Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजुन एक म्हणजे , मॅच
अजुन एक म्हणजे , मॅच सपल्यावरच्या presentation सेरेमोनीत ही धोनी,विराट वैगरे अगदी परेफ्क्ट बोलतात, नाहितर पुर्वी अझर वैगरे" वी बॅट वेल्,वी बॉल वेल वी फिल्ड वेल" म्हणुन सन्पवायचा.
<< अत्यंत गरज आहे पहिल्या
<< अत्यंत गरज आहे पहिल्या जोडीनी कमीत कमी ७० रन तरी ठोकायची. >> निदान इथं मायबापानीं त्याना लावलेलीं विशेषणं वाचून तरी त्या दोघांसाठीं हें आत्यंतिक गरजेचं झालंय !!!
प्राजक्ता +१. सगळेच मस्त
प्राजक्ता +१. सगळेच मस्त बोलतात. त्यांना गेमची समज आणि त्याही पेक्षा जे घडलं आणि त्यांच्या मनात जे काही आहे ते परफेक्टली आर्टिक्युलेट करता येतं. ह्याउपर नेहमी एक मेकांना सावरुन घ्यायलाही बघतात. अश्विन बुमराह बद्दल बोलताना अगदी नीट तो कुठल्या मनस्थिती होता ते सांगितलं. आधी कॅच सुटल्यामुळे आधी प्रेशर मध्ये असताना त्यांनी खुप छान बॉलिंग केली शेवटी असं म्हणाला. काल परत कोहलीनी बरोबर युवराजची बाजू सावरुन घेतली. दे आर जस्ट गूड पीपल दीज यंग्स्टर्स. सो प्राऊड ऑफ देम!

चक्क आता ओपनिंग पेअर बद्द्ल
चक्क आता ओपनिंग पेअर बद्द्ल सगळे बोलायला लागले?
सुपर टेन मधील चार मॅचेस - ऑस्ट्रेलिया ओपनर्सचे रन - १८८
सुपर टेन मधील चार मॅचेस - एन्झी ओपनर्सचे रन - १५४
बाकी मायबाप ह्यांनी लिहिलेले व्हॉट्सअॅप वर अनेकांकडून आले. पण हिंदीमधून. अन त्यात धोणीचा उल्लेख आहे.
केदार आता दुसर्यांदा की
केदार आता दुसर्यांदा की तिसर्यांदा हे डिस्रिगार्ड करतोय की तू परत परत स्वतःचा तोच पॉईंट प्रुव करायला बघतोयस. I thought we agreed to disagree?
निदान इथं मायबापानीं त्याना
निदान इथं मायबापानीं त्याना लावलेलीं विशेषणं वाचून तरी त्या दोघांसाठीं हें आत्यंतिक गरजेचं झालंय !!! >> LOL
चक्क आता ओपनिंग पेअर बद्द्ल सगळे बोलायला लागले? >> इथे बोलणार्यांनाना opening ला पाठवण्याचा प्रस्ताव मी मांडतो, कु. र्हु. कडून धोनीकडे कळवता येईल
मीही गुरुवारी दुपारी १ नंतर
मीही गुरुवारी दुपारी १ नंतर कामावर जायचा विचार करत आहे..मग करुच कल्ला..:)
दीपांजली:)
पण आता नुसते सेमी फायनल पर्यंत जाउन चालणार नाही.. ३ बॅटल्स तर जिंकली आहेतच.. आता वॉर जिंकलेच पाहीजे..
ज्या पद्धतीने विराट खेळत आहे त्यावरुन तो आपल्याला कप जिंकुन देइल असेच वाटत आहे. त्याचा सध्याचा फॉर्म बघुन मला १९९८ चा तेंडुलकरने आपल्याला जिंकुन दिलेला शारजाह कप आठवतो.. तेव्हा त्याने एकट्याच्या कामगीरीवर तो कप खेचुन आणला होता आपल्यासाठी.. तेव्हा त्याने कॅस्परविच, फ्लेमिंग, मुडी व वॉर्नला पुढे येउन मारलेले उत्तुंग षटकार कोणीच विसरणार नाही..
विराट सध्या अगदी तसाच खेळत आहे.. मला माहीत आहे की क्रिकेट एक सांघीक खेळ आहे.. रोहीत, धवन्, रैना यांनी काँट्र्युब्युट केले पाहीजे हे मान्य आहे... पण विराट इज इन अ झोन! व पुढच्या मॅचेस तो असाच खेळला तर हा वर्ल्ड कप तोही आपल्याला सिंगल हँडेडली जिंकुन देइल असे वाटत आहे.. बघुया.. घोडा मैदान जवळच आहे..:)
युवराज गेला असेल तर फारच
युवराज गेला असेल तर फारच छान....
