माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>राधिकाला सगळ कळणार आहे....>>
अस किती वेळा तरी दाखवतात प्रोमो मध्ये की राधक्काला कलनार हा....आणि त्यात एपिसोड वर एपिसोड करतात आणि कळत तर काहीच नाही त्या माठाला... आणि 2/3 महिन्यानंतर कळलं तरी काय फारसा फरक पडणारे... मग परत तेच रडगाणं.. माह्ये हे कसे चांगले आणि शन्याने कस माह्या गरीब गॅरोबाला नादाला लावलं....मग परत बालिश वेडे चाळे माकड चाळे करेल... मग परत टेम्पररी शन्योबा आणि गॅरोबा वेगळे ,मग परत हा माठ खुश, मग परत एकत्र ,मग वेगळे ,मग परत माठोबा खुश...मग परत परत तेच....आवरा अरे मालिकेला...

मी जे काही भाग पाहिले त्यात ती माधवी निमकर गाडीतून उतरल्यावर ड्रायव्हर ला थोतरीत देते. आणि म्हणते अर्जंट ब्रेक लावल्याबद्दल तुला मारलं Uhoh अर्जंट ब्रेक दाबला नसता आणि हिचा कपाळमोक्ष झाला असता तर चाललं असतं का? पुढची हाईट म्हणजे गाडी नेहमिपेक्षा मागे थांबवल्यामुळे २ स्टेप मागे उतरावे लागले, आणि देविकाला मागे जायला आवडत नाही... Uhoh हा कसला बळंचकर डायलॉग? Uhoh

माधवी निमकर गाडीतून उतरल्यावर ड्रायव्हर ला थोतरीत देते. आणि म्हणते अर्जंट ब्रेक लावल्याबद्दल तुला मारलं>>>>> हे कुठल्या वेगळ्या सिरीयलचं आहे की ह्यतच आलंय नवं काही?

हे कुठल्या वेगळ्या सिरीयलचं आहे की ह्यतच आलंय नवं काही? >> यातच नविन आहे . तीचे राधिकाच्या दूकानाशेजारी हॉटेल की काही आहे .
आता ती रधक्का चे दूकान बंद पाडणार आहे . ईशी ने शन्याला सांगितल , की हीच्याशी मैत्री कर म्हणजे राधिका आंटीला तुला त्रास देता येईल .

अरे बास कारा म्हणावं आता. हिच्या नवर्‍याची बायको आणि त्रास आपल्याला. >> Rofl खरंच.

त्या राधिकाच्या मसाल्याच्या पोत्यांवर कुणितरी पाणि ओतून ठेवलं होतं एक दिवस.
आणि काय नॉनसेन्स आहे कळ्त नाही. त्या पाणि ओतण्याच्या प्रसंगात राधिकाची एक मदतनीस डायरेक्ट बोलते ही हे शेजारच्या हॉटेलिणीचे काम आहे तेव्हा राधिका तिला म्हणते असं डायरेक्ट आरोप करणं योग्य नाही.
आणि लगेच जेव्हा ही हॉटेलिण येते तेव्हा राधिका तिला म्हणते "तुम्हाला मला त्रासच द्यायचा आहे ना.." Uhoh च्यायला ज्ञान सांगे लोका आणि शेम्बूड माझ्याच नाका... एकिकडे मदतनीस ला म्हणायचं आरोप करू नको, पण तुम्हाला मला त्रास दयायचाय ना.. ? द्या.. हे वाक्य म्हणजे काय आरती ओवळण्याचा प्रकार आहे का? Uhoh

केबिन मध्ये कोण गुरु आणि आनंद होता का ? >> प्रोमोत पाहिलं त्यात शन्या टेबलावर बसून गॅरोबाला सांगत होती की मला (तिला) भरव.. असं काहितरी Proud

हॉटेलिण> Lol

एकिकडे मदतनीस ला म्हणायचं आरोप करू नको, पण तुम्हाला मला त्रास दयायचाय ना.. ? द्या.. हे वाक्य म्हणजे काय आरती ओवळण्याचा प्रकार आहे का?>>> येड्छाप डायलॉगासाठी कुणी ह्यांचा हात धरु शकत नाही.

