Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही नाही शनाया हापिसात आणि
काही नाही शनाया हापिसात आणि राधिका सोसायटीत लोकांना पिडताहेत.
सध्या काय नॉन्सेन्स चालू आहे
सध्या काय नॉन्सेन्स चालू आहे म्हणे?
काल एक सीन बघितला, तो आनंद
काल एक सीन बघितला, तो आनंद शनायाला सोडतो रस्त्यात आणि गाडी घेऊन जातो. जाम हसले मी. बालीश असला तरी हसायला आलं. त्या गॅरीला धडा शिकवा, सर्व त्या शनायाच्या मागे. शनायापण बालीशपणे त्रास देते राधिकाला आणि बाकीचे पण तसाच शनायाला त्रास देतात.
बकवास चालू आहे.
बकवास चालू आहे.
आन्नदच जेनीबरोबर जुळवतील अस वाटत. +१
जेनीच्या केसांचा आर्टिफिशियल
जेनीच्या केसांचा आर्टिफिशियल पिसारा आवडत नाही. यांचे मेकअप आर्टिस्ट्स कधी सुधारणार? त्या शनायाला पण कधीकधी बटबटीत मेकअप थापलेला असतो.
शनाया आणि ती दुसऱ्या
शनाया आणि ती दुसऱ्या सिरीयलमधली राणी ह्यांना एकावेळेला आख्खीच्या आख्खी लिपस्टिक थापतात की काय ओठाला असं वाटतं मला.
जेनीच्या केसांचा आर्टिफिशियल
जेनीच्या केसांचा आर्टिफिशियल पिसारा आवडत नाही. +१
अगदी चिकटवल्यासारखे दिसतात तिचे केस.
काल ती येडी राधिका गॅरी ला बरं नव्हतं म्हणून त्याची सेवा करायला घरी आली होती. आणि म्हणे माझ्या घरात माझ्या किचनमध्ये स्वयंपाक करायचा हक्क मी मिळवूनच राहणार.
नशीब झाडलोट करायचा, लाद्या पुसायचा, गॅरीचे कपडे धुण्याचा हक्क नाही म्हणाली.
हो ना.... स्वयंपाकाचा कसला
हो ना.... स्वयंपाकाचा कसला हक्क...जेव्हा त्याच्या मनावरच तुझा हक्क नाही! आणि शनाया कुठे गेलीये सध्या?
प्रोमोत एक मुर्खप णा दाखवतायत
प्रोमोत एक मुर्खप णा दाखवतायत की शन्या ला लेप थापायला पार्लर वाली येतेय. आणि काय काय
ते झालं का दाखवून?
माझ्या घरात माझ्या किचनमध्ये
माझ्या घरात माझ्या किचनमध्ये स्वयंपाक करायचा हक्क मी मिळवूनच राहणार.>>> धन्य आहे राधिका.
किती भंपकपणा जास्तीजास्त करू
किती भंपकपणा जास्तीजास्त करू शकतो त्याची ही सिरेल म्हणजे हाईट...
सध्या झी च्या प्राईम टाईम मधील ही आणि खुकखु ह्या दोन्ही गंडलेल्या सिरेल... लेखक- दिग्दर्शक- नट सगळेच गोंधळेले...
आणि प्रेक्षक भंजाळलेले!!!
'झी' वरच्या मालिका पाहिल्या
'झी' वरच्या मालिका पाहिल्या कि क्वालिफिकेशनसाठी बालपण आणि नंतर ऑफिसमधे स्वतःला प्रुव करण्यात तरुणपण वाया घालवल्याचं दु:ख होतं. किती बरं यांना सहजासहजी नोकर्या मिळतात. बॉसेस काय जेम असतात, किती त्या सुट्ट्या आणि कन्सेशन्स.
