यंदा रंगपंचमी / धूलीवंदनला पाण्याची नासाडी करावी का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 March, 2016 - 16:43

विषय तसा नेहमीचाच आहे.

दर होळी सणाच्या काही दिवस आधी ‘पाणी वाचवा’ मेसेज सोशलसाईटवर फिरू लागतात. सोबत हिंदू सणांनाच नेमके तुम्हाला निसर्गाची चिंता भेडसावते, मेसेजही लगोलग हजर असतात. मी मात्र दरवर्षी "खेळा बिनधास्त" या गटात असायचो. अर्थात यामागे हिंदू सण परंपरा जपल्याच पाहिजेत असा काही उदात्त हेतू नसून ज्यातून मनोरंजन होतेय ते ते केले पाहिजे असा स्वार्थ असायचा. त्याचबरोबर स्वताच्या लहानपणी होळीच्या आठवडाभर आधीपासूनच आम्ही जी रंगपंचमी साजरी करायचो त्या पार्श्वभूमीवर आताच्या लहान पिढीला उपदेशाचे डोस पाजायचा आपल्याला काही एक नैतिक अधिकार नाही असेही वाटायचे. परीणामी आजवर दरवर्षी लहानांबरोबर आणखी लहान होत टाकीतले पाणी संपेपर्यंत रंगपंचमी खेळत आलोय.

पण यंदा परिस्थिती बिकट आहे. कदाचित आधीच्या वर्षीही असावी, पण आमच्याकडे चोवीस तास मुबलक पाण्याचे सुख असल्याने ती कधी जाणवली नसावी. यावेळी मात्र ऑफिसमधील ईतरांच्या चर्चेतून ती जाणवतेय. तसेच काही दिवसांपूर्वीच मी जे आजवर शॉवरने आंघोळ करायचो ते तांब्याबादलीने आंघोळ करायला सुरुवात करून पाणी वाचवायला चालू केलेय, त्यामुळे ईतरांना उपदेश करायचा थोडाफार नैतिक अधिकार मी कमावला आहे असे वाटू लागलेय. म्हणून हा धागा.

माझे मत क्लीअर झाले आहेच. यंदा पाण्यापासून चार हात लांब राहत हा सण साजरा करता येतो का हे बघायचे. तसेच सुक्या रंगाने खेळायचे ठरवल्यास आंघोळीला चार बादल्या तर लागणार नाहीत ना, आणि रंगलेले अंगण साफ करायला पाण्याचा ड्रम तर रिकामा होणार नाही ना, याची काळजी घ्यायची.

गवताच्या पेंढ्या होळीत टाकून भडका उडवायचा, त्या पेटलेल्या होळीवर बोंबा मारायच्या, आपली आवडती मुलगी होळीला प्रदक्षिणा मारायला आल्यावर उगाचच काठी हातात घेत शायनिंग मारायची, त्याच काठीने अर्धे जळालेले खोबरे होळीतून बाहेर काढत, अर्धे तिला द्यायचे, अर्धे आपण खायचे, घरी जाऊन आईने बनवलेली पुरणपोळी आणि कोंबडीवड्यावर आडवाउभा ताव मारायचा, या ईतर गोष्टींची मौज तशीच राहील. पाण्याला तेवढा अलविदा होईल.

फक्त आता हा निर्धार कितपत टिकतोय हे बघायचेय, कारण आमच्या येथील रंगपंचमी फारच धमाल असते. त्या मोहावर विजय मिळवणे कठीणच..

हे झाले माझे, पण तुमचे काय ? जमेल ..

...............................................................

यावर पोल काढणे गरजेचे वाटले म्हणून .. इथे http://www.maayboli.com/node/58123

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाई च्या गोबर आणि गोमुत्र ने होळी खेळायची आयड्या कशी आहे?

त्यांची संध्याकाळ मात्र चंदन पावडरने होणार आहे हो Happy

ठीक आहे की ..गोबर्,गोमुत्र..चंदन.

