यंदा रंगपंचमी / धूलीवंदनला पाण्याची नासाडी करावी का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 March, 2016 - 16:43

विषय तसा नेहमीचाच आहे.

दर होळी सणाच्या काही दिवस आधी ‘पाणी वाचवा’ मेसेज सोशलसाईटवर फिरू लागतात. सोबत हिंदू सणांनाच नेमके तुम्हाला निसर्गाची चिंता भेडसावते, मेसेजही लगोलग हजर असतात. मी मात्र दरवर्षी "खेळा बिनधास्त" या गटात असायचो. अर्थात यामागे हिंदू सण परंपरा जपल्याच पाहिजेत असा काही उदात्त हेतू नसून ज्यातून मनोरंजन होतेय ते ते केले पाहिजे असा स्वार्थ असायचा. त्याचबरोबर स्वताच्या लहानपणी होळीच्या आठवडाभर आधीपासूनच आम्ही जी रंगपंचमी साजरी करायचो त्या पार्श्वभूमीवर आताच्या लहान पिढीला उपदेशाचे डोस पाजायचा आपल्याला काही एक नैतिक अधिकार नाही असेही वाटायचे. परीणामी आजवर दरवर्षी लहानांबरोबर आणखी लहान होत टाकीतले पाणी संपेपर्यंत रंगपंचमी खेळत आलोय.

पण यंदा परिस्थिती बिकट आहे. कदाचित आधीच्या वर्षीही असावी, पण आमच्याकडे चोवीस तास मुबलक पाण्याचे सुख असल्याने ती कधी जाणवली नसावी. यावेळी मात्र ऑफिसमधील ईतरांच्या चर्चेतून ती जाणवतेय. तसेच काही दिवसांपूर्वीच मी जे आजवर शॉवरने आंघोळ करायचो ते तांब्याबादलीने आंघोळ करायला सुरुवात करून पाणी वाचवायला चालू केलेय, त्यामुळे ईतरांना उपदेश करायचा थोडाफार नैतिक अधिकार मी कमावला आहे असे वाटू लागलेय. म्हणून हा धागा.

माझे मत क्लीअर झाले आहेच. यंदा पाण्यापासून चार हात लांब राहत हा सण साजरा करता येतो का हे बघायचे. तसेच सुक्या रंगाने खेळायचे ठरवल्यास आंघोळीला चार बादल्या तर लागणार नाहीत ना, आणि रंगलेले अंगण साफ करायला पाण्याचा ड्रम तर रिकामा होणार नाही ना, याची काळजी घ्यायची.

गवताच्या पेंढ्या होळीत टाकून भडका उडवायचा, त्या पेटलेल्या होळीवर बोंबा मारायच्या, आपली आवडती मुलगी होळीला प्रदक्षिणा मारायला आल्यावर उगाचच काठी हातात घेत शायनिंग मारायची, त्याच काठीने अर्धे जळालेले खोबरे होळीतून बाहेर काढत, अर्धे तिला द्यायचे, अर्धे आपण खायचे, घरी जाऊन आईने बनवलेली पुरणपोळी आणि कोंबडीवड्यावर आडवाउभा ताव मारायचा, या ईतर गोष्टींची मौज तशीच राहील. पाण्याला तेवढा अलविदा होईल.

फक्त आता हा निर्धार कितपत टिकतोय हे बघायचेय, कारण आमच्या येथील रंगपंचमी फारच धमाल असते. त्या मोहावर विजय मिळवणे कठीणच..

हे झाले माझे, पण तुमचे काय ? जमेल ..

...............................................................

यावर पोल काढणे गरजेचे वाटले म्हणून .. इथे http://www.maayboli.com/node/58123

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर कधीच होळी खेळत नाही
काय होत रंगांनी खेळून फक्त पाण्याचा अपव्यय आणि केमिकल रंग वापरल्याने त्वचेच नुकसान ,
कोरडे रंग खेळले तर वायू प्रदुषणात भर .............
यंदा परिस्थिती बिकट आहे म्हणून लोक होळी खेळणार नाहीत पण जेव्हा मुबलक पाणी उपलब्ध होत तेव्हाच पाण्याचा अनाठायी वापर टाळला तर परिस्थिती इतकी बिकट झालीच नसती
पण आपल्याकडचे अतिशहाणे लोक तहान लागली कि विहीर खोदायला घेतात

पुन्यातल्यानी मुळा मुठा नदीकडे जाऊन होळी साजरी करावी.
अरे संस्कृती जपणे हाच हिंदू धर्म. काही लोक मुद्दामुन हिंदू सणांना टारगेट करतात. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.
जसे मागच्या दिवाळीला मनसोक्त फटाके उडवून प्रदूषणाला हातभार लावला तसेच बिन्धास्त होळी खेळून पाण्याच्या उधळपट्टीला हातभार लावावा. आपली संस्कृती महत्त्वाची बाकी काही नाही.
होली है.

