निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरिवा,
फोटो नाही दिसताय...

हि गोव्यात पाहिलेली उक्षी..
.

या गोवाफेरीत खुप सारी नीरफणसाची झाडं दिसली मला...फळं लगडलेली...
वृक्षगान मधे उल्लेख आलेला वाचला होता मी बहुधा..मस्त वाटतं ना नवी झाडं पाहताना...
असं वाटतं अरे हे तर आज पहिल्यांदा नव्यांन दिसतयं काहीतरी...रोजच्या गडबडीत तर कधी नजरच गेली नाही इकडे..मला वाटत एफसी रोड वरुन सरळ जाताना पुढे नॅशनल हायवेकडे कृषी विद्यालयाला लागुन जो रस्ता जातो तेथेसुद्धा मला पुत्रंजीवी दिसला..पण तोनक्की तोच होता का हे जाणकारच सांगु शकतील.. व्रूक्षगान वाचताना पुत्रंजीव पुत्रंजीवी बद्दल वाचताना ते प्रकरण खुप इंटरेस्टींग वाटलेलं अन लगोलग शांकलीने तिच्या घराजवळ असलेलं पुत्रंजीवी दाखवलं पन होतं.. मला कृषी महाविद्यालय रोड्ने दिसलेलं पुत्रंजीव असाव असं वाटतय.. एखादवेळी फोटो काधुन ओळख करुन घ्यावी लागेल..

टीना, अगं पुण्याच्या रस्त्यांवर पुत्रंजीवाची झाडं वाट्टेल तेवढी दिसतात.
नीरफणस...एकदा याच्या भाजीची किंवा कापंची चव बघायची आहे. याची झाडंही प्रभात रस्त्यावरच्या काही बंगल्यांच्या आवारात कौतुकाने लावलेली दिसतात.

अरे वा अदिजो..
आता असं आजुबाजुला पाहातच अ‍ॅक्सिलरेटर ला पीळ मारावा लागेल Wink

लहानपणी या पुत्रंजीवीच्या बिया भिंगरीसारख्या वापरल्या आहेत. ग्राहक पेठेसमोरे एक पारीजातक नावाचा मॉल झाला होता एकेकाळी त्याच्या आवारत होते बहूतेक हे झाड. हे व ते गोल्फबॉलवाले टण्ण्युचे झाड.

शोभाताई, बरं झाल धागा वर काढलास ते. आज सकाळीच येताना ब़कुळीच्या झाडावर फळ पाहिली. केसात माळायच्या करवंदा सारखी, पण सुटी सुटी. मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे फार अप्रुप वाटल. तेव्हाच ठरवल की इथे येऊन सांगाव पण कामाच्या गडबडीत विसरले. माझ्या मैत्रिणीच्या घरी (वसई) बकुळीचे वृक्ष होते. पण फळ कधी पाहिल्याच आठवत नाही. एकतर आम्ही लहान होतो त्यामुळे इतकं नीट पहाण्याची अक्क्ल नव्हती आणि झाड उंचच उंच त्यामुळे सहज दिसण अशक्य.

पुत्रंजीवीच्या फळांच्या माळा लहान मुलांच्या गळ्यात घालतात, नजर लागू नये म्हणून.. आणि म्हणूनच हे नाव.
सोलापूर, पंढरपूर कडे या माळा रस्त्यावर विकायला असलेल्या बघितल्याचे आठवतंय.

आज सकाळीच येताना ब़कुळीच्या झाडावर फळ पाहिली. >>>>>>>>>>.ओ ताई, ती पिकली की मला आणून द्याकी. कितीतरी वर्षात खाल्ली नाहीत. २-३ दिवसांपूर्वीच आईला त्या आठवणी सांगत होते. Happy

तू खाल्लीस तर जपून खा. ती पिठूळ असतात घशात खेपतात. लेकीला तर आधी देऊच नको. आधी तू थोडसं खाऊन बघ. मला मात्र भरपूर आणून दिलीस तरी चालतील. मला सवय आहे खायची Happy
जर आणली नाहीस, तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेव. Proud

छानच फोटो सरिवा.. Happy गौताळा मधील फोटो इथेपन देशील गं..

