Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणी जाड जाड मांड्या हे पर्सनल
आणी जाड जाड मांड्या हे पर्सनल कसे? जे ती दाखवतेय ते खुले आम आहे, मग ती टीका पर्सनल कशी होऊ शकते? हा किंवा याच्या आधीचा भाग / बाफ सुरुवाती पासुन वाच. कुठेतरी कोणीतरी राधिकाला पांढरी माकडीच म्हणलेय.>>> जाड जाड मांड्या आणि पांढरी माकडी दोन्हि पर्सनल होतच आणि ते चुकीच. एखादया मुलीला आपल्या जाड मांड्या दाखवण्यात काहीच problem नाहिये, तो तिचा choice असू शकतो, तिच्याकडे न बघण हा आपला choice आहे. पण एखाद्याच्या मूळ, नैसर्गिक शारिरिक ठेवणीला किव्वा रुपाला नावे ठेवू नये एवढेच माझे म्हणणे आहे.
शनायाला जसे शॉर्ट्स घालायला आवडते तसेच राधिकाला साड्या नेसायला.> मी सुद्दा हेच लिहिलेय आधीच्या पोस्टमध्ये. प्रत्येक माणसाची आवड वेगवेगळी असू शकते. राधिकाला जस साडयामध्ये comfortable वाटत तस शनायाला शॉर्ट् ड्रेसेसमध्ये वाटत असेल. पण एखाद्यावर/एखादीवर तु आम्हाला आवडतात म्हणून तसेच कपडे घाल अशी त्याच्या/तिच्या मनाविरुद्द जबरदस्ती करणे चूक आहे. हि गोष्ट राधिका आणि शनाया दोन्हिन्ना लागू होते.
तिची कोणतीच मैत्रिण-शेजारी नाही पण त्या परिसरातही कोणी असे दाखविले नाहीत. >>> तिची मैत्रीण इशा तसे कपडे घालते ना.
राधिकाला श्रेष्ठ ठरवण्याच्या नादात लेखकाने/ निर्मात्याने शनायाचे पात्र भीषण बनवले आहे. >>> +++१११
आणी गुरुला मॉडर्न च बायको हवी आहे तर मग रेवतीचे उदाहरण समोर आहेच की. ती किंवा समिधा कुठलाही थिल्लरपणा न करता मॉडर्न दिसतात.>>> अगदी अगदी. पण मध्ये समिधा शनाया-इशा नादाला लागून बालिशपणा करायला लागली होती.
यात नवीन असं काय ! असे तिचे निर्णय (खमकी होण्याचे) आतापर्यंत अनेक वेळा झाले होते की !>>> नैतर काय.
राधिकेचा मेक ओव्हर कराच, तिला तिचा 'अय्या' सिनेमातला लूक द्या, आणि मग बघा मजा>>> ईईईई
काहीही केलं तरी सिरियल ची चव
काहीही केलं तरी सिरियल ची चव जी काही गेली आहे ती परत येईलसं वाटत नाही.
बुंद से गई सो हौद से नही आती :नामुबा:
अंजु, या मालिकेत समिधा गुरु
अंजु, या मालिकेत समिधा गुरु नाहीये .पण ती पण मालिकांमध्ये काम करते. तिचा नवरा अभिजित गुरु ज्याने पण या मालिकेत काही एपिसोड्स चे संवाद लिहिलेत आणि कामही केलाय तो गुरु आणि शनायाचा कॉमन मित्र दाखवलाय तो जो दोघांकडून पैसे उकळतो आणि त्यांना सल्ले देतो तो
"माफेलेचा पूर्ण सोहळा आणि
"माफेलेचा पूर्ण सोहळा आणि सविस्तर जाहिरात करून झाल्यावर राला हे दोघं दिसणार वाटतं. दिसल्यावर राला खूप राग येतो आणि ती सरळ मुंबईला जाऊन घटस्फोटाचे पेपर्स बनवते असे दाखवले तर किती बरे होईल.">>
किती आशावादी विचार ते! पण असलं काही होण्याची सुतराम शक्यता नाही. इतक्या लवकर बरी संपेल आपली छळणूक
मी मालिका नाही पहिली पण
मी मालिका नाही पहिली पण प्रोमो पहिला...राधक्काला ते दोघे दिसल्यावर आपला नवरा आपल्याला फसवतोय आणि आता मी त्याला सोडेन,दुसरी संधी देणार नाही अस काही मनात येत नाही का?? मनात काय येत मी स्वतःला बदलेन?? त्यानं काय होणारे.. ????? प्लिझंच.... हिच्या बेसिक मध्येच लोच्या आहे...... म्हणजे नवरा समोरच दुसऱ्या मुलीसोबत लिव्ह इन मध्ये राहतो... मग परत येतो..मग ती मुलगीही परत येते..मग म्हणतात आमचं आता 'तसं' काही नाही हा.. राधक्का पण लगेच मग बॅक टू पॅव्हेलिअन.... संपताय ना???? संपा म आता लवकर...
