मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरदा, जबरीच!
आगावाने नोंदलेलं वाक्य वाचून मी ही थबकले २ क्षण...

लोकसत्ता-बूकमार्कमधेही या पुस्तकाबद्दल वाचलं होतं.

मराठीत ऑनलाईन माझाच रीव्ह्यू पहिला का? Uhoh आणखी कुणी कुठे लिहिलेलं दिसलं तर सांगा. आणखी वृत्तपत्रांमधे काय लिहून आलंय? मला वाचायला आवडेल Happy

अजून पुस्तक वाचले नाहिये पण अ‍ॅटिकसचा हा पैलू खरे तर खूप नॉर्मल आहे असे मला तरी वाटते. वाट्याला आलेली केस निष्ठेने लढवणे वेगळे आणि सगळे समान असे वाटणे वेगळे. जो पर्यंत प्रत्येकजण ठरवून दिलेली उतरंड पाळायला तयार आहे तोवर न्यायाच्या गप्पा पण ती उतरंडच अन्यायकारक आहे, मोडायला हवेय असे अ‍ॅटिकस मॉकिंगबर्डमधेही म्हणत नाही. सिग्रीगेशन त्याच्यासाठी नॉर्मलच आहे. वंश संकर होवू नये म्हणून इंटर रेशीयल मॅरेजवर कायद्याने बंदी असणार्‍या भागातले हे सोसायटीचे पिलर्स. या मंडळींचा ककक मधला सहभाग हे देखील खूप नॉर्मल. आम्ही आखलेल्या चौकटीत रहा आणि आम्ही तुमच्या बाबतीत जो काही दयाळूपणा दाखवतोय त्याबद्दल कृतज्ञता बाळगा ही मानसिकता खरे तर थोड्याफार फरकाने सगळीकडेच आढळते. रेस रिलेशन्स मधे ती अजूनच अधोरेखीत होते. बॅक टु बॅक बघितलेले बटलर , सेल्मा आणि जोडीला पेटलेले बाल्टिमोर यामुळेही असेल कदाचित पण लॉस ऑफ इनोसंस असला तरी हा अ‍ॅटिकस माणूस म्हणून जास्त ऑथेंटिक वाटतोय त्यामुळे पुस्तक वाचायला उत्सुक आहे.

गो नि दांडेकरांचे रानभुली वाचले. रायगडावर राहणाऱ्या त्यांच्या धनगर मानसकन्येची छोटीशी कथा आहे. खूप सुंदर आहे.

त्यात त्यांनी कुठे कुठे गडाचे वर्णन करताना लवण असा उल्लेख केला आहे. हे लवण काय असते कुणी सांगू शकेल का?

लवण म्हणजे मीठ हे मला माहित होते. पण इथे गडाच्या भूभागाच्या वर्णनात लवण आलेय. वाघदरीवाजा ओलांडल्यावर लवण आहे ते ओलांडून गेले... अशाप्रकारचे वर्णन आहेत. पुस्तक आधीच वाचनालयात परत दिलय त्यामुळे एक्झॅक्ट वाक्यरचना आता देऊ शकत नाही. Sad

लवण म्हणजे स्मूथ छोटा उतार व छोटा चढ असलेला खड्डेवजा भूभाग . जमीन थोडी लवलेली असते. तव्याचा क्रॉस सेकशन घेतल्यावर जसा दिसेल तसा प्रदेश.

मी सद्ध्या शांताराम वाचतोय.. मोठ्ठ आहे, पण वाचनीय वाटतंय..
आपल्या मातीत घडलय हे सगळ.. त्यामुळे एका बाहेरच्याच्या नजरेतून हे सगळ पाहायला मस्त वाटतंय.. Happy

बिल ब्रायसनचे 'मदर टंग' वाचलं. धन्यवाद रैना सुचवल्याबद्दल.
इंग्रजी भाषा, तिचा सगळीकडे वापर होतो त्याची लेखकाच्या मते कारणं पासून कर्सिंग आणि हे सगळं सांगताना वेगवेगळ्या गमतीजमती. आवडलं. काहीकाही स्पष्टीकरण कोन्टेकस्ट नसल्याने समजली नाहीत, पण एकूण वाचायला मस्त वाटलं.

@वरदा - 'गो सेट अ वॉचमन'बद्दलची निरीक्षणं आवडली, पटली. विशेषतः निराळ्या संदर्भातला 'लॉस ऑफ इनोसन्स'*, दोन्ही पुस्तकांचा मिळून एकसंध परिणाम आणि त्यांचा रिलेव्हन्स (स्थलाबरोबरच अलीकडच्या घटना पाहिल्या तर काळाच्या संदर्भातही).