हा हा हा! हू कॅन फरगेट द
हा हा हा! हू कॅन फरगेट द शारजाह इनिंग्स.
मला वाटतं तेंडल्या आणि फ्लेमिंग दोघांचा वाढदिवस होता एका मॅच च्या वेळी. मग नंतर ते वादळ आलं होतं त्यात सगळे फिल्ड बाहेर जायला लागले होते तर तेंडल्या एकटा उभा होता. त्याला जायचच नव्हतं!
प्राजक्ता + १ धोनी तर कमालीचा
प्राजक्ता + १
धोनी तर कमालीचा संयमी आणि थंड डोक्यानी बोलतो .
MS Dhoni is the best thing happened to Indian cricket so far :).
<< दे आर जस्ट गूड पीपल दीज
<< दे आर जस्ट गूड पीपल दीज यंग्स्टर्स. सो प्राऊड ऑफ देम! >> +१.
भारतासारख्या देशात प्रचंड स्पर्धेला तोंड देत राष्ट्रीय संघात येण्याइतपत मजल मारणं हीच एक कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याकरतां असावी लागणारी प्रतिभा, करावी लागणारी तपश्चर्या , डेडीकेशन, सोसावं लागणार टेंशन इत्यादींची या पोराना पुरेपूर जाणीव असते. आपल्याला फक्त त्याना मिळणारे पैसे व प्रसिद्धीच दिसते. त्यामुळेच, बर्याच वेळां खेळाडूंच्या अपयशावर अन्याय्यकारक वैयक्तीक शेरेबाजी केलेली दुर्दैवाने ऐकायला/वाचायला लागते.
झिम्बॉब्वे आणि केनिया यात का
झिम्बॉब्वे आणि केनिया यात का नाहीत?
फ्लेमिंग जबरदस्त रिव्हर्स
फ्लेमिंग जबरदस्त रिव्हर्स स्विंग करणारा चेंडू अक्षरशः थांबूनच यायचा
इथे बोलणार्यांनाना opening
इथे बोलणार्यांनाना opening ला पाठवण्याचा प्रस्ताव मी मांडतो, कु. र्हु. कडून धोनीकडे कळवता येईल >>>>> आय डोंट अंडरस्टँड असामी. इथे बोलणारे लोकं उगाच बडबड करत आहेत असं म्हणतोयस का?
इफ युआर जोकिंग आय विल लेट इट गो.
आपल्याला फक्त त्याना मिळणारे पैसे व प्रसिद्धीच दिसते>>>>> +१
MS Dhoni is the best thing
MS Dhoni is the best thing happened to Indian cricket so far . : +१
टीममधुन रैना, युवी, धवन, रोहितला काढुन टाका अस म्हणणार्यांसाठी..
धोनी हॉर्सेस फॉर द कोर्सेस या विचारसरणीला घट्ट चिकटुन रहणारा कर्णधार आहे.. २०१५ च्या वर्ल्ड कप वेळीही मी म्हटले होते की जडेजा, रैना,रोहीत,धवन.. हे त्याचे शॉर्ट फॉर्मॅट मधले घोडे आहेत..यांच्या बाबतीत त्याला एक कंफर्ट फिल आहे.. ही इज नॉट विलिंग टु लुज दॅट कंफर्ट फिल...अँड इज विलिंग टु गँबल ऑन देम..
बुवा, "कु. र्हु. कडून
बुवा, "कु. र्हु. कडून धोनीकडे कळवता येईल" ह्यावरून बहुधा तो जोकच असावा.
आय डोंट अंडरस्टँड असामी. इथे
आय डोंट अंडरस्टँड असामी. इथे बोलणारे लोकं उगाच बडबड करत आहेत असं म्हणतोयस का? >> घाला तेल घाला.
मी म्हणतोय कि दर मॅच नंतर तेच तर मी सांगत होतो म्हणण्यामधे काय अर्थ आहे. common sense आहे कि ह्या स्पर्धेदरम्यान असा काही बदल होणार नाही. परत धोनी दहा वेळा तरी बोलला असेल कि त्याचा सारखे बदल करण्यावर विश्वास नाही.
असामी सॉरी तुझ्या जोकचा
असामी
सॉरी तुझ्या जोकचा चुरा केला.
भाचा
धोनी तर बेस्टच आहे राव. त्याच्या रिटायरमेंट बद्दल येतय ते खरय ला? काय गरज आहे खरं? वय पण फार नाही त्याचं आणि खेळतोय की मस्त अजून?
झिम्बॉब्वे आणि केनिया यात का
झिम्बॉब्वे आणि केनिया यात का नाहीत?
