Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा मी एकटीच नाहीये असा
अरे वा मी एकटीच नाहीये असा समज झालेली , आबासाहेब पण आहेत.
राणा ला लिहिता। येत नाही का।।
राणा ला लिहिता। येत नाही का।। अंजलीचा नंबर घेताना बहाना करतो हात दुखतोय असा। पण तिला स्पर्श करणे टाळतो। निरक्षर असेल तर अवघडय मग अंजलीबैंशी जमणं।। त्या व्हयनीचा हात पिरगाळून एक ठोसा द्यावा वाटतो नाकावर।।
काल अंजलीने सांगितलेल्या
काल अंजलीने सांगितलेल्या तिच्या मोबाईल नंबरमध्ये आणि आज राणाच्या हातावरच्या नंबरमध्ये फरक होता.
अंजलीने काल ८०८ ७४ ७४ ६४ ९ असा नंबर सांगितला होता. आजचा नंबर ८० ८७ ४६ ४६ ४९ असा होता. अंजलीच्या नंबरमधला सहावा आकडा ७ होता तर राणाच्या नंबरमधला सहावा आकडा ६ होता.
अंजली ८०८७४७४६४९
राणा ८०८७४६४६४९
अंजलीने सांगितलेला नंबर सुरेशने राणाच्या हातावर लिहिलेला होता. आजचा राणाच्या हातावरच्या नंबर बरोबर असेल तर काल अंजलीने आपला नंबर चुकीचा सांगितला होता जो सुरेशने राणाच्या हातावर लिहिला. राणाच्या हातावर लिहिलेल्या नंबरवर अंजलीला बरोबर फोन लागला.
अरे देवा सारिका !
अरे देवा सारिका !
sarika... _/\_
sarika... _/\_
(No subject)
तो साहेबराव खूप देखणा आहे,
तो साहेबराव खूप देखणा आहे, शिंगं भारी मस्त आहेत.
साहेबराव राणाचा भाऊ नाही..
साहेबराव राणाचा भाऊ नाही.. त्याच्या बैलाचं नाव साहेबराव आहे >>>>>>>
मला पण इथल्या चर्चेवरून त्याचा भाऊच "साहेबराव" आहे असं इतके दिवस वाटत होत.
त्या बैलाला देखणा आहे / देखणा आहे करताहेत का सगळे ? अछा
सारिका
सारीका.. केवढं बारीक लक्ष.
सारीका.. केवढं बारीक लक्ष.
पाठकबाई गोड हसतात
पाठकबाई गोड हसतात
मला कधीकधी राणामधे अनिल
मला कधीकधी राणामधे अनिल कपूरचा आणि पाठ्कबाईंमधे जेनेलिया डिसूझाचा भास होतो.
राणाजी जेव्हा लाजुन हसुन बोलतात आणि पाठकबाई जेव्हा गोड हसतात तेव्हा.
अंजली ची ती मैत्रीण गावातलीच
अंजली ची ती मैत्रीण गावातलीच आहे नाा? तिला माहीत असेलच ना राणाला लिहिता-वाचता येत नाही ते.
मग ती का सांगत नाही मोबाईल नंबर लिहुन घेताना राणा बिचकत असतो तेंव्हा अंजली तिला कंफ्युज्ड लुक देत असते तेंव्हा.
सस्मित | 7 December, 2016 -
सस्मित | 7 December, 2016 - 17:05
मला कधीकधी राणामधे अनिल कपूरचा आणि पाठ्कबाईंमधे जेनेलिया डिसूझाचा भास होतो.
राणाजी जेव्हा लाजुन हसुन बोलतात आणि पाठकबाई जेव्हा गोड हसतात तेव्हा. >>>>
Perfect..!!! मी खुप दिवस झाले हाच विचार करत होतो..पण नक्की आठवत नव्हत ते कोणा सारखे दिसतात... Thanks सस्मित
काही दिवसांपुर्वी राणा बरकतशी
काही दिवसांपुर्वी राणा बरकतशी बोलताना बरकतने सांगितले होते कि त्याने चौथीमध्ये शाळा सोडली आहे आणि राणाने त्याआधी. प्राथमिक शाळेत काही शिक्षण झालेल्या माणसाला किमान अक्षर/अंक ओळख सुध्दा असु नये? तो अगदीच निरक्षर / अशिक्षित नाही आहे. त्याला (मराठी तरी) अगदीच लिहिता वाचता सुध्दा येत नाही हे पटत नाही. वडील शिक्षणमंत्री असताना मुलगा निरक्षर / अशिक्षित!
