तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राणा ला लिहिता। येत नाही का।। अंजलीचा नंबर घेताना बहाना करतो हात दुखतोय असा। पण तिला स्पर्श करणे टाळतो। निरक्षर असेल तर अवघडय मग अंजलीबैंशी जमणं।। त्या व्हयनीचा हात पिरगाळून एक ठोसा द्यावा वाटतो नाकावर।।

काल अंजलीने सांगितलेल्या तिच्या मोबाईल नंबरमध्ये आणि आज राणाच्या हातावरच्या नंबरमध्ये फरक होता.
अंजलीने काल ८०८ ७४ ७४ ६४ ९ असा नंबर सांगितला होता. आजचा नंबर ८० ८७ ४६ ४६ ४९ असा होता. अंजलीच्या नंबरमधला सहावा आकडा ७ होता तर राणाच्या नंबरमधला सहावा आकडा ६ होता.

अंजली ८०८७४४६४९
राणा ८०८७४४६४९
अंजलीने सांगितलेला नंबर सुरेशने राणाच्या हातावर लिहिलेला होता. आजचा राणाच्या हातावरच्या नंबर बरोबर असेल तर काल अंजलीने आपला नंबर चुकीचा सांगितला होता जो सुरेशने राणाच्या हातावर लिहिला. राणाच्या हातावर लिहिलेल्या नंबरवर अंजलीला बरोबर फोन लागला.

साहेबराव राणाचा भाऊ नाही.. त्याच्या बैलाचं नाव साहेबराव आहे >>>>>>>
मला पण इथल्या चर्चेवरून त्याचा भाऊच "साहेबराव" आहे असं इतके दिवस वाटत होत.
त्या बैलाला देखणा आहे / देखणा आहे करताहेत का सगळे ? अछा Happy
सारिका Lol

मला कधीकधी राणामधे अनिल कपूरचा आणि पाठ्कबाईंमधे जेनेलिया डिसूझाचा भास होतो.
राणाजी जेव्हा लाजुन हसुन बोलतात आणि पाठकबाई जेव्हा गोड हसतात तेव्हा.

अंजली ची ती मैत्रीण गावातलीच आहे नाा? तिला माहीत असेलच ना राणाला लिहिता-वाचता येत नाही ते.
मग ती का सांगत नाही मोबाईल नंबर लिहुन घेताना राणा बिचकत असतो तेंव्हा अंजली तिला कंफ्युज्ड लुक देत असते तेंव्हा.

सस्मित | 7 December, 2016 - 17:05
मला कधीकधी राणामधे अनिल कपूरचा आणि पाठ्कबाईंमधे जेनेलिया डिसूझाचा भास होतो.
राणाजी जेव्हा लाजुन हसुन बोलतात आणि पाठकबाई जेव्हा गोड हसतात तेव्हा. >>>>

Perfect..!!! मी खुप दिवस झाले हाच विचार करत होतो..पण नक्की आठवत नव्हत ते कोणा सारखे दिसतात... Thanks सस्मित Happy

काही दिवसांपुर्वी राणा बरकतशी बोलताना बरकतने सांगितले होते कि त्याने चौथीमध्ये शाळा सोडली आहे आणि राणाने त्याआधी. प्राथमिक शाळेत काही शिक्षण झालेल्या माणसाला किमान अक्षर/अंक ओळख सुध्दा असु नये? तो अगदीच निरक्षर / अशिक्षित नाही आहे. त्याला (मराठी तरी) अगदीच लिहिता वाचता सुध्दा येत नाही हे पटत नाही. वडील शिक्षणमंत्री असताना मुलगा निरक्षर / अशिक्षित!
त्या नंदिताचे पप्पा नक्की आहेत तरी कोण? नंदिता एखाद्या राजघराण्याची माजी राजकन्या असल्यासारखी कायम गुर्मित का असते? मामांजी (सासरे) सोडुन बाकी सगळयांना ती इतकी तुच्छ का लेखते? राणा किमान घरची शेती तरी सांभाळतो पण सुरज नक्की काय करतो? बघावं तेव्हा तो दारू पिऊन घरी आलेला असतो. काही कामधंदा करत नसलेल्या सुरजचे नंदिताशी लग्न कसे झाले?
सध्यातरी शिष्यवृत्ती प्रकरणात राणा आणि अंजलीचा लपंडाव बघायला मजा येते आहे.

मुलं अन बरकत राणाची मस्त फिरकी घेतात.. खुप मजा वाटते बघतांना .. Happy पण राणाने सुद्धा खुप छान निरागस राणा वटवलाय..
खरच राणा अन अंजलीचा लपंडाव बघण्यात मजा येते.

पण राणाने सुद्धा खुप छान निरागस राणा वटवलाय..
खरच राणा अन अंजलीचा लपंडाव बघण्यात मजा येते. >>>> अगदी अगदी Happy

मोबाईल वापरता येत नाही असं कुणीसुद्धा नसतं खेडेगावात आजकाल हे सोडून मालिका लय भारी कित्येक दिवसातून अस काही बघायला मिळतंय!

राणा मस्त अंजलीकडून एकेक डायलॉग शिकतोय आणि अनुसरतोय. त्याचे बाबापण छान काम करतात सहज, अंजली कधी कधी फार गोड वाटते पण तिची मैत्रीण जास्त गोड वाटते.

राणाचा भाऊ सुरज काय उंडारत आणि पितंच असतो का? आणि वडील एवढे बिझी की त्यांच्या लक्षात येत नाहीये, तो वाया जातोय ते. त्याला उभंपण नीट रहाता येत नव्हतं त्यांच्यासमोर आणि वासपण येत असणार, तरी ते काही बोलले नाहीत त्याला. राणाला पण माहीती नाहीये का भाऊ कसा वागतोय ते. सुरजचे डोळे फार सुंदर आहेत मला आवडतात.

अन्जू, सुरज बद्दल +१
मला अंजलीचे dialogue आवडतात. सहजपणे बोलते ती. उगाच ओढून ताणून तत्वद्यान सांगतिये काहीतरी आणि हा बसलाय माना हलवत असं नाही वाटत.
कोण आहे संवाद लेखक?

कोण आहे संवाद लेखक? >>> नाही माहिती. रात्री साडेबाराला सुरु झाली की जमलं तर नावं बघेन. मी रिपीट बघते.

Pages