निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक भाबडा प्रश्न.. ट्रेल म्हणजे नेमक काय? >>
इथे ट्रेल म्हणजे जनरली पायवाट. क्वचित सायकली अलाउड असतात. पण बहुतेक ट्रेल्स वर सायकल, स्केटिंग, स्कूटर वगैरे चालवता येत नाही. अगदी पूर्वी इथल्या इंडियनच्या यायच्या जायच्या पायवाटा होत्या ते ओरिजिनल ट्रेल्स . हळू हळू ते ट्रेल्स पायोनिअर्स, सेटलर्स लोकांनी वापरुन त्यांचे घोडागाडिचे रस्ते आणि गेल्या १०० एक वर्षात मोटर गाडीचे रस्ते, हायवे इत्यादी झाले.

अलिकडे शहरी , उपनगरी भागात बागांमधून मुद्दाम पायवाटा बनवून मेंटेन केलेल्या असतात. अशा ट्रेल्सवर खडी किंवा चक्क रस्त्यासारखे अस्फाल्ट ( डांबर) असते, नकाशा दाखवणारे बोर्ड असतात, बसायला बाकडी, क्वचित पिण्याच्या पाण्याचे फाउंटन, बाथरुम्स वगैरे पण असतात.

मोठ्या नॅशनल पार्क / स्टेट पार्क मधले ट्रेल मधे त्यामानाने कमी सुविधा असतात. पार्क च्या प्रवेशापाशी मॅप्स वगैरे मिळतात पण पायवाट म्हण्जे खरोखर जंगलातली, काट्याकुट्यांमधली वाट असते.

Appalachian Trail नावाचा सुप्रसिद्ध ट्रेल १०-१२ राज्यांमधून जातो आणि २००० पेक्षा जास्त मैल लांब आहे .

fIMG_20160518_142210.jpg

वॉव सगळ्यांच्या कडचा मोगरा फुललाय!
इथेही खूप रंगित फुलं आहेत. पण बरीचशी बिन वासाची. एक हनिसकल मात्र आपल्या सुगंधाने वेड लावतं. खूप दूरवर पासून हा मंद सुगंध यायला लागतो. आणि कित्ती फुफ्फुसं भरून घेतला तरी समाधान होत नाही. वाट्तं एखाद्या कुपीत भरून घट्ट बंद करू घरी न्यावा. असेलही बाजारात याचा एखादा परफ्यूम!
हाय टिनाबाय....कैसा क्या?

अगदी प्लॅस्टिकची वाटतील ही फुलं....म्हणून मुद्दाम वर त्याचं झाडही पहा.






मानुषी.. आह हाय क्या फुले डाली तुने..
सुपर्ब.. क्या पता पण बघुन या फुलांचा फिल मुसांडा सारखा असेलस वाटतय.. कसाय?

प्रज्ञा कोण ?
वाढदिवसाच्या तरीही शुभेच्छा Happy

मानुषी ताई, खुप सुरेख फुलं

ती पिवळी हनिसकल ची काय? खुप गोड आहेत..

प्रज्ञा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!!!

मेधा, मस्त माहिती.

हनीसकल आवडले. हात लावुन पाहावासा वाटला. अशा बारिक प्रिंटचे कापड मला खुप आवडते. डॉगवुडची फुले मोठी वाटतात. मागे मेधानेच लिहिलेले डॉगवुडबद्दल.

पिवळी फुले बहुतेक Alyssum ची आहेत.
हनिसकल चा फोटो पान ३३ वर त्यांनी टाकलेल्या फोटो मधला शेवटून तिसरा आहे

साधना त्या पिवळ्या गुच्छाबद्दल माझ्याही मनात हेच आलं.
हनिसकल. हे पहा.

मेधा बरोबर ...तो पिवळा गुच्छ...Allyssum असावा. गुगलल्यावर हाच पिवळा गुच्छ दिसतोय.

मेधा छान माहिती ट्रेल बद्दल ची!!
मानु. हनीसकल आणी इतर फुलं अती म्हंजे अतीशयच सुंदर आहेत..
मोगरा.. वॉव ..कसला शुभ्र आणी टवटवीत आहे..

आता निग, च्या नवीन भागाच्या प्रतिक्षेत...... Happy

मानुषी, तुझे फोटो सुन्दर आणि मेधा, त्याची महिती ही तुझ्यामुळे मस्त मिळतेय.

वर्षु, काय गोड फुल आहेत ! हो आता नवीन भागाच्या प्रतीक्षेत

फोटो सर्वच मस्त मस्त.

हेमाताई माझ्याकडे ह्याच रंगाची लिली आहे, गावाहून आणलीय मी, पण तीन वर्षाच्या गॅपने यंदा २ फुलं आली, तिसरं कळी असतानाच पक्षांनी दांडी तोडली. तुमची फुलं बघुन छान वाटलं.

अंजू माझा फोटो ही आमच्या कोकणातल्या लिलीचाच आहे आमच्या आगारात लायनीत लिली लावली आहे. मस्त दिसतात फुल.

तुझ्याकडे इथे कुंडीत फुलली म्हणजे नवल आहे ग. पक्षयांपासून लागत खूप. जास्वंदीच्या पण कळ्या चिमण्या वैगेरे तोडतात.
फुलं फुलली आता तर इथे फोटो डकव.

तुझ्या सोनटक्याच्या फुलाने आम्हाला ही किती आनंद दिला होता.

वर्षू ममो सायो सर्वांचेच फोटो छान.
सध्या इथे ८ पर्यन्त व्यवस्थित ऊन असते. परवा रात्री/संध्याकाळी ८ वाजता हे फोटो काढले. काढताना नाही जाणवलं पण पहिल्या फोटोत अंधूकसं इंद्रधनुष्य दिसतंय.



मानुषीताई सॉलीड फोटो.

हेमाताई फोटो आहेत मागच्या महीन्यात फुलं आलेली त्याचे पण चांगले नाही एवढे म्हणून टाकले नाहीत. माझ्या लक्षात आलं तुमच्या गावच्याच लिलीचा फोटो आहे Happy .

मी पण देऊ का झब्बू ,मानुषीतै?
मला पण इथे खुप ग्मती जमती दिसतात पण फोटोज काढायला बोअर होतं

Pages