माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधिकाशी रोमँटिक वागताना गुरु जाम्भया देत होता हे पाहून मला गुरुची दया आली आणि राधिकाचा राग. ज्या माणसाला आपल्या बायकोशी साधा रोमान्स करायला कन्टाळा येतो, तिच्या साडीच्या निर्या नीट करण त्याला कमीपणाच वाटत, जिच्याबरोबर त्याला बेडरुमही शेअर करावीशी वाटत नाही, अश्या माणसाला ही बाई लग्नाच्या बन्धनात जबरदस्तीने का अडकवून ठेवते? गुरुला राधिका अजिबात आवडत नाही हे त्याच्या कालच्या वागण्यावरुन स्पष्ट दिसून येत होत. मग का हा राधिकाचा अट्टाहास एकत्र राहण्याचा? मी माझ्या नवर्यासाठी काहीही करीन अस बोलते ना ही, मग सिद्द करुन दाखव तस, घटस्फोट दे त्याला.
शनाया दिवसेनदिवस कोडगी होत चाललीय हे तिला दिसतय, पण आपला नवरा महाकोडगा झालाय हे नाही कळत तिला. Angry

अश्या माणसाला ही बाई लग्नाच्या बन्धनात जबरदस्तीने का अडकवून ठेवते? गुरुला राधिका अजिबात आवडत नाही हे त्याच्या कालच्या वागण्यावरुन स्पष्ट दिसून येत होत >>> गुरुलाही तिला सोडायचे नाहिये. ती एक चांगली बायको, आई, सुन इत्यादी आहे. फक्त त्याला रोमान्स करायला शनाया हवी आहे. बाकी सगळी काम करायला, काळजी घ्यायला बायकोही पाहिजे Angry

गुरुलाही तिला सोडायचे नाहिये. ती एक चांगली बायको, आई, सुन इत्यादी आहे. फक्त त्याला रोमान्स करायला शनाया हवी आहे. बाकी सगळी काम करायला, काळजी घ्यायला बायकोही पाहिजे>>माझा तर बाई गोंधळच होऊन राह्यला.
असं काहून होऊन राह्यलं
असं सगळ्याच पुरुषांना आणि मग बायाना पण वाटायला लागलं तर?

ज्या माणसाला आपल्या बायकोशी साधा रोमान्स करायला कन्टाळा येतो, तिच्या साडीच्या निर्या नीट करण त्याला कमीपणाच वाटत, ............ :-)....सुलू, ही भंपक सिरीयल जाऊ दे...पण प्रत्यक्षात नवरे असेच वागतात! म्हणजे शनया सारखं अफेअर वगैरे नसतं काही त्यांचं...पण बायको ही फक्त घरातली कर्ती बाई ,मुलांची आई अशी असते....... नॉट इव्हन अ फ्रेंड, फर्गेट अबाऊट लव्ह अँड ऑल!

पण प्रत्यक्षात नवरे असेच वागतात! म्हणजे शनया सारखं अफेअर वगैरे नसतं काही त्यांचं...पण बायको ही फक्त घरातली कर्ती बाई ,मुलांची आई अशी असते....... नॉट इव्हन अ फ्रेंड, फर्गेट अबाऊट लव्ह अँड ऑल! >>> असं काही नाही हा असतात बरेच जण बायको वर प्रेम करणारत, तीला मदत करणारे, समान हक्क देणारे

प्रत्यक्षात नवरे असेच वागतात! म्हणजे शनया सारखं अफेअर वगैरे नसतं काही त्यांचं....पण बायको ही फक्त घरातली कर्ती बाई ,मुलांची आई अशी असते....... नॉट इव्हन अ फ्रेंड, फर्गेट अबाऊट लव्ह अँड ऑल!????? आंबटगोड, का ग एवढं टोकाचं? हे जनरलायझेशन चुकीचं आहे हे तुलाही माहित असणारच.

पण प्रत्यक्षात नवरे असेच वागतात! म्हणजे शनया सारखं अफेअर वगैरे नसतं काही त्यांचं...पण बायको ही फक्त घरातली कर्ती बाई ,मुलांची आई अशी असते....... नॉट इव्हन अ फ्रेंड, फर्गेट अबाऊट लव्ह अँड ऑल! >>> असं काही नाही हा असतात बरेच जण बायको वर प्रेम करणारत, तीला मदत करणारे, समान हक्क देणारे>>> करेक्ट.

