मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>ललिताने वर दिलेल्या लिंकवरची 'तिरिछ' ही कथा नक्कीच वाचा, व्यवच्छेदक उदय प्रकाश!<<
+१ जबरदस्त कथा! अचाट लिहिलयं.

मनी, मराठी साहित्यात जी पुस्तके मास्टरपीस म्हणून ओळखली जातात त्यापासून जर तू सुरुवात केलीस तर तुला मराठी पुस्तकाची आवड निर्माण होईल शिवाय अनेक लेखकांची शैली, प्रतिभा तुला लक्षात येईल. शिवाय वाचानाचा निर्भेळ आनंद तुला नक्कीच मिळेल. तेंव्हा मी तुला ही मास्टरपीसेस वाच असा सल्ला देईल.

माझी यादी अशी आहे:
१) आहे मनोहर तरी --- सुनिता देशपांडे
२) सोयरे सकळ - सुनिता देशपांडे
३) जावे त्यांच्या वंशा - प्रिया तेंडूलकर
४) दुस्तर हा घाट - गौरी देशपांडे
५) आहे हे असे आहे - गौरी देशपांडे
६) पुर्वरंग - पु. ल. देशपांडे
७) आंधळ्याच्या गायी - मेघना पेठे
८) हंस अकेला - मेघना पेठे
९) युगांत - ईरावती कर्वे
१०) व्यासपर्व - दुर्गा भागवत
११) माझ्या मनाची रोजनिशी - अंजली किर्तने
१२) ययाती - वि. स. खांडेकर

आत्तापुरती इतकीच यादी देतो. ह्यातील कुठलेही पुस्तक निवड तुला आवडलेच.

ही माझी नवीन खरेदी... (ह्यातील काही संग्रही असुद्यावी म्हणून वाचलेलीच पुस्तके आहेत. तर काही नवी खूप गाजलेली. अन काही अशीच आयत्यावेळेस घेतली. काही भेट मिळाली तर काही आईकडून ढापून आणली आहेत )

प्रेषित, यक्षांची देणगी, चार नगरांतले माझे विश्व - जयंत नारळीकर
चकवा चांदण - मारूती चितमपल्ली
पर्व - डॉ. एस एल भैरप्पा - अनुवाद सौ उमा कुलकर्णी
माझंही एक स्वप्न होतं - वर्गीस कुरीयन
रारंग ढांग , चक्रीवादळ - प्रभाकर पेंढारकर
मण्यांची माळ, आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे
सुनीताबाई , गुंडाबळी - मंगला गोडबोले
महोत्सव - वपु (पूर्वी हे पुस्तक फारच आवडले होते .. हल्ली वपु वगैरे लेखन बोअर होते. पण वाचून बघायचे आहे परत आवडते की बोअर होते.. )
उरलंसुरलं, गणगोत - पुलं
शारदा संगीत - प्रकाश नारायण संत (ह्या सिरीजमधील पहिले पुस्तक कुठले हे आजिबात आठवेना. व इतर पुस्तकं दिसेनात. म्हणून हे घेतले आहे..)
हसरी किडनी - पद्मजा फाटक
अमलताश - सुप्रिया दीक्षित
शोध - मुरलीधर खैरनार
फॉर हिअर ऑर टू गो - अपर्णा वेलणकर
सात सक्कं त्रेचाळीस - किरण नगरकर
मौनराग, त्रिबंध - महेश एल्कुंचवार
मालगुडी डेज - आर के नारायण (अनुवाद मधुकर धर्मापुरीकर)
तोत्तोचान - तेत्सुको कुरोयानागी (अनुवाद चेतना सरदेशमुख गोसावी)
बापलेकी - पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर, विद्या विद्वांस
थालियाची थाळी - पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर

डेक्कनवरच्या बुकगंगा दुकानातून घेतली पुस्तकं. अमेझिंग एक्स्पिरिअंस. नवर्‍याला फायनान्समधील काही पुस्तकं हवी होती, ती लिहून घेऊन आठवड्याभरात आणून ठेवली त्यांनी. माझ्या मुलासाठी देखील बिग प्रिंटमधील फार सुरेख पुस्तकं मिळाली तिथे. आमची एक बॅग पुस्तकांचीच झाली! Happy