बकुळीची फळं फोटो काढण्याआधीच संपली का रे?
काय यार कधी काळी हमेशा पहिल्या पानावर असणारा धागा आता चौथ्या पाचव्या पानापात्तुर शोधावा लागतो.. लिहते व्हा..

हे कुणी बघीतल नसेल तर..माहितीसाठी..
http://www.maayboli.com/node/29342

बकुळीची फळं फोटो काढण्याआधीच संपली का रे? >>> नाही गं टिना आज घरी जाताना काढते फोटो आणि दाखवते. हां आता शोभाताई खाल्ली असतील तर काय................... Wink

धायटी मस्त!
सकाळी सकाळी धायटीच्या फुलांत डोकावलं, तर फुलाचा पेला मकरंदाने (नेक्टर) भरलेला दिसतो. मधखाऊ पक्ष्यांचं आणि कीटकांचं आवडतं झुडुप. त्यांचा ज्युस बारच म्हणा ना!

मस्त माहिती दिदा...

स्निग्धा, आठवणीने काढं गं..

अदिजो,
ज्युस बार>> मस्त उपमा.. Happy

टिना, फोटो मोबाईल कॅमेराने काढले आहेत, समजुन घे
बकुळीची फुले
Bakul.jpg

बकुळीची फळे
Bakul phal.jpg

करवंदासारखी वाटताहेत ना?
Bakul phal 1.jpg

स्निग्धा सुंदर फोटो.

मलाही धायटी उरणच्या वेश्वी डोंगरावर दिसली.

स्निग्धा, ओमान देशात रस्त्याच्या कडेने बकुळीची झाडे आहेत. ती खास जात आहे कारण झाडे अगदी लहान असूनही फुलतात. आपण नेहमी खाली पडलेली फुले गोळा करतो, पण तिथे हाताने झाडावरची फुले अलगद तोडता येतात.

बकुळीची फळे>>>> स्निग्धा, तुझ्यामुळे पहिल्यांदा पहाता आली.

दिनेशदा, ऐतेन.अशी झाडे आपल्याकडे नाहीत तेच बरे,एक फूल ठेवले नसते.

बकुळीची फळे>>>> स्निग्धा, तुझ्यामुळे पहिल्यांदा पहाता आली.

दिनेशदा, ऐतेन.अशी झाडे आपल्याकडे नाहीत तेच बरे,एक फूल ठेवले नसते.

दिनेशदा, ऐतेन.अशी झाडे आपल्याकडे नाहीत तेच बरे,एक फूल ठेवले नसते.>>>>
असच काही नाही देवकी... आंध्र - तेलंगणा चा राज्यवृक्ष बकुळ आहे..आणि इथे ही रस्तो रस्ती बकुळ ची झाड आहेत.. ती बह्हरुन ओसंडत असतात, अगदी झाड भरलेली असतात आणि खाली पण सडा असतो..
बहुदा महाराष्ट्रात कमी प्रमाणात आढळत असल्याने लोकाना ती तोडायला आवडत असावी

हो ना. माझ्या घरासमोर एक निझाम काळातला बंगला आहे.. त्यात एक बकुळ चा वृक्ष आहे. इतक मोठ बकुळीच झाड असु शकत यावर माझा विश्वास च बसला नसता जर बघितल नसत. त्याच्या सावलीत मजूर जेवायला बसतात एव्हढे झाड आहे ते
जमल तर फोटो काढुन टाकेन

चिंगमाय्,थायलँड मधे या रस्त्याच्या दुतर्फा बकुळीची आणी तामण ची झाडे लावलेली आहेत. खाली अक्षरशः बकुळी चा सडा पाहून आनंदमिश्रित आश्चर्याचा धक्काच बसला होता.. पहिला विचार आला मनात तो हा ,श्या..आपली बकुळा इथे कशीकाय??? Happy

Pages