केदार आता दुसर्यांदा की
केदार आता दुसर्यांदा की तिसर्यांदा हे डिस्रिगार्ड करतोय की तू परत परत स्वतःचा तोच पॉईंट प्रुव करायला बघतोयस. I thought we agreed to disagree? >>
अरे बुवा तुझ्याबद्दल नाही हे. मी सगळे इंटरनेट, सोशल मिडीया वगैरे आणि कॉमेंट्स बद्दल लिहितोय. मी आधीच लिहिले आहे की व्हाय टू किल किल्ड हॉर्स? माझा पाँईट मी कशाला प्रुव्ह करायला बघू. तो ऑलरेडी अनेकदा झाला आहे.
पण सगळीकडे काल पासून तेच चालू आहे. आणि मायबापची काँमेट ही मलाही अनेक ग्रूप मधून हिंदीतून आली हे त्यामुळे लिहिले आहे.
ओह ओके केदार. अंडरस्टूड.
ओह ओके केदार.
अंडरस्टूड.
चक्क आता ओपनिंग पेअर बद्द्ल
चक्क आता ओपनिंग पेअर बद्द्ल सगळे बोलायला लागले? >> इथे बोलणार्यांनाना opening ला पाठवण्याचा प्रस्ताव मी मांडतो, कु. र्हु. कडून धोनीकडे कळवता येईल >>
आता तुझ्या हातात एवढे सर्व आहे तर हो चालेल मी जाईन ओपनिंगला. निदान १ बॉल १ आउट असे होउन बॉल तरी वाचतील
<< यांच्या बाबतीत त्याला एक
<< यांच्या बाबतीत त्याला एक कंफर्ट फिल आहे.. ही इज नॉट विलिंग टु लुज दॅट कंफर्ट फिल...>> आणि, हा 'कंफर्ट फील' हि धोनीची एक लहर नसून त्याचा त्यांच्या कुवतीवरचा दृढ विश्वास व त्याची 'गट फीलींग' आहे. आपण त्याच्याशी सहमत नसलो, तरी आपण त्याचा आदर करायला हवा, असं मलाही वाटतं. निदान, त्याच्या निवडीची कुचेष्टा तरी करूं नये . कारण, कुणी सांगावं, ही मे हॅव द लास्ट लाफ !!
भाउ... एक्झॅक्टली! त्याच्या
भाउ... एक्झॅक्टली!
त्याच्या गट फिलिंगवर त्याने २००७ च्या टी २० वर्ल्ड कपची शेवट्ची ओव्हर जोगिंदर शर्माला दिली होती..त्याचे काय झाले ते आपण पाहीलेच.. ते एकच नाही तर अशी कितीतरी उदाहरणे त्याच्या गट फिलिंगची देता येतील.. आणी त्याच्याच शब्दात सांगायचे तर.. मोर ऑफन दॅन नॉट.. त्याचे गट फिलिंग बरोबर ठरते..:)
भाऊ मला नाही वाटत कोणी
भाऊ मला नाही वाटत कोणी कुचेष्टा करत आहे.
प्रत्येकाचा बॅड पॅच असतो आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी तेवढा वेळ त्या प्लेअरला द्यावा लागतो. सचिन / द्रविडला पण होता. द्रविडचा तर खूप मोठा होता. पण त्यातूनही विश्वास होताच की तो बाहेर येईल.
डोन्ट गेट मी राँग. मला रोहित, धवन, रैना आवडतात. खूप आवडतात. वी नीड टू गिव्ह देम रोप. आणि ह्यांना खूपदा संधी मिळाल्या आहेत.
इनफॅक्ट चॅम्पियन्स ट्रॉफी कोण विसरेल. धवन / रोहितने धमाल उडवली होती.
पण प्रश्न जेंव्हा कन्सिटंटली फेल होतात, आणि बेंच असतो तेंव्हा बेंचला संधी द्यायला हरकत नाही. पूर्वी बेंचच नसायचा. आता आहे. एखादवेळेस रोटेशन करावे. धवनला दोन टेस्ट मध्ये बसवले होते. ते त्यामुळेच.
शिवाय ह्या स्पर्धा २ वर्षानंतरच असतात. तेंव्हा जिंकावे वाटणे साहजिक आहे.
रोहित जेंव्हा खेळतो तेंव्हा ते पाहणे एक अवर्णनिय सोहळा असतो, त्याचे सिक्स, इनसाईड आउट न काय काय, पण असा सोहळा दर २० मॅच नंतर एकदा येतो. त्यामुळेच त्याला "लेझी एलेगन्स" असे म्हणले गेले आहे.
आपल्याला लेझी एलेगन्स एखाद मॅच मध्ये बघायला काहीच हरकत नाही, पण त्या चॅम्पियन्स ट्रॉफ्री सारखी सातत्य ओपनिंग पेअर कडून हवे.
केदार, भाऊ सुद्धा तू मगाशी
केदार, भाऊ सुद्धा तू मगाशी म्हणत होतास तसं इतर ठिकाणी कुचेष्टा वगैरे एकायला मिळते त्याबद्दल म्हणतायत, तुझ्याबद्दल नाही.