हाताची पाचही बोटं समान असतात का? जिथे निसर्ग समानता ठेवत नाही तिथे समानतेचा टेंभा मिरवणारे आपण कोण? <<<<<<<+१

म्हणुनच निसर्गाने मानवामधेही भेद-भाव केला आहे.
लाल्,पिवळे, हिरवे आणि काळे रक्त देऊन.

आमच्या सोसायटीमधेपण शाब्दीक युद्ध चालु आहे.
एकाने "ग्लोबल वार्मिंग, एल निनो, क्लायमेट चेंज" वगैरे लिहुन होळी खेळू नका म्हणुन आवाहन केलं. "२४ तारखेला कळेलच कोण सुसंस्क्रुत आहे" असा तडका पण दिला मेलच्या शेवटी.
माझा एक मित्र त्यावर अतिशय भडकला. "च्यायची @#, भे@#$, हा भ#$ घरात आर-ओ प्युरिफायर लावुन पाणी फुकट घालवणार, ३ AC लावुन एनर्जी कंझंप्शन वाढवणार, SUV ने पुणे ते लेह-लदाखला जाणार, दर एक दिवसाआड गाडी पाण्याने धुतली गेली नाही तर शिव्या घालणार, लिफ्ट मध्ये आधीच ३-४ जणं असतील तर अ‍ॅडजस्ट व्हायच्या ऐवजी दुसरी लिफ्ट बोलवणार आणि फक्त एक दिवस होळी खेळत नाही म्हणुन आम्हाला असंस्क्रुत म्हणणार. या आर्मचेअर अ‍ॅक्टिविस्टच्या @#$@#%#"

>>> कारण नेमेचि येते होळी आणि दरवर्षी (कोणाच ना कोणाची) नका खेळू होळी असतचं. <<<
राजसी, अगदी अचूक.

अन हो, वर्षभर पुण्यामुंबैतल्या हजारोंच्या संख्येने असलेल्या दुचाकी/चारचाकी रोजच्या रोज धुवायचे बंद करा असे कोणी सांगायला येत नाही, पण होळी/रंगपंचमी मात्र आवर्जुन आठवेल उपदेशाचे डोस पाजायला.

त्याशिवाय ऱोजच्या रोज करत असलेल्या आंघोळी/स्नाने बंद करा असेही सांगायला येत नाहीत हेच नशिब आपले.

रश्मीतै, जौद्याहो, "अनुल्लेख" माझ्या पाचवीलाच काय, जन्मत:च पूजलेला आहे. मागेही माबोवर सांगितले होते, की मी जन्मल्यावर (गुदमरल्यामुळे?) रडलो नव्हतो, तर पाचेक मिनिटे कुणाचेच माझ्याकडे लक्ष नव्हते, सगळ्यांचे ध्यान आपले आईकडेच, मग आईच चिडली अन म्हणाली, "अहो मला काही धाड नाही भरलेली आधी बाळाकडे बघा का रडले नाहिये अजुन...... "! मग नर्सेसचि पळापळ, अन मला रडविण्यात आले. Proud तर जन्मापासुनच असा अनुल्लेख अनुभवायला मिळालाय, एक आई होती, जिने कधीच अनुल्लेख केला नाही माझा, आता ती देखिल नाही. Happy असोच.
आता या पोस्टीचा मात्र अनुल्लेख होणार नाही कदाचित, अन मी "डॉक्टर" गेला बाजार वैद्य वगैरे नसल्याने, मला मनुष्य जन्मावर (व खास करुन वरील "गुदमरल्यामुळे?" या वास्तवावर) बोलायचा काहीच अधिकार कसा नाही हे सांगायला मात्र दहा शहाणे उगवतील. Wink

टग्या... तुमच्या मित्राच्या भावनेशी सहमत. Happy
ते फुल्ली अ‍ॅटोमॅटिक धुलाइ यंत्र किती पाणी वाया घालविते ? ती मशिन वापरणे बंद करा , असे नै कोणी साम्गायला येणार....

