विषय तसा नेहमीचाच आहे.
दर होळी सणाच्या काही दिवस आधी ‘पाणी वाचवा’ मेसेज सोशलसाईटवर फिरू लागतात. सोबत हिंदू सणांनाच नेमके तुम्हाला निसर्गाची चिंता भेडसावते, मेसेजही लगोलग हजर असतात. मी मात्र दरवर्षी "खेळा बिनधास्त" या गटात असायचो. अर्थात यामागे हिंदू सण परंपरा जपल्याच पाहिजेत असा काही उदात्त हेतू नसून ज्यातून मनोरंजन होतेय ते ते केले पाहिजे असा स्वार्थ असायचा. त्याचबरोबर स्वताच्या लहानपणी होळीच्या आठवडाभर आधीपासूनच आम्ही जी रंगपंचमी साजरी करायचो त्या पार्श्वभूमीवर आताच्या लहान पिढीला उपदेशाचे डोस पाजायचा आपल्याला काही एक नैतिक अधिकार नाही असेही वाटायचे. परीणामी आजवर दरवर्षी लहानांबरोबर आणखी लहान होत टाकीतले पाणी संपेपर्यंत रंगपंचमी खेळत आलोय.
पण यंदा परिस्थिती बिकट आहे. कदाचित आधीच्या वर्षीही असावी, पण आमच्याकडे चोवीस तास मुबलक पाण्याचे सुख असल्याने ती कधी जाणवली नसावी. यावेळी मात्र ऑफिसमधील ईतरांच्या चर्चेतून ती जाणवतेय. तसेच काही दिवसांपूर्वीच मी जे आजवर शॉवरने आंघोळ करायचो ते तांब्याबादलीने आंघोळ करायला सुरुवात करून पाणी वाचवायला चालू केलेय, त्यामुळे ईतरांना उपदेश करायचा थोडाफार नैतिक अधिकार मी कमावला आहे असे वाटू लागलेय. म्हणून हा धागा.
माझे मत क्लीअर झाले आहेच. यंदा पाण्यापासून चार हात लांब राहत हा सण साजरा करता येतो का हे बघायचे. तसेच सुक्या रंगाने खेळायचे ठरवल्यास आंघोळीला चार बादल्या तर लागणार नाहीत ना, आणि रंगलेले अंगण साफ करायला पाण्याचा ड्रम तर रिकामा होणार नाही ना, याची काळजी घ्यायची.
गवताच्या पेंढ्या होळीत टाकून भडका उडवायचा, त्या पेटलेल्या होळीवर बोंबा मारायच्या, आपली आवडती मुलगी होळीला प्रदक्षिणा मारायला आल्यावर उगाचच काठी हातात घेत शायनिंग मारायची, त्याच काठीने अर्धे जळालेले खोबरे होळीतून बाहेर काढत, अर्धे तिला द्यायचे, अर्धे आपण खायचे, घरी जाऊन आईने बनवलेली पुरणपोळी आणि कोंबडीवड्यावर आडवाउभा ताव मारायचा, या ईतर गोष्टींची मौज तशीच राहील. पाण्याला तेवढा अलविदा होईल.
फक्त आता हा निर्धार कितपत टिकतोय हे बघायचेय, कारण आमच्या येथील रंगपंचमी फारच धमाल असते. त्या मोहावर विजय मिळवणे कठीणच..
हे झाले माझे, पण तुमचे काय ? जमेल ..
...............................................................
यावर पोल काढणे गरजेचे वाटले म्हणून .. इथे http://www.maayboli.com/node/58123
इथे विरोध करणारे सगळे
इथे विरोध करणारे सगळे देशद्रोही. स्गळ्यांना पाकिस्तानात पाठवा.
उद्या परवा अशी मागणी सुध्दा होऊ शकते. काळाजी घ्या
एकगठ्ठा विसा मागणार्यांना खास सवलत मिळते का ?
पाणी तर चोरतातच, गळ टाकून विज
पाणी तर चोरतातच, गळ टाकून विज पण चोरतात. या विरुध्द का नाही चळवळ., का नाही धागे निघत.
