Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे हो की , विसरलेचं
अरे हो की , विसरलेचं
अरे हो की , विसरलेचं >>>
अरे हो की , विसरलेचं >>> चालेल ग. लेखक मंडळी इतक काय काय विसरतात तू फक्त हेच विसरलिस
शनाया आली का रहायला गॅरी च्या
शनाया आली का रहायला गॅरी च्या सोसायटीत?
आणि ईशा कडे राहतेय का? पण आधी ही इशा शनायाने तिच्याकडे रहायला येणं टाळत होती ना?
आणि ईशा कडे राहतेय का? पण आधी
आणि ईशा कडे राहतेय का? पण आधी ही इशा शनायाने तिच्याकडे रहायला येणं टाळत होती ना? >>> तेच तर, शनाया गुरुकडे राहयचा plan करुन आली होती, मध्येच हिचा विचार असा कसा बदलला?
शनायाचा हा plan तिच्यासारखाच पुचाट निघाला. मोठया (अती)आत्मविश्वासाने तिने सोसायटीत प्रवेश केला, पण राधिकापुढे तिची शेळी झाली. सरळ सान्गायच ना, मला हे सगळ करायला तुझ्या नवर्याने भाग पाडलय. तुझ्या नवर्यालाच विचार की मी इथे परत का आले ते.
काल सुद्दा गॅरीच जिन्कला. मला वाटल आता ही शनाया ह्याच भान्ड फोडणार. पण हा प्रत्येक वेळी सहीसलामत सुटतो.
तर समिधाबैना गॅरोबाने
तर समिधाबैना गॅरोबाने त्याच्या हापिसात नोकरी दिलीय, नोकरी दिलीय म्हणण्यापेक्षा ती समिधाने गॅरोबाला ब्लॅकमेल करुन मिळवलीय. >>> नाही रश्मी, राधिकाने तिच्यासाठी शब्द टाकला तेव्हा त्याने तिला नोकरी दिली. गॅरीने स्वत: च्या स्वार्थासाठी तिला नोकरीवर घेतल.
आता ती माधवी निमकर कशाला
आता ती माधवी निमकर कशाला आलीये ह्या सिरियलमध्ये?
माधवी निमकर म्हणजे कोण?
माधवी निमकर म्हणजे कोण?
माधवी निमकर Uhoh म्हणजे कोण?>
माधवी निमकर Uhoh म्हणजे कोण?>>>> माधवी निमकर-कुलकर्णी, स्वप्नाच्या पलिकडले मधली अन्विता.
पण रोल कोन्ता?
पण रोल कोन्ता?
बांदेकरभाऊजी ??माय फेअर लेडी
बांदेकरभाऊजी ??माय फेअर लेडी बरोबर?? >> पूर्वी नाही का केसरीच्या माय फेअर लेडी बरोबर बरोबर जात होते बांदेकर भाऊजी. वीणा वेगळी झाल्यावर त्यांनी सोडून दिल .
आता ते वीणा travels बरोबर जातात ना?>> नाही
ती माधवी निमकर आहे का ? आज आहे तिची एंट्री
अरे आज चुकून दोन मिनिटं
अरे आज चुकून दोन मिनिटं बघितली तर शनाया आणि गॅरी पार डोक्यात गेले माझ्या. तो गॅरी स्वतःला पेटवून घ्यायला निघाला, काहीही. आई त्याची काय एकदम त्याच्यावर विश्वास ठेवायला लागली आहे. गॅरी आता एकदम आजोबाच दिसायला लागलाय, अंकल पण नाही.
तो गॅरी स्वतःला पेटवून
तो गॅरी स्वतःला पेटवून घ्यायला निघाला, काहीही. >> हे कालच्या भागात झालं ना??
साबा कालच मला सांगत होत्या की, नुसत्या काडेपेटीने पेटायला होतं होय.. नाटकं करतो मेला.. राधिकानं राॅकेल ओतायचं त्याच्या अंगावर नि पेटव म्हणा काडी.
निधी मी रिपिट बघितला बहुतेक
निधी मी रिपिट बघितला बहुतेक काल एक सीन, रात्री मेन नाही बघितला.
काय वाट्टेल ते डायलॉग्स ..
काय वाट्टेल ते डायलॉग्स ...म्हणे इंग्रजीचे पापड लाटू नकोस... ईईईईई.....
