२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक शंका (टेक्निकल): नोबॉल टाकला तर तो बॉल परत टाकावा लागतो आणी बॉलर च्या ओव्हर मधे मोजला जात नाहे. पण बॅट्समन च्या टॅली मधे धरतात का?

केदार, हिम्सकूल, मलाही तसच वाटलं. क्रिकईन्फो वर बघितलं तर रोहित च्या टॅली मधे तो बॉल धरलाय. कन्फर्म्ड!

बद्री खूप हुशारीने आणि कंट्रोलने टाकतोय. लाईन पटापट अ‍ॅडजस्ट करतोय. बरेय तीन ओव्हर निघाल्या त्याच्या आधीच. मिड-ओव्हर्समध्ये चोक नाही बसवता येणार.

शर्मा त्याच्या औकातीत खेळून बाद झाला..

एकूण अ‍ॅव्हरेज ३७.६७ आणि स्ट्राईक रेट १३५.९७,, आणि आजचा स्कोर ४३ आणि स्ट्राईक रेट १३८.७०

कोहली ईज जिंक्स्ड!

"शॉट मारता नसतील ना येत तर वन्स अ‍ॅन्ड टूज सुरु ठेवा म्हणा!" - रहाणे ते चांगलं करतोय आणी कोहली तर ते परवचा म्हणावं ईतक्या सहजतेनं करतो.

Pages