बाकी अ‍ॅटिकसच्या नव्या रूपाबद्दल बरीच चर्चा वाचल्याने तसा धक्का बसला नाही; उलट 'स्काऊट'च्या वागण्यातल्या काही गोष्टी किंचित अनपेक्षित वाटल्या. शिवाय या कादंबरीचा जीव तसा छोटा आहे. स्वतंत्रपणे वाचनीय असली तरी 'मॉकिंगबर्ड'मधली इतर कथानकं (बू रॅडली, गावात घडणारे प्रसंग) आणि संघर्षाचं चित्रण यांच्या तुलनेत ह्या कादंबरीतलं द्वंद्व एक-दोन प्रसंगांतच आटपतं. त्यामुळे मॉकिंगबर्ड न वाचताच, जर कुणी थेट हे पुस्तक वाचलं तर ते त्याला गुंडाळल्यासारखं वाटेल.

मॉकिंगबर्डमधलं प्रथम'पर्सनी' निवेदन हे लंपनसारखं बेमालूम आपल्याला त्या विश्वात घेऊन जातं. लहान मुलाच्या नजरेतून आलं असलं तरी अधूनमधून त्याला प्रौढ व्यक्तीच्या विश्लेषक वृत्तीचीही जोड आहे. ते वैशिष्ट्य हरवल्याचं 'गो सेट अ वॉचमन' वाचताना तसं जाणवत नाही; पण मॉकिंगबर्डशी (अन्याय्य) तुलना केली की लक्षात येतं.

* 'अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे' ही ओळ आठवली. मॉकिंगबर्डमध्ये ती शब्दशः (बू रॅडलीच्या अंगणात उभं राहून त्याच्या 'दृष्टी'ने पाहण्याचा प्रयत्न करणारी स्काऊट) अधिक लाक्षणिक अर्थाने खरी ठरते. 'गो सेट...'मध्ये दॅट हिट्स क्लोज टू होम.

नंदन, तुझ्या पोस्टची वाट पाहतच होते. तुझ्या स्टाईलने 'गो सेट...'बद्दल विस्तृत लिहावे ही नम्र विनंती. Happy

* 'अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे' ही ओळ आठवली. मॉकिंगबर्डमध्ये ती शब्दशः (बू रॅडलीच्या अंगणात उभं राहून त्याच्या 'दृष्टी'ने पाहण्याचा प्रयत्न करणारी स्काऊट) अधिक लाक्षणिक अर्थाने खरी ठरते.>> व्वा, व्वा!

आगाऊ +१

हो, अ‍ॅटिकस मलाही कुठे धक्कादायक वाटला नाही की त्याच्या स्वभावात अंतर्विरोध जाणवला नाही. तो एका विशिष्ट कालखंडाचं, सामाजिक मानसिकतेचं प्रॉडक्ट आहे. आणि वर्णभेद मानणार्‍या आणि न मानणार्‍या व्यक्ती पूर्ण काळ्या किंवा पांढर्‍या नसणारच (कुठल्याही सामाजिक विषमतेलाही हेच लागू) त्यामुळे त्याचा त्या व्यवस्थेवर विश्वास असला तरी चांगुलपण, माणूसपण, सत्याची कास, न्याय-अन्यायाची चाड असणे हे आहेच. त्याने आपल्या मुलांवर स्वतःच्या सामाजिक विषमतेच्या दृष्टीकोनाचे मुद्दाम संस्कारही केलेले नाहीत (म्हणूनच स्काउट स्वतंत्रपणे विचार करू शकते). उलट या अशा सगळ्या गोष्टींमुळे मॉकिंगबर्ड मधल्या जवळजवळ एकरंगी अ‍ॅटिकसला फार लोभस माणूसपण लाभलं असं मला वाटतंय. मुलीला तो शेवटपर्यंत ज्या पद्धतीने वागवतो, त्या भावनिक आंदोलनांना ज्या प्रकारे हाताळतो त्याने त्याचं 'शहाणं बाप-पण' फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतो.
मुळात हे पुस्तक स्वतंत्रपणे न वाचता मॉकिंगबर्ड चा सीक्वेल म्हणूनच वाचण्यात अर्थ आहे असं मला वाटतं

आज एका बाईंशी गप्पा मारत असताना एका पुस्तकाची माहिती मिळाली. खूप इंटरेस्टिंग वाटतंय. वाचायला आणि संग्रही ठेवायला आवडेल मला.