फिनीक्स सारखी भरारी झाली की
फिनीक्स सारखी भरारी झाली की घेऊन डोक्यावर नांगर फिरवून आणि मसाले कुटून. कधी संपणार हिच्या भरा-या आणि आपला छळवाद.
हो सुजा, माहितेय मला पण मी
हो सुजा, माहितेय मला पण मी confused की रश्मीला म्हणायचं आहे ह्यातल्या समिधाचा नवरा अभिजीत गुरु, त्यामुळे ती पोस्ट लिहिली.
राधक्काला ते दोघे दिसल्यावर
राधक्काला ते दोघे दिसल्यावर आपला नवरा आपल्याला फसवतोय आणि आता मी त्याला सोडेन,दुसरी संधी देणार नाही अस काही मनात येत नाही का? > +१
मनात काय येत मी स्वतःला बदलेन?? > तर काय. किती बिनडोकपणा तो. (जुन्या अवंतिका सिरीयल मधल्या अवंतिकाचा स्टँड सुस्पष्ट आणि भावणारा होता. त्यात ती त्या दुसर्या बाई च कसं चुकतय अस म्हणून कुढ्त बसत नाही. नवर्याला मात्र माफ करत नाही. )
मनात काय येत मी स्वतःला बदलेन
मनात काय येत मी स्वतःला बदलेन?? >>> धोक्याची घंटा. राधाबाई स्वतःला बदलणार म्हणजे शिरेल ६ महिने तरी चालणार
आपला नवरा आपल्याला फसवतोय हे
आपला नवरा आपल्याला फसवतोय हे कळलं का फायनली राधाक्काला ?
मी प्रोमोत पाहिलं त्यात ती नव्याने जन्मेन वगैरे काहीतरी बोलली. पण म्हणजे नक्की काय करणार आहे ती?
मी प्रोमोत पाहिलं त्यात ती
मी प्रोमोत पाहिलं त्यात ती नव्याने जन्मेन वगैरे काहीतरी बोलली. पण म्हणजे नक्की काय करणार आहे ती? >>म्हणजे अजून गेला बाजार तीन-चार महिने तिला जन्मायला लागतील आणि पुढे दोन तीन महिन्यात मस्त बाळसं धरून गुटगुटीत झाली कि आपण पुढच्या मालिकेला धोपटायला नाहीतर अंजारायला -गोंजारायला रेडी
पण म्हणजे नक्की काय करणार आहे
पण म्हणजे नक्की काय करणार आहे ती?> आता आणखी झणझणीत मसाले बनवेल बहुतेक!
पण बहुतेक त्या प्रोमोत तिची
पण बहुतेक त्या प्रोमोत तिची हेअर स्टाईल एकदम वेगळी दाखवली होती असे वाटते...मी अगदीच जाता जाता पाहिलं... म्हणजे ती काया कल्प करणार...... एकदम मॉड, स्मार्ट राधिका होणार....!
पण मधे एकदा गुरवाने तिला 'प्रिय राधा' वगैरे काहीतरी लेटर लिहीलेले ना? तेव्हा तर तो जेन्युईन साऊंड झालेला .....
म्हणजे ती काया कल्प करणार....
म्हणजे ती काया कल्प करणार...... एकदम मॉड, स्मार्ट राधिका होणार....! >> मलाही असेच वाटतेय, तसेही केसरी टुरमध्ये राधिका चांगली दिसतेय, सो तसेच कंटीन्यु केले तर बरेयं तीला
सुजा, रावी
सुजा, रावी
कसली बालिश सिरियल आहे छे!
राधिका सिंगापुरमध्ये काय घडलं
राधिका सिंगापुरमध्ये काय घडलं हे कोणाला सांगणार नाही.. तिह्या सोज्वळ नवऱ्याची बदनामी होईल नं..
