माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झी वर एक ती बाई नथ घालते , चंद्रकोर लावते आणि मग गॉगल काय न तुरेवाला फेटा काय अगदी आवडल नाही .

शनायाला गुरुचे चरण आय मीन बूट पुसायला लावून एवढा काय पराक्रम केला राधक्काने? ते लगेच मागे 'हा s s s हा s s s' म्युझिक वाजवायला लागले ते>>>> राधिकाच्या पतीप्रेमाची व्याख्या जर नवर्याची दिवसरात्र सेवा करणे आणि त्याचे बूट पुसणे हिच असेल त्याला आपण पामर प्रेक्षक काय करणार? ती फक्त पहिल्या एपिसोडमध्ये, गुरुच्या खिशातून फोन चोरणे, आणि गुढीपाडव्याच्या दिवशीच रोमान्टिक वागलीये गुरुबरोबर, आणि तो रोमान्ससुद्दा नावापुरताच.
राधिकाने शनायाला गुरुचे बूट पुसायला लावले म्हणजे शेवटी तिला नवर्याचे पराक्रम कळले वाटत. त्यापेक्षा तिने गुरुलाच त्याचे बूट पुसायला लावले असते तर मानल असत तिला.

हल्ली ते...."एकच वादा...... टेंशन (?) ज्यादा...>>>> Rofl खरच .. टेंशनच देतात झीमच्या मालिका.

. "उंचा स्टेटस है इनका....." आणि मग ...ऑफ ऑल पर्सन्स....शिव - गवरी व राधिका-गुरु येतात व तिच्या कडे पाहून हसतात! ...>>>> शिव गवरी आणि राधिका गुरु कधीपासून उंचे स्टेटसवाले झाले? Uhoh

उंचा स्टेटस है इनका ..
एकच वादा कनेक्शन ज्यादा.. >>> झीमराठी ची जाहीरात हिन्दिमध्ये? Uhoh

सुलू... Happy
हो ना...
आणि रावि, खरेच, ती बाई नथ घालते , चंद्रकोर लावते...आणि मग बुलेट वर बसून जाते... अगदी आवडत नाही सिक्वेंस....
हल्ली फिलर सारखेच लावायला लागले आहेत...मलिका बहुदा लवकर संपतात वेळेआधी..काही कंटेंट च उरला नाहीये ना...!

हायला, चिंचे मी पण ते टेंशन जादाच ऐकत आलेय कायम. Proud काहीतरी चुकतंय असं वाटायचं पण कधी सरळ ऐकूच आलं नाही आणि मी जवळ जाऊन ऐकायचा प्रयत्न पण केला नाही.

खरेच, ती बाई नथ घालते , चंद्रकोर लावते...आणि मग बुलेट वर बसून जाते... अगदी आवडत नाही सिक्वेंस....
हल्ली फिलर सारखेच लावायला लागले आहेत...मलिका बहुदा लवकर संपतात वेळेआधी..काही कंटेंट च उरला नाहीये ना...!>> ती झी मराठी ची जाहिरात आहे. HDवर प्रत्येक सिरियल नंतर लागते कारण सिरीयल च्या ब्रेक मध्ये इतर जाहिराती नसतात. त्यामुळे एपिसोड २३-२४ मिनिटात संपतो. मग असं फिलर सारखं हे आणि चहयेद्या चे भाग दाखवतात

अगं क्रांती ते काका मुर्ख नाहीयेत, आपणच मुर्ख बनलोत. मागे ठरवले होते की ही भुक्कड सिरीयल पहायची नाही. पण काका ( दामले-नाना) बाँब फोडणार आहेत असे कळल्याने पहायला बसले, मग त्यात समिधा नावाची मांजर मध्येच अवतरल्यावर पुढचा भाग मला आधीच कळला. मुळात असले ध्यान घरात असताना, नाना, महाजनींचा मोबाईल स्वतःकडे कशाला ठेऊन घेतात हे ते आणी लेखक व निर्माताच जाणे. दररोज डाळीत ओततायत पाणी. बाकी अभिजीत ने गुरुनाथचा रोल चांगला वठवलाय. अगदी लबाड, संधीसाधू, बेरकी वगैरे वगैरे...