<<<पाणी म्हणजे कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. पण योग्य वापर आणि उधळपट्टी यादेखील निश्चित कल्पना नाहीत. ते प्रत्येकाचे मत आहे. प्रत्येक घरात दोन बादल्या पाणी असताना एक जण अंघोळ राखून एक बादली पाणी बाल्कनीतल्या कुंड्याना घालत असेल तर त्याच्या दृष्टीने आनंद आणि शेजार्यासाठी उधळपट्टी असू शकतेच ना?>>>

निश्चित कल्पना नसतील पण पाण्याच्या वापराला मर्यादा असल्याच पाहिजेत
कुंडीतल्या झाडांना पाणी घालण आणि पाण्याचा अमर्याद वापर करून होळी रंगपंचमी खेळण ह्यामधे फरक आहे

नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपव्यय करण्याचा अधिकार कुणालाच नाहीये

एक बादली पाणी बाल्कनीतल्या कुंड्याना घालत असेल >> झाड जगतंय कि. आणि तुमच्या आंघोळीच्या पाण्याचाच वापर करुन होळी खेळलात तर कुणाला आक्षेप नसेल. पण तसे होत नाही हेही खरंय. पाण्याने होळी खेळणं, रंग धुण्यासाठी अमर्याद पाणी वापरणं हे शहाणपणाचे आणि 'सुसंस्कृत'पणाचे लक्षण आहे काय?? या गोष्टींवर आक्षेप घेतला की 'हिंदुधर्म खतरेमे' अशी आरोळी ठोकत पळी-पंचपात्री घेऊन धावत येणार्‍यांना काय म्हणायचं?

होळी सण साजरा झाला पाहिजे, मित्रांनो, रंग पंचमी पण,
दुष्ट शक्तीला दहन करा.
एक व्हा, संघटीत व्हा.

कुंडीतल्या झाडांना पाणी घालण आणि पाण्याचा अमर्याद वापर करून होळी रंगपंचमी खेळण ह्यामधे फरक आहे

हा फरक आहे का? असला तर दोन्हीत माझ्यासाठी चांगलं काय हा निर्णय व्यक्तीसापेक्ष आहे आणि असलाच पाहिजे. मी होळी खेळत नाही पण मी एसी, लिफ्ट, टीव्ही, फ्रिज वापरतो. म्हणजे मी विज आणि पर्यायाने पाणी वाया घालवतोच. त्यावेळी माझ्या डोक्यात निसर्ग, मराठवाडा यापेक्षा माझा आराम किंवा मनोरंजन हाच विचार असतो ना? ते बरोबर आणि हे चूक ही विसंगती वाटते.

पाण्याचा गैरवापर करणार्‍या दृष्ट शक्ती
निसर्गाची हाणी करुन प्रदुशन करणारी दृष्ट शक्ती
या..दुष्ट शक्तीला दहन करा.
एक व्हा, संघटीत व्हा.

विठ्ठलः 'हिंदुधर्म खतरेमे' हा मूर्खपणा आजकाल जास्तच बोकाळलाय. सोशल मिडीयाचा सगळ्यात गैरवापर या लोकानी केलेला आहे. पण मी व्यक्तीस्वातंत्र्य या मुद्द्यातून विचार करायचा प्रयत्न करतोय. जसा धर्माचा आपल्यावरील प्रभाव लिमिटेड असावा तसाच स्टँड समाजाबद्दल घेणे किती संयुक्तिक असेल?

सकुरा: कुणाला कशात आनंद वाटतो हे ठरवायचा हक्क ज्याचा त्याला असावाच ना? आता इथे कळीचा मुद्दा म्हणजे 'जोपर्यंत दुसर्याच्या हक्कावर गदा येत नाही तोपर्यंत'. होळी खेळल्याने ती लक्ष्मणरेषा क्रॉस होते का?

उपदेश करणे सोपेच असते, स्वतः करणे अवघड असते.
काड्या करणे सोपे असते, आनंद देणे अवघड असते.
निंदा करणे सोपे असते, स्तुती करणे अवघड असते.
निंदक असावे शेजारी हे म्हणायची आता गरज उरली नाही.

'जोपर्यंत दुसर्याच्या हक्कावर गदा येत नाही तोपर्यंत'. होळी खेळल्याने ती लक्ष्मणरेषा क्रॉस होते का?<<<<

नैसर्गिक संसाधनाच्या बाबतित हे लागु नसावे असे माझे वैयक्तिक मत आहे.