बस्केच्या यादीतली बहुतेक पुस्तक वाचून झाली असल्याने कॉलर टाइट झालीये Proud

बस्के, तू पाडस वाच . मूळ किंवा अनुवादित . भयंकर आवडत मला ते पुस्तक. शेवटचा पॅरा माझ्या विशेष आवडीचा आहे त्यातला

मालगुडी डेज - आर के नारायण >> हे मुळात इंग्रजीच वाच बस्के. ओल्ड मैसूर स्टेट छापाचं इंग्रजी आहे. फार मजा येते वाचताना

बस्केच्या यादीतली बहुतेक पुस्तक वाचून झाली असल्याने कॉलर टाइट झालीये >>>>> +१ अगदी ३,४च वाचलेली नाहीत.
पाडस,राम पटवर्धन यांचा अनुवाद आहे.मूळ लेखिका मार्जोरी रॉलिंग पुस्तकाचे नाव "The Yearling". खूप सुरेख आहे.
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=3&cad=rj...

देवकी थँक्स! हे नाव कायम विसरते मी. Happy
अरे माझी लिस्ट काही परीपूर्ण नाहीये! Happy नीलला घेऊन गेले शॉपिंगला Uhoh शिवाय खिसा अन बॅगांचे वजन असेही लिमिटेशन्स होतेच की.

मेधा, बघते पुढच्या वेळेस. समहाऊ तिकडून इकडे आणताना इंग्लिश पुस्तके बघितलेच नाही जात! हे पुस्तक स्पेसिफिकली नवर्याला वाचनाची आवड लागावी म्हणून घेतले आहे..काहीच वाचत नाही तो! Sad त्याला सिरिअल खूप आवडते..

रार, थँक्स गं! इतक्यात नको पाठवूस. इतर पुस्तकं वाचते जरा आधी.. Happy

मी किती शुल्लक आहे वाचण्यात हे हा धागा वाचुन कळते मला Happy काय व्यासंग आहे राव लोकहो तुमचा कितीतरी पुस्तके जोड़ली गेली माझ्या लिस्ट मधे

जयंत नारळीकरांचे "वामन परत न आला" सुद्धा उत्तम

यक्षांची देणगी मधली "गंगाधरपंतांचे पानीपत" ही विशेष आवडती कथा आहे माझी तरी

वरच्या लिस्टमधली सुनीताबाईंची, संतांची आणि मौनराग ही माझी कधीही घेऊन वाचावीत असली पुस्तकं.

आत्ता परत तोत्तोचान विकत घेतलयं मित्राला भेट द्यायला..
खैर त्या मित्राला भेटण तर झाल नाही पण बघु आतली प्रिंट कशी आहे असं म्हणत माझच परत एकदा पारायण झालं त्या पुस्तकाचं.. वाचन सुरु केल्यानंतर अगदी सुरुवातीच्या काळात हाती आलेलं हे पुस्तकं.. खुप खुप खुप आवडतं Happy

बस्के, दणक्यात झाली की खरेदी. वाचून होईल तसे थोडक्यात का होईना इथे लिही. ते ते पुस्तक आधी वाचलेले असेल तर तेव्हढाच उजाळा मिळतो. बरे वाटते.

हो गजानन.. लिहीन. मी पूर्वी पुस्तक वाचल्यावर माझ्या डायरीत, माझ्या शब्दात टिपणं काढायचे! ती डायरी वाचायला फार मस्त वाटायचे नंतर. तसे चालू करणार आहे आता परत. Happy