The London Jungle Book : http://www.amazon.in/London-Jungle-Book-Bhajju-Shyam/dp/818621187X

इथे त्या पुस्तकांतील चित्रांसंदर्भात छान लिहिलेलं आहे. : http://www.brainpickings.org/2014/06/20/london-jungle-books-bhajju-shyam...

संदेश कुलकर्णीचे 'माँटुकले दिवस' हे एकदम गोड पुस्तक आहे. तीन-साडेतीन वर्षांचा माँटु, त्याचे भावविश्व, त्याचे आणि संदेशचे विश्व आणि संदेशचे स्वतःचे (मोठ्यांचे) विश्व या सर्वांची सांगड अतिशय साध्या, कोणताही आव न आणलेल्या शब्दांमध्ये संदेशने घातली आहे. लहान लहान प्रसंगांमधून लेख फुलवले आहेत. सगळेच लेख जमले आहेत असं नाही, खासकरून शेवट कसा करावा हे उमजलं नाहीये असं वाटतं Happy पण फार सुंदर अनुभव काही लेख वाचताना मिळतात. एकदा तरी वाचावंच असं पुस्तक.

पूनम, चाळलं होतं अक्षरधारामध्ये.. छान वाटत होतं पण बरीच पुस्तकं होती अजेंड्यावर त्यामुळे राहिलं.. आता घेइन नक्की..

गो सेट अ वॉचमन गेल्या आठवड्यात वाचलं. फार फार आवडलं. अ‍ॅटिक्स आधीपेक्षा आधिकच आवडायला लागला.
स्काउटचा त्याच्याबरोबरच संघर्ष जरी वर्णभेदासारख्या मोठ्या गोष्टीवरून झाल असला तरी असा आईवडिलांच्या मता/विचारांना विरोध करायची वेळ सर्वांवर येतेच कधीतरी त्यामुळे स्काउट ज्या स्पष्टपणे तो व्यक्त करते ते फार आवडलं (याचं श्रेय अर्थातच अ‍ॅटिअक्सने ज्या प्रकारे मुलं वाढवली त्याला )

गरोदरपणात वाचायला द्यायला कुणी चांगली पुस्तके सुचवाल का?
शक्यतो गोष्टीरुप हवी आहेत.... आत्मचरित्र वगैरे नको!

मनःशक्तीचे कृष्णरहस्य आणि कृष्ण कारस्थान वाचा. बर्‍यापैकी स्टोरी स्वरुपात दिले आहे आणि कंटाळा येत नाही.

नंदन , >>* 'अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे' ही ओळ आठवली. मॉकिंगबर्डमध्ये ती शब्दशः (बू रॅडलीच्या अंगणात उभं राहून त्याच्या 'दृष्टी'ने पाहण्याचा प्रयत्न करणारी स्काऊट) अधिक लाक्षणिक अर्थाने खरी ठरते)>> - फार थोड्या शब्दात खूप काही आलं .
मी पुन: महाभारत वाचतेय, त्यात || महाभारत || संघर्ष आणि समन्वय- रवींद्र गोडबोले खूपच वाचनीय मननीय.आपला दृष्टिकोन आरपार बदलून टाकायची क्षमता असलेलं पुस्तक युगांत नंतर.
FB वर ही पोस्ट टाकली होती या वाचनाबद्द्ल -