पण प्रत्यक्षात नवरे असेच वागतात! म्हणजे शनया सारखं अफेअर वगैरे नसतं काही त्यांचं...पण बायको ही फक्त घरातली कर्ती बाई ,मुलांची आई अशी असते....... नॉट इव्हन अ फ्रेंड, फर्गेट अबाऊट लव्ह अँड ऑल!>>>> जनरली अरेन्ज marriage मध्ये बायकान्बद्दल असाच गैरसमज असतो नवर्यान्चा. लव marriages बद्दल माहीत नाही बुवा. पण काही बायका सुद्दा आपल्या नवर्याबद्दल असाच विचार करत असतील की.

असं सगळ्याच पुरुषांना आणि मग बायाना पण वाटायला लागलं तर? >>>> तर मग भारताची पुर्ण अमेरीका होईल. अर्धी तर झालीच आहे म्हणा.

तो वैभवलक्ष्मी मधला रमेश भाटकरचा मेव्हणा झालेला गॉगल घातलेला वेटर झालाय. कालच्या भागात दाखवला.

गुरुलाही तिला सोडायचे नाहिये. ती एक चांगली बायको, आई, सुन इत्यादी आहे. फक्त त्याला रोमान्स करायला शनाया हवी आहे. बाकी सगळी काम करायला, काळजी घ्यायला बायकोही पाहिजे>>>> Angry

ते काही असले तरी...... अश्या वागण्याने गुरुने स्वत:चे माकड करुन घेतले आहे आणि असेच करत राहिला तर लवकरच कर्जबाजारी सुद्धा होईल तो. असा माणूस जास्त काळ सुखी राहू शकत नाही एव्हढे जरी या मालिकेत दाखविले तर बरे होईल.

राधिका जशी विचार करते तश्या विचारसरणीच्या बायका असतात, ज्या नवरासोडून दुसर्‍या बाईलाच दोषी ठरवतात. कारण त्यांचा एक कम्फर्ट झोन असतो त्यातून बाहेर पडण्याची त्यांची ईच्छाही नसते. त्यातून तिला साथ देणारे (येथे सासु-सासरे आहेत) असतिल तर नाहीच.

मला खरंच माहीत नाही या राधक्का सारख्या बायका आजच्या जगात असतात की नाही.. तिला साधं नवऱ्याचं खरं प्रेम आणि खोट खोटं प्रेमाचं नाटक ही कळू नये...नवरा सोडा पण एखादी तिऱ्हाइत व्यक्ती मग पुरुष असो वा स्त्री यांच्या वागणुकीवरीनही एखाद्याला नक्कीच कळत... आणि जर मालिका एवढी सिरीयस विषयासाठी बनवली नसून फक्त विनोदी म्हणून पहायची असेल तर पूर्ण विनोदी तरी दाखवा ना...हलक्या फुलक्या प्रासंगिक प्रसंगातून विनोदनिर्मिती करता येऊ शकली असती...पण इथे लेखकच भैताडलाय नक्की काय दाखवाचय....गंभीर का सामाजिक संदेश देणारी का ट्राजेडी का विनोदी ...

( एकदाची ) ही भैताड मालिका संपते आहे का ? नवीन २ मालिका सुरू होत आहेत आणि वेळ नाहि दाखवली आहे दोन्हींची.

आज जर राधाक्का ला कळणार असेल गॅरीचं सत्य, तर ती त्याला सोडेल, मग त्याला पश्चाताप वगैरे गुंडाळता येऊ शकेल ( त्या स्वानंदी च्या मालिके सारखं ) आणि एकदाचे प्रेक्षक सुटतील ......

डिनर एपिसोड म्हणजे बिन्डोक पणाचा कहर होत ! तिन्ही पात्रं, लेखक, दिग्दर्शक सर्वच स्पर्धेत उतरले आहेत. सर्वात जास्त कोण

डिनर एपिसोड म्हणजे बिन्डोक पणाचा कहर होत >>> तिच्या डोळ्यावर पट्टी , तो वेटर तिला खायला भरवतोय असं काहीतरी पाहिल.

