं, खाऊ साठी हट्ट करणं, बालबुद्धीनं वागणं ह्याने ती खरंच बच्चा वाटते....
हा हा...बालकलाकार....
हा हा...बालकलाकार....
(No subject)
लहान मुलांच्यातला निरागसपणा मात्र नाही ह्या बच्च्यात. मूर्खपणा आणि आप्पलपोटेपणा आहे.
नविन प्रोमो बघितला का. राधिका
नविन प्रोमो बघितला का. राधिका स्वप्न बघून राहिली की काय.
नाही ग चंपा, काय दाखवलं आहे?
नाही ग चंपा, काय दाखवलं आहे?
छोटे कपडे घालणा-या आणि छोटे
छोटे कपडे घालणा-या आणि छोटे केस ठेवणा-या, स्वत:चे स्वतंत्र विचार असणा-या खलनायिका >> सगळं बरोबर आहे पण" स्वत:चे स्वतंत्र विचार असणा-या "हे मात्र शनायाला लागू होत नाहीये
एकूण काहे दिया परदेस चा मिट्ट
एकूण काहे दिया परदेस चा मिट्ट गोड शेवट पाहून तुम्हाला काय वाटत? या सिरीयलचा शेवट कसा असेल?
खरतरं शनया ही रॉची एजण्ट असते. कपूर सरांच्या मसाल्यामागून चाललेल्या भानगडी शोधायला ती आलेली असते. तिला साधा सरळ सज्जन नागपूरचा असून सरळ मराठी बोलणारा गुरूनाथ भेटतो. त्याला चिंता होती बायकोचा स्वाभिमान कसा जागृत करावा? तेव्हा शनयानेच सांगितलं की आपण लफड आहे अस दाखवू? खरा तो बायकोशीच एकनिष्ठ असतो. सिंगापूरलाही ती रॉच्या कामासाठीच आलेली असते.
ती सतत खात असते कारण तिला जंत झाले होते पण दामदाकाकूंनी काडेकिराईत देऊन तो प्रश्न सोडवलाय....
माझी अक्कल इतपतच चालतेय.याहून भिषण काहीतरी असू शकतं.
तुम्हाला काय वाटतं......
ती सतत खात असते कारण तिला जंत
ती सतत खात असते कारण तिला जंत झाले होते >>>>
नविन प्रोमो बघितला का. राधिका
नविन प्रोमो बघितला का. राधिका स्वप्न बघून राहिली की काय.>>>> म्हणजे ते तिचे सिन्गापूरला जाणे, तिकडे गुरु-शनायाला बघणे, मग नवर्याला शिक्षा देणे, त्याला कुटणे वै. हे तिचे झोपेतले स्वप्न होते का? म्हणजे ती सिन्गापूरला अजून गेलीच नाही? बापरे केवढे ते लाम्बलचक स्वप्न?
खरतरं शनया ही रॉची एजण्ट असते
खरतरं शनया ही रॉची एजण्ट असते. कपूर सरांच्या मसाल्यामागून चाललेल्या भानगडी शोधायला ती आलेली असते. तिला साधा सरळ सज्जन नागपूरचा असून सरळ मराठी बोलणारा गुरूनाथ भेटतो. त्याला चिंता होती बायकोचा स्वाभिमान कसा जागृत करावा? तेव्हा शनयानेच सांगितलं की आपण लफड आहे अस दाखवू? खरा तो बायकोशीच एकनिष्ठ असतो. सिंगापूरलाही ती रॉच्या कामासाठीच आलेली असते. >>>> असा शेवट व्हायला हवा. पण ती गुरुच्या क्रेडिट कार्डवर shopping करते, तो सतत बच्चा बच्चा करतो त्याच काय क्ल्रेरीफिकेशन देता येईल हया शेवटात?
ती सतत खात असते कारण तिला जंत झाले होते पण दामदाकाकूंनी काडेकिराईत देऊन तो प्रश्न सोडवलाय.... >>>> अयाईग
दामदाकाकू कोण आणि काडेकिराईत
दामदाकाकू कोण आणि काडेकिराईत म्हणजे? तुमचा कल्पनाविलास चांगला आहे पण झी नाही एवढा विचार करत. राधिका सुटाबुटात, गुरूची बाॅस दाखवली आहे आणि शनाया हाऊसकिपींगटाईप्स त्याच आॅफिसमध्येे पोछा मारत असते, राधिका येऊन मुद्दाम चहाचा कप टाकतेे तिला त्रास द्यायला. राधिकाच्या केबीनवर नाव असतं, राधिका गुरूनाथ सुभेदार.