पुढे काय झाले? त्या उर्मट
पुढे काय झाले? त्या उर्मट हॉटेल मालकीनी बरोबर??
खुकखु आणि ही अती बोअर आणि
खुकखु आणि ही अती बोअर आणि निगेटिव्ह आहे.. टायटल सॉन्ग ऐकायला आलं तरी चिड चिड होते..खर्याचा जमानाच नाही असं वाटत.. खुकखु मधे इशा चे तर हाल लावले आहेत.. केस करावी अशा कलुशित मनाच्या लेखकु आणि दिग्दर्शकावर
खरे आहे, ती मानसी तर डोक्यात
खरे आहे, ती मानसी तर डोक्यात जाते
आता तर म्हणे गुरुनाथचे वडिल
आता तर म्हणे गुरुनाथचे वडिल राधिकाला modern कपडे घाल, मेकओवर कर म्हणून सान्गत आहेत. म्हणजे एकप्रकारे आपली सुन सन्सार टिकविण्यात सपशेल हरली हेच मान्य करण्यासारखे आहे. साधी राहून सुद्दा आपला मुलगा तिच्याकडे ढुकुनही बघत नाही, तिचा मेक ओवर करुन बघूया काय फरक पडतो ते. आपला मुलगा तिच्याकडे परत येतो का. असे सासरेबुवान्ना वाटत असेल. तिच्या बदललेल्या रुपाकडे (नकली) गुरु आकर्षित होईलही, पण तिच्या गुणान्चे काय? शारीरिक सौन्दर्य तर काय फक्त एक दोन दिवस टिकत. उद्या राधिका म्हातारी झाल्यावर गुरु घटस्फोटच देईल तिला. हि सिरियल साध राहण कस वाईट, modern राहण कस चान्गल हेच दाखवणार, विचारान्नी modern होण तर दुरचीच गोष्ट आहे.
राधिकाने आधी तिच्या वागण्या बोलण्यात मेकओवर कर म्हणाव. नाहीतर modern कपडयामध्ये सुद्दा तिचे करुन राहयले, बोलून राहयले, भैताड' हे चालूच राहिल.
गुरुनाथचे वडिल राधिकाला
गुरुनाथचे वडिल राधिकाला modern कपडे घाल, मेकओवर कर म्हणून सान्गत आहेत.>> खरतर मला हा पार्ट सेपरेटली खुप आवडला, वरचा सुलुचा मुद्दा बरोबर असला तरी राधिकाला एक बिझनेसवुमन म्हणुन /काळाबरोबर बदलायला खुद्द सासु-सासरे सान्गतायत तिला फुल ऑन सपोर्ट करतात हे मस्तय . बाकी सगळ मात्र आनदी आनद आहे.
तिचा मेक ओवर करुन बघूया काय
तिचा मेक ओवर करुन बघूया काय फरक पडतो ते.>>>ऑ!!! परत मेक ओवर करणार? मागे एकदा केला होता कि डोक्यावर नांगर फिरवून...यावेळी नवे काय करणार?
नाहीतर modern कपडयामध्ये सुद्दा तिचे करुन राहयले, बोलून राहयले, भैताड' हे चालूच राहिल.>>>हो. ती विंग्रजी सुद्धा बोलायला शिकली होती ना.....शाळेत जाऊन ४ वाक्ये बोलली आणि मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या. त्यानंतर विंग्रजी बंदच झाले.
>>>हो. ती विंग्रजी सुद्धा
>>>हो. ती विंग्रजी सुद्धा बोलायला शिकली होती ना.....शाळेत जाऊन ४ वाक्ये बोलली आणि मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या. त्यानंतर विंग्रजी बंदच झाले.>>>> हा हा...मागे कोणीतरी म्हटलं ना तसा लेखकाला चकवा लागत असेल हो अधून मधून... आता नवीन व्हर्जन काढा कोणीतरी माबो तुझा लेखकावर भरवसा न्ह्याय का???( माबो कोरस) न्हाय न्हाय...
दोघीही जाणार होत्या ना शो रुम
दोघीही जाणार होत्या ना शो रुम मधे... ? मग ऐन वेळेवर रेवती कुठे गायब झाली... ? हिने एकटीनेच गाडी खरेदी केली ....
व पुन्हा रेवती रस्त्यात भेटली तिला.... आधीच तर ती रिक्षातून उतरलेली ना हिच्या साठी..?
