विषय तसा नेहमीचाच आहे.
दर होळी सणाच्या काही दिवस आधी ‘पाणी वाचवा’ मेसेज सोशलसाईटवर फिरू लागतात. सोबत हिंदू सणांनाच नेमके तुम्हाला निसर्गाची चिंता भेडसावते, मेसेजही लगोलग हजर असतात. मी मात्र दरवर्षी "खेळा बिनधास्त" या गटात असायचो. अर्थात यामागे हिंदू सण परंपरा जपल्याच पाहिजेत असा काही उदात्त हेतू नसून ज्यातून मनोरंजन होतेय ते ते केले पाहिजे असा स्वार्थ असायचा. त्याचबरोबर स्वताच्या लहानपणी होळीच्या आठवडाभर आधीपासूनच आम्ही जी रंगपंचमी साजरी करायचो त्या पार्श्वभूमीवर आताच्या लहान पिढीला उपदेशाचे डोस पाजायचा आपल्याला काही एक नैतिक अधिकार नाही असेही वाटायचे. परीणामी आजवर दरवर्षी लहानांबरोबर आणखी लहान होत टाकीतले पाणी संपेपर्यंत रंगपंचमी खेळत आलोय.
पण यंदा परिस्थिती बिकट आहे. कदाचित आधीच्या वर्षीही असावी, पण आमच्याकडे चोवीस तