Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झाड पकडून 'रहाणे', पेड पकडके
झाड पकडून 'रहाणे', पेड पकडके 'रैना', असेच त्यांच्या मनात आहे, त्याला ते तरी काय करणार!
<< स्लो डाउन झालेले दिसतात
<< स्लो डाउन झालेले दिसतात आता, बहुधा विकेट्स गेल्यामुळे. >> ऑफ-स्टंपबाहेरच्या वाईड बॉलच्या सीमारेषेवर गोलंदाजीचा मारा व यॉर्कर्स यामुळे स्लो-डाऊन झाला. वाईडच्या सीमारेषेवरचे चेंडू क्रिझमधून लांबूनच टोलावण्याच्या प्रयत्नात झेल जावून विकेटस गेल्या. आपणही या तंत्राचा वापर धांवा रोखण्यासाठी करावा, असं वाटतं, अर्थात , याच्यासाठीही खास सराव लागतच असावा.
एक फरक प्रकर्षाने जाणवला आपल्या व किवीजच्या फलंदाजीत. आपले फलंदाज क्षेत्ररक्षक चुकवून फटके मारण्यात वाकबगार वाटतात तसे किवीज वाटले नाहीत.
England धम्माल करतेय असे
England धम्माल करतेय असे दिसतेय
Current time 21:05 local, 15:35 GMT T20I Career
Batsmen R B 4s 6s SR This bowler Last 5 ovs
Jason Roy (rhb) 23 12 5 0 191.66 1 (1b) 23 (12b)
Alex Hales (rhb) 9 5 0 1 180.00 8 (4b) 9 (5b)
Mat Runs HS SR
13 232 43 127.47
43 1208 116* 134.82
Bowlers O M R W Econ 0s 4s 6s This spell
Mitchell McClenaghan (lmf) 0.5 0 9 0 10.80 1 0 1 0.5-0-9-0
Adam Milne (rf) 1.0 0 7 0 7.00 3 1 0 1-0-7-0
Mat Wkts BBI Econ
28 30 3/17 7.72
18 21 4/37 7.27
काय हाणतंय इंग्लंड !
काय हाणतंय इंग्लंड !
४ ओवर्स मधे ४९/०!! आपल्या
४ ओवर्स मधे ४९/०!! आपल्या ओपनर्स नीअसं काही केलेलं उद्या (किंवा कधीतरी) बघायला मिळेल का!!
हे लिहीपर्यन्त ५ ओवर्स म्धे ६० झालेत!
स्वप्नं बघायला हरकत नाही
स्वप्नं बघायला हरकत नाही
कसला होल्ड घेतला इंग्लंड्नी मॅचवर.
इंग्लंड जबरी खेळतंय. शॉट्स
इंग्लंड जबरी खेळतंय. शॉट्स कसेल बिनधास्त आहेत. अमेझिंग.
६ ओव्हर्स मध्ये ६९ ! रॉय ४९ ! क्लास
इंग्लंड सुटलंय
इंग्लंड सुटलंय नुसते.
वृक्षप्रेम >>
फेफे, युवीच्या जागी नेगी असेल तर वरच्या तिघांना हात घालू नये. पांडे येत असेल तर एखादा बदल हरकत नाही. रैनाला कुठल्याही परिस्थितीत हात लावला जाणार नाही कारण तो एकमेव बॅक अप स्पिनर उरतोय.
बास करा आता चर्चा. पांडे
बास करा आता चर्चा. पांडे येतोय युवराजच्या जागेवर.
बास करा आता चर्चा >.
बास करा आता चर्चा >. असाम्या आता उतर खाली.
आपले लोकं काही ६ ओव्हर्स मध्ये ६०-६० करणार नाही. ३०-३२ ऐवजी ४५ केले तरी खूप झाले. तुला मी ते गुड गुड पाजेल.
बाबौ!! झालेच की अल्मोस्ट!
