Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.
इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑटोबायोग्राफी ऑफ़ योगी वाचतोय.
ऑटोबायोग्राफी ऑफ़ योगी वाचतोय. सुरुवतीला लिहिलेले त्यांच्या बालपणीचे अनुभवच इतके विलक्षण आहेत कि बास.
म्हणजे ते जरा जास्तच विलक्षण वाटले मला, ते दोन देह धारी संत वगेरे वाचून मनात शंका आल्याशिवाय राहात नाही.
एकंदर छान वाटतंय पण पुस्तक, ओघवत आहे.
>आपल्याला उल्लू बनवणारे इतके
>आपल्याला उल्लू बनवणारे इतके लोक जगात आहेत की आपण फसवून सेन्टी होतो की काय असे बर्याचदा वाटत राहते....<
... हे बाकी खरंय. पुस्तक वाचताना तेवढंच आपल्याला संवेदनशील असल्याचं समाधान.
`विदाऊट माय डॉटर`चा अनुवाद आलेला आहे कुणाच्या ऐकण्यात? म्हणजे `मेहतां`च्या रतिबामध्ये ते कुणी पाहिलंय का?
ऑटोबायोग्राफी ऑफ़ योगी,(मराठी
ऑटोबायोग्राफी ऑफ़ योगी,(मराठी अनुवाद) खुप वर्षापुर्वी वाचलंय. मला आणि नव-याला आवडलं. अजुनही मधेच त्यातले काही निवडक भाग वाचायला आवडतात.
विदाऊट डॉटरचा अनुवादच वाचलाय.
विदाऊट डॉटरचा अनुवादच वाचलाय. पब्लिशर मेहता नाहीत वाटते.
विदाऊट डॉटर सिनेमापण आहे
विदाऊट डॉटर सिनेमापण आहे ना?
मी वाचलं होतं ते पुस्तक. खरं-खोटं माहिती नाही.
पण मग अजून एक वाचलं होतं, बेट्टी मेहमूदीचंच, की अशा अनेक आयांचे अनुभव आहेत... त्या पुस्तकाचं नाव 'फॉर दी लव ऑफ अ चाईल्ड'. अनुवाद नाही, इंग्रजीच वाचलं होतं. त्यात बेट्टीचा सल्ला असा होता की मुलं परत मिळाल्यावर आयांनी आपली ओळख न लपवता उलट शेजारीपाजारी आणि जवळच्या पोलीस स्तेशनात रीतसर सर्व काही थोडक्यात सांगून ठेवावं. जर मागे-पुढे मुलांच्या वडिलांकडून किंवा त्या कुटूंबाकडून काही त्रास झाला, किंवा मुलं पळवली गेली (आणि संशय अर्थातच वडील/ कुटूंबावर असेल) तर मदत मिळताना त्रास होत नाही. ओळखच लपवली तर कोण काय मदत करणार!
ज्या वांशिक संहाराच्या घटना
ज्या वांशिक संहाराच्या घटना झाल्या त्या झाल्याच नाहीत किंवा अगदीच शक्य नसेल तर फार कमी प्रमाणात झाल्या असं भासवणं हे हल्ली फार बो़काळले आहे. याचे गांभिर्य ठाऊक असल्यानेच अमेरिकेत आणि इतर काही देशात Denying holocaust हा एक गुन्हा मानला गेला गेला आहे. त्यावर एक पुस्तक ऐकिवात आलं होतं नाव आठवलं की सांगतो.
विदाऊट डॉटरचा अनुवाद मी पण
विदाऊट डॉटरचा अनुवाद मी पण वाचलाय... 'मेहतां'चचं आहे ते...
इश्वरराव पुरूषोत्तम या
इश्वरराव पुरूषोत्तम या पुस्तकाचं समीक्षण / टीका कुणी लिहीली असल्यास लिंक मिळेल का ?