केदार साधी गोष्ट आहे, Down
केदार साधी गोष्ट आहे, Down Under सलामीची जोडी वेगवेगळ्या सामन्यांमधे का होईना धुवांधार खेळत होती. धवन मोक्याच्या सामन्यांमधे खेळतो (किमान आत्ता पर्यंत तरी खेळत आला आहे). रोहित किंवा धवन चा खेळ कधीच पहिल्या बॉलपासून उचलून मारणे ह्य प्रकारातला नाही आहे. त्यांच्या glorious innings सुद्धा कधीच पहिल्या बॉलपासून उचलून सुरू होत नाहीत. सेट झाल्यावर ते १०० च्या पुढे strike rate नेतात. हे काहिही रहस्य नाही. अशा वेळी 'ते इंग्लंड नि आफ्रिके सारखे खेळत नाहीत' ह्या वाक्यांना काय अर्थ आहे ? मूळात तसे खेळाडू हवे होते तर श्रेयस अय्यर वगैरे असायला हवे होते. भर स्पर्धे मधे कुठला कर्णाधार बदल करणार ? तोही अशा खेळाडूला आणेल ज्याच्याबद्दल त्याला आधीच शंका आहे (read राहाणे).
धोनीच्या गट फिलिंगवर विश्वास
धोनीच्या गट फिलिंगवर विश्वास ठेवून पुढे विजयाची आशा ठेवूयात.
(धोनीला म्हणा तुझं गट साफ ठेव बाबा. गट साफ असलं की गूड फिलिंग येतं बाबाsss)
बुवा अरे मला माहिती आहे भाऊ
बुवा अरे मला माहिती आहे भाऊ मला उद्देशून लिहित नाहीत ते. मी आपलं माझ मत ठोकून दिल.
असामी,
तू म्हणतोस ते बरोबर आहेच, पण आता करो नाही तर मरो मध्ये आहोत. ऑस्ट्रेलिया मॅच पण तशीच होती.
मी चार दिवसांपूर्वी एक वाक्य लिहिलं होतं. अॅडॉप्ट करणारी टीम स्मार्ट असते. तेच परत लिहितोय. ह्या सिच्युएशन्स मध्ये कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. जो ऑस्ट्रेलिया मॅच मध्ये धवणने घेतला होता ऑलरेडी. पण शॉट बॉलचा अंदाज चुकल्यामुळे तो आउट झाला.
फॉर्मॅट इतके फास्ट आहे की जर तुम्ही वेळोवेळी सिच्युएशन्स प्रमाणे बदलला नाहीत तर रिझल्ट फेल आणि मग त्यावर लोकं बोलणारच. इनफॅक्ट ह्या ही पुढे मी हे लिहितो, की कोहलीने त्या दोन ओव्हर्स मध्ये तुडवला नसता तर लोकं कोहली विरुद्धही बोलले असते.
मला असं जमत नाही, माझा खेळ असाच आहे असे राहूल द्रविड म्हणत बसला असता तर इतक्या विविध सिच्युएशन्स मध्ये त्याला धावा करताच आल्या नसत्या. राहूल इज ग्रेट, रोहित / धवण / रैना त्यासमोर बच्चे आहेत, जर तो वेळोवेळी अॅडॉप्ट करू शकतो तर सगळ्यांनी करायची तयारी दाखवावी लागते.
पहिल्या बॉल पासून सिक्स / फोर अशी अपेक्षा नाईव्ह लोकांची असते. माझी नाही ! पण जेंव्हा तुम्ही १० बॉल खेळता ( टि २० ते खूप असतात) तेंव्हा यु निड टू अॅडजस्ट. ६ ओव्हर्स मध्ये गेल्या अनेक मॅचेस आपण काय दिवे लावत आहोत ते सर्वज्ञात आहेत. ६ तर सोड कालचा १६० हा आपला हायस्ट स्कोअर आहे. जर आपली पहिली बॅटिंग झाली असती ( टारगेट नसले असते) तर आपला किती स्कोअर झाला असता?
त्यामुळे ह्यावर काउटंर ऑर्ग्युमेंट " इथल्या लोकांनी तिथे जाऊन खेळावे" असे नाही ना असू शकत. शेवटी ही चर्चा आहे आणि माझ्या मताला काही किंमत नाही हे मान्य. पण त्यामुळे जे दिसतंय, ते पण क्रिकेटच्या बाफवर लिहू नये, असे कसे?
अॅन्ड अगेन, ती लोकं मला आवडतात, पण त्यामुळे रॅशनल मत / फॅक्ट्स मांडू नयेत असे थोडी आहे.
वैद्यबुवा...
वैद्यबुवा...
Pages