काहीही दाखवितात...अनाकलनीय!
आणि बच्चा काय सतत आईस क्रीम खात असते...? गुरुनाथ काय भरवतो.....!! वाट्टेल ते दाखवतात!
:रागः
त्या गुरुला राधिकाने भर चौकात
त्या गुरुला राधिकाने भर चौकात झोडपून काढायला हवं चाबकाने, त्याला झोडपताना स्वतःवर पण मधे मधे फटके मारुन घ्यायला हवेत माह्या नवरा करत आणि शनायाने टाळ्या पिटत दोघांना उल्लू कसं बनवलं बघत उभं रहायला हवं. असा सीन बघायला आवडेल मला. एकेक प्रोमोज ह्याचे बघून.
@अंजु... हहपूवा, खरेच असे
@अंजु... हहपूवा, खरेच असे दाखवले पाहिजे.
खरतर मला हा पार्ट सेपरेटली
खरतर मला हा पार्ट सेपरेटली खुप आवडला, वरचा सुलुचा मुद्दा बरोबर असला तरी राधिकाला एक बिझनेसवुमन म्हणुन /काळाबरोबर बदलायला खुद्द सासु-सासरे सान्गतायत तिला फुल ऑन सपोर्ट करतात हे मस्तय .>>>>सहमत. राधिकाने स्वतःसाठी आणि तिच्या बिझनेससाठी बदलाव, नवर्यासाठी नाही. नाहीतर मग तिच्यात आणि शनायात काय फरक राहिला? ती शनायासुद्दा गुरु आकर्षित करण्यासाठीच नटत असते ना.
ऑ!!! परत मेक ओवर करणार? मागे एकदा केला होता कि डोक्यावर नांगर फिरवून...यावेळी नवे काय करणार?>>> यावेळी तिला modern कपडे घालायला देणार. ति वजन कमी करुन बारीक, शिडशिडीत होणार आहे.
ती विंग्रजी सुद्धा बोलायला शिकली होती ना.....शाळेत जाऊन ४ वाक्ये बोलली आणि मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या होत्या. त्यानंतर विंग्रजी बंदच झाले.>>>> नतर तिने गुरुचा अपमान करताना सुद्दा एक विंग्रजी वाक्य बोलली होती, तो तिचा तम्बूत राहायचा ट्रेक होता ना त्यात.
त्या गुरुला राधिकाने भर चौकात
त्या गुरुला राधिकाने भर चौकात झोडपून काढायला हवं चाबकाने, त्याला झोडपताना स्वतःवर पण मधे मधे फटके मारुन घ्यायला हवेत माह्या नवरा करत आणि शनायाने टाळ्या पिटत दोघांना उल्लू कसं बनवलं बघत उभं रहायला हवं. असा सीन बघायला आवडेल मला. एकेक प्रोमोज ह्याचे बघून.>>> अस झाल तर बेस्टच आहे. झी मराठी ऐकताय ना?
हि राधिका शाळेत काय बोलली
हि राधिका शाळेत काय बोलली होती आठवतेय ना ?
मॅम कॅन आय स्पिक इन इन्ग्लिश
कॅन आय नव्हे ग, शॅल आय? हा हा
कॅन आय नव्हे ग, शॅल आय? हा हा
मी हि मालिका बघायची सोडून
मी हि मालिका बघायची सोडून दिली होती. पण आज चुकून पाहण्यात आली हि सिरियल. मागच्या पानावरुन पुढे चालूच आहे हि सिरियल. तोच तो राधिकाचा बावळटपणा, गुरुच्या आईचा मुलावरचा अतिविश्वास, शनायाचा गळेपडूपणा, महाजनी काकान्चा फुसका भन्डाफोड, गुरुचा खोटारडे पणा ई. सगळे अजून चालूच आहे.
त्या माधुरी निमकरला फक्त पाहुणी कलाकार म्हणून घेतल होत का सिरियल मध्ये? ति कुठे दिसत नाहीये सिरियलमध्ये म्हणून म्हटल.
आता आज राधिकाला सगळ कळणार आहे अस दाखवलय पुढच्या भागात.
मालिका दिग्ददर्शकाला चहा व
मालिका दिग्ददर्शकाला चहा व पिझ्झा खूप आवडत असावा अशी खात्री पटत चाललेय. किती वेळा तो चहा !! श्या:
Pages