प्र९, तू नॉट विदाउट माय डॉटर
प्र९, तू नॉट विदाउट माय डॉटर म्हणत अहेस ना? बेटी महमुदीचं ? वर चर्चा सुरु आहे ती बेट्टीच्या नवर्याने लिहिलेल्या "विदाउट माय डॉटर" बद्दल. त्यावर कुठे सिनेमा आलाय कधी ?
विदाऊट माय डॉटर वर व्हिडीओ
विदाऊट माय डॉटर वर व्हिडीओ बनला आहे. तो पण लोकप्रिय आहे. त्यात दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. तरी पण त्याच्या बायकोला इराणला यावे लागले आणि राजमार्गाने अमेरिकेला का जाता आले नाही याबद्दलचं समाधानकारक स्पष्टीकरण त्यात नाही देता आलेलं.
द्रोहपर्व हे मस्त पुस्तक
द्रोहपर्व हे मस्त पुस्तक वाचून संपवलं. इतिहासकालीन अप्रतीम थ्रिलर.
इ.स. १७७३ ते १७७९
शनिवारवाड्यात ऐन गणेशोत्सवात नारायणराव पेशव्यांचा झालेला अमानुष खून... लबाडीनं पेशवाईची वस्त्रं धारण करून राघोबांनी पुन्हा सुरू केलेली राघोभरारी... गंगाबाईंच्या पोटात वाढत असलेला नारायणरावांचा अंकुर चिरडण्यासाठी आसमंतात घोंघावणारी कारस्थानं... नाना फडणीस आणि बारभाईंनी तो अंकुर वाचवण्यासाठी केलेला जिवाचा आटापिटा... रामशास्त्री प्रभुण्यांनी राघोबांस दोषी ठरवल्यावर त्यांच्यामागे लागलेलं शुक्लकाष्ठ...
निजाम, हैदर आणि इंग्रजांच्या कारवाया.... सदाशिवरावभाऊंच्या तोतयानं सुरु केलेला उत्पात आणि त्याचा निःपात... संधिसाधू इंग्रजांनी राघोबांशी हातमिळवणी केल्यावर मराठ्यांच्या पुण्यभूमीवर ओढवलेलं पहिलं फिरंग्यांचं परचक्र... ते उलटवून लावण्यासाठी उभ्या हिदुस्थानभर पसरलेल्या प्रबळ मराठा सरदारांची झालेली अभूतपूर्व एकजूट...
इंग्रजांनी ऐतिहासिक दस्तऐवजांत दडवून ठेवलेल्या पराक्रमी मराठ्यांच्या यशोगाथेत - ’वडगावच्या लढाई’त - इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान १७७९ सालीच पारतंत्र्यात जाता!
इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून देणारी ऐतिहासिक कादंबरी.
- डबल पोस्ट -
- डबल पोस्ट -
आलमगीर वाचा.
आलमगीर वाचा.
नुकतच रारंगढांग वाचुन
नुकतच रारंगढांग वाचुन झालं..
ह्याच धाग्यवर कोणीतरी उल्लेख केला होता तेंव्हा ठरवलं होतं वाचुन पाहु कसं वाटतय ते..
खुप छान आहे, कथा साधी आणि सोपी आहे, (infact सर्जेरावला आपघात होणार आहे हे सुरुवातिलाच लक्षात आलं होतं), साधी सोपी असुनही कंटाळवाणं वाटलं नाही. पुस्तक खुप मोठ्ही नाही आणि लहानही नाही लेखकाने खुप परपेक्ट बलन्स केला आहे.
काही काही पॅरा तर खुपच छान आहेत, पुन्हा एकदा वाचण्यासारख वाटलं.
मला जरा वेगळं वाटतंय
मला जरा वेगळं वाटतंय रारंगढांगबद्दल.
वेगळा व्यवसाय (सिव्हिल इंजिनीयर तोही आर्मीतला), वेगळी पार्श्वभूमी (हिमालय + लष्कर) यांमुळे पुस्तक पकड घेतं. पण वर म्हटलंय तसं त्या सर्जेरावला अपघात होणार याचा अंदाज खूप आधीच लागतो. तसा तो अनेक गोष्टींचा लागतो.
