निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन सुलक्षणा :स्मितः
सामी प्लिज मला कधी भेटशील तेव्हा ओव्याच रोप दे. माझ गेल आहे.

आमच्या प्राजक्ताच्या झाडावर येणारे फुलपाखरू


अय्या..........जागुले कित्ती सोप करून संगितलंस! डकवला की फोटो!...............गिरीपुष्प.

काहीतरी चुकलं. असो........


गिरिपुष्पाचे झाड लांबून.

दवबिंदु,
तुम्ही दिलेल्या फुलाला गोव्याकडे 'समई' म्हणतात. शस्त्रीय नाव Clerodendrum paniculatum
पॅगोडा फ्लॉवर

जागू बोरं बघून खूप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. आमच्या बागेत बोराचं मस्त झाड होतं आणि त्याला झोपाळा..खूप खेळायचो आम्ही.
बोराच्या कोवळ्या पानाकडे मी कितीही वेळ निरखून बघत बसायची. किती मऊ गोजिरवाणी असतात.
देवकी, मलाही माझ्या ३ फोटोंपैकी एकच दिस्तोय. मी पिकासा वरून पहिल्यांदा अपलोड केले, त्यामुळे तिथले अल्बम सेटिंग बदलतांना कैतरी गफला झालाय.

मला दिसतोय...मस्तच वर्षू...
आम्ही याला उलटा रावण म्हणायचो...
माझ्याकडे फक्त पिवळा रंग असणारा आहे...

काल मी ताईकडून वापस येत असताना बंड गार्डन रस्त्यावर सीता अशोक पाहिला..मस्त फुलावर होता..
मला सीता अशोक म्हटलं कि दिदांची श्रीलंका टूरचा धागा आठवतो...मला एकदम श्रीलंकेमधे गेल्याचा फिल आला Proud

मस्ताय जंगली मैना...
शांकली अन् मी पर्वती पुलाजवळ ब्राम्हणी मैना पाहिली..

कालपरवा मला एक साळूंकी सारखा पक्षी दिसला...पण तो काळा नाही तर पूर्ण मातकट पिवळा होता..बाकी डिट्टो साळूंकी..कोण असावा बरे?

दवबिंदु,
तुम्ही दिलेल्या फुलाला गोव्याकडे 'समई' म्हणतात. शस्त्रीय नाव Clerodendrum paniculatum
पॅगोडा फ्लॉवर
>>>>>>> याच्या मुळांचा वापर उटण बनवण्यासाठी होतो.

हे प्रकाश चित्र साधारण ८ वर्ष पुर्वीचे . कोकण प्रवासात घेतले होते. कुठे ते नक्की आठवत नाही . याची कोणी काही माहिती देऊ शकेल का ? खुप
उत्सुकता आहे++ हे दिपमाळ / समई चे झाड ना!

याच्या मुळांचा वापर उटण बनवण्यासाठी होतो.++ हे माहिती नव्हते.. नविन माहिती साठी धन्स.
गिरीपुष्प खुप सुरेख!!!

याच्या मुळांचा वापर उटण बनवण्यासाठी होतो.++ हे माहिती नव्हते.. नविन माहिती साठी धन्स.
गिरीपुष्प खुप सुरेख!!!

शाल्मली... (लेकाच्या शाळेजवळच नुसतं फुलांनी लगडलेलं निष्पर्ण झाड... खुप सुरेख दिसत होते..)

शाल्मली...आहाहा! दिल गार्डन गार्डन हो गया! सुंदर Happy

जागू तू खास पक्ष्यांसाठी फोटो स्टुडिओ उघडला आहेस आणि पक्षी मस्त स्वतः होऊन फोटो काढून घ्यायला येतात..छान छान पोझ मध्ये, बॅकग्राऊंड मध्ये.. खरं ना? Happy

अरे बापरे !! एकदम एवढे प्रतिसाद ... माहिती बद्दल धन्यवाद Happy ... पण मी हे फुल आयुष्यात एकदाच पहिला आहे .

पुण्यातील शायद एकमेव 'व्हाईट शेव्हींग ब्रश' या वृक्षाला बहार आला आहे...
इच्छुकांनी जरुर लाभ घ्यावा...
मस्त फुलं हायती..म्या आजच बघुन आली..
त्या हिरव्या मोटूल्या कॅलिक्स मधुन निघालेले मोठ्ठाले अन्थर्स, ती उभट शेंगेसारखी दिसणारी लांब कळी, भरपूर पाने गाळलेला भलामोठा वृक्ष...सारच प्रेक्षणीय आहे..

Pages