'झी' चा एकही लेखक कधी ऑफिसला गेला/गेली नाही का? किंवा नोकरी नसेल केली तर नुसतं ऑफिस पाहिलं सुद्धा नाही का? सगळ्या मालिकांमधे किती भंकस ऑफिस असतात. (आठवा ऑफिसेस आणि तिथले प्रसंग - कादिप, जान्हवी सिरियल, नवरा बायको असुन नाते लपवणारे कपलची मालिका, मा. न. बायको, एवढंच कशाला राखेचा मधली सायंटिस्ट आणि तिचा प्रोफेसर नवरा महिनो न महिने नोकरी असुन गावाला जावुन बसतात. किती तरी उदाहरणं)
प्रोफेशनल बिहेविअर, JDs, इंटर्व्यु राउण्ड्स, कोड ऑफ कंडक्ट, HR या शब्दांचा कुठेही मागमुस नसतो. या कॉन्सेप्ट्स किंचितही माहित नसाव्यात का? आता राधिका शनायापेक्षा मोठ्या पोस्टवर येणार हे ऐकुन आम्ही का शिकलो, मॅनेजमेण्ट कोर्सेस केले, क्वालिफिकेशन्सच्या मागे का आयुष्य घालवलं असं फ्रस्ट्रेशन आलं आहे. ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
प्रोफेशनल बिहेविअर, JDs,
प्रोफेशनल बिहेविअर, JDs, इंटर्व्यु राउण्ड्स, कोड ऑफ कंडक्ट, HR या शब्दांचा कुठेही मागमुस नसतो. या कॉन्सेप्ट्स किंचितही माहित नसाव्यात का?>>>
अहो, कामावरून हाकलून दिलेली शनाया ऑफिस मध्ये बॉस म्हणून येते तेही एच आर हेड ला माहिती नसते कोण जॉईन होणार आहे सिनियर पोस्ट्वर!! ह्या पेक्षा अजुन काय हाईट!!!
प्रोफेशनल बिहेविअर, JDs,
प्रोफेशनल बिहेविअर, JDs, इंटर्व्यु राउण्ड्स, कोड ऑफ कंडक्ट, HR या शब्दांचा कुठेही मागमुस नसतो. या कॉन्सेप्ट्स किंचितही माहित नसाव्यात का?>>> अगदी अगदी. Cabin मध्ये कोणी हिरोचे फोटो लावतात का? आणि शनाया स्वतःला आयडियल बिझिनेसवुमन म्हणवते.
माझ्या घरात माझ्या किचनमध्ये
माझ्या घरात माझ्या किचनमध्ये स्वयंपाक करायचा हक्क मी मिळवूनच राहणार.>>> धन्य आहे राधिका.
>>>>
This is too much...!!!
अजुनही त्या गॅरीचं बच्चा
अजुनही त्या गॅरीचं बच्चा बच्चा सुरुच आहे.
नक्की काय सुरूये सिरियल मध्ये
नक्की काय सुरूये सिरियल मध्ये?
मी तर पहातच नाही.
आता राधिका शनायापेक्षा मोठ्या
आता राधिका शनायापेक्षा मोठ्या पोस्टवर येणार >> म्हणजे नक्की काय?? कोण देणार तिला नोकरी??
अहो, कामावरून हाकलून दिलेली शनाया ऑफिस मध्ये बॉस म्हणून येते तेही एच आर हेड ला माहिती नसते कोण जॉईन होणार आहे सिनियर पोस्ट्वर!! ह्या पेक्षा अजुन काय हाईट!!!>> +1.
त्या hotel च्या मालकाला
त्या hotel च्या मालकाला उशीरा येण्याचे कारण म्हणून बायकोची कर्तव्ये, एक बायको सन्सारासाठी काय काय करते ह्यावर राधिकाने भाषण देण्याची काही गरज नव्हती. जस काय त्या मालकाला ह्या गोष्टी माहितच नाही जणू . आणि वर असेही सान्गितले तिने की, मी आजारी नवर्याची सेवा करत होती म्हणून उशीर झाला. अर्थव खेळताना पडला हे सुद्दा सान्गितले तिने.
खर तर राधिकाने फक्त माझा मुलगा खेळताना पडला, traffic लागल एवढच सान्गितल असत तर पुरेस होत. गुरु बरोबर बोलत होता की राधिका सतत सहानूभूती गोळा करण्याचा प्रयत्न करते.
काल एक सीन पाहून राहोलो.
काल एक सीन पाहून राहिलो. त्यात राधिका एम डी एच च्या त्या आजोबांसारख्या (विदाउट पगडी) एका बिजनेसमॅनच्या ऑफिसात जाऊन राहते. माझ्या चाणाक्ष नजरेने लगेच ओळखले की माणूस मसाल्याचा व्यापारी असणार. तर, उशीरा येण्याबद्दल काही बाही कारणं राधिका देऊन राहते. त्यावर ते आजोबा तिला म्हणून राहतात का , " मिसेस सुभेदार, तुम्ही जरा वेड्याच आहात"
इथे मी चमकून बायको कडे पाहिलं. मी काय जास्तीचं ऐकलं आहे हे तिला लगेच समजलं. 'वेड्याच' नाही, 'वेगळ्याच' असं म्हणाले ते... असं स्पष्टीकरण न मागताच मिळालं.
