Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती पुढचं पाऊल मधली 'रूपे'
ती पुढचं पाऊल मधली 'रूपे' ....(रुपाली) आहे.>>> खर तर तिलाच घ्यायच होत शनाया म्हणून.
वेळप्रसन्गी आपल्या हक्कासाठी
वेळप्रसन्गी आपल्या हक्कासाठी भान्डणारी राधिका? कधी भान्डली ती? उलट गुरु ने तिला निघून जा म्हणताच मुकाटयाने निघून गेली की? साधा वादसुद्दा घातला नाही तिने. तिने गुरुला ठणकावून सान्गायचे होते की,"हे घर माझेही आहे. मी या घराची लक्ष्मी आहे. तुमच्या इतकाच हया घरावर माझा सुद्दा तेवढाच हक्क आहे. मी हे घर सोडणार नाही."
ती सईटाईप नाही. जी भूमिका
ती सईटाईप नाही. जी भूमिका असेल त्या टाईपच असते काम करताना. इथे तिला वाया घालवू नये अशी मनापासून इच्छा. मस्त अभिनेत्री आहे ती खरंतर.
प्रज्ञा ९ +१.
प्रज्ञा ९ +१.
ती सईटाईप नाही. जी भूमिका
ती सईटाईप नाही. जी भूमिका असेल त्या टाईपच असते काम करताना. इथे तिला वाया घालवू नये अशी मनापासून इच्छा. मस्त अभिनेत्री आहे ती खरंतर.>>>> सहमत
गुरुची आई रेवतीची आई शोभते बोलण्यात. गावातील असूनही तिचे विचार आधुनिक आहेत.
मला तो श्रेयस (मनीष) जरा चीप
मला तो श्रेयस (मनीष) जरा चीप वाटतो. तो डायरेक्ट शनायाला विचारतो," तु एकटी जाणार आहेस का घरी? मी तुला बाईकने सोडू का? हे जरा खटकल.
खर तर अस असायला हव होत की, शनाया बाहेर रिक्षाची वाट पाहते, तेव्हा श्रेयस तिला "हे काय तु अजुन ईथेच?" विचारतो, नन्तर ती आपली सिच्युएशन सान्गते. श्रेयस तिला लिफ्ट offer करतो. हे सहज घडत असे दाखवायला हवे होते.
शनाया आणि श्रेयसची मैत्री हळूहळू फुलायला हवी होती. इथे पहील्याच दिवशी सेल्फी काय, बाईकवर फिरणे काय, सगळच फास्ट दाखवलय.
श्रेयस शनायाच्या मागे लागलाय असेच वाटतेय हा ट्रेक बघून.
श्रेयस शनायाच्या मागे लागलाय
श्रेयस शनायाच्या मागे लागलाय असेच वाटतेय हा ट्रेक बघून.>> अगं, पानवलकर आणि गुरवाच्या मित्राने त्याला शनायाच्या मागे लावलाय असं मला तरी वाटतं. आणि तो गुरव नसल्याचा फायदा करुन घेतोय.
अगं, पानवलकर आणि गुरवाच्या
अगं, पानवलकर आणि गुरवाच्या मित्राने त्याला शनायाच्या मागे लावलाय असं मला तरी वाटतं. आणि तो गुरव नसल्याचा फायदा करुन घेतोय.>>> सहमत
ज्या गुप्तेला स्वत:च्या
ज्या गुप्तेला स्वत:च्या प्रायव्हसी मध्ये कुणी नाक खुपसलेल आवडत नव्हत, त्याला अचानक गुरुची काळजी कशी काय वाटायला लागली बुवा? राधिकाने केलेल्या जेवणाची जादू वाटत.