मला हे सग़ळं ठरवून केल्यासारखं, पुढेमागे चित्रपट काढायचा झाला, तर उपयुक्त असं कथानक 'रचल्यासारखं' वाटलं.
लष्करी जीवनाचं चित्रण करणारी आणखी एक कादंबरी वाचली. दिनानाथ मनोहर यांची रोबो. ही मला जास्त आवडली.
विचार करू शकणार्या, इच्छिणार्या माणसाचं रोबोमध्ये रूपांतर करण्याचा चंग बांधलेली व्यवस्था system या अर्थी..नुसती लष्करीच नव्हे तर आताच्या काळात कुणाच्याही जगण्याला समर्पक ठरेल असं कथानक आणि चित्रण.
मेलूहाचे मृत्युंजय बर्याच
मेलूहाचे मृत्युंजय
बर्याच अपेक्षेने वाचायला घेतलेले. इतके महाबंडल पुस्तक मी आयुष्यात पहिल्यांदा वाचले असावे.
पाकिस्तान - भारत पार्श्वभुमी घेऊन कैच्याकै महादेवाच्या नावावर खपवले आहे. यापेक्षा "हिंदू" १० वेळा वाचली तरी नविन काहीतरी वाचल्याची फिलिंग तरी येते
नशिब ३ ही पुस्तके एकदम घेतली नाही.
http://www.thehindu.com/news/
http://www.thehindu.com/news/cities/mumbai/entertainment/living-history-...
आज ही लिंक वाचनात आली म्हणून देतेय , पुस्तक वाचलेलं नाही.
हे वर्ष पुस्तकांच ठरतय
हे वर्ष पुस्तकांच ठरतय माझ्यासाठी.
सुरुवात म्हणावी तर जानेवारी च्या शेवटाकडे झाली.. १६ पुस्तक घेतली. पैकी २ वाचणे शिल्लक आहे.
आरामात लिहते एकेकाबद्दल.
पैकी नुकतच वाचुन संपवलेल व्यंकटेश माडगूळकरांचा Big city Little Boy' या मॅन्युअल कॅामरॅाफ लिखित कादंबरीचा 'मंतरलेले बेट' अनुवाद.
न्यूयॉर्क मधील मॅनहॅटन येथे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या लेखकाची कहानी, आजुबाजुला होणारे बदल, त्याचा लेखक होण्याअगोदरचा प्रवास फार रोचक शब्दात मांडला आहे.
वाचण्याजोगे पुस्तक
मूळ गुजराती लेखक दिनकर जोषी
मूळ गुजराती लेखक दिनकर जोषी यांनी लिहिलेल्या 'अयोध्यचा रावण आणि लंकेचा राम' ह्या पुस्तकाचा सुषमा शाळीग्राम यांनी केलेला अनुवाद वाचतेय..अर्ध पुस्तक वाचुन झालयं.. सुंदर लिहिलयं अगदी सुषमा यांनी केलेला अनुवाद सुद्धा छानच आहे..
पुस्तकाचा गाभा म्हणजे राम आणि रावण ह्यांच्या वैचारिक सहअस्तित्वाची अभिनव पुराणकथा असा दिला आहे..
रामायण आणि महाभारत हि आपल्या पुराणातील दोन महाकाव्ये.. लिहिल्यानंतर त्यात बरच काही खतपाणी लोकांनी आपापल्या परिने ओतलयं.. याला सत्य मानणारे, असत्य मानणारे आणि न्युट्रल राहणारे असे तीन विचारांचे लोक आपल्यामधे आहेत..