मध्यंतरी गीतकार सुधीर मोघे ह्यांनी लिहिलेलं 'गाणारी वाट' वाचलं. त्याचं झालं असं की मायबोलीकर पूनमने दोनवर्षांपूर्वी संपादीत केलेल्या सप्तसुर अंकात सुधीर मोघ्यांचा 'एकाच ह्या जन्मी जणू' ह्या गाण्यावरचा लेख होता. तो मला खूपच आवडला होता. मी त्याबद्दल चिन्मयला सांगत असताना, त्याच्याकडून ह्या पुस्तकाबद्दल समजलं. ह्या भारतवारीत ते घेऊन आलो.
सुधीर मोघ्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमधली गाणी लिहिली, अनेक दिग्गज संगीतकार गायकांबरोबर काम केलं. काही चित्रपटांना त्यांनत्यांनीही दिलं. ह्या सगळ्या गाण्यांच्या 'जन्मा'ची कथा ह्या पुस्तकामध्ये सापडते. खरतर मला कविता, त्यांची रसग्रहणं वगैरे वाचायला खूप कंटाळा येतो पण ही गाणी असल्याने ह्या जन्मकथा, त्यात दिसणारे आणि न दिसणारे पण उलगडून दाखवलेले अर्थ वाचायला खूप मस्त वाटलं. गाणी लिहिताना, केलेला खोलवर विचार वाचून थक्क व्हायला होतं. पुस्तकातली भाषाही खूप रसाळ आहे! अजून एक आवडलेली बाब म्हणजे पुस्तकामध्ये दिग्गजांच्या आठवणी आहेत पण त्यात अडकून पडलेलं नाहीये. गाणी, कविता हाच मुख्य भाग आहे.

चित्रपटसृष्टीतले अजून एक दिग्गज दिलीप प्रभावळकर. त्यांनी लिहिलेलं 'मुखवटे आणि चेहेरे' हे पुस्तक सध्या वाचतो आहे. त्यांच्या हिंदी चित्रपटांमधल्या कामाचा भाग वाचायचा राहिला आहे.
अफाट पुस्तक आहे. प्रभावळकरांनी इतक्या नानाविध प्रकारच्या भुमिका केल्या आहेत की त्या क्षेत्रातल्या एखाद्याला हेवा वाटवा. त्यांच्या सुरूवातीच्या काळातल्या नाटकांविषयी फार माहिती नव्हती. ती ह्या पुस्तकातून मिळाली. तसचं प्रत्येक भुमिका साकारताना ती समजून घेण्यासाठी केलेला विचार, चेहेर्‍यावरचे हावभाव, उभं रहायची, चालायची, बोलायची, आवाज लावयची पद्धत, ते तसं का केलं ह्यामागची कारणं, नाटक असेल तर प्रयोगांदरम्यानचे अनुभव, चित्रपट शुटींगचा वेळचे अनुभव, लोकांच्या प्रतिक्रिया हे सगळं प्रभावळकरांनी अगदी सविस्तर लिहिलं आहे. नक्की वाचावं असं आहे हे पुस्तक!

हा बाफ गेले दोन दिवस वर आहे म्हणून ही पोस्ट. Happy

मी वाचलेले नाही पण वडलांकडून माहिती झालेले पुस्तक: एक होता फेंगाड्या.
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4745865608209435918?BookNa...

आदिम काळातील एक माणूस जखमी होतो. त्याला त्याच्या टोळीतले लोक कसे मदत करतात, पोसतात असे काहीसे पुस्तक आहे. मला इंटरेस्टिंग वाटले. जर सापडलेल्या सांगाड्यात मांडीच्या हाडाला गाठ असेल तर त्याचा एक अर्थ तो मनुष्य जखमी झाल्यावर त्याच्या टोळीने त्याला पोसले व तो पडून राहून 2-3 महिन्यात त्याचे हाड जुळून आले. म्हणजे त्या टोळीत एक संस्कृती होती जी जखमी माणसाला पोसणे हे करू शकत होती.

पराग,
तुला मोघ्यांचं पुस्तक आवडलं असेल तर आनंद मोडकांचं 'स्मरणस्वर'ही आवडेल. त्यातले काही लेख ऑनलाईनही आहेत.

हो आनंद मोडकांच्या पुस्तकाबद्दल ऐकलं मध्यंतरी. वाचेन तेही.
मोघ्यांनी आनंद मोडकांबद्दल आणि त्यांनी केलेल्या कामाबद्दल भरभरून लिहिलं आहे.