राधिकाचे अॅक्सेन्ट ओढुन
राधिकाचे अॅक्सेन्ट ओढुन ताणुन आणल्यासारखे येतात त्यामुळे अजुनच ईरिटेट करतात, तिच "आवो"(अहो! अतिशय नाटकी वाटत, गुरुचे आई-वडील भारी आहेत, सहज अभिनय आहे दोघान्चा,
सुनेची बाजु घेवुन मुलाला रागवणारे काना मात्र सिरियलितच असु शक्तात.
सुनेची बाजु घेवुन मुलाला
सुनेची बाजु घेवुन मुलाला रागवणारे काना मात्र सिरियलितच असु शक्तात.>> एकदम बंडल जनरलाझेशन.
नागपुरमधे पुडाची वडी म्हणतात?
नागपुरमधे पुडाची वडी म्हणतात?
सांबारवडा म्हणतो आम्ही यवतमाळकर
http://www.marathipizza.com/b
http://www.marathipizza.com/bad-culture-shown-in-marathi-tv-serials/
गुप्ते, बिवी नं वन मधल्या
गुप्ते, बिवी नं वन मधल्या अनिलकपूर किंवा सवत माझी लाडकी मधल्या रमेश भाटकर चा रोल निभावणार बहुतेक.
आणि गॅरीच्या ऑफीसमधल्या मित्राचा टाका भक्ती सोबत भिडवणार
काल तो मनीष (या मालिकेतले नाव
काल तो मनीष (या मालिकेतले नाव अजून डोक्यात बसायचय) 'सिक्रेट अॅडमायर' म्हणत होता सारखा.
काल तो मनीष (या मालिकेतले नाव
काल तो मनीष (या मालिकेतले नाव अजून डोक्यात बसायचय) 'सिक्रेट अॅडमायर' म्हणत होता सारखा.>>>>>>>>>>हो चुकीचे इंग्लिश प्रोनाउन्सेशन
बाकी तो मनीष जेवढा "होणार" ,
बाकी तो मनीष जेवढा "होणार" , मध्ये प्रभावी वाटायचं तितका इथे नाही वाटत. मुळात तो त्या नटवीला नाही शोभत.
त्या गुर्र्वाला सुद्धा नाही
त्या गुर्र्वाला सुद्धा नाही दाखवता येत आहेत योग्य त्या फीलिंग्स लाईक "एक तरफ है घरवाली एक तरफ बाहरवाली" आपले दामले काका किंवा अशोक मामा आता जर यंग असते ना तर त्यांना हि भूमिका शोभली असती.
काय ती नटवी हाफिसात कुठल्या
काय ती नटवी हाफिसात कुठल्या टॅलेंट वर सिलेक्ट झाली काय माहित ? तिची पोस्ट काय तिचा पगार काय नि बाई इथे करते काय काहीच कळत नाही. त्यादिवशी तीला ऑडिट करायला दिले होते तर तो दाढीवाला मनीष मदत करतो.. त्याला येते ऑडिट करता इतके सोपे असते ऑडिट करणे ?????????? कि कीबोर्ड वर बोटे फिरवली आणि चेहऱ्यावर एक्स्प्रेशन दिले कि झाले ऑडिट.
अपर्णा.....त्याचा उच्चार
अपर्णा.....त्याचा उच्चार "प्रोनंसिएशन" असा आहे..
आंबट गोड | 21 September, 2016
आंबट गोड | 21 September, 2016 - 16:18 नवीन
अपर्णा.....त्याचा उच्चार "प्रोनंसिएशन" असा आहे.. स्मित
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
ओके, टाईप करताना नीट चेक केला होता पण चुकलाच, जाऊदे मला कुठे करायचे आहे तो चुकत होता हे सांगायचे होते किंवा माधव यांच्या पोस्टला सहमत असे दर्शवायचे होते इतकेच.
नाही...ठीकाय...मी सहज गम्मत
नाही...ठीकाय...मी सहज गम्मत केली. इथे आपल्याला सगळ्यांनाच मनिष कसा चुकतोय हे दाखविणे महत्वाचे!
