100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज फार बोअर झाला एपिसोड. कित्ती गळेपडू आहे ती राणी. तिच्यावर संशय येईल ह्या गेटअपमध्ये तर पोलीस स्टेशनला जाते आणि काय ते प्रश्न पहिल्याच भेटीत, मी म्हणतच होते असं तेवढ्यात आदिनाथ पण म्हणाला पहिल्याच भेटीत इतके पर्सनल प्रश्न. फार काय एखादा भाळेल (निदान आदिनाथसारखा) एवढं मला तिचं व्यक्तिमत्व नाही वाटलं. कीवच आली अशा गळेपडूपणाची.

>>>arrange कि love हा प्रश्न नाही. पण जोडी अगदीच विजोड
विजोड आहे आणि त्याचा वरुनच त्याच्या पैशा करता तर तिने ल्गन केल्याचे कळतंय ..

कालचा एपि. फारच संथ... कंटाळा आला....

राणीचं पात्र सिडक्टिव्ह आहे, मान्य... तिला अजय ठाकूर प्रथम पाहताच आवडला हे ही मान्य... पण तरी ती इतकी लंपटपणाकडे का झुकली आहे हे (अजून तरी) कळलेलं नाही. पुढे कळेल अशी आशा.

अजय ठाकूरची आई लई बोअर मारणारे एकंदर...

एक डोक्यात आलं - ‘नेहा’ हे पात्र प्रत्यक्ष पडद्यावर आणलंच नाही शेवटपर्यंत तर मजा येईल... जरा वेगळा प्रयोग होईल... तसं करायचं तर संवाद डोकेबाजपणे लिहावे लागतील...फक्त ‘झी‘वाले असा प्रयोग करणार का हा प्रश्न आहे!

पोलीस स्टेशनमधली ती जाडगेली महिला हवालदार - काल उगीचच वाटलं की तिला पुढे कथानकात काहीतरी महत्त्वाचा रोल असू शकतो.

लोकांना कसे रिऍक्ट व्हायचे ना तेच कळत नाही आहे हि मालिका बघून. कोणी टायटल सोंग वरून गहजब माजवू पाहतेय तर कोणी त्या हिरो आणि हिरवणीच्या लूक वरून. चांगलं काही दिसू लागलं तर कोणालाही हजम होत नाही. काहीतरी नवीन बदल स्वीकारायला शिका. आपण जेव्हा शाळेत शिकतो तेव्हा आपल्याला अनेक विषय असतात मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल, संस्कृत, गणित अजून आपल्या सिल्याबस प्रमाणे यातले हिंदी आणि संस्कृत सोडून बाकीचे विषय शाळा इंग्लिश माध्यम असेल तर इंग्लिश मध्ये आणि मराठी असेल तर मराठीत शिकविले जातात. आपण लहानपणापासून काही ना काही नवीन शिकतो, अपग्रेड होत जातो मग आपल्या आवडी निवडी, रुची अभिरुची बदलत जातात त्यानुसार आपण मनोरंजन सुद्धा आपल्या आवडीनुसार बघतो, करून घेतो. पण हे हल्ली मराठी, मराठी म्हणून जे ओरडत आहेत ते हे बेसिक का विसरतात हेच कळत नाही. काय तर म्हणे या सिरीयल चे टायटल सॉन्ग हिंदीत का ती हिरोईन अशी का नि तशी का. अश्या लोकांनी आपले विचार आपल्याकडेच ठेवावे. मायबोलीवर हे जे नवीन नवीन सिरीयल वर धागे विणले जातात ते हल्ली मनोरंजन कमी आणि डोक्याला ताप जास्त देत आहेत. सिरियलच्या कन्टेन्ट पेक्ष्या इतर गोष्टीवरून वाद होतात आणि असेच काही. बाकी माझे विचार कोणाला आवडले नाही तर क्षमस्व, पण खूप दिवस हे कुठे कोणाला तरी सांगावे असे वाटत होते म्हणून हे लिखाण.
"अगर अपने जैसा इन्सान धुंडने जाओगे तो खुदको अकेला पाओगे".

अपर्णा, खरं आहे!
पिसंच काढायचीत म्हणून उगाच कशीही काहीही टिप्पणी करण्याची स्पर्धा असते मालिकांच्या चर्चा धाग्यावर.