दक्षिणा, ती माधवी निमकर गाडीतून उतरल्यावर ड्रायव्हर ला थोतरीत देते. ...हे वाक्य वाचून इतकं हसायला येतंय मला ....कांट कंट्रोल.
बळंचकर डायलॉग....... !! rofl.gif
Lol
झीम च्या दुर्दैवाने त्यांना प्रेक्षक हे अतिशय चाणाक्ष आणि तल्लख आणि काय काय असे मिळालेले आहेत.... खास तुझ्या सारखे..... त्यामुळे ते सगळ्याच चुका अगदी क्षणार्धात ओळखतात ....

हॉटेलीण - शब्द मस्त!!

केबिन मध्ये कोण गुरु आणि आनंद होता का ? >> प्रोमोत पाहिलं त्यात शन्या टेबलावर बसून गॅरोबाला सांगत होती की मला (तिला) भरव.. असं काहितरी>>
केबिनमध्ये गुरु शनायाच असतात. आधी शनाया गॅरीच्या समोर टेबलवर बसलेली असते. राधिका येतेय हे कळल्यावर समोरच्या खुर्चीवर बसलेली असते. (मी एवढंच बघितलं)

पण हाॅटेलणीला हिच्या मसाल्याच्या दुकानाचा काय त्रास???

कालच माता राधाक्का रेवतीला म्हणत होती, "आज जे जे मला त्रास देतायत ते सगळे एक दिवस माह्या बाजूने उभे असतील, अगदी ती शन्या पण. आणि तो दिवस लवकरच येईल." Uhoh Angry

>> हॉटेलिण,बळंचकर...
एक नंबर शब्द आहेत हे... माबोच्या शब्दसंग्रहात ऍड करायला हवेत..

कालच माता राधाक्का रेवतीला म्हणत होती, "आज जे जे मला त्रास देतायत ते सगळे एक दिवस माह्या बाजूने उभे असतील, अगदी ती शन्या पण. आणि तो दिवस लवकरच येईल.">>> मला वाटत हि राधिका सिरियलच शिर्षक आणि Title Song च्या शेवटी दाखवलेला तो सोफ्यावरचा शनायाला उडवण्याचा प्रसग्न सार्थ करणार आहे सिरियलच्या शेवटी. सिरियलच्या शेवटी शनायाला गुरुची दुसरी बायको म्हणून तिचा स्वीकार करेल आणि तिला गुरुच्या घरात राहू देईल. वरती तिने गुरुचा पैसा खाऊ नये म्हणून तीही घरात राहील शनायावर watch ठेवायला. म्हणूनच ती काल म्हणत होती ना, आज जे जे मला त्रास देतायत ते सगळे एक दिवस माह्या बाजूने उभे असतील/ माह्या बरोबर असतील, अगदी ती शन्या पण. आणि तो दिवस लवकरच येईल.
शेवट काहीही दाखवा पण हि सिरियल लवकरात लवकर सम्पवा. डोक्याला ताप नुसता. Angry

अरे बास कारा म्हणावं आता. हिच्या नवर्‍याची बायको आणि त्रास आपल्याला. >>> अगदी अगदी

. आणि 2/3 महिन्यानंतर कळलं तरी काय फारसा फरक पडणारे... मग परत तेच रडगाणं.. माह्ये हे कसे चांगले आणि शन्याने कस माह्या गरीब गॅरोबाला नादाला लावलं....मग परत बालिश वेडे चाळे माकड चाळे करेल... मग परत टेम्पररी शन्योबा आणि गॅरोबा वेगळे ,मग परत हा माठ खुश, मग परत एकत्र ,मग वेगळे ,मग परत माठोबा खुश...मग परत परत तेच....>>> हा सिलसिला अर्थव मोठा होईपर्यन्त चालू, मग अर्थव बापावर जाईल, त्याचे college मध्ये वेगळे उपद्व्याप सुरु, राधिकाला मात्र माह्या नवरा आणि मुलगा किती सदगुणी अस वाटेल, गुरु म्हातारा होईल आणि शनाया चाळीशीची होईल तरी पण त्याचे बच्चा, बच्चा चालूच, राधिकाचे सासु-सासरे आणि सोसायटीतील इतर सिनियर मन्डळी स्वर्गवासी झालेले, गुरु-शनायाची मुलगी भक्ती साम्भाळते. तरीही राधिकाचे माह्या नवरा, शन्या तुला मी सोडणार नाही, मी तुला चान्गला धडा शिकवीन, चालूच.

प्रोमोत पाहिलं त्यात शन्या टेबलावर बसून गॅरोबाला सांगत होती की मला (तिला) भरव.. असं काहितरी>> ति त्याच्याकडे एक दिवस मागत होती. जस्ट यु एन्ड मी म्हणे.