राधिकाच्या केबीनवर नाव असतं,
राधिकाच्या केबीनवर नाव असतं, राधिका गुरूनाथ सुभेदार.>> मागे "सौ." लावायला विसरलात. ती नाव सांगताना तसंच सांगते.
मालिका संपायला आली आहे लोकहो,
मालिका संपायला आली आहे लोकहो, उरलेल्या भागांचा लाभ घ्या
मालिका संपायला आलेय असच वाटत
मालिका संपायला आलेय असच वाटत ज्यापद्धतीने श्रेयस ऑफिस मध्ये गुरु-शनायाचा उलगडा करतो राधिका पण नाना - नानी आणि सगळ्यांना कळवून त्यांची माफी मागते परत गुरूच्याच ऑफिस मध्ये तिला कपूर साहेबांकडून नवीन काम मिळत या सगळ्यांवरून अंदाज. अर्थात अजून दुसऱ्या कुठल्याही मालिकेचा प्रोमो सुरु झाला नाहीये .
त्याअर्थी एका महिन्याने संपेल असं वाटत
प्रोमोत शन्या स्वीपरच्या
प्रोमोत शन्या स्वीपरच्या ड्रेस मधे जमीन पुसताना दाखवली आहे.
राधिका बॉस झालेय.
राधिकाच काय कुणीही बॉस झालं तरी कुणी मुलगी जमीन का पुसेल?
एवढी वेळ येइपर्यंत तिथे नोकरीच का करेल?
कुणाला घाबरुन? एवढी कसली मजबूरी?
बासच! आवरा आता.
अत्यंत भिकार, दळभद्री सिरीयल आहे ही.
झी प्लीज नोट धिस.
राधिका इज होपलेस.
त्या दाढीवाल्याला- जानुबैच्याचा मित्र होता तो- थोबाडीत का मारते म्हणे?
स्वतःचा नवरा शेण खातो ते डोळ्यांना दिसत असुनही एक चकार शब्दाने विचारत नाही की घडाघडा बोलुन काये स्पष्ट विचारत नाही.
बालिश पोरकट खेळ करते आणि त्या ऑफिसातल्या मुलाला घरी बोलावुन जाब विचारुन डायरेक्ट थोबाडीत??
कहर आहे. कल्पनादारिद्र्य म्हणतात ते हेच.
ज्या स्पीड ने जाताहेत ते
ज्या स्पीड ने जाताहेत ते पाहून आता हार्डली १०-१२ दिवसांचीच सोबती आहे असे वाटते ही सिरीयल.....
काहीही...श्रेयस ने ऑफीसात सांगितलं....राधिकाने बिल्डीग मधे सगळ्यांना सांगितलं....मग आता गुरु- शनायाचा भंडाफोड व्हायला काय देर? इतकं काय राष्ट्राचा सुरक्षा प्रश्न असल्या सारखं सिक्रेट्ली बोलताहेत हे सर्व जण..?
कुणाला घाबरुन?
आणि गुरु च्या ऑफीसातले लोक अती भोचक आहेत असे नाही का वाटत? गेटींग टू पर्सनल!
वरच्या ३-४ पोस्ट्सशी अतिशय
वरच्या ३-४ पोस्ट्सशी अतिशय सहमत आहे.
सस्मित +१११११११
काहीही म्हणजे काही ही दाखवतात. आणि राधिकाला गुरूच्या हापिसात नोकरी म्हणजे अत्तीच झालं.
राधिकाला गुरूच्या हापिसात
राधिकाला गुरूच्या हापिसात नोकरी म्हणजे अत्तीच झालं. >> मला नाही वाटत तसे, म्हणजे जर तो गुरु सारखा मानुस जो काम कमी लफडी जास्त करतो तो CEO म्हनुन चालणार असेल, कपुर सर फक्त राधीकाच्या हातचे खाणे आवडते म्हणुन गुरुला दर्वेळी सांभाळुन घेतात असे जिथे दाखविलेय तीथे त्यांना राधिका पण चालेल की.
