मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए एल बाशम ancient india साठी चांगलं आहे अस माझं मत आहे.
मेडिव्हल इंडिया साठी मुजुमदार आणि स्वातंत्र्य काळासाठी ग्रोव्हर and ग्रोव्हर ही पुस्तकं आवडलेली

लक्ष्मीकांतच इंडियन पॉलिटी मी १५ वेळा तरी वाचलंय . बायहार्ट झालेलं मला. एकदम सरळ सोपी भाषा .,नो डोक्याला शॉट . हे पुस्तक वाचून भारतीय संविधानाचा अभ्यास पक्का होतो अगदी . स्पर्धापरीक्षेतच नव्हे इतर आयुष्यातही उपयोग होतो . बिपीनचंद्राच्या इंडियन फ्रीडम struggle हे ही बेस्ट आहे.

Basham जुने आणि आउटडेटेड पुस्तक आहे. गेल्या ५०-६० वर्षांत, म्हणजे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर, प्राचीन भारताबद्दल आपल्याला असलेले ज्ञान प्रचण्ड विस्तारले आहे, नवे संशोधन झाले आहे.....

बापू,
मीपन अतुल सरांची student..I have Bipinchandra..
Thanks for Spectrum नुस्खा..

पुणेकर,
टिळक स्मारक मंदिर समोर व्हाईट हाउस मधे पुस्तक प्रदर्शन सुरु आहे.
अजब प्रकाशनाची सारी पुस्तकें ₹५०/- मधे फक्त..

मी साने गुरुजींचे संध्या आणि सोनसाखळी व इतर कथा अशी दोन पुस्तकं तसेच विष्णुपंत गोडसेंच माझा प्रवास व विजयकुमार दळवींच जोगवा घेतलं.

प्रिय बाई-बार्बियानाची शाळा
अनुवाद - सुधा कुलकर्णी हे सुद्धा घेतलं.

वाचल्यावर कळवेलचं

टण्या साहेब,

ए एल बाशम चं वंडर दैट वॉज इंडिया हिस्ट्री ऑप्शनल ची पोरे वापरत वरती जाई म्हणल्या आहेत तेच खरे

एंशेंट इंडिया बाशम, कोसंबी, के कृष्णा रेड्डी (टीएमएच फॅक्ट बेस्ड)

मिडिवल साठी सतीशचंद्र पार्ट वन पार्ट टु अन जे एल मेहता पार्ट ३ (जे एल मेहता ख़ास करुन ईवोलूशन ऑफ़ आर्ट्स एंड आर्किटेक्चर अन कल्चरल चेंजेस वाचायला बेस्ट) जे एल स्वतः गोट्टिंगेन यूनिवर्सिटी जर्मनी ला बरेच वेळी लेक्चर्स घ्यायला जात असत

मॉडर्न - स्पेक्ट्रम मॉडर्न इंडिया, बिपिनचंद्र ह्यांचे इंडियन फ्रीडम स्ट्रगल, ग्रोवर एंड मेहता आहेच शिवाय एनसीईआरटी टेक्स्टबुक्स सुद्धा उत्तम!

हिस्ट्री ऑफ़ कनफ्लिक्ट बिटवीन रिलिजन एंड साइंस

- लेखक. जॉन विलियम डार्पर

टाइटलच भयानक आकर्षक वाटले, किंडल ऍप वर किंडल फ्री बुक्स मधुन घेतले, गरजू मंडळी ने "फ्री ई बुक्स ऑन अमेज़न" सर्च करावे उपलबध होऊन जाईल, अजुन वाचले नाहीये, वाचुन मग रिव्यु देतो, कोणी वाचले असल्यास रिव्यु सांगा प्लीज

हो ते सतीशचंद्राचे मेडिव्हील इंडिया मस्त आहे . लढाया एकदम डिटेलवर दिल्यात .

तर मी अबकडइ हा सतीश काळसेकरांनी संपादित केलेल पुस्तक वाचलं . चंद्रकांत खोत यांच्या अबकडइ ह्या दिवाळी अंकाच्या निवडक लेखांचं संपादन आहे . सतीश काळसेकरांचाच उत्तर मध्य पूर्व भारत भ्रमंतीवर लिहिलेला लेख विशेष आवडला .