अपर्णा, खरं आहे!
पिसंच काढायचीत म्हणून उगाच कशीही काहीही टिप्पणी करण्याची स्पर्धा असते मालिकांच्या चर्चा धाग्यावर >>>>> +1111

झालं..... तोंड बंद करा. पण फॅक्ट स्वीकारू नका.>>>> अग बाई.. त्रागा करुन घेऊ नकोस.एवढाच त्याचा अर्थ आहे.

ओके...पण फार कमी वेळा रिऍक्ट होते म्हणून वाचणाऱ्याला त्रागा वाटतो. बाकी मायबोली वर सदस्य झाल्यापासून मला विविध विषयांचे अनमोल मार्ग दर्शन झाले आहे परंतु निरीक्षणावरून एवढे ध्यानात आले कि लोक समाधानी नाहीत चांगल्या धाग्यावर चांगल्या विषयावर पर्सनल सूड उगवल्यागत भाष्य करतात. अगदी रंगाचा बेरंग होईतो चर्चा करतात. आणि मग चांगले मागे पडते उरतो फक्त बाष्कळपणा. सॉरी आता हे शेवटचे.

पण नॉर्मली सिरीयलचे धागे हे पिसं काढायलाच असतात.

तोंड बंद करा. पण फॅक्ट स्वीकारू नका. >> हे फारच मोठ विधान आहे आणि ते इथे अपेक्षित नाही. आयुष्याच्या facts स्वीकारूनच लोक इथे थोडा वेळ मनोरंजन करायला येतात. एका सिरीयल वरच्या टिपण्या वाचून लोक त्यांच्या आयुष्यात काय करतात याचे अंदाज बांधण हे सुद्धा हास्यास्पदच आहे.

परवापासून मालिका बघायला सुरुवात केलीये. आदिनाथला अभिनयात अजून बराच पल्ला गाठायचाय असं प्रथमदर्शनी वाटलं. त्याचं इतर कोणत्या सिनेमा/ मालिकेतलं काम मी पाहिलं नाहीये. कालच्या एपिसोडमध्ये तेजस्विनीशी बोलताना तो आत्ता हसेल की मग असं अ‍ॅटलिस्ट मला तरी वाटत होतं Proud
तेजस्विनीची निवड योग्य वाटतेय पण तिचं पात्र एकूणच फार घाईत आहे असं वाटलं.

पण फार कमी वेळा रिऍक्ट होते म्हणून वाचणाऱ्याला त्रागा वाटतो. बाकी मायबोली वर सदस्य झाल्यापासून मला विविध विषयांचे अनमोल मार्ग दर्शन झाले आहे परंतु निरीक्षणावरून एवढे ध्यानात आले कि लोक समाधानी नाहीत चांगल्या धाग्यावर चांगल्या विषयावर पर्सनल सूड उगवल्यागत भाष्य करतात. अगदी रंगाचा बेरंग होईतो चर्चा करतात. आणि मग चांगले मागे पडते उरतो फक्त बाष्कळपणा. >>> अगदी अगदी

आदिनाथला अभिनयात अजून बराच पल्ला गाठायचाय असं प्रथमदर्शनी वाटलं. >> संपदा नक्कीच. पण तो प्रयत्न करतोय खूप हे ही पोहोचतं
नाही का? Happy
damn it Happy

माझ्या मते त्या राणीने मुद्दामून पैशाकरता वयाने मोठ्या असलेल्या ( रमेश भाटकर ) माणसाशी लग्न केलं आणि त्याची संपत्ती ढापायची तिचा प्लॅन . त्यात ती त्या बिल्डर चा मुलगा ( विकी ) म्हणजे "राखेचा" मालिकेतला गणेश त्याला पण फशी पाडतेच आहे आणि स्वतःची काम करून घेतेय . आत्ता नेमकी "आदी "च्या हातात केस गेलेय मग त्याच्या पाठी पडायचं आणि त्याच लक्ष दुसरी कडे विचलित करून त्या केस मधून सही सलामत सुटायची तिची आयडिया / ट्रिक असेल . त्यामुळे आता ती सारखीच त्या आदी च्या पाठी पडताना / गळेपडू करताना दाखवतील बहुतेक Happy

अपर्णा सही . मायबोलीवर मालिकांचे धागे हे नेहमीच पीस काढायलाच काढलेले असतात. फारस कोणी चांगलं लिहिताना दिसत नाही हे मी "रात्रीस " धाग्यावर पण आत्ताच लिहिलंय . अरे थोडस कौतुक पण करा पण नाही . तू म्हणतेस तसं लोक समाधानी नाहीत हेच खर . चार घटका करमणूक म्हणून आपण हे धागे विणतो आणि आपलं फ्रट्रेशन ( घरच /दारच इत्यादी इत्यादी ) बाहेर काढतो . असच असत एकुणात . काय करणार ? असो Happy