मनिष >>>> होसूमीयाघ चा
मनिष >>>> होसूमीयाघ चा इंपॅक्ट अजून आहे
काल पहिल्यांदाच गुरवाला
काल पहिल्यांदाच गुरवाला त्याच्या मुलाशी खेळताना / प्रेमाने बोलताना बघितले.
ती राधिका ज्याला त्याला काय सांगते की "ह्यांची माझ्यावर खूप प्रेम आहे" सासू-सासरे, ती मैत्रीण हे तर झालेच पण परवा त्या गुप्तेना पण सांगितले
बाकी काही असुदे, पण घरोघरच्या
बाकी काही असुदे, पण घरोघरच्या बायांना मात्र ही सेरियल भलतीच आवडते हो, अन नवर्याच्या तोंडावरो, त्याचे समोरच, मालिकेतील पात्रांच्या निमित्ताने शिव्याशापही घालण्याची सोय झालीचे, शिवाय, माझ्याबाबतीत आस्से आस्से घडले तर मी तस्से तस्से करीन ही जपमाळही ओढली जात्ये असे सार्वत्रिक निरिक्षण रिपोर्ट आहेत.
मालिकेद्वारे घराघरात घुसत असलेल्या संयशी पिशाच्चापासुन रक्षण कसे करावे या चिंतेत असलेला...
आपला नम्र
लिंब्या
त्या लाल नायटीचं पुढे काय
त्या लाल नायटीचं पुढे काय झाले? साबा ( श्रीएल मधल्या) साबूं ना म्हणत होत्या तुम्ही कधी असे आणले नाहीत वगैरे.
बाकी काही असुदे, पण घरोघरच्या
बाकी काही असुदे, पण घरोघरच्या बायांना मात्र ही सेरियल भलतीच आवडते हो, अन नवर्याच्या तोंडावरो, त्याचे समोरच, मालिकेतील पात्रांच्या निमित्ताने शिव्याशापही घालण्याची सोय झालीचे, शिवाय, माझ्याबाबतीत आस्से आस्से घडले तर मी तस्से तस्से करीन ही जपमाळही ओढली जात्ये असे सार्वत्रिक निरिक्षण रिपोर्ट आहेत.>>>>>>>> हा हा हा हा हा हा हा
बाकी काही असुदे, पण घरोघरच्या
बाकी काही असुदे, पण घरोघरच्या बायांना मात्र ही सेरियल भलतीच आवडते हो, अन नवर्याच्या तोंडावरो, त्याचे समोरच, मालिकेतील पात्रांच्या निमित्ताने शिव्याशापही घालण्याची सोय झालीचे, शिवाय, माझ्याबाबतीत आस्से आस्से घडले तर मी तस्से तस्से करीन ही जपमाळही ओढली जात्ये असे सार्वत्रिक निरिक्षण रिपोर्ट आहेत. >>>>>>>फिदीफिदी फिदीफिदी हसून हसून गडबडा लोळण
बाई इथे करते काय काहीच कळत
बाई इथे करते काय काहीच कळत नाही. त्यादिवशी तीला ऑडिट करायला दिले होते तर तो दाढीवाला मनीष मदत करतो.. त्याला येते ऑडिट करता इतके सोपे असते ऑडिट करणे ?????????? >> ज्या दिवशी काम दिलं , त्यादिवशी ती जेनीकडे मदत मागायला गेली होती. रिसेप्शनिस्ट पण करू शकते , त्याच्या हापिसात.
मनिष-शनायाची मैत्री आता कुठे
मनिष-शनायाची मैत्री आता कुठे सुरु झालेली आहे, सो त्याचे तिला एवढ महागडे locket देण आणि तेही त्यान्च्या दोघान्च्या नावान्ची initials असलेल , हे काही पटल नाही. मैत्री अजून फुलायला वाव दयायला हवा होता. मनिषची इमेज हयात चीप, desperate दाखविली आहे.
Pages