त्या नंदिताचे पप्पा नक्की आहेत तरी कोण? नंदिता एखाद्या राजघराण्याची माजी राजकन्या असल्यासारखी कायम गुर्मित का असते? मामांजी (सासरे) सोडुन बाकी सगळयांना ती इतकी तुच्छ का लेखते? राणा किमान घरची शेती तरी सांभाळतो पण सुरज नक्की काय करतो? बघावं तेव्हा तो दारू पिऊन घरी आलेला असतो. काही कामधंदा करत नसलेल्या सुरजचे नंदिताशी लग्न कसे झाले?
सध्यातरी शिष्यवृत्ती प्रकरणात राणा आणि अंजलीचा लपंडाव बघायला मजा येते आहे.
मुलं अन बरकत राणाची मस्त
मुलं अन बरकत राणाची मस्त फिरकी घेतात.. खुप मजा वाटते बघतांना .. पण राणाने सुद्धा खुप छान निरागस राणा वटवलाय..
खरच राणा अन अंजलीचा लपंडाव बघण्यात मजा येते.
नंदिता एखाद्या राजघराण्याची
नंदिता एखाद्या राजघराण्याची माजी राजकन्या >>>> माजी राजकन्या? हा काय प्रकार आहे?:अओ:
राणा ४ थी पर्यन्त शिकलाय तर
राणा ४ थी पर्यन्त शिकलाय तर त्याला इंग्लिश नाही निदान मराठी तरी लिहिता वाचता यायला हवा ना ?
माजी राजकन्या? हा काय प्रकार
माजी राजकन्या? हा काय प्रकार आहे? >> त्यांना 'माजी राजघराण्याच्या' राजकन्या असं म्हणायचं असेल.
पण राणाने सुद्धा खुप छान
पण राणाने सुद्धा खुप छान निरागस राणा वटवलाय..
खरच राणा अन अंजलीचा लपंडाव बघण्यात मजा येते. >>>> अगदी अगदी
२००
२००
आपल्याला तर शिष्यवृत्तीबाई
आपल्याला तर शिष्यवृत्तीबाई (अंजली) खुप आवडल्या..!!!
सौ म्हणते.. तु अंजलीच हे काय नविन नाव ठेवलय..!!!!
>>>माजी राजकन्या? हा काय
>>>माजी राजकन्या? हा काय प्रकार आहे?
म्हणजे माजलेली असं पण खरंच ती लई माज करते ...
काल राणाजींबद्दल विचार करताना
काल राणाजींबद्दल विचार करताना अंजली चक्क ' आता कसं भेटता येईल राणाला' एवढच म्हणाली. 'जी' गायबलं.
विचार करताना तो अरे तुरेच
विचार करताना तो अरे तुरेच म्हणते. 'असा काय हा' वैगेरे. प्रकट कुणासमोर बोलताना जी असतं
राणा ने 'आपण वेळ दिला पाहिजे
राणा ने 'आपण वेळ दिला पाहिजे एकमेकांना ' हे फारच सिरीयस्ली घेतलय..
ज्याला त्याला हेच म्हणतोय.
मोबाईल वापरता येत नाही असं
मोबाईल वापरता येत नाही असं कुणीसुद्धा नसतं खेडेगावात आजकाल हे सोडून मालिका लय भारी कित्येक दिवसातून अस काही बघायला मिळतंय!
राणा मस्त अंजलीकडून एकेक
राणा मस्त अंजलीकडून एकेक डायलॉग शिकतोय आणि अनुसरतोय. त्याचे बाबापण छान काम करतात सहज, अंजली कधी कधी फार गोड वाटते पण तिची मैत्रीण जास्त गोड वाटते.
राणाचा भाऊ सुरज काय उंडारत आणि पितंच असतो का? आणि वडील एवढे बिझी की त्यांच्या लक्षात येत नाहीये, तो वाया जातोय ते. त्याला उभंपण नीट रहाता येत नव्हतं त्यांच्यासमोर आणि वासपण येत असणार, तरी ते काही बोलले नाहीत त्याला. राणाला पण माहीती नाहीये का भाऊ कसा वागतोय ते. सुरजचे डोळे फार सुंदर आहेत मला आवडतात.
अन्जू, सुरज बद्दल +१ मला
अन्जू, सुरज बद्दल +१
मला अंजलीचे dialogue आवडतात. सहजपणे बोलते ती. उगाच ओढून ताणून तत्वद्यान सांगतिये काहीतरी आणि हा बसलाय माना हलवत असं नाही वाटत.
कोण आहे संवाद लेखक?
कोण आहे संवाद लेखक? >>> नाही
कोण आहे संवाद लेखक? >>> नाही माहिती. रात्री साडेबाराला सुरु झाली की जमलं तर नावं बघेन. मी रिपीट बघते.
मस्त चाललीये मालिका!
मस्त चाललीये मालिका!
Pages