सध्या इतकेच . विस्तृत पोस्ट नंतर लिहीन

हो जाई जी,

हिस्ट्री अन जियोग्राफी (दोन ऑप्शनल च्या आमदनीले म्हातारेकोतारे आम्ही)

२०११ नंतर हिस्ट्री ठेवला जियोग्राफी सोडला

दोन्ही घेण्यामागे herodotus चं एक वाक्य होतं आवडतं

History should be studied geographically and geography should be studied historically

,

ते आमचे असो, तुमचा ऑप्शनल कुठला आहे ? सद्धया इन सर्विस का? कुठली? किती एटेम्पट उरले??

काय झालय ह्या धाग्याला, लोक्स वाचत नहियेत की वाचताहेत पण इथे लिहायचा कंटळा करताहेत?
असो, नुकतच शिवा ट्रायोलॉजी 'संपवलं'..
भयंकर बोरिंग, पुढे काय आहे ह्यापेक्षा कधी संपतय असंच वाटत होतं, हजार पानांमध्ये १०-२० वाचण्यासारखी वाटली, बाकी निव्वळ रद्दी..एकाच पुस्तकातही सगळं करता आलं असतं, बहुतेक LOTR सारखं काहीतरी करायच असेल अमिशला. बाकी ही सिरिज एव्हढी का गाजली हे मला तरी समजलं नाही.
चेतन भगत ह्या पेक्षा बरा असच वाटलं, अ‍ॅमेझोन वर शिवा ट्रायोलोजीची कलेक्टर्स एदिशन होती/ आहे रुपये ९००/- (ज्याची एमार्पी २५००/- आहे) घ्यायचा विचार होता, बरं झालं नाही घेतली, पैसे वाचले.
ईपब वरच वाचली सगळी सिरिज, वेळ गेला हाती काहिच नाही लागलं.

'रंग नटेश्वराचे' हे गणपत पाटील यांचे आत्मचरित्र वाचले. तमाशात नाच्याची भूमिका करणार्‍या या कलाकाराच्या आयुष्यातील चढउताराचं चित्रण या पुस्तकात आहे. ज्यांना अशा रूढार्थाने दुय्यम पण प्रेक्षकांच्या 'लक्षात राहणारा' अभिनय करणार्‍या कलाकारांविषयी कुतूहल वाटते, त्यांना आवडेल असे पुस्तक आहे. तमाशात मुख्य भूमिका जरी नसली तरी ते त्या काळी लोकप्रिय होते. गणपत पाटलांच्या नावावर अनेक तमाशे त्याकाळी हाऊसफुल्ल होत. इतकेच काय जाहिरातीत गणपत पाटलाचे नाव आहे आणि प्रत्यक्षात मात्र ऐन वेळी प्रयोगात ते न दिसल्यामुळे प्रेक्षकांनी हैदोस मांडल्याच्या घटनाही घडल्या होत्या. प्रतिस्पर्धी फडही आपले प्रयोग चालावेत म्हणून आपल्या जाहिरातीत 'गणपत पाटील' असं ठळक अक्षरात लिहून पुढे लहान अक्षरात 'यांना टक्कर देणारा' अशी जाहिरात करायचे. आपल्या भूमिकेबद्दल कधीच कमीपणा न बाळगता जी जी कामं मिळाली त्याचं सोनं करणं एवढंच त्यांनी बघितलं. या भूमिकेनं त्यांना आयुष्यात खर्‍या अर्थाने दोन घासांची सोय करून दिली याची पुरेपूर कृतज्ञता त्यांच्या लिहिण्यात जाणवते.

अग्निपंख,
शिवा ट्रायॉलॉजी इज फार बेटर दॅन चेतन भगत's..