ईतका विचार नाही ओ करायचा
हो पण जर खरेच संपणार असेल तर बघायला हवी काही दिवस
सस्मित +१११११११
सस्मित +१११११११
गुरूच ( अभिजित ) " पती गेले
गुरूच ( अभिजित ) " पती गेले ग काठेवाडी "नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे . त्याला नाटकाची तालीम करायला इतका वेळ मिळाला त्याअर्थी मालिकेचं शूटिंग संपल असणार . म्हणजे मालिकाही संपेल
चंपा
चंपा
दामदा टायपो एरर दामलेकाकू म्हणायच होत मला.
काडेकिराईत हे भयंकर कडू औषध जंत झाल्यावर घेतात.
मला माहीतेय शेवट याहूनही रद्दड असेल.
म्हणजे मालिकाही संपेल>>>
म्हणजे मालिकाही संपेल>>> आतापर्यंत रधिकाची फसवणुक चालू होती. आता कुठे राधिका बदला घेणार आहे तर मालिका बंद होणार. शेवटी गुरुबाबा आणि शन्याबच्चाचा छळ बघण्याचे सुख प्रेक्षकांना मिळणारच नाही वाटते.
मालिका सम्पेल कशी? आता सवत
मालिका सम्पेल कशी? आता सवत माझी लाडकी प्रमाणे राधिका शनाया-गुरू लग्न लावून शनायाला घरी आणेल ना.
झीच्या मालिका लवचिक असतात,
झीच्या मालिका लवचिक असतात, कितीही ताणू शकतात आणि एका आठवड्यात गुंडाळूपण शकतात. राधिका काय छळणार, तीला सगळे बाष्कळ प्रकार सुचतात, आत्ताच दाखवलंं प्रोमोमध्ये, शनाया गॅरीच्या घरी कपाटात अडकते. राधिका श्रेयसच्या थोबाडीत मारते तो आईच्या आजारपणाचं कारण सांगतो म्हणून आणि गॅरी स्वत:च्या आईवडिलांना गाडीपर्यंत सोडायलाही येत नाही हे नाही दिसत तीला. दुस-याचं ते कार्ट असं आहे तिचं.
मी बघते सध्या . मला आवडत्येय
मी बघते सध्या . मला आवडत्येय आता
पण नवर्याला तिच्याबरोबर रहायच
पण नवर्याला तिच्याबरोबर रहायच नाहिचे,, तो तिला फसवतोय.. काही झालं तरी त्याला दिसरी मुलगी आवडततर आहेच.. मग अशावेळी त्याच्या बरोबर रहायचे की नाही.. त्याला सरळ सरळ विचाराय्च आणि काय तो निर्णय घ्यायचा नॉर्मल लोकांप्रमाणे की हे फाल्तु खेळ खेळत बसायच??????????
त्याला सरळ सरळ विचाराय्च आणि
त्याला सरळ सरळ विचाराय्च आणि काय तो निर्णय घ्यायचा नॉर्मल लोकांप्रमाणे की हे फाल्तु खेळ खेळत बसायच?????????? >>>> फालतु खेळ खेळणे चुकीचेच आहे, पण मला वाटते कि अश्या माणसाला जो बायको मुल असताना लफडे करतो अन बाईला जिला माहित आहे की आपण ज्याच्यात गुंततोय तो संसारी आहे तरीही लफडे करते स्वःताच्या स्वार्थासाठी अश्या दोघांना पण चांगलाच धडा शिकवायला हवा अन कायदेशीर दणका सुद्धा.
अर्थात या मालीकेत असे काही होईल असे वाटत नाही
पण नवर्याला तिच्याबरोबर रहायच
पण नवर्याला तिच्याबरोबर रहायच नाहिचे,, तो तिला फसवतोय.. काही झालं तरी त्याला दिसरी मुलगी आवडततर आहेच.. मग अशावेळी त्याच्या बरोबर रहायचे की नाही.. त्याला सरळ सरळ विचाराय्च आणि काय तो निर्णय घ्यायचा नॉर्मल लोकांप्रमाणे की हे फाल्तु खेळ खेळत बसायच?????????? >>> + १२३
आणि काल ते महाजनी काका का
आणि काल ते महाजनी काका का कुणितरी तिला सांगत होतं की तु गुरूला डिव्होर्स देऊन टाक, तर ती म्हणते म्हणजे त्यांना रान मोकळं? रान मोकळं?
त्याला रान मोकळं मिळू नये म्हणून ही रोज आपलं आयुष्य वेचणार त्या फालतू माणसासाठी?
कसली ही विचारसरणी?
आता ही असतानाही रान मोकळं
आता ही असतानाही रान मोकळं असल्यासारखंच आहे की.
Pages