अरे बापरे काय भयानक चाललंय, बघणा-यांच्या सहनशक्तीला दंडवत.

आता त्या समिधाच्या नव-याने अफेअर नाटक करायला हवं.

अंजू, अगदी अगदी. काही महिन्यापूर्वी माझ्या मनात हेच आले होते की समिधाला धडा शिकवायला तिच्या नवर्‍याने असेच नाटक करायला हवे. पण त्या बद्दड लेखकाला आणी निर्मात्यांना आपले पोट भरायचे आहे की. आजचा भाग म्हणजे बालिशपणाचा कळस आहे, काल झलक बघीतली.
Firing Cat

भारती पाटील आसाख मध्ये आल्या होत्या. छान दिसत होत्या एकदम तरूण आणि मालिकेपेक्षा वेगळ्या. बोलल्याही छान. मानसीही आली होती एका भागात. मालिकेत दिसते त्यापेक्षा जास्त कळकट दिसत होती आणि तिच्या भयाण मराठीत तिने सुरेश भटांची एक कविता म्हटली. त्यांच्या कवितेचा अपमान होता तो Angry

राधक्काच पाणचटपणा परत चालू झाला . कधी सुधारणार ही बाई ??? >>> आता काय केल हिने? सध्या ही सिरियल बघायची सोडून दिलीये मी.

बादवे, राधाक्का modern होणार होत्या, झाल्या का?

भारती पाटील आसाख मध्ये आल्या होत्या. छान दिसत होत्या एकदम तरूण आणि मालिकेपेक्षा वेगळ्या. बोलल्याही छान. मानसीही आली होती एका भागात. >>> शनाया सुद्दा आली होती एका भागात.

रश्मी, स्माईली मस्तय. Happy

धन्यवाद चैत्राली, अंजू, सूलू.
मला वाटत की करिष्मा आणी सलमानचा एक असा पिक्चर होता ना, ज्यात सुष्मिता सेन, सलमानची मॉडर्न प्रेयशी असते, मग नवर्‍याला धडा शिकवायला करिष्मा बहुतेक अनिल कपूरची मदत घेऊन मॉडर्न बनते, मग सल्लु बाबाजी सुधरतात.

पर्याय : नंबर १: - समिधाच्या नवर्‍याने लफडे करण्याचे नाटक करावे

नंबर २:- राधाक्काने मॉडर्न बनुन नाच गाणी करुन भैताड नवर्‍याला सुधरवावे.

नंबर ३ :- महाजनी डिटेक्टीव्ह गिरीत फेल झाल्याने त्यांनी ते काम रेवती+ गुप्ते भाऊ+ शन्याचा जुना प्रियकर+ जेनी अशा चार यारांना सोपवावे.

नटुकाकी असु द्या हो. उगाच या तिघांची भैताड गिरी पाहुन डोक्याला ताप करुन घेण्यापेक्षा, लेखकाने ही मालिका विनोदी बनवावी हे उत्तम.

अंजू, हे आपले डॉयलॉग झी च्या फेसबुकावर टाक की, मजा येईल. कॉपी पेस्ट कर इकडुन तिकडे.

शन्या आणी गुरु आज खुश होऊन नाचतायत बघ.Happy Times

नंबर २:- राधाक्काने मॉडर्न बनुन नाच गाणी करुन भैताड नवर्‍याला सुधरवावे.
>>
झी ची आदर्श सुनबाई असे करणे शक्यच नाही.

अंजू, हे आपले डॉयलॉग झी च्या फेसबुकावर टाक की, मजा येईल. >>> नको, ब्लॉक करतील मला, मागे राधिकाला डोस पाजून आले आणि गौरीला अभिनय येत नाही म्हणून मी बघत नाही हे लिहून आले, आता भडकतील माझ्यावर.