मी सद्ध्या शांता शेळके नी केलेला अनुवाद वाचला चौघीजणी हा..
सुंदर पुस्तक पण शेवट अगदीच नाही वाचवला मला. मी शेवटचे काही प्रकरण तर सोडूनच दिले..
सुरुवात छाने पण शेवट नाय नाय नाय आवडला.. असो.. नक्की वाचा इतरांनी. वाचलही असेल म्हणा शायद. पण नसेल वाचल तर वाचण्यासारखं पुस्तक.. Happy

दर थोडे दिवसांनी या धग्यावर येऊन पाहते काय नवीन वाचले कुणी. बरेच वर्ष यातून वाचून पुस्तक मागवली आहेत.
पण सध्या काही अपडेट्स नाहीत विशेष येथे.
सध्या स्मरणगाथा परत एकदा वाचून काढते आहे.

दर थोडे दिवसांनी या धग्यावर येऊन पाहतो काय नवीन वाचले कुणी. येथे वाचून पुस्तक मागवली आहेत.
पण सध्या काही अपडेट्स नाहीत विशेष येथे. Happy Happy

एक अतिशय प्रभावी पुस्तक वाचनात आले. हिंदू.
आपली जगण्याची, धर्माकडे बघण्याची व्याख्या बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणारे, अतिशय महत्वाचे पुस्तक. विशेषतः आजच्या पिढीला निदान मनातली गुंतागुंत शब्दबद्ध केल्याचे समाधान देणारे, कुठलाही अभिनिवेश न बाळगता नेमके वर्मावर बोट ठेवणारे, हिंदू धर्मातल्या अनेक फोल समजुती, रुढी, परंपरा यांचे विच्छेदन करणारे आणि थेट भिडणारे पुस्तक !
कोसला वाचल्यानंतर नेमाडें बद्दल एक ’थोर’ आदर मनात भरुन राहीला होता. इतकी आरस्पानी भाषा, जणू समोर घडतंय असं चित्रदर्शी वर्णन, रेशमाच्या लडींप्रमाणे एकातून एक उलगडत जाणार्‍या घटना व प्रसंग, आणि कुठल्याही पानावरुन पुस्तक वाचायला सुरु केलं तरी लागत जाणारी संगती...
हिंदू ही कुणा एका खंडेरावाची – एकेकाळच्या तालेवार पाटील घराण्यातल्या मुलाची कथा आहे. नदीच्या प्रवाहाप्रमाणे खालीवर वाहत कथा पुढे जाते. काळाची फारशी पर्वा न करता तो त्याला आलेले घरचे-दारचे अनुभव अतिशय ओघवत्या, ग्रामिण बोलीत सांगत जातो...त्यात काही स्वगतं असतात, काही आयाबायांचे उद्गार असतात आणि काही कथानकं...कथेला पुढे नेणारे.
आर्यांच्या आगमनाने सिंधुतीरावर एक नवीन संस्कृती उदयास आली. अनेक शतकांपूर्वी निर्माण झालेल्या या हिंदू संस्कृतीने जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करीत संपूर्ण भारतीय उपखंडात आपली पाळेमुळे रुजवली. तिने सतत प्रवाही राहून वेगवेगळ्या सामाजिक स्तरांना आपलंसं करुन घेतलं व नवनवीन संकल्पनांचा अंगीकार केला. मूळ तत्व तेच राहीले तरी नवीन विचारांचा स्वीकार केल्याने तिला एक बहुआयामी, समृद्ध पोत मिळाला ज्याचा परिणाम सामाजिक प्रथा व व्यक्तीगत नाते संबंधांवर होत राहीला.
या संस्कृतीचा सार्वत्रिक परिणाम, तिच्या जमेच्या व दुबळ्या बाजूंसकट आपल्यावर होत असतो. आपण समाजात राहतांना सतत बर्‍या वाईटाला पारखत, ’अपग्रेड’ होण्याची लढाई लढत असतो. ही समृद्ध करणारी लढाई हा ’हिंदू’ चा गाभा आहे. ही कादंबरी जीवनातील भव्यता आणि अनेकविधता एखाद्या महाकाव्याच्या धर्तीवर साकारते. वाचनाचा अतिशय आनंद देणारे हे पुस्तक तुम्हाला स्वतःचाच नव्याने धांडोळा घ्यायला उद्युक्त करते.

