सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.
भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...
पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
....सिकाडाची. आवाज ऐकले...मग
....सिकाडाची. आवाज ऐकले...मग आपण ज्याला रातकिडा म्हणतो तसाच/ तोच का हा? >>> तसाच पण तो नाही. रातकिडा रात्री आवाज करतो आणि हा दिवसा. रातकिड्याचे जीवनचक्र छोटे आहे, सिकाडा १७ वर्षे जमिनीखाली असतो आणि केवळ प्रजननासाठी बाहेर येतो.
माहिती शोधावी लागेल पण बहुतेक रातकिडा हा आपला नेहेमीचा नाकतोडा असतो.
मी जिथे सायन्स पार्क २ मधे
मी जिथे सायन्स पार्क २ मधे काम करतो तो भाग दाट झाडींनी माजलेला आहे आणि भर दिवसा तिथे किर्र आवाज सुरुच असतो. मला आज कळले की तो आवाज रातकिड्यांचा नसून सिकाड्याच्या आहे. सिकाडा हा एक किडा आहे हेच आजवर माहिती नव्हते. म्हंटले ना निगच्या धाग्यांवर गेले की डोके सुपीक होते
ते असे 
इथे सिकाड्याची मस्त एक लिंक
इथे सिकाड्याची मस्त एक लिंक दिली आहे. https://www.youtube.com/watch?v=mah26og11ms
बरोबर सतरा वर्षे सूप्तावस्था,
बरोबर सतरा वर्षे सूप्तावस्था, हेच मला नवलाचे वाटते. आणि त्यातून बाहेर आले कि आयूष्य अगदी काही दिवसांचेच. मी असेही वाचलेय कि अनेक भक्षक त्याच्यावर हल्ला करायला घाबरतात कारण हा किटक त्यांनी आयूष्यात कधी बघितलेलाच नसतो.
The Return of the Cicadas:
The Return of the Cicadas: https://www.youtube.com/watch?v=0JJz36rSob0
धन्यवाद नलिनी! सिकाडाचा असा
धन्यवाद नलिनी! सिकाडाचा असा विडीओ मागे सुद्धा बघितलेला. ज्याप्रकारे ते सिकाडा जमिनीतून बाहेर येतात भीती वाटते. अगदी मम्मी चित्रपटात ते प्राचीन किडे बाहेर येतात तसे वाटते.
गेल्या एक-दोन दिवसात बहावा आणि वसंतातल्या इतर फुलांचे फोटो मायबोलीवर फिरत आहेत. पण ह्याच दिवसात आणखी एक प्रकारचे फूल दिसते पण बिचारे सफेद रंगाचे असल्याने दुर्लक्षित होत असावे!

परवा संध्याकाळी अंधार झाल्यावर बोरीवली पश्चिम बस स्टेशनजवळून येताना शेवगाच्या झाडावर सफेद फुलांच्या चांदण्या चमकताना दिसल्या!
<<बरोबर सतरा वर्षे
<<बरोबर सतरा वर्षे सूप्तावस्था, हेच मला नवलाचे वाटते>>. ऐकावं ते नवलच !
मानुषी चेरि ब्लोसम सुरेखच ! मन तृप्त झालं !
यू ट्यूबवर एक लिंक होती,
यू ट्यूबवर एक लिंक होती, त्यात १७ वर्षांपुर्वी, ३४ वर्षापुर्वी, ५१ वर्षांपुर्वी काय चालू होते त्याचे चित्रण होते,
आपापल्या वयानुसार आठवून पहा बरं
(No subject)
मानुषीताई, मेपल मस्तच.
मानुषीताई, मेपल मस्तच.
मानुषी ताई, मस्त गोल गुटगुटीत
मानुषी ताई, मस्त गोल गुटगुटीत कंच हिरवी झाडे... आणि मेपल मस्तच ग...
हि एक मस्त विडिओ बघा!
हि एक मस्त विडिओ बघा!
https://www.facebook.com/Birds.Lovers.1/videos/969317153147442/?autoplay...
१००० चं अभिनंदन!
१००० चं अभिनंदन!