Happy
मला ते पुन्हा विचारायचं आहे..."एकच वादा, टेंशन ज्यादा" बद्दल...
ठीके , मान्य करु की ते "कनेक्शन ज्यादा....." असं आहे...पण मग हा वादा कुणी कुणाला केलाय? कनेक्षन ज्यादा...म्हणजे झी वाल्यांनी ज्या कुणाला एच डी चं कंत्राट दिलं असेल ते झी ला सांगताहेत ना...की आम्ही मॅक्झिमम कनेक्षन्स करुन देऊ एच डी ची.....!!! राईट?
मग आम्हा प्रेक्षकांना का सांगताय हे ओरडून? हा तुमच्या अ‍ॅग्रिमेंट मधला स्कोप ऑफ वर्क? काहीही...!! ही इल्लॉजीकल गाणी आमच्याच माथी का म्हणून? Angry

आज गुप्ते म्हणत होता की आम्ही सोसायटीत सार्वजनिक गणेशोत्सव बसवतोय. मालिकाच धन्यवाद आहे म्हटल्यावर संवादही त्याच लायकीचे असणार. रसिका फारच गोड आहे मात्र. ती गॅरीच्या आईवडिलांना आॅरेंजेस म्हणते. बाकी सतत बर्गर, पास्ता आणि पिझा खाऊन ती अशी फिगर मेंटेन करते हे अशक्य आहे.

आम्ही सोसायटीत सार्वजनिक गणेशोत्सव बसवतोय. >>>> Rofl

बाकी सतत बर्गर, पास्ता आणि पिझा खाऊन ती अशी फिगर मेंटेन करते हे अशक्य आहे. >>>>> + १११११११११

आम्ही सोसायटीत सार्वजनिक गणेशोत्सव बसवतोय. ..... Biggrin असं म्हणाला गुप्ते? काहीही दाखवतात.
पण रसिका खरंच गोड दिसते....तिला म्हणे राधिका (अनिता दाते) आवडते!!
रेवती किती छान दिसते हल्ली! बारीक झालीये.

रेवती आणि समिधा दोघी छान दिसतात, छान रहातात. राधिका तशी राहू शकते ना, सदा न कदा त्या साड्या कशाला ?

रेवती आता गुप्ते न म्हणता नावाने हाक मारते आणि गुप्ते पण तिला रेवती म्हणतो आता, हा बदल कधी झाला ?

रेवती आता गुप्ते न म्हणता नावाने हाक मारते आणि गुप्ते पण तिला रेवती म्हणतो आता, हा बदल कधी झाला >>> हो हो . मी पण तेच विचरणार होते .
मध्येच एकदा पाहिले तेन्व्हा ती म्हणत ती , "आज दूपारी सुबोध आला" . मी एक्दम दचकले .

प्रगती झाली का.. Happy

काल प्रोमो दिसला या शिरेलीचा तर राधिका शनायाला सांगत होती की आता तिच्याकडे (शनयाकडे) फक्त 10 दिवसच शिल्लक आहेत सोसायटी सोडून जाण्यासाठी.
मी मागे कधीतरी बघितलं तेव्हा राधाक्काने तिला 30 दिवस दिले होते.. कशासाठी ते आठवत नाही पण हे त्यातलेच 10 दिवस उरलेत की काय अजून. Uhoh की राधाक्का नि शनायाचा नवीन टास्क सुरू आहे??

शनाया गॅरीकडे स्वतःचा 3 BHK मागतेय लगेच. Uhoh काय चाॅकलेट आहे का काय.. गॅरी म्हणजे काय अंबानी नायतर टाटा वाटतो का काय तिला??

आणि हा बूळचट माणूस नुसतं म्हणतो असा खर्च करत राहिलो तर कर्जबाजारी होईन... Uhoh इतकंच.. ???
अरे 'देत नाही जा' म्हणावे ना तिला...

गॅरी अतिनिर्लज्ज आणि मठ्ठ दाखवल्यामुळे तो फार काही पैसे मिळवत असेल यावर विश्वास ठेवणे शक्य होत नाही; तसेच भविष्यकाळात सत्य समोर आल्यावर जेव्हा राधिका त्याला माफ करेल (दुसरी अपेक्षाच नाहीये ) ते ही अजिबातच न पटणारं असेल

Pages