मी आपला उगीचच चाट पडून राहिलो, की एवढे वास्तववादी संवाद कोणी लिहिले रे बाप्पा !!!
(No subject)
भारि हा मित +++१११Lol Lol Lol
भारि हा मित +++१११Lol
Lol
Lol
राधिकाला आता ती ऑर्डर मिळणार.
राधिकाला आता ती ऑर्डर मिळणार. आणि ते आजोबा तिचे कर्तुत्व आ णि चिकाटी पाहुन तिला स्वतःच्या मुलासाठी (जो डिव्होर्सी आहे आणि भरपूर श्रीमंत आहे ज्याला एक मुलगी आहे पण संसार सांभाळायला कुणी नाही) पसंत करणार.
पण राधिका लग्न न करतात त्या मुलीच्या प्रेमापोटी त्या आजोबांच्या घ री राहाय्ला जाणार कर्तव्य म्हणुन. मग तो आजोबांचा मुलगा गॅरीची कंपनी विकत घेणार (कारण ती एक्स्पोर्ट कंपनी आहे आणि राधिकाला पण तिचे मसाले देशाबाहेर एक्सपोर्ट करायला एक सेटअप मिळेल म्हणुन) . राधिकाला ती कंपनी तो गिफ्ट करणार मग राधिका मालकिण म्हणुन त्या कंपनीत येणार आणि पुढे सगळी मज्जा.
बर मालकिण बनुन आल्यावर देखिल ती गॅरीची हापिसात सेवा करणार तिथे रांधुन त्याला खायला घालणार आणि तिच्या हातच्या अन्नाची सवय लागल्याने आणि शनायावर उडवुन सगळे पैसे संपल्याने गॅरी पोटासाठी राधिकाला पुन्हा स्वयपाकासाठी घरी बोलावनार. हिला हिचे किचन मिळणार आणि शनायाला परत ऑफिस आणि गॅरी नेहमीप्रमाणे खुशाल्चेंडू.
आजोबा आणि त्यांचा लेक मात्र पुन्हा पहिल्यासारखे.
बा प्रे...ही खरीच स्टोरी ए
बा प्रे...ही खरीच स्टोरी ए की तुमचे इमॅजिनेशन? एम. डी. एच. (वि.प.) आजोबांना बराच मोठा रोल मिळालेला दिसतोय.
शुभांगी बरं आहे आता तु सिरीयल
शुभांगी बरं आहे आता तु सिरीयल लिहायला घे बघु
अस काही होणार नाहिये अजुन १००
अस काही होणार नाहिये अजुन १०० अपिसोडस तरी. त्यामुळे निश्चिंत रहा. शनाया आणि राधिकाची लुटुपुटुची लढाई चालूच राहणारे.
शुभांगी, बसा आता मानधन बुडणार
शुभांगी, बसा आता मानधन बुडणार तुझे इथे श्टोरी लीक केल्याबद्दल!
मला वाटते. दरम्यान शनाया
मला वाटते. दरम्यान शनाया आजारी पडेल.. मग राधिका तिच्या उशाशी बसून रात्रंदिवस सेवा करेल तीची... गॅरीला सागेन तूमी अजिबात काळजी करु नका मी काळजी घेईन तुमी जावा दौर्यावर.. मग शनायचे डोके दाबणे'.... आल्याचा चहा.... गरगुटी खिचडी पथ्यपाणी... सगळे व्यवस्थित करेल..
आणि शनाया उदार मनाने गॅरीला सांगेल हिला देखिल राहू द्या आपल्या घरात.. समोर नानांकडे अश्रीतासारखी राहण्यापेक्षा इथे उपयोग तरी होईल...
हे प्रपोजल तर ऑलरेडी शनायाने
हे प्रपोजल तर ऑलरेडी शनायाने दिलेलं आहेच गॅरीला. की तिला आपल्या नवीन घरात सर्व्हंट म्हणून ठेवून घेऊ.
काल शनायाने गॅरीने उष्टं ताट नेऊन ठेव म्हटल्यावरचा अभिनय मस्त केला....
अनिता दाते चा अभिनय इतर कुठे
अनिता दाते चा अभिनय इतर कुठे चान्गला असेलही पण या सिरियल मधे तरी मला काही विषेष चुणुक दिसली नाही ( तशा झी सिरियलित काय वाव असणार) तिचे तोन्ड वेगाडुन बोलणे तिच कॅरेक्टर अजुनच इरिटेटिन्ग बनवत, शनाया रोल करणारी तिच काम चान्गल करते, बाकी कॅरेक्टर लिहण लेखकाच काम
Pages