द. मा. मिरासदारांचं 'चकाट्या' नावाचं पुस्तक सध्याच वाचनात आलं. थोडं अप्रसिद्ध असल्यासारखं वाटलं. (आधी कधी नाव ऐकले नव्हते.) सगळ्याच कथा मजेदार आहेत. चणेफुटाणेवाल्याकडे फुटाणे तव्यावर उडत असतात तशा फर्मास तडतडणार्‍या क्षणात उड्या मारणार्‍या गोष्टी. गावाकडच्या गप्प्पा कोणी ऐकवाव्यात तर त्या मिरासदारांनी! ते सगळेच वातावरण एखाद्या वाक्यात उभे करण्याची हातोटी विलक्षण आहे. शेवटची चोराची गोष्ट विशेष आवडली. (चोर इत्यादीच्या त्यांच्या सगळ्याच गोष्टी लिहीताना त्यांना चेव येतो बहुधा.)

पराग, मोघे यांच्या 'गाणारी वाट' बद्दल अनुमोदन. या नावाचं सदर ते लोकसत्तेत लिहायचे. मला त्याची कात्रणं मध्यतंरी शिफ्टींगचा पसारा काढताना सापडली. तेंव्हा पुन्हा वाचतानाही तितकीच मजा आली.

भास्कराचार्य, 'चकाट्या'बद्दलही अनुमोदन. धमाल आहेत सगळ्याच कथा. मिरासदारांच्या कथा शाळेत असताना बर्‍याचदा वाचल्या होत्या. (चक्क त्यातल्या कथांचा क्रमही लक्षात राहीपर्यंत!) शिवाजीचे हस्ताक्षर, रंगारी, मालतीचा शेपटा, फोटो, भविष्यकथन, असे विषय असणार्‍या कथा आजही आठवल्या.

जाई

हे बघ विकी हे सांगत

A paperback (also known as softback or softcover) is a type of book characterized by a thick paper or paperboard cover, and often held together with glue rather than stitches or staples. In contrast, hardcover or hardback books are bound with cardboard covered with cloth; although more expensive, hardbacks are more durable. Inexpensive books bound in paper have existed since at least the 19th century in such forms as pamphlets, yellowbacks, dime novels, and airport novels.[1] Modern paperbacks can be differentiated by size. In the US there are "mass-market paperbacks" and larger "trade paperbacks." In the UK, there are A-format, B-format and the largest C-format sizes.[2]

Paperback editions of books are issued when a publisher decides to release a book in a low-cost format. Cheaper paper, glued bindings, and the lack of a hard cover contribute to the lower cost of paperbacks. Paperbacks can be the preferred medium when a book is not expected to be a major seller or where the publisher wishes to release a book without putting forth a large investment. Examples include many novels, and newer editions or reprintings of older books.

पराग, बर्‍याच दिवसांनी इथे दिसलास. दोन्ही पुस्तकांबद्दल छान लिहिलंयस.
दिलीप प्रभावळकरांचं 'एका खेळियाने' नावाचं पुस्तक पण खूप छान आहे. त्यात त्यांनी सुरूवातीला केलेल्या बालनाट्यांबद्द्ल वगैरेही लिहिलं आहे. 'अलबत्या गलबत्या'मधली चेटकीण ही त्यांची गाजलेली सर्वात पहिली भूमिका असं वाचल्याचं आठवतंय. त्या पुस्तकातला त्यांचा अभिनयाचा प्रवास जिथे थांबला आहे, तिथून पुढे 'मुखवटे आणि चेहरे'मधे येतो का?

रत्नाकर मतकरींच्या 'माझे रंगप्रयोग'मधेही प्रभावळकर भूमिकेसाठी किती आणि कशी मेहनत घेत त्याबद्दल छान लिहिलंय.

टण्या,

'एक होता फेंगाड्या' - इंटरेस्टिंग दिसतंय पुस्तक. बूकगंगावर थोडी पानं वाचायला मिळाली.

Pages