बाबौ!! झालेच की अल्मोस्ट! हार्डली ५० उरलेत ! ९ विकेट्स आणि १० ओवर्स बकी!!
इंग्लंड इज टोटली रुलिंग !!
इंग्लंड इज टोटली रुलिंग !!
अरे काय एकदम वन सायडेड विन !
अरे काय एकदम वन सायडेड विन ! इंग्लंड रुल्ड !
तब्येतीत जिंकलं इंग्लंड
तब्येतीत जिंकलं इंग्लंड
इंग्लंडने धांवा रोखायला
इंग्लंडने धांवा रोखायला डांवपेंच वापरले तसा कांहीं खास प्रयत्न न्यूझींकडून झालाच नाहीं. मान्य आहे रॉय झपाटल्यासारखाच खेळत होता पण तिथंच तर कर्णधाराच्या कल्पकतेची कसोटी लागते. फारच सहज जिंकूं दिलं न्यूझीने इंग्लंडला !!
उद्यां गेलसाठी धोनीने व
उद्यां गेलसाठी धोनीने व विराटसाठी सॅमीने काय योजना आंखल्या आहेत, तें बघणं रंजक ठरणार आहे.
अरे यह किया बवाल हो गया?
अरे यह किया बवाल हो गया? यन्झी हार गये?
चला बरं झालं! आता उद्या गेल वगैरे ला किरकोळीत काढा अन आधीच शेळी झालेल्या विंडिजला डॉमिनेट करुन जिंका म्हणा बावळ्यांनो!
मग त्या रुट अन रॉय अन कॉय कॉय ला बघून घेऊ!
हायलाईट्स बघितले आत्ता. काही
हायलाईट्स बघितले आत्ता. काही चानसच ठेवला नाही इंग्लंडनी. टोटली डॉमिनेट केलं. रॉय आणि मॉर्गन पटापट गेले तेव्हा गेम पलटू शकत होता पण रुट अन बटलर दोघंही एकेनात. सडन्ली इंग्लिंडची साईड एकदम फॉर्मिडेबल वाटत आहे कारण एखादा माणूस चालण्या एवेजी २-३ लोकं चालत आहेत.
हायलाईट्स होते त्यामुळे बॉलिंग सगळी नाहीच बघायला मिळाली पण जे काही बॉल पाहिले इंग्लंडचे त्यात खुप काही बेकार होते असं नाही वाटलं, यन्झी वाल्यांनी चांगली सुरवात करुन नंतर त्यांना कॅपिटलाईज नाही करता आलं, आपण लावला होता तसाच इंग्लिंडनी पण टाईट बॉलिंग करुन चांगला डँपर लावला. टाईट बॉलिंग अन फिल्डिंग केल्यामुळे यन्झीवाले पटापट बळी पडले शेवटी. गप्टिल पण आजिबात चालला नाही त्यामुळे आणखिनच लोचा झाला त्यांचा.
यन्झीची बॉलिंग पण काही वाईट नव्हती पण रॉयची जबरी नजर बसली होती! अक्षरशः तिन्ही स्टंप सोडून त्यांनी सिक्स फटकावला आहे. बाकी तो पण कोहली सारखेच रिस्टी टेनिस छाप फटके मारतो बर्याच वेळा हे ऑब्झर्व केलं असेलच. त्याची ताकद मला कोहलीपेक्षा जास्त वाटते पण. बॉल खुप इजिली बाऊंडरी पार करत होता, जमीन असो की हवेत!
एकंदरित असं दिसतय की टोटली मोमेंट टु मोमेंट असा गेम वर खाली सरकत जाणार आहे. धोनी की कोहली म्ह्णाला ते आठवत नाही आता पण टोटली खरं आहे ह्या फॉर्म्ट मध्ये ते. यु जस्ट हॅव टु बि अॅन्ड प्ले इन द मोमेंट. फार काही प्लॅनिंग करुन खुप काही करता येइल हे शक्यच नाहीये.