>>>> या आर्मचेअर अ‍ॅक्टिविस्टच्या @#$@#%#" <<<<< Uhoh Lol
मला हे थोडे उशिराने कळले बरका.. आर्मचेअर अ‍ॅक्टिव्हिस्ट....... Lol मराठीत काय म्हणू शकू?

लिंबु, दहा चुका केल्या म्हणुन अकरावी चुक करायचा परवाना नाही मिळत. किंवा दहा गोष्टी बरोबर केल्या म्हणुन अकरावी मुद्दामहुन चुकीची केली तरी चालेल असेही नसते.

पाणी फुकट घालवणे चुक म्हणजे चुकच.

होळी खेळणे, रंगपंचमी खेळणे ही जीवनावश्यक गोष्ट असल्यासारखे काही आयडी आम्ही खेळणारच म्हणतायत ते बघून खेद वाटला.

समोरचा गाड्या धुणे थांबवत नाही म्हणून मी पण रंगपंचमी खेळणार हे दुर्दैवी आहे.

>>लिंबु, दहा चुका केल्या म्हणुन अकरावी चुक करायचा परवाना नाही मिळत. किंवा दहा गोष्टी बरोबर केल्या म्हणुन अकरावी मुद्दामहुन चुकीची केली तरी चालेल असेही नसते.

पाणी फुकट घालवणे चुक म्हणजे चुकच>>>>+१०००००००००००००००००००००

होळी ही "अकरावी" चुक नसुन हजारो वर्षांचा परंपरागत सण आहे, ज्यात "पाण्याची नासाडीच्च होते" हे मला मान्य नाहि. एरवीही मी आंघोळ करतोच, या दिवशी आधि रंग लावुन घेऊन मग आंघोळ करतो इतकाच काय तो फरक. Proud
बाकीच्या १० चुका ही गेल्या दहावीस वर्षातील देणग्या आहेत.

पाणी थेंबा थेंबाने वाचवण्या ऐवजी आपल्या कडे देशात एवढा पाऊस पडतो तर त्याचे योग्य नियोजन करुन असं दात कोरून पोट भरण्याची वेळच आपल्यावर येऊ नये असा विचार का होत नाहीये? आपल्या कडे सगळ्याच राजकारण आणि वैयक्तिक फायद्यात रस. काय करणार? जे कोण अस लिहिल तो मात्र लगेच असंकृत निर्दय वगैरे वगैरे.

लिंबूभौ,
पुण्यातल्या शिमग्याच्या वेळी चालणारे अश्लील आणि बीभत्स प्रकार दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांना कायदा करून बंद करावे लागले होते. सभ्य स्त्रीपुरुषांना होळीच्या आगेमागे घराबाहेर पडता येत नसे, इतके गलिच्छ प्रकार पुण्यात चालत. अर्थात कायदा आला म्हणून ते प्रकार पूर्ण बंद झाले असं नव्हे. अनेकांनी पुण्यातल्या घाणेरड्या प्रकारांबद्दल लिहून ठेवलं आहे. कृपया ते वाचा आणि त्यात 'धार्मिक' नक्की काय, ते सांगा. Happy

'पाणी जपून वापरा', 'गाड्या धुऊ नका' हे वर्षभरसुद्धा सांगितलं जातं.

जो धर्म आणि ज्या धार्मिक रूढी सहवेदना निर्माण करू शकत नाहीत, त्यांचा पुनर्विचार व्हायला हवा.

http://www.ibtimes.co.uk/world-water-day-2016-40-photos-make-you-think-t...