नवीन बालिश plans करत बसेल
सॉरी सुलु, मी सहमत होऊ शकत
सॉरी सुलु, मी सहमत होऊ शकत नाही. या सिरीयल मध्ये ईशाने सुद्धा छोट्या कपड्यात लुक्स दिले आहेत. पण ती कुठेच बेढब वाटत नाही, तेच शनाया बर्याच ठिकाणी बेढब दिसते. चेहेर्यातला देखणेपणा सोडला तर शॉर्ट कपड्यात ती कंफर्टेबल असली तरी बेढब वाटलीय. या उलट ती साडीत ( प्रत्यक्ष आयुष्यातले फोटो ) अतीशय सुंदर आणी ग्रेसफुल दिसते. मॉडेलींग असो वा फिल्म्स, या लोकांना फिगर तेवढीच मेंटेन करावी लागते. झीनत अमान बिकीनीत कधीच व्हल्गर वाटली नाही पण तेच मंदाकिनी अतीशय जाड दिसलीय.
एव्ढेच काय माझ्या मैत्रीणीची रविना टंडन सारखी दिसणारी धाकटी बहीण एकदा कॉलेजला शॉर्ट कपड्यात आली ( दिसायला छान, पण अशीच जाड जुड ) तर तिची जाम खेचण्यात आली. शॉर्ट्स घातले म्हणून नाही तर तिला जाडेपणामुळे टीका ऐकावी लागली. तीच मुलगी आता कमनीय बांध्यात फार छान दिसते.
असो, विषय फारच भरकटला गेला माझ्याकडुन , त्यामुळे माझ्याकडुन या वदाला विश्रांती.
आज राधिकाला कळेल गुरुचे खरे रुप. ती म्हणते की आता मी फिनीक्स पक्षासारखी भरारी घेईन. पण म्हणजे काय? गेट अप बदलेल या भैताडाकरता? की अर्थ सिनेमाची शबाना आझमी बनेल, निर्माता जाणे.
मला वाटत नवीन ट्रेक 'खून
मला वाटत नवीन ट्रेक 'खून भरी मान्ग' स्टाईल असावा. म्हणजे ती मॉड होईल, नवर्याच्या office वर कब्जा करेल. नवर्याला सुद्दा धडा शिकवेल आणि त्याला वठणीवर आणेल. तसही ती एकदा म्हणाली होती ना, एक ना एक दिवस हेच मला त्यान्च्या office मध्ये वरच्या पदावर बसवतील. तिच भविष्य खर ठरतय म्हणजे. हो, पण ति जर मॉड होऊन बालिश चा़ळे ( शनायाचा ड्रेस्/केस काप, तिच्या जेवणात जास्त
ति़खट टाक वै.) करायला लागली तर मग तिचे काय खरे नाही.
पण मधे एकदा गुरवाने तिला
पण मधे एकदा गुरवाने तिला 'प्रिय राधा' वगैरे काहीतरी लेटर लिहीलेले ना? तेव्हा तर तो जेन्युईन साऊंड झालेला .>>> अगदी अगदी. आणि जेव्हा ती चक्कर येऊन पडली तेव्हाही तो तिला तिच्या गालावर हात ठेऊन तिला उठवत होता तेव्हाही तो कुठे खोटा वाटत नव्हता.
म्हणजे ती काया कल्प करणार...... एकदम मॉड, स्मार्ट राधिका होणार....! >>> आणि शेवटी ती नवर्याला माफ करणार, पुन्हा त्याच्याकडेच जाणार.:राग:
अरे सगळे नावं ठेवत बघतात
अरे सगळे नावं ठेवत बघतात त्यामुळे trp मध्ये दोन नं वर आहे, झी किंवा इतर channels ना प्रेक्षक भावनांशी देणे घेणे नसते, तुम्ही बघता मग भोगा आम्ही दाखवू ते एवढा साधा सरळ हिशोब त्यांचा, लक्षात घ्या.
त्यात झी पेजवर कोणी दखल घेतही
त्यात झी पेजवर कोणी दखल घेतही नाही. स्टार प्रवाह वर निदान गोठ चे क्रिएटिव्ह प्रोडुसर उत्तर तरी द्यायला येतात नाराजीचे.
मला वाटत नवीन ट्रेक 'खून भरी
मला वाटत नवीन ट्रेक 'खून भरी मान्ग' स्टाईल असावा. म्हणजे ती मॉड होईल, नवर्याच्या office वर कब्जा करेल. नवर्याला सुद्दा धडा शिकवेल आणि त्याला वठणीवर आणेल. तसही ती एकदा म्हणाली होती ना, एक ना एक दिवस हेच मला त्यान्च्या office मध्ये वरच्या पदावर बसवतील. तिच भविष्य खर ठरतय म्हणजे >>>> हा अंदाज आपण सर्वानी फार अगोदर ही मांडला होता . पण तीने फक्त साड्यांचा चॉईस आणि केशभूशा बदलली .आता ती सुप्रिया निमकर तिला या कामात काही मदत करेल का?
आणी गुरुला मॉडर्न च बायको हवी
आणी गुरुला मॉडर्न च बायको हवी आहे तर मग रेवतीचे उदाहरण समोर आहेच की. ती किंवा समिधा कुठलाही थिल्लरपणा न करता मॉडर्न दिसतात. >> अगदी अगदी .
पण त्या समिधा ला मात्र शन्या एक्दम "क्लास" वाटली होती. गुरुला अशीच शोभते म्हणे .
मला वाटले कि ती नव्याने स्वतः
मला वाटले कि ती नव्याने स्वतः चे जग निर्माण करेल ज्यात गुरुला जराही जागा नसेल, पण आता तुमच्या पोस्ट वाचून निराशा झाली
आधी जे बालीश चाळे करून ती
आधी जे बालीश चाळे करून ती शन्याला त्रास द्यायची तसेच चाळे करून गुरूला पीडणार, पुढील भागात मध्ये दाखवलं. त्या दोघांना एकत्र बघितल्यावर ती रडते ते साहजिक आहे पण त्या टूरवरच्या बायकांनाही ती सगळं सांगते आणि त्यांची सहानूभुती मिळवते. एवढ्या खाजगी गोष्टी चार दिवसांसाठी भेटलेल्या माणसांबरोबर शेअर करणे म्हणजे...असोच
सोनाली मला वाटत ती कपूर
सोनाली मला वाटत ती कपूर साहेबांना सांगुन शनायाला ऑफिस मधून काढुन टाकेल. कालच्या भागात ( म्हणजे जो आज गुरुवारी दाखवतील तो ) तिची सासु विचारते की गुरु भेटला का? तो कुठे आहे? असे ऐकल्यावर तिच्या चेहेर्यावर तीव्र संताप दाटुन येतो. तो अभिनय मला तरी नैसर्गीक वाटला, कारण अनिता दाते चांगली स्टेज अॅक्टर पण आहे.
झी च्या मालिका रद्दड असतात, पण कलाकार एवढे छान मिळतात त्यांना की त्याच करता आपण पहातो. अभिजीतने गुरु, रसिकाने शनया आणी बाकी कलाकारांनी त्यांची कामे चांगली व चोख केलीत. एखाद-दोन अपवाद सोडुनच द्यावे लागतात.
मला वाटत ती कपूर साहेबांना
मला वाटत ती कपूर साहेबांना सांगुन शनायाला ऑफिस मधून काढुन टाकेल >> असं झालं तर खर तर चांगलं होईल . कारण तिने तिला आधीच माफ न करता काढून टाकलं असत तर ? वेगळंच चित्र असत पण नाही त्यांना मालिका वाढवायची आहे . अजूनही टीआरपी असेल
पण हापिसातून काढून काय हाशिल?
पण हापिसातून काढून काय हाशिल? गुरूच्या मनातून शनाया जाणं जास्त महत्वाचं आहे ना? पण हे झी वाल्यांना काय कळणार? मला तर वाटते राधिका ने चांगली कोर्टात केस करून नामोहरम करावे गुरूला..
हो ना.....तिला भलेही ऑफीसातून
हो ना.....तिला भलेही ऑफीसातून काढून टाकलं तरी ती गुरवाला भेटल्या शिवाय (आणि गुरव तिला भेटल्या शिवाय!) राहणारे का?
ती केसरी टूर्स ची जहिरात कधी
ती केसरी टूर्स ची जहिरात कधी बंद करणारेत? फिनिक्स उडायला लागण्याचं श्रेय पण केसरीलाच!
Pages