रन काढायची प्रचंड घाई असताना एकदम टाईट बॉलिंग ठेवून जेरबंद करता आलं तर बॅटिंगवाले आपोआपच गडगडतात अशी परिस्थिती आहे. कुठलीही बॉलिंग साईड फक्त तेवढच करु शकते कारण बॅटिंग साईडला जो कोण खेळत असेल त्याला त्या दिवशी फुटबॉल येवढा बॉल दिसत असेल तर भगवान बचाए भैय्या! त्याच बरोबर तुम्ही जर आणखिन लूज बॉल अन लूज फिल्डिंग केली तर मग ते नुसतं हरणारच नाही तर अपमानीत सुद्धा होतील.
काल अगदी हेच वाटलं इंग्लंडची
काल अगदी हेच वाटलं इंग्लंडची बॅटींग बघून... सगळं आता, त्या दिवशी जे होईल त्यावर आहे, आणि फ्लिंटॉफच्या गमज्या खर्या होतात की काय, अशी भिती वाटली
फलंदाजीचीं पहिलीं ६ षटकं
फलंदाजीचीं पहिलीं ६ षटकं बव्हंशीं निर्णायक ठरतात, असं इतरांच्या सामन्यांवरून दिसत असलं, तरीही आपला संघ मात्र आतांपर्यंत तरी याला अपवाद ठरण्यात यशस्वी झाला आहे. [पॉवर-प्ले मधे आपल्या भरीव धांवा होत नाहीत व विरुद्ध संघ मात्र त्या ६ षटकांत ६०च्या आसपास धांवा आरामात करतो. व तरीही आपण, कसेबसे कां होईना, जिंकतो]. हें कौतुकास्पद असलं व त्याकरतां दाखवलेली जिद्द व जिगर पुढच्या सामन्यांत उपयुक्त ठरणार असली, तरीही यापुढे तरी पहिल्या ६ षटकांत आपला भरीव स्कोअर होणं व विरुद्ध संघाच्या धांवा रोखणं आत्यंतिक महत्वाचं ठरणार आहे. अपवादाने नियम सिद्ध होत असला तरीही अपवाद हाच नियम तर नाही होवूं शकत ना ! शिवाय, त्यामुळें सगळ्यांचा जीव टांगणीला लागतो, हेंही आहेच !
ऑल द बेस्ट, भारत.
रोहीत शर्माच्या जागी
रोहीत शर्माच्या जागी पांडे
युवराजच्या जागी रहाणे
रैना किंवा जडेजाच्या जागी भज्जी
असे करतील का आज? भज्जीला मुंबई इंडीयन्समुळे होम ग्राउंड आहे. विकेट जरी घेत नसला तरी तो रनरेट कमी करतोच. झालंच तर फट़केबाजी पण करु शकतो. बघा बुवा.
आज मांजरेकरला लांब ठेवा मैदानाच्या.
<< भज्जीला मुंबई इंडीयन्समुळे
<< भज्जीला मुंबई इंडीयन्समुळे होम ग्राउंड आहे >> अहो, रोहितचं तर खरंखुरं होम ग्राऊंड आहे हें ; काढतील त्याला ? मला नाहीं वाटत काढतील असं व काढावा असंही !
आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता,
आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहता, धोनी आहे त्या संघात काही बदल करेल असं अजिबात वाटत नाही. युवराज बाहेर पडल्याने (नाइलाजाने) पांडे (धोनीचा फेवरेट म्हणून) किंवा रहाणे (होम ग्राउंड) म्हणून एवढाच काय तो फरक असेल फायनल-११ मधे असं वाटतंय.
कालची स्ट्रॅटेजी पूर्ण चुकली
कालची स्ट्रॅटेजी पूर्ण चुकली एनझीची... सुरुवातीलाच स्पिनर ट्राय करायला हवे होते जे आधीच्या चारही मॅचेस मध्ये केले होते... आणि जर ओपनिंग पेस बॉलर्सनी करायची होती तर निदान बोल्ट किंवा साउदी ला तरी घ्यायचे होते... आपल्या विरुद्ध पेस बॉलर्स चालले असते एक वेळ पण इंग्लंड जे पेस बर्यापैकी नीट खेळू शकतात त्यांच्या विरुद्ध अशी रणनिती.. बात कुछ हमज ही नही हुई..
रोहीतबद्दल भऊ म्हणताय ते
रोहीतबद्दल भऊ म्हणताय ते बरोबर आहे पण तो खेळलाय कुठे?? रहाणे आयपीएलमधे बर्याचदा ओपनर म्हणुन आला आहे आणी कायम टॉप ३ स्कोरमधे असतो. रोहीतचे असे होते की १० पैकी १ मॅच तो चांगला खेळतो पण रहाणे १० पैकी ५-६ मॅच चांगला खेळतो. फक्त ग्यानबाची मेख अशी आहे की भारताच्या संघात रोहीतला २०-३० मॅच खेळवतात व त्यातल्या तो २-४ भारी खेळतो व रहाणेला कुजवतात किंवा २-३ मॅच संधी दिली जाते व त्यावरुनच जज करतात. असो. धोनी करे सो कायदा, जोवर पैका तोवरी ऐकाच्या चालीत 'जोवरी जिंका तोवरी ऐका'
रोहित, धवन आणि रैना, ..
रोहित, धवन आणि रैना, .. खबरदार आज म्हणाल व कराल
"आपलं काय 'सेम' आहे " तर ! आज 'सेमी' आहे !!!
आज मांजरेकरला लांब ठेवा
आज मांजरेकरला लांब ठेवा मैदानाच्या. >>
रहाणे आमचा गांववाला आज संघात
रहाणे आमचा गांववाला आज संघात हवाच! उत्तम क्लोज इन फिल्डर आणि संयमी तरी चेंडू न खाणारा...
आज मांजरेकरला लांब ठेवा
आज मांजरेकरला लांब ठेवा मैदानाच्या. >>
त्याला फोन करुन बोलवा अर्जण्ट किंवा जमाल गोटा द्या..
काल न्युझी वाले भारत बनण्याचा
काल न्युझी वाले भारत बनण्याचा प्रयत्न करत होते त्यात त्यांचा पराभव झाला अन्यथा त्यांचा विजय नक्की होता. जेव्हा रॉय धुणे धुत होता तेव्हा सातत्याने जलदगती गोलंदाजाकडे चेंडू दिला जेणेकरून चेंडू लवकर जुना होईल मग स्पिनर्स आणू आणि वेसण घालू परंतू चेंडू जुना होई पर्यंत रॉय ने सामना पलटून दिला होता. तिथे विल्यमसन चा अंदाज चुकला. नविन चेंडूवर २ ओव्हर नंतर सॅनेटर या सोढी यांना आणायला हवे होते. परंतू सगळे "अश्विन" नसतात हे आता मान्य करावे लागेल. अश्विन २०-२० सारख्या स्पिनर्सना अत्यंत धोकादायक प्रकारात सुध्दा अगदी पहिल्या ओव्हरला येतो आणि धावा रोखून दाखवतो. हे इतर स्पिनर्स्ना सुध्दा जमायला हवे. किमान भारतीय खेळापट्टीवर तरी हा जुगार विल्यमसन ने खेळायला हवा होता. तो यशस्वी ठरला असता तर नंतरचे १० ओव्हर मधे इंग्लिश फलंदाजांना धावा काढणे फार कठीण झाले असते. खेळपट्टी दिल्लीची आणि ती आपल्या लौकिकला जागणार होती. इथे मॅकलम चा अनुभव मिळायला हवा होता.
Pages