निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा सुरेख फुले. काय एकसे एक कलर्स आहेत.
सायु ताम्ह्ण मस्त फुलला आहे सगळीकडे. तुझा लेख मस्त आहे इकेबाना बद्दल. सॉरी लेट वाचला. हल्ली खूप काहि मिस करत आहे माबो वर.
सायन पनवेल मार्गावर खूप ठिकाणी डिवायडर्स वर छान फुल झाडे लावली आहेत. सकाळी ऑफीस ला जाताना वाटेतील बहरलेला गुलमोहर, नवी पालवी फुटलेला पिंपळ , अनेक रंगातील बोगनवेल बघताना असे वाटते की याचा एरीयल व्ह्यु किती मस्त वाटत असेल.

मस्त फोटोज.

मेधा यांच्या अपडेट्स छान आहेत. मुलगा सध्या ग्रीक गॉड्स वगैरेबद्द्ल वाचतोय त्याला Narcissus ची गोष्ट सांगायला पाहिजे Happy

विकेंडला पाहिलेली क्रीपर/वेल
Wel.jpg

पुर्वी, राणीच्या बागेत सिंहाच्या पिंजर्‍यावर विषवल्ली या नावाची ( फक्त नाव, विषारी नाही ती ) वेल होती. तशीच वेल मी रुईया कॉलेजजवळ पण बघितली. छान फुले असतात तिची. आता बहरात असेल. कुणी गेले तिथे तर अवश्य बघा.

हे काय आहे? फोटो व्यवस्थित नाही आला. कमी प्रकाश होता. आणि फुले जवळुन दाखवायच्या नादात लाम्बुन फोटो घेण्यचे राहुन गेले. रस्त्यावर उभे राहुन रानफुलान्चे फोटो घेताना अगदि वेड्यासारखे वाटत होते. लाम्बुन गच्च फुलानी भरुन गेलेले दिसतात. आता हिरवट रंगाचा थोडा हलका कॉफी कलर झालाय... हायवेवर जाताना बरेचदा रस्त्याकडेला दिसले आहेत.

हाय निगकर्स
वाच्तेय हळूहळू.
पांढर्‍या फुलांचे अजून एक झाड.
रस्त्याने जाताना एकदा हे दिसलं आणि झपाट्लं याने. मुद्दम पुन्हा तिथे गेले. आणि इतकं अद्भुत दिसलं ते झाड...
प्रचंड वारा सुटला होता आणी अगदी टोकापर्यन्त नाजुकसाजुक फुलं ल्यालेल्या सडपातळ फांद्या वार्‍यावर हिंदोळू लागल्या.
त्यातही संध्याकाळ्चं हळदुल्या उन्हाने चमकणारं सभोवताल!
कित्ती फोटो काढले पण ती अद्भुत चमत्कृती नाही पकडता आली मला त्या यंत्रात.







मानुषीताई, अगदी "बघतं राहू दे तुझ्याकडे" हेच मनात आलं फोटो पाहिल्या बरोबर Happy

असाच एक जॅकरांडा माझ्या ऑफिसच्या वाटेवर फुललाय. नुसती फुलंच फुल. एकही पान नाही. पण ऐन गर्दिच्या रस्त्यावर असल्यामुळे थांबुन फोटो नाही काढता येत Sad

मानुषी , सुपर्ब वसन्तफुलोरा ....
कित्ती फोटो काढले पण ती अद्भुत चमत्कृती नाही पकडता आली मला त्या यंत्रात.>>> पण तुमच्या शब्दांतुन ती किमया भरभरुन वहातेय ...

Pages