'In the Heart of the Sea: The Tragedy of the Whaleship Essex' लेखक: Nathaniel Philbrick.
१८२० मधे व्हेलच्या शिकारीला निघालेल्या बोटीवर एका महाकाय माशाने हल्ला करुन तिला बुडवले. त्यातून वाचलेले खलाशी तीन लहान बोटींमधून जवळपास ४००० मैलांच्या प्रवासावर निघतात. त्या ९० दिवसात काय काय घडत जाते याचे सुंदर वर्णन आहे (घटना सुंदर नसल्या तरी). विशेष म्हणजे नॉन फिक्शन पुस्तक असूनही एका बैठकीत वाचावे इतके खिळवून ठेवते.

(त्यावेळी वाचलेल्या खलाशांनी त्यांची स्मरणे लिहून ठेवली आहेत. त्यावरुनच हर्मन मेलविल 'मोबी डिक' साठी प्रेरित झाला म्हणे. In the Heart of the Sea याच नावाने पुस्तकावर आधारित सिनेमा मागच्या वर्षी आला होता. सिनेमा पडीक होता पण तो बघून पुस्तक शोधले आणि फार आवडले.)

उदय प्रकाश लिखीत हिंदी दीर्घकथा 'मोहन दास' वाचली. तिचे पुस्तकरुपाने प्रकाशन झाले आहे. त्यांच्या शैलीशी ज्यांचा परिचय आहे त्यांना तर आवडेलच पण ज्यांना उदय प्रकाश हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचे आहे त्यांनीही नक्कीच वाचावी.
कोण्या एका मोहन दासच्या 'आयडेंटीटी थेफ्ट'ला आपला हातभार तर लागला असेल का हा प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करेल. स्वतःच्या प्रतिमेबद्दल, ओळखीबद्दल तुमच्या मनात शंका उत्पन्न होईल, आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे या स्वप्रतिमेच्या निर्मितीत माझा स्वतःचा वाटा किती आणि धर्म, देश, समाज, जात इत्यादी रेडीमेड लेबल्सचा प्रभाव किती हा प्रश्न उभा राहील.

खरं तर सांगायला कसंतरीच वाटतंय पण मी आजपर्यंत एकही पुस्तक/ कादंबरी वाचलं नाहीये पण आता मराठी/ इंग्लिश वाचनाची सवय टाकाविशी वाटतेय. कुठल्या पुस्तकां पासनं चालू करता येईल?

मनी, हाच धागा पूर्ण वाचून काढा Happy

हॅरी पॉटर सिरिज वाचायला सोपी आहे . अगाथा क्रिस्टीची पुस्तके, ओ हेन्रीच्या गोष्टी , हिचकॉकच्या गोष्टी , हे ट्राय करु शकता.

कॉलेजवयात मिल्स अ‍ॅण्ड बून्स आणि तत्सम रोमान्स नॉवेल्स पासून पण बरेच लोक सुरुवात करतात.

पल्प फिक्शन मधे सिड्ने शेल्डन, बाँडच्या कादंबर्‍या पण इझी रीडर आहेत.

मुंमग्रंसंत एक बाई आपल्या कॉलेजवयीन मुलीच्या वाचनाची सुरुवात कोणत्या पुस्तकांनी करावी असं विचारत होत्या. काउंटरवरच्या ताईंनी सुहास शिरवळकर, व पु काळे, प्रवीण दवणे ही नावे सांगितली.

मराठी वाचन सुरुवात करायची असेल तर मी प्र ना संत, श्रीनिवास कुलकर्णी, ग दि माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, गो नी दांडेकर, अनिल अवचट, चिं वि जोशी , गौरी देशपांडे हे सुचवेन.

Came across an interesting blog through Ann Morgan's Ted talk.
Ann decided to read book from each country (all 196 of them) in 2012 and blogged about it .
Here is the link to her blog.

https://ayearofreadingtheworld.com/

(For some reason, not able to type in devnagari)

मुळात असे कोणाला विचारून वाचायला सुरुवात करूच नये. हे म्हणजे मी आता काय खायला लागू असे झाले.
जे आवडेल ते, पचेल ते, आणि परत परत खावेसे वाटेल असे चविष्ट असे खावे हे उत्तर झाले.

Pages