Submitted by पुरंदरे शशांक on 3 July, 2016 - 23:16
झुंबर ढगांचे
झुंबर ढगांचे
झुलते तालात
गाणे पावसाचे
पेरते वनात
सावळे सावळे
घन आभाळात
सल उकलवी
भुईचे अल्लाद
थेंब पावसाचे
येती आवेशात
मुग्ध रान सारे
बेहोशी उरात
दाटला कल्लोळ
गगनी अवनी
जलरुप घेई
स्वये नारायणी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा !!
वा !!
मस्त !!
मस्त !!
वा अगदी तालात वाचली . मस्त
वा अगदी तालात वाचली . मस्त वाटलं वाचताना
खूप छान....अगदी पावसाळी फील
खूप छान....अगदी पावसाळी फील आला.