राजेश्वर कुळकर्णी, आपणही धागा
राजेश्वर कुळकर्णी, आपणही धागा काढु शकता. का नाही काढत?
अगदी बरोबर राजेश्वर, नेमके
अगदी बरोबर राजेश्वर,
नेमके हिंदू सणांच्या वेळेसच हे "अक्कलेचे डोस" पाजणे का होते? अन वर दहा चुकानंतरचि अकरावी चुक का करावि हा वैचारिक शिरजोर पणा का?
बाकीच्या दहा नै तर शंभर चुका होताहेत, त्या आधि बंद करा ... ! स्मित
निव्वळ "धार्मिक" बाबींवर हल्लाबोल करायची ही फ्याडे आता पब्लिकलाही कळू लागली आहेत.जिथे "धंदा' होतोय, पैका मिळतोय, तिथे एक शब्द विरोधाचा नाही, उलट त्यातच सामिल. पण हिंदु धार्मिक बाब आलिरे आलि की गेली काही वर्षे सातत्याने त्यावर नकारात्मक टीका.. हे एकतर्फी फार काळ चालू शकत नाही.
विठ्ठल | 22 March, 2016 -
विठ्ठल | 22 March, 2016 - 03:33 नवीन
राजेश्वर कुळकर्णी, आपणही धागा काढु शकता. का नाही काढत?
>>>
प्रश्न धागे काढण्यारांना आहे.,, ? खुसपट काढण्यारांना नाही.
ओह, लिंबुसाठी आहे का ते?
ओह, लिंबुसाठी आहे का ते? असो.. असो...
पाणी तर चोरतातच, गळ टाकून विज
पाणी तर चोरतातच, गळ टाकून विज पण चोरतात. या विरुध्द का नाही<<<, हे अदानी अंबानी, मल्याचे भाऊ-बंद आहेत म्हणुन सरकार यांना काही करत नाही.
आमच्या सोसायटीत पण लॉन ला पाणि देत असतात विचारायला गेल्यावर उत्तर मिळाले की ते म.न.पा चे पाणी नाही आहे बोअर चे आहे आणि त्याला भरपुर पाणी आहे.
होळी हा सनच असा आहे की ज्यात फक्त निसर्गाचा विनाशच आहे. लाकडं फुकट जाळली जातात्,पाण्याचा दुरुपयोग, स्त्रीयांची विटंबना, अजुन बरेच काही
आम्ही कोरडी होळी खेळलो, आता
आम्ही कोरडी होळी खेळलो, आता प्लीजच, खेळलातच का वगैरे नको.
मुलांनी बादलीतून पिचकार्या वगैरे प्रकारे खेळली, डोक्यावर पाईप्/बादली ओतणे वगैरे नाही केले.
रंगल्यावर ही अंघोळीला अगदी रोज करतो त्याहून ५ मिनीटे जास्त लागली, आधीच भरपूर तेल, क्रीम चोपडून गेल्याने रंग ही अगदी सहजच गेलेत.
पण हिंदु धार्मिक बाब आलिरे
पण हिंदु धार्मिक बाब आलिरे आलि की गेली काही वर्षे सातत्याने त्यावर नकारात्मक टीका.. > पाण्याचा प्रश्न फार अवघड व धार्मिक मुद्द्या पेक्षा मोठा आहे. इस्लाम मध्ये काही एक कारणासाठी मेलेल्यांच्या कबरीवर पाणी शिंपडायचे असते. तर लोक कबरीला भेटायला जातात तेव्हा कॅन भर पाणी नेतात व कबरीवर शिंपडतात. ते कृपया करू नये व अगदी चार थेंब शिंपडून रिचुअल पार पाडावे असे आवाहन केले जात आहे.
पर्यावरणाची हानि झाली तर संपूर्ण ग्रहालाच धोका आहे. हे कृपया लक्षात घ्यावे.