एखाद्या जुनाट मूर्तीवरचे शेंदराचे थर खरवडल्यावर आतल्या मूर्तीचं मूळ रेखीव रूप पाहून थक्क व्हावं तसं काहीसं ‘’ महाभारत : संघर्ष आणि समन्वय ‘’ हे रवींद्र गोडबोले यांचं पुस्तक वाचताना झालं. ( देशमुख आणि कं.पब्लिशर्स ,२०१३ )
‘’चला ! महाभारतावर अजून एक अभ्यास वाचू या’’ अशाच भावनेने हातात घेतलेल्या या पुस्तकाने फार महत्वाचा धडा दिला तो म्हणजे सतत प्रक्षेपांचं भान राखत केलेला खोल अभ्यास. एखाद्या चित्रावर नंतर दिलेली पुटं जाणत्या नजरेतून सुटू नयेत तसे व्यक्तिरेखांच्या संवादात येणारे विक्षेप,कालमापनाचा पाठपुरावा , तर्काच्या तीक्ष्ण हत्यारांचा वापर, यातून हे जोड सपासप छेदून टाकल्यावर मनातले अनेक आरोप निवळतात , बुद्धीला पडलेले संभ्रम दूर होतात याचा अनुभव घेतला.
अगदी साधं आणि एकच ठळक अवतरण-
‘’ स्त्रीसु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर:-अर्जुनाच्या तोंडी आलेले, वर्णसंकराची धास्ती व्यक्त करणारे आणि पितरांना नरकवास भोगावा लागेल या भीतीने ग्रासलेले हे चार श्लोक उत्तरकालीन प्रक्षेप असण्याच्या शक्यता जाणवू लागतात ..’’ ( पान ३२५)- आपले हे विधान पुढे गोडबोले यांनी सप्रमाण मांडले आहे,तेव्हा गीतेतल्या अनेक न पटणाऱ्या स्रोतांची गंगोत्री गवसते.
अशा अनेक महत्वाच्या प्रक्षेपांचा सूक्ष्म विचार करून, ते त्यागल्यावर हाती शिल्लक राहिलेलं महाभारत मुळातूनच वाचनीय आहे. घटना-दुर्घटनांच्या प्रपातात प्रत्येक व्यक्तिरेखा करत असलेला मूल्यविचार आणि संघर्ष ठाशीवपणे उभारून आला आहे. द्यूताचा प्रसंग त्यांच्या अभ्यासाच्या आधारे वाचताना या महान ग्रंथाच्या आत्म्यात धगधगलेला ज्वालामुखी आजही जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. हा सारा घटना- विश्लेषण –भाष्य प्रपंच आटोपशीर ३४३ पानात सामावला आहे.
या-या परिस्थितीत माझा धर्म कोणता ? माणसाला पडणारा सनातन प्रश्न. महाभारताच्या महामंथनातलं व्यक्तिगणिक घडणारं बिघडणारं धर्म-अर्थ-कामाच्या असमतोलाचं कथासूत्र, त्यातून घेतला गेलेला सार्वकालिक संतुलनाचा शोध हे या महाकाव्याचं अजोड बलस्थान. गोडबोलें यांनी कुठेही एकांगी न होता ते आपल्यासमोर मांडलं आहे.
वाचायलाच हवं असं पुस्तक.

भारती....

श्री.रवीन्द्र गोडबोले यांच्या "महाभारत : संघर्ष आणि समन्वय" या पुस्तकावर आपली चर्चा झाली आहेच. आज पुन्हा (अगदी अपघाताने म्हटले तरी चालेल) या पानावर आल्यावर तुमचा हा नवा प्रतिसाद दिसला आणि अत्यंत आत्मियतेने तुम्ही श्री.गोडबोले यांच्या मांडणी आणि तत्वावर लिहिल्याचे जाणवले. पुस्तकातील विचार तुम्हाला किती खोलवर भावले आहेत हे तर उमजून येतेच शिवाय लेखकाने अत्यंत तटस्थनेने दोन्ही बाजू ("एकांगी न होता" असे तुम्हीही म्हटलेले आहेच) वाचकांसमोर सादर केल्याचे जे दिसून येत आहे तीच पुस्तकाची फार प्रभावी बाजू सिद्ध होऊ शकते. मुळात संघर्ष तर आहेच...होताच आणि झालाच...त्यातून जेत्याच्या हाती काय आले ही देखील एक सुन्न करणारीच घटना आहे. लढाई जिंकली म्हणून रणदुदुंभीसुद्धा फुंकता येत नव्हत्या त्या गलितगात्र जेतेपदाच्या वीरांना....शेवटी भावाभावातील जमिनीच्या वाटपावरूनचा तो संघर्ष...व्यापकरुपातील...तो अ जिंकला आणि ब हरला....घडलेल्या रक्तपातात तिसरेच स्वर्गवासी झाले. त्यामुळे अशा कणाहीन संघर्षातून समन्वय साधायचा झाल्यास तो कशाप्रकारे वा किती खोलवर हे सर्वसामान्य वाचकाचे नव्ह तर गोडबोले यांच्यासारख्या पंडिताचेच कार्य असते....आणि ते त्यानी केले आहे समर्थपणे असे तुम्ही म्हणता म्हणजे ते पुस्तक या संदर्भात प्रमाण मानावे असेच मी म्हणेन.

धन्यवाद.

Pages