मला आपल्या पुराणकथा वाचायला भरपुर आवडतात.. संस्कॄती वगैरे सुद्धा ठिकच आहे पण अगदी डोळेझाक करुन त्यावर विश्वास ठेवणार्यांमधे मी मोडत नाही. प्रत्येक नाण्याला दोन बाजु असतात असे मला वाटते म्हणुन हा सुद्धा एक पैलु असु शकतो या विचारसरणीला धरुन असणारं साहित्य वाचायला मला आवडतं.
चांगले ते सुर अन वाईट ते असुर हा विचार मला कधीच पटला नाही म्हणुनच आनंद निलकांतन यांच 'असुर' पुस्तक तसेच अमिष त्रिपाठी चे पुस्तक मी इतर पुस्तकांप्रमाणे एंजॉय करु शकली..
वाचतेय.. छान वाटतयं.. इच्छा असल्यास जरुर वाचा
पुस्तकाचे नाव - अयोध्येचा रावण आनि लंकेचा राम
मूळ गुजराती लेखक - दिनकर जोषी
मराठी अनुवाद - सुषमा शाळीग्राम
मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत रु. १४०/- मात्र.
पुस्तकांचे प्रचि जालावरुन साभार..
जिमच्या (जिम कॉर्बेट)
जिमच्या (जिम कॉर्बेट) पुस्तकाने वाघाबद्दल असलेलं आकर्षण आणखीनच वाढलं.. त्याचे पहिले दोन पुस्तक वाचल्यावर अतुल धामनकर यांच्या 'वाघ' या पुस्तकाबद्दल कळलं..
लगोलग पुण्यातल्या अक्षरधारा बुक गॅलरी गाठून पुस्तक विकत घेतल.
पुस्तकात लेखकाने गेल्या १३ वर्षांपासून जंगलात भटकून केलेलं निरिक्षण आणि अभ्यास आहे..
विविध प्रकरणात त्यांनी वाघाबद्दलची माहिती दिलीय.. सोबतच त्यांचे अनुभव सुद्धा पेरलेले आहेत.. वाचनीय पुस्तक.. ज्यांना ज्यांना या राजस प्राण्याबद्दल माहिती वाचायला आवडेल त्यांनी जरुन घ्यावं..
पुस्तकाचे नाव - वाघ
लेखक - अतुल धामनकर
प्रकाशक - श्रीविद्या प्रकाशन
किंमत - रु ३००/- मात्र
पुस्तकाच वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर पाने.. साधारणतः मॅगझिन्स मधे असतात तशी गुळगुळीत आणि चमकदार.. सोबतच वाघांचे सुंदर सुंदर प्रकाशचित्र सुद्धा त्यात आहेत.
मला बरेचदा प्रश्न पडतो कि मराठीत खरं तर खुप सुंदर लिहिणारे लोक आहेत. संग्राह्य असावी अशी तर कित्येक पुस्तक आहेत तरीही आपले लोक या पुस्तकांची पेपरबॅक सोबतच लिमीटेड का होईना पण हार्डकव्हर कॉपीज सुद्धा का काढत नाही.. या सुंदर सुंदर पुस्तकांचे काही वर्षांनी झालेले हाल अगदीच पाहवत नाही मला लोक मराठी पुस्तकांच्या बाबतीत दर्दी नाहीत हे कारण असावं का ? नक्कीच..
महाश्वेता - सुधा मुर्ती
महाश्वेता - सुधा मुर्ती ...
छान आहे पुस्तक..
काल परत एकदा रारंग ढांग वाचल
काल परत एकदा रारंग ढांग वाचल
'शोध' वाचली.मुरली
'शोध' वाचली.मुरली खैरनारांची..