" मोरीच्या तोंडाला बोळा, अन
" मोरीच्या तोंडाला बोळा, अन दरवाजा मात्र सताड उघडा" ही म्हण मला राहुन राहुन आठवते आहे.
आपट्याची पाने दस-याला, बेल
आपट्याची पाने दस-याला, बेल श्रावणात महादेवाला, तुळस, दुर्वा, फुले पत्री सगळे बंद करा बघू . ळ
सूखे के चलते मुस्लिमों ने
सूखे के चलते मुस्लिमों ने उठाया कदम, कब्रों पर नहीं डाला जाए पानी
http://m.navbharattimes.indiatimes.com/metro/mumbai/other-news/in-time-o...
>>>> आपट्याची पाने दस-याला,
>>>> आपट्याची पाने दस-याला, बेल श्रावणात महादेवाला, तुळस, दुर्वा, फुले पत्री सगळे बंद करा बघू . ळ <<<<
हो हो, अगदी अगदी, अन झालच तर ते शंख वगैरे पुजेत घेऊन पर्यावरणाची हानी होते ती वेगळीच. घंटा/पळीपंचपात्री/ देवांच्या मूर्ति वापरता, निसर्गातुन तांबे काढुन वापरता, त्यानेही निसर्गाची भारीच हानी होते, ते ही बंद करा, देव कसा? मनात हवा.... देव भावाचा भुकेला आहे, तुमच्या शंख घंटा फुले पत्री वगैरेंचा नाही, अन कुणि सांगितले हो की देवाला अमकेच वाहिलेले आवडते? काय पुरावा? अन हे सगळे असले त्या ह्यांनीच रचलेले जुगवलेले अन तुम्ही फॉलो करणार ना आंधळेपणे?
अन काय ते आचमन फिचमन करतात, सगळा नुस्ता कित्ती तो पाण्याचा नास...
तिन पळ्या प्या अन एक पळी सोडुन द्या, म्हणजे? का सोडुन द्यायचे? कुणाच्या हुकुमावरुन? आम्ही नै असले हुकुमबिकुम मानित... मुळात भांडे तोंडाला लावुन पिता येत असताना पळी पळीने हातावरुन घेऊनच का प्यायचे? शीऽऽ... या़क, कित्ती ती घाणेरडी सवय... अगदी पाणी ओंजळीत घेऊन पिल्याप्रमाणे वाट्टय.... हात तरी धुतलेले अस्तात का? त्यापेक्षा पळीच तोंडाला लावली तर काय होईल? देव रागावेल का अशाने? उग्गाच कैच्याकैच... ते काय देवाने सांगितलय का? कधी सांगितलय? कुणाला सांगितलय? पुरावा काय?
अन होळी अश्शाच प्रकारे खेळा हे कोणच्या देवाने सांगितलय? नै खेळणार आम्ही होळी ज्जा... सांगा तुमच्या त्या देवाला.....
हो, अन तुम्हालाही खेळू देणार नाही.... \
खेळू लागलात तर तिथ्थे मोर्चा काढून येऊन पिरपिर करु , घोषणाबाजी करु, तुमचे पाणी तोडू, तुमच्याविरुद्ध पोलिसकम्प्लिण्टा करु..... .!
:उपहास मोड ऑफ :
अमा, अंधेरी येथिल
अमा, अंधेरी येथिल कब्रस्तानाने कबरीवर पाणी न शिंपडण्याचे आवाहन केले आहे. याबाबतच्या बातमीचा हा दुवा! पण एकाही संत-महंत-बाबा-बापु यांनी होळीमधे पाणी कमी वापरा असे आवाहन केलेले वाचनात आले नाही. ईथले ब्रह्मर्षी तर हिरीरीने होळीचं समर्थन करताना दिसत आहेत.
अनघाताई, तुमच्या सुचनेला जोरदार अनुमोदन.
देव होळी खेळा सांगुन गेलेत
देव होळी खेळा सांगुन गेलेत का?