डिनर एपिसोड म्हणजे बिन्डोक पणाचा कहर होत ! >>> खरच आचरटपणा होता सगळा Angry

आज जर राधाक्का ला कळणार असेल गॅरीचं सत्य, >>> मला नाही वाटत तिला कळेल. मंद आहे ती एकदम. मंदाकिनी

तिच्या डोळ्यावर पट्टी , तो वेटर तिला खायला भरवतोय असं काहीतरी पाहिल. >>> मी पण पाहिला तो सिन, वाट लागली हसुन
तो वेटर तर पुर्ण वेडाच वाटत होता

काल हा सिन मधुनच पाहिला ( मातोश्रीना उढचा पार्ट लावुन देताना) तर राधिकाने फक्त डाव्या बाजुला बघितल तरी शन्या तिला दिसली असती अशा सीटवर गुरूने तिला बसवल होत.

तिन्ही पात्रं, लेखक, दिग्दर्शक सर्वच स्पर्धेत उतरले आहेत. सर्वात जास्त कोण>>> भैताड!

आज जर राधाक्का ला कळणार असेल गॅरीचं सत्य, >>> मला नाही वाटत तिला कळेल. मंद आहे ती एकदम. मंदाकिनी>>>> हो ना, उलट ती गॅरीला म्हणेल, "अहो कुठे होता तुम्ही? मी तुम्हाला hotel भर शोधून राहयले?

भैताडलेली (पछाडलेली च्या चालीवर) मंदाकिनी >>>:हहगलो:

मंदाकिनी वाचल्यावर राज कपूर आठवतो मला. Biggrin

मी पण पाहिला तो सिन, वाट लागली हसुन
तो वेटर तर पुर्ण वेडाच वाटत होता >>>> ++१११११

हो ना, उलट ती गॅरीला म्हणेल, "अहो कुठे होता तुम्ही? मी तुम्हाला hotel भर शोधून राहयले? >>>> हाच की असाच डायलॉग मारला की तीने

डोंगर पोखरुन उंदीर काढला भैताडाने. तो समिधा गुरुचा नवरा आहे ? तरीच डाळीत एवढे पाणी ओततोय भसाभसा. राधिकाबैना आताच सगळे कळले तर लेखक महाशयांच्या दाढीवर चुकलं पोटावर पाय येणार नाही का?

कालचा भाग मुर्खपणाचा कहर होता. राधिका वॉशरुमकडे जाताना शनायाला लगेच टेबलाखाली बघायला सांगणे, श्रेयसने नवीन घड्याळ दिले आहे यावर राधाक्कांचा विश्वास बसणे. नवरा सतत कुठेतरी कारण काढुन उठुन जात असेल तर दुसर्‍या बाईल नक्कीच संशय आला असता. आणी तिने त्याचा ( वॉशरुम सोडुन ) सतत पाठलाग केला असता आणी दामटुन एका जागी बसवला असता. इथे ही येडचाप काहीच करत नाही.

कळलं का राधाक्काला ?>>

राधाक्काला समदं माहिती हाय तो रायटर अन दिग्दर्शक ह्यांना प्रेक्षकांना कळून द्यायचं नाई कि तिला समदं ठाव हाय!
दुसर्‍या सिरलीची यवस्था लागे पतुर चालू ठेवू म्हनं!

तो समिधा गुरुचा नवरा आहे ? >>>>> मी पण गोंधळले होते . पण या वाक्याचा , समिधा दामले आणि गुरुनाथ सुभेदार यांच्याशी काही संबंध नाही .
तो ( केडी) , "समिधा गुरु" चा नवरा आहे . Happy

मी पण गोंधळले होते . पण या वाक्याचा , समिधा दामले आणि गुरुनाथ सुभेदार यांच्याशी काही संबंध नाही .>>>>:हहगलो:

काल झी talkies वर कापूसकोन्डयाची गोष्ट लागला होता, त्यात समिधा गुरु होती.

कोण समिधा गुरु?..?

राधिका नेहमी म्हणते.... " आव...तुम्ही तर कैच्या काईच बोलून राह्यले नं...."...
ते इतकं इरिटेटींग होतं ना...गुर्वाचे इरिटेशन अगदी साहजीक आहे! नागपूरचे लोक असे बोलत नाहीत!
शनायाने गुरवाच शर्ट फाडला ते पाहून हसता हसता पुरेवाट झाली...का ही ही दाखवतात.

कोण समिधा गुरु >>> मनोरंजन क्षेत्रात काम करते. कमलामधे शरयुची बहीण सारिका होती. तिचा नवरा अभिजीत गुरु हा लेखक, अभिनेता आहे.

Pages