व्हीटी२२० काय सुंदर
व्हीटी२२०
काय सुंदर कोरिओग्राफी!(???) आणि काय सुंदर पक्षी!
http://www.msn.com/en-us/news
http://www.msn.com/en-us/news/us/17-noisy-facts-about-17-year-cicadas/ar...
Interesting info about cicada. Apparently they use blossoming of the trees to count 17 years. They drink root sap which 90% water and very low in nutrients. Therefore the cicadas grow very slowly (They don't hibernate. They just grow slow)
Its not choreography Manushi,
Its not choreography Manushi, its sita swayamvar!
I didn't understand the end correctly, but I believe the female gave some sort of signal that she made her decision and after that many left. But I didn't understand who was the right guy and how he came to know if he was the right guy. I liked how they stood bowing down to await the decision. 
ओह....अशी भानगड! मस्त. मीही
ओह....अशी भानगड! मस्त. मीही पाहिला परत. पण "राइट गाय" मलाही नाही कळ्ला.
१५ दिवस सततच्या पावसानंतर
१५ दिवस सततच्या पावसानंतर ट्रेलमधे चालायला गेले तेव्हा हे सगळे भेटले. ते एक हरीण पाड्स सुद्धा!





सुप्रभात नि.ग. कर्स. सध्या
सुप्रभात नि.ग. कर्स.
सध्या सुट्टीवर असल्याने इथे जास्त येणे होत नाही. पण जून पासून रेग्युलर. :स्मितः
पुढचा धागा लवकरच येईल. तो पर्यंत इथे गप्पा चालू द्या.
Manushi I envy your walks and
Manushi I envy your walks and trails!!
:-o 
मानुषीताई फोटो मस्त मस्त.
मानुषीताई फोटो मस्त मस्त.
मानुषी , मस्त फोटो.
मानुषी , मस्त फोटो.
mast photo manuShi.. tyaa
mast photo manuShi.. tyaa trailachaa ekhadaa tukaDaach aaNataa yeeel kaa ikaDe ?
२ नंबरचा फोटो Multiflora
२ नंबरचा फोटो Multiflora Rose नावाचे अतिशय इन्व्हेझिव्ह वीड आहे.
३,४,५ आणि शेवटचा क्लोव्हर आहे - सबर्बन घरांच्या, शाळांच्या , ऑफिसच्या लॉन मधे वीड मानतात याला .
पण हे लेग्युम फॅमिलीतले असल्याने याच्या मुळांवर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरियाचे नॉड्युल्स असतात. त्यामुळे ही मुळे जमिनीचा कस वाढवतात. फुलांमुळे मधमाशा व इतर पॉलिनेटर कीटकांना चारा मिळतो.
काही व्हरायटी फार्म अॅनिमल्स करता चारा म्हणून वापरतात. क्लोव्हरच्या फुलांचा मध पण विकतात
मानुषी ताई, हरणे असतील अशा भागातून फिरताना टिक्स चावणार नाहीत याची खबरदारी घ्या प्लीज . फिरून आल्यावर सुद्धा हाता पायावर वगैरे टिक्स बसलेल्या नाहीत हे चेक करा .
सर्व निसर्गप्रेमींना
सर्व निसर्गप्रेमींना धन्यवाद!
दिनेश.......काश!!!!!' ये हम कर सकते!
मेधा खूप छान माहिती! आणि स्पेशल इन्स्ट्रक्शन्सबद्दल धन्यवाद! अगदी मौलिक सूचना!
.. tyaa trailachaa ekhadaa
.. tyaa trailachaa ekhadaa tukaDaach aaNataa yeeel kaa ikaDe >>>>> अगदी अगदी!
शोभा लक्ष्मण फळ का? मानुषि
शोभा लक्ष्मण फळ का?
मानुषि ताई, लै भारी फोटो....
मस्त गप्पा.. आज राहिलेल्या
मस्त गप्पा..
आज राहिलेल्या तब्बल १७० पोस्टी वाचुन काढल्या..
मस्त फोटो..मस्त प्रश्न..मस्त मार्गदर्शन..
मानुषी तू तोस्वर्गातच हाय गो.. भारीच..
एक भाबडा प्रश्न.. ट्रेल म्हणजे नेमक काय?
टीना, ट्रेल म्हणजे नैसर्गिक
टीना, ट्रेल म्हणजे नैसर्गिक वाटेल अशी पण मुद्दाम तयार केलेली वाट. कधी ही पक्की असते तर कधी कच्ची सडक असते. मोठ्या गजबजलेल्या शहरातही ( उदा. सिंगापूर, हाँग काँग ) काही भागात जंगल राखून त्यात अशी वाट राखलेली असते.
या वाटेवरून जाताना हरवायचा धोका नसतो.
टीने किती दिवसांनी झालं तुझं
टीने किती दिवसांनी झालं तुझं दर्शन ! मस्त वाटलं पण !
Pages