अवांतर तरीही... देशी
अवांतर तरीही... देशी अधिकार्याने सांगितलेली हकीकत: तो बर्याच वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात गेला होता.दाढी करत असताना बेसिनचा नळ चालू होता.असे दोन दिवस त्याच्या मेडने पाहिले होते. संध्याकाळी घरी आल्यावर त्याच्यासाठी चिठी होती की " तुम्ही माझ्या देशाचे नुकसान करत आहात्,मला तुमच्याकडे काम करणे योग्य वाटत नाही."
अंधेरी येथिल कब्रस्तानाने
अंधेरी येथिल कब्रस्तानाने कबरीवर पाणी न शिंपडण्याचे आवाहन केले आहे. >> म्हणजे इतकी वर्ष ते कबरीवर पाणी अकारण टाकत होते असे नाही का वाटला बा विठ्ठला की ते करणे शास्त्र्संमत आहे.
देव होळी खेळा सांगुन गेलेत
देव होळी खेळा सांगुन गेलेत का?> देव कपडे घाला हेही नाही सांगुन गेले
पॉपकॉर्न आणा कोणीतरी
पॉपकॉर्न आणा कोणीतरी माझ्यासाठी!
देव काहीही सांगून गेले नाहीत.
देव काहीही सांगून गेले नाहीत. पण काळसुसंगत वागण्यात बहूजनांचे हित आहे.
म्हणजे इतकी वर्ष ते कबरीवर
म्हणजे इतकी वर्ष ते कबरीवर पाणी अकारण टाकत होते असे नाही का वाटला बा विठ्ठला की ते करणे शास्त्र्संमत आहे.<<<<<सध्याची पाणी टंचाई बघुन त्यांनी हा निर्णय घेतला हे महत्वाचे नाही का? पाऊस पडुन मुबलक पाणी असेल तेंव्हा पुन्हा घालतिल की ते कबरीवर पाणी होळी बद्द्ल काय मत आहे हिंदू साधु संताचे? आत्ताच्या परिस्थितीत...
पॉपकॉर्न आणा कोणीतरी
पॉपकॉर्न आणा कोणीतरी माझ्यासाठी!
राजकारण सोडून आपण कधीच विचार
राजकारण सोडून आपण कधीच विचार करू शकत नाही का?
देव कपडे घाला हेही नाही
देव कपडे घाला हेही नाही सांगुन गेले>>>> काय सांगता
पण काळसुसंगत वागण्यात
पण काळसुसंगत वागण्यात बहूजनांचे हित आहे.>>> म्हणुनच काळसुसंगत का काय ते वागा असं सगळे घसा आय मीन कीबोर्ड बडवुन सांगताहेत. नैतर अजुन भयंकर काळ येइल.
देव कपडे घाला हेही नाही
देव कपडे घाला हेही नाही सांगुन गेले >> मुक्तेश्वर देवाचं एव्हढं ऐकत असाल असं वाटलं नव्हतं हो!
सध्याची पाणी टंचाई बघुन त्यांनी हा निर्णय घेतला हे महत्वाचे नाही का? >>>+७८६
सध्याची पाणी टंचाई बघुन
सध्याची पाणी टंचाई बघुन त्यांनी हा निर्णय घेतला हे महत्वाचे नाही का? पाऊस पडुन मुबलक पाणी असेल तेंव्हा पुन्हा घालतिल की ते कबरीवर > म्हणजे ते सुसंगत आहे असे तुमचे म्हणणे आहे . पण याला नेमके शास्त्रीय कारण सांगाना , की तेही दररोज तर्पण करतात.
पण काळसुसंगत वागण्यात
पण काळसुसंगत वागण्यात बहूजनांचे हित आहे. >> म्हणजे नक्की कोणाचे?
तर्पणामागे शास्त्रीय कारण आहे
तर्पणामागे शास्त्रीय कारण आहे कां??
पण काळसुसंगत वागण्यात
पण काळसुसंगत वागण्यात बहूजनांचे हित आहे. >> म्हणजे नक्की कोणाचे?> अहो प्रस्थापितांचे म्हणा. बा विठूला बरोबर ना
Pages