२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिपोर्टर : सैमी, विराट विरूध्द काय प्लान आहे? कसे रोखणार?

सैमी: वेरी सिंपल, धवन आणि रोहीत ची विकेटच घेणार नाही.

रिपोर्टर : मग, सेमिसाठी संघात कांहीं बदल ?
धोनी : फायनलसाठी आतां विराटला विश्रांति द्यायचं ठरलंय ; धवन, रोहित व रैना हे
वे.इंडीज व टीकाकारांना प्रत्यूत्तर देण्यास पुरेसे आहेत !!!

<< झिम्बॉब्वे आणि केनिया यात का नाहीत?>टी-२०मधल्या कामगिरीच्या निकषाला कमी पडले असावेत. नक्की मात्र माहित नाहीं.

झिबांम्ब्वे क्वालिफायड मधे होता पण अफगाणीस्थान जिंकला आणि पुढे आला
केनिया त्या क्वालिफाईडच्या आधीच्या स्पर्धेत सुध्दा पोहचू शकला नाही त्यामुळे तो आला नाही.
नेपाळ, अमेरिका वगैरे सुध्दा संघ आहे जे विश्वचषकाच्या क्वालिफाईड राऊंड पर्यंत पोहचले नाही.

<< झिबांम्ब्वे क्वालिफायड मधे होता पण अफगाणीस्थान जिंकला आणि पुढे आला
केनिया त्या क्वालिफाईडच्या आधीच्या स्पर्धेत सुध्दा पोहचू शकला नाही त्यामुळे तो आला नाही>> धन्यवाद.
सॉरी. मीं प्राथमिक फेरी नव्हती पाहिली. अहमदनगरकरांचा पुन्हा विचारलेला प्रश्नही अनुत्तरित रहात होता म्हणून मीं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यांचं व माझंही शंकानिरसन झालं.

प्राथमिक च्या आधी ही बर्‍याच फेर्या असतात. विशिष्ट गुणांपर्यंत या अजुन काही निकषापर्यंत पोहचल्यावर त्यांना प्राथमिक फेरीमधे स्थान देतात. केनिया / झिम्बांब्वे या देशांमधले सरकार हुकुमशाही आहे मधे त्यांनी तिथल्या क्रिकेट बोर्डला ताब्यात घेतले होते त्यामुळे त्यांना आयसीसीने बाहेर काढले होते. क्रिकेट बोर्ड स्वतंत्र हवे अशी काही विचित्र नियम आयसीसीमधे आहे. नंतर दोन्ही संघांना परत खेळान्याची मान्यता दिली गेली.
सध्या केनिया नामिबिया इ. आफ्रिकन देशांमधे आपापसात सामने खेळत आहे.

आपल्या देशाचे क्रिकेटर हे कायमस्वरूपी क्रिकेटर आहे तसे इतर नविन आलेल्या संघांमधल्या खेळाडूंचे नाही. ते विविध खेळ सुध्दा खेळतात. व्यवसाय सुध्दा करतात. त्यामुळे त्यांच्या सामन्यांमधे वारंवारता नाही.

<< प्राथमिक च्या आधी ही बर्‍याच फेर्या असतात. विशिष्ट गुणांपर्यंत या अजुन काही निकषापर्यंत पोहचल्यावर त्यांना प्राथमिक फेरीमधे स्थान देतात >> धन्यवाद. नशीब, माझा <<टी-२०मधल्या कामगिरीच्या निकषाला कमी पडले असावेत>> हा कयास तरी बरोबर ठरला ! Wink

अशा संघांना सरळ टी२० च्या मुख्य स्पर्धेत उतारने म्हणजे डिव्हिलर्स गेल सारख्या वाघांसमोर सशाला फेकण्यासारखे आहे. २० ओव्हर मधे शतका ऐवजी द्विशतक वगैरे लागतील.

<< कोण जिंकेल??? >> फायनलमधे आपल्याला उट्टं काढायचा चान्स मिळावा म्हणून तरी न्यूझीलंड जिंकावं ! Wink

<< कोण जिंकेल??? >> फायनलमधे आपल्याला उट्टं काढायचा चान्स मिळावा म्हणून तरी न्यूझीलंड जिंकावं ! >>>
भाऊ, आ बैल मुझे मार होऊ नये.
मला तर वाटतय इंग्लंडच जिंकाव (जिंकणार)

न्युझीलंड जिंकतील कारण दिल्लीची खेळपट्टी स्पिनर्सला मदत करत आहे आणि इंग्लंडचे स्पिनर्स इतके काही प्रभावी ठरले नाही. त्याउलट न्युझीलंडचे ३ही स्पिनर्सनी उत्तम कामगिरी केली.

सहमत. फिरकी खरंच भेदक आहे त्यांची ! >> बोल्ट नि साउठी हे फ्रंट लाईन बॉलर एकही सामना खेळले नाहियेत ह्यातच सगळे आले. विल्यिमसन ची कॅप्टन्सी हा एक मह्त्वाचा भाग आहे. अचूक बॉलिंग चेंज करतोय.

इडन मधे बोल्ट या साउथीचा वापर नक्की करतील. खासकरून बोल्ट चा तर नक्कीच करतील. एकीकडे डेन स्टेन सारखा मार खातोय बघून फार वाईट वाटते. सगळी लय बिघडली आहे.

<< आ बैल मुझे मार होऊ नये.>> 'बुलफायटर'ची धमक असणं हीच तर विश्वविजेत्यांची खरी ओळख असते !!

मलाही NZ आले तर बरं वाटेल. परतफेड आत्ताच करावी.

मागे २००३ मध्येही आपण ऑस्ट्रेलियासोबत पहिल्य मॅच मध्ये हारलो, मग फायनलला ऑसी - भारतच होते. तिथे हारलो ते सोडा. पण आत्ता आपण जिंकणार.

न्यूझिलंड च्या कोच चं पण बरच कौतुक वाचलय. माईक हॅसन - जो स्वतः एकही प्रथम श्रेणी सामना खेळला नाहीये, त्याला मॅक्कलम ने कोच म्हणून आणलाय आणी त्याची आणी विल्यमसन ची जोडी जबरी जमलीये.

आत्ता तरी एन्झी मस्त खेळतायेत. पण ईंग्लंड ला कमी नाही लेखता येणार.

उद्या आपल्या प्लेयिंग ११ मधे रहाणे, नेगी की पांडे? स्टॅबिलिटी साठी रहाणे नी खेळावं असं वाटतय (ओपनिंग ला आणी शर्मा ४थ्या क्रमांकावर जसं तो आयपीएल मधे करतो) पण धोनी पांडे ला खेळवेल असा अंदाज आहे.

रहाणे आधीच असताना पांडेला नाही खेळ्वायचा कदाचित. पहिले तिघं जर चांगले खेळले तर तीच ऑर्डर मेन्टेन करावी अन अगदी शेवटी येऊ द्यावा त्याला.

केदार Happy

तुम्हा दोघांचं वृक्षप्रेम पाहून मी सद्गदीत झालोय. Wink झाडं सोडत नाहे अजिबात.

Pages