म्हणजे आज गुरुनाथ शनायाबरोबर एक दिवस एक रात्र घालवणार म्हणे. Uhoh Angry आता हे तरी त्या माठ राधिकाला आणि गुरुच्या आईला कळू दे म्हणजे झाले, प्रेक्षकान्वर देव पावला असे म्हणेन मी.

>>>गुरु-शनायाची मुलगी भक्ती साम्भाळते. तरीही राधिकाचे माह्या नवरा, शन्या तुला मी सोडणार नाही, मी तुला चान्गला धडा शिकवीन, चालूच.>>> हा हा...सहीच... गुरु-शनायाची मुलगी... गॅनाया गुरुनाथ सुभेदार... आणि राधक्का तिलाही
सांभाळेल... माह्या ह्यांच्या हाडा मांसाची मुलगी.. तिला मीच सांभाळणार.. कुछ भी हो सकता हैं..

गॅनाया गुरुनाथ सुभेदार>> >>>> अगंग Rofl

त्या दिवशी गुरुच्या आईला काय झटका आलेला पुत्रप्रेमाचा? त्या म्हातर्‍या माणसाला वाटेल तसं बोलत होती गुरुची बाजु घेउन.

ते महाजनी काही केल्या सुधारत नाही. त्याचा अविर्भाव एकुण राधाक्काच्या काळजीपेक्षा गुरू च प्रकरण उघड करण्यात जास्त रस असल्यासारखा वाटतो. बरं पुरावे ही अगदी बालिश पद्धतीने गोळा करतात.

गॅनाया गुरुनाथ सुभेदार>>>> Lol

ते महाजनी काही केल्या सुधारत नाही. त्याचा अविर्भाव एकुण राधाक्काच्या काळजीपेक्षा गुरू च प्रकरण उघड करण्यात जास्त रस असल्यासारखा वाटतो. बरं पुरावे ही अगदी बालिश पद्धतीने गोळा करतात.>>> नैतर काय. मला तर अशी शन्का येतेय, पत्रकार असताना office मध्ये सुद्दा हे असेच ओरडत येत असतील ब्रेकिन्ग न्यूज मिळाल्यावर. Lol किती ते ओरडत दुसर्यान्च्या घरात शिरण. Angry

बरं पुरावे ही अगदी बालिश पद्धतीने गोळा करतात.>>> महाजनी पत्रकार कसे बनले कुणास ठाऊक? Uhoh रेवतीला तरी हाताशी धरायला हव होत त्यान्नी.

शनायाला गुरुचे चरण आय मीन बूट पुसायला लावून एवढा काय पराक्रम केला राधक्काने? ते लगेच मागे 'हा s s s हा s s s' म्युझिक वाजवायला लागले ते

हल्ली ते...."एकच वादा...... टेंशन (?) ज्यादा..." वालं झी म च्या एच डी चं गाणं बरेचदा दाखवताहेत....त्यांचं चॅनेल बोस्ट करायला....
काही थीम कळत नाही...एक बाई टी व्हि ऑन करते आणि तिचं विश्वच बदलतं.....तिला अगदी अभिवादन करायला सगळे (झी म चे डायरेक्टर्स ?) उभे..नंतर ती एकदम इव्हिनिंग गाऊन मधे जिने चढते व लोक तिला सह्या मागतांना आवरले जात नाहीत...मग अचानक एक झोपड पट्टीतला शोभावा असा मुलगा येऊन आपल्यावरच खेकसून म्हणतो, .. "उंचा स्टेटस है इनका....." आणि मग ...ऑफ ऑल पर्सन्स....शिव - गवरी व राधिका-गुरु येतात व तिच्या कडे पाहून हसतात! ...... मग ती भानावर येत्ये व आपल्याला खुणावते की पहा...झी मराठी चं एच डी चॅनेल किती भारी ए.....व तुम्हालाही गुरु राधिका भेटतील.......!!!!

पण आपल्याला काहीच भारी वाटत नाही हे वेगळं...!!
आणि कुणाला ते गाणं नक्की काय आहे ते ऐकू येतंय का?

मी नाही हे गाण बघितलं. मी सगळ्या मालिका रेकॉर्ड करुन ढकलत ढकल बघते म्हणून बहुदा मिसलं असेल.

उंचा स्टेटस है इनका ..
एकच वादा कनेक्शन ज्यादा..
बोअरिंग आहे
झी मराठी एच डी झाल्यानंतर च गाणं आहे

Pages