हाच मुद्दा मी माझ्या मित्रालाही सांगितला. तो म्हणाला "मला मान्य आहे पाण्याची उधळपट्टी चुक आहे ते. पण गडचिरोलीत लहान मुलं भुकेने मरताना मी पार्टी करतो हेही चुक आहे, लोकं थंडीने मरत असताना मी लेटेस्ट फॅशनचे ब्रांडेड कपडे घालतो हे पण चुक आहे, लाखो लोकं बेघर असताना मी तिसरं घर घ्यायचं प्लानिंग करतो हे पण चुक आहे, शेतकरी आत्महत्या करत असताना मी सहकुटुंब आठवडाभर पिकनिक ला जातो हेही चुक आहे. ही लिस्ट कितिही लांबवता येइल. मला होळीची मजा घ्यायची आहे आणि जरी एथिकली चुक असलं तरी मी होळी खेळणारच" Uhoh

पाणी फुकट घालवणे म्हणजे नक्की काय हे रिलेटीव आहे फार. कोणाला अंघोळी साठी एक बादीदी योग्य वाटले तर कोणाला ती उधळपट्टी वाटेल.

टग्या,

त्या आधीच्या दहा चुकांचे काय? हे म्हणजे क्लायमेटवर भांडणार्‍या अमेरिकादी देशांसारखे झाले. आधी विकसीत देशांनी कार्बन अधिक उत्सर्जित करुन वाट लाउन ठेवली. आता भारतासारख्या गरीब देशांनी निर्बध पाळा म्हणुन ओरडुन राहिलेत.

असो.

मी तर पाणी टंचाई म्हणुन न खेळण्यच्या भुमीकेत आहे. पण भावनेच्या आहारी न जाता लहान मंड्ळींना थोड्या प्रमाणात होळी खेळु द्यावी. त्यांना समजाउन सांगितलेत तर नक्कीच फरक पडेल. अन मोठ्यांनी कोरडे रंग खेळल्यास काहिच हरकत नाही.

चिनुक्स,

ते प्रकार आता होळीत केले जातात का? मग तेव्हा कधीतरी होळीत काहेही व्हायचे म्हणुन आता न साजरी करणे योग्य का? आतातर ते करत नाहीत ना लोकं?

उगाच आपल काहीही.

_तात्या_,
मी कोणाला आणि कुठल्या प्रतिक्रियेला उद्देशून लिहिलं आहे ते वाचण्याचे कष्ट कृपया घ्याला का? Happy

जो धर्म आणि ज्या धार्मिक रूढी सहवेदना निर्माण करू शकत नाहीत, त्यांचा पुनर्विचार व्हायला हवा.

>>

हे काय ते मग? धर्म सोडा असेच सांगताहात न?

चिनूक्स ने दिलेल्या लिंक मधले फोटो भीषण वास्तवाचं चित्रण करतायत. याच पार्श्वभूमीवर मटा मधली एक प्रेरणादायी बातमी :

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maha...

*धर्म आणी धार्मिक रुढी* यांचा एकत्रित पुनरविचार म्हणजे काय हो? Happy
नुसत धार्मिक रुढी म्हणा, मी तुमच्यासोबत येइल कट्टरवाद्यांशी भांडायला.

पण धर्म आणी धार्मिक रुढी यांचा पुनरविचार म्हणाल तर प्रचंड सॉरी. आय्येम नॉट विथ यु.

धूळवड आणि रंगपंचमी खेळणं बंद करून साधारण १२ वर्ष झाली...
फक्त आपले सणवार टिकले पाहिजेत म्हणून २ चिमूट रंग लावतो ( जो आधि पुसून मग धुतो ज्यामुळे रंग काढताना ही जास्त पाणी वाया जात नाही ) ईतकंच काय ते सेलिब्रेशन..
प्लॅस्टीक च्या जुन्या झालेल्या बाटल्यांना छिद्र पाडून त्याच झाडांजवळ ठेवून त्यानी पाणी देतो झाडांना.. वाचेल तितकं जास्त पाणी वाचवतो पूर्ण कुटुंब मिळून.
आपण वाचवलेलं पाणी तिकडे कसं जाणार असले प्रश्न नाही पडले कधी...

पाण्याचा अपव्यव टाळावाच.
धुलीवंदन खेळणे टाळावे.

मद्य प्राशन सुद्धा टाळावे.
एक लिटर बियर तयार करण्यास ४ लिटर पाणी खर्च होते. तसेच मद्य प्राशनाने डिहायड्रेशन होऊन जास्त पाणी पिल्या जाते.

सॉफ्ट ड्रिन्क पिणे टाळावे
एक लिटर सॉफ्ट ड्रिन्क बनवण्यास साधारण अडिच लिटर पाणी लागते. शिवाय सॉफ्ट ड्रिंक्सने पूर्ण तहान भागत नाही. पाणी प्यावे लागतेच.

Pages