तुम्हाला कुणाला जाणवल की नाही माहित नाही पुर्वी रमेश भाटकर असलेली एक शुन्य शुन्य सिरियल लागायची तिचे टायटल साँग पण असेच हटके होते. अ‍ॅनेट कि कोणतरी गायिका होती.
मला हे आवडल टायटल सॉंग नेहमीपेक्षा वेगळं आहे.
जोबन मधुबन बेचैन करिया
तुमरी दरस को तरसी अखिया

शब्द चुकले असतील पण असच काहीतरी आहे गाण.

मलाही आवडलं शीर्षक गीत म्हणून सर्च केलं तर चक्क हर्षदीप कौरने गायलंय. Happy सायली पंकज बरोबर (हिनेच राखेचा चे शीर्षक गीत गायले होते)

जोबन मधुबन
बैचेन करीया
तुम्हरे दरस की
प्यासी नजरिया

आजा… सजनवा…
हमरी… अठरीया…
बितेना तुम बिन
बैरण रतीया

जोबन मधुबन
बैचेन करीया
तुम्हरे दरस की
प्यासी नजरिया

संगीत – पंकज पडघम
पार्श्वसंगीत – ए व्ही प्रफ्फुलचंद्र
गीत – वलय मुळगुंद
गायिका – हर्षदीप कौर, सायली पंकज
वाहिनी – झी मराठी

मला आवडलं शीर्षक गीत. साड्याही आवडल्या मला. मी फेसबुकवर विचारलंय झीला साड्या तेजस्विनी यांनी स्वतः डिझाईन केल्यात का? ज्या कोणी केल्या असतील त्यांचं कौतुक असं.

शुभांगी. , ती मालिका हॅलो इन्स्पेक्टर Happy , अ‍ॅनेट आणि सुरेश वाडकरने गायले होते बहुतेक. एकाने इथे स्वतः ते गाणे ऑन व्हिडिओ टाकलाय बघ
https://www.youtube.com/watch?v=fEg8eLFMtSw

हॅल्लो हॅल्लो हॅल्लो हॅल्लो इन्स्पेक्टर
हॅल्लो हॅल्लो हॅल्लो हॅल्लो इन्स्पेक्टर
रात्रंदिनी शोधी गुन्हा
पोलिस हा
सुरक्शिततेसाठी
वाजवी वीणा

Lol

मी ह्या सिरियलचा पहिला भाग पूर्ण आणि नंतरचा दहा एक मिनिटं पाहिला. १०० दिवसांत मालिका संपणार आहे का? तरी आठवड्याला ६ दिवस म्हणजे महिन्याचे २४ झाले. सो जवळपास ४ महिने चालेल.

मला आपलं एक वाटतं की तरुण बायको, वयाने मोठा श्रीमंत नवरा ही सरधोपट कथा झाली. त्याऐवजी कदाचित असे ट्विस्ट असू शकतात.

१. राणीच्या नवर्‍याने खून किंवा तत्सम गुन्हा केलाय. त्यात हा इन्स्पेक्टर नडणार असं दिसताच त्यांनी हा मिसिंग केसचा बनाव रचून त्याला राणीच्या जाळ्यात अडकवायचा घाट घातलाय.

२. राणी आणि इन्स्पेक्टर एकमेकांच्या प्रेमात आहेत. त्याच्याकडेच ह्या गुन्ह्याचा तपास येणार म्हणून राणीने नवर्‍याचा खून केलाय. एका हिंदी पिक्चरची काहीशी अशी स्टोरी होती. बहुतेक धुंद.

२अ. राणीचं प्रकरण नवर्‍याला माहित आहे. ती आपला खून करण्याचा प्रयत्न करणार हेही माहित आहे. त्यामुळे त्याने ड्रायव्हरला वगैरे जास्त पैसे दिलेत. ऐनवेळी तो समोर येऊन इन्स्पेक्टरची हवा टाईट करणार.

पण इन्स्पेक्टर सिरियलचा हिरो असल्याने २ आणि २अ अशक्य दिसतात.

हॅलो इन्स्पेक्टर अधिकारी ब्रदर्स ची होती. अजब असायच्या सिरेली त्यांच्या.

झी च्या सगळ्या गजब च असतात म्हणा Proud

Pages