कादंबरीतला थरार आपल्याला पुस्तक खाली ठेऊ देत नाही
पण शेवटाकडे थोडी predictable होत जाते
इंडियन पॉलिटी , ले. एम्
इंडियन पॉलिटी , ले. एम् लक्ष्मीकांत परत एकदा वाचतो आहे! जालीय अस्तित्वात एक लक्षात आले बहुसंख्य लोक नाराज आहेत (नेटीज़न्स तरी) त्यांना संविधान एक दस्तऐवज म्हणून माहीतीच नाही, अन अश्या अवस्थेत काही लोकं संविधानाला शिव्या घालायला अन काही लोकं त्याला डोक्यावर घ्यायला चक्क तर्ककर्कश्य होताना आढळतात, मुळात "पार्टली रिजिड पार्टली फ्लेक्सिबल" असे हे संविधान एक अतिशय सुंदर मासला आहे मॉडर्न लॉ चे , तेव्हा म्हणले परत एकदा वाचावे! नाही विरोध नाही पूजा तर किमान मानसिक पावित्र्य (मेन्टल सांकटिटी) अबाधित राहील!
इच्छुकांनी (ज्यांना लीगल भाषा वाचणे जड़ पड़ते त्यांनी) ह्या पुस्तकाचा जरूर लाभ घ्यावा, विज्ञानशाखेतल्या लोकांना समजावे म्हणून पॉइंटवाइज मांडलेले आहे ह्यात सगळे
पुस्तक - इंडियन पॉलिटी
लेखक :- एम् लक्ष्मीकांत
प्रकाशक :- टाटा मॅकग्रा हिल पब्लिकेशन्स
उत्तम पुस्तकाची ओळख करून
उत्तम पुस्तकाची ओळख करून दिलीत बापूसाहेब.
बापू, तुमच्या आमच्यासाठी
बापू,
तुमच्या आमच्यासाठी बायबल आहे ते..
कितीही polity, constitution वरचे पुस्तक वाचले तरी याची सर कुणालाच नाहीं..
पण मला ते या धाग्यावर कुणी recommend करेलस वाटल नव्हत.
Text book सारख झालय ना माझ्यासाठी म्हणुन असेल..
सोन्याबापू, भारीच ओळख आहे की
सोन्याबापू, भारीच ओळख आहे की ही! या पुस्तकाबद्दल माहिती नव्हतं.
मस्त ओळख सोन्याबापू! धन्यवाद
मस्त ओळख सोन्याबापू! धन्यवाद
टीना, पाहिल्या पहल मी डी डी
टीना,
पाहिल्या पहल मी डी डी बसु वाचले होते ओ माय!!! मह्या डोक्याचा फ्यूज शॉर्ट झालता! मग कश्यप वाचले अन एक प्रीलिम फेल झालो मग लक्ष्मीकांत घेतले ! माझे आपल्या पुर्ण सिलेबस मधे ते सर्वात आवडते पुस्तक आहे! अन दत्त सुंदरम सर्वात नावड़ते पुस्तक आहे!!
मंडळी,
अजुन एक पुस्तक जे "लेटर मुगल्स अन भारतीय स्वातंत्र्यलढ़ा" अतिशय सखोल अन फॅक्टबेस्ड कवर करते (सनावळ्या वगैरे) तर कृपया इंडियन फ्रीडम स्ट्रगल :- ग्रोवर एंड मेहता हे वाचावे. अगोदर ह्यालाच "ग्रोवर एंड ग्रोवर" म्हणत असत,
फॅक्ट चा कंटाळा असेल अन गोष्टीरुपात वाचायचे असले तर बिपनचंद्रा ह्यांचे इंडियाज स्ट्रगल फॉर फ्रीडम वाचावे (ह्याच पुस्तकावर आधारीत सीबीएसई एनसीईआरटीची टेक्स्ट बूक आहेत
वि.सु. - टीना ह्या वर्षी एटेम्पट घेणार असली तर तू फ़क्त स्पेक्ट्रम चं मॉडर्न इंडिया वाच! अहीर ने मस्त लिहिले आहे ते
अरे तुम्ही लोक ए एल बाशम नाय
अरे तुम्ही लोक ए एल बाशम नाय का वाचत. 10-15 वर्षांपूर्वी upsc साठी ए एल बाशम फेवरिट असे
Pages