झाडांना पाणी हे झाड जगवण्यासाठी घातलं जात

तुमची आवड नावड हा व्यक्तीसापेक्ष निर्णय तेव्हा असतो जेव्हा तुमच्या निर्णयाने निसर्गाची हानी आणि नैसर्गिक संपत्तीचा विनाकारण ऱ्हास होत नसेल
जगण्यात थोडीफार विसंगती असतेच
मी पंखा लावते तेव्हा विजेची आणि पर्यायाने पाण्याची नासाडी होते हे मान्य पण उकाड्यापासून संरक्षण ही माझी गरज आहे आणि होळी खेळण ही गरज नसून चैन आहे
गरज आणि चैन ह्यामधे फरक आहे
आपण जगण्यासाठी वीज ,पाणी आणि इतर अनेक नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करतच असतो पण म्हणून त्यांचा वाटेल तसा वापर करण चुकीच आहे

होळी खेळण ही गरज नसून चैन आहे >>> हे व्यक्तीसापेक्ष आहे. थोडक्या पाण्यात अन कोरड्या रंगात स्वतः च्या आनंदासाठी काही लोकांना खेळावी वाटेल.

होळीचे रन्ग खेळण्यापेक्षा प्रेमाचे रन्ग खेळा.:इश्श:............... म्हणजे अन्ताक्षरी/ गाण्याच्या भेन्ड्या खेळत होळीची गाणी म्हणा. देवाची मानसपूजा असते तशी मानस होळी खेळा.:फिदी:

काय जबरदस्ती आहे? मैत्रीची, प्रेमाची, कशाचीही होळी पर्यावरणाला धक्का न लावता, पाण्याची नासधुस न करता केली तरी हरकत आहेच का? Sad

मी पंखा लावते तेव्हा विजेची आणि पर्यायाने पाण्याची नासाडी होते हे मान्य पण उकाड्यापासून संरक्षण ही माझी गरज आहे आणि होळी खेळण ही गरज नसून चैन आहे
हे प्रत्येकाचे निर्णयस्वातंत्र्य नसावे का? तुम्हाला पंखा गरज वाटते. एखाद्यासाठी, हातपंखा- ओला टोवेल या साध्या उपायानी साध्य होणार्या गोष्टीसाठी वीज वापरणे चैन वाटेल. पण त्याच्या वाटण्यासाठी तुम्ही 'तुमची गरज' डिसमिस करत नाही ना? कदाचित तुम्ही संसाधनांची जास्त नासाडी करता आहात.

भुत्या ......................................? पंखा,विज एसी काय न काय...

एक काम करा त्या एसी बनवनार्‍याला पाणी बनवायची मशिन पण दे म्हणाव बनवुन.

माझे म्हणणे चुकीचे असेलही. पण म्हणून "काय बोलताय तुम्हाला तरी कळत आहे का"?

टीपः वीज निर्माण होताना किती पाणी लागते, प्रकल्पांपायी निसर्गाचा कसा विनाश होतो आणि पावसावर त्याचा कसा परिणाम होतो याबद्दल सगळे तुम्हालाच 'कळत' असेल ना?

वीज निर्माण होताना किती पाणी लागते >> Uhoh ते पाणी परत वापरले जाते ना कि बाष्पीभवन होऊन हवेत स्पिरिटसारखे उडून जाते ? Wink

बर जौ दे हे प्रकल्प, धरण विज निर्मिती तुम्ही होळी बरोबर जोडणार असाल तर मला तुमच्याशी वाद घालायचा नाही
तुम्हाला काही कळतय का? हे शब्द मी माघारी घेत आहे.

>>>> आता हे म्हणू नका की मराठवाड्यात पाणी नाही तर लोक नायगरा धबधब्याला कसे एंजोय करतात. .. प्लिजच <<<<< Lol यू सेड इट.... आय लाईक इट... Happy
याच उदाहरणानंतर मला त्या अकबरबिरबलाची खिचडी शिजवायची गोष्ट आठवते आहे. Happy कुणाला माहित आहे का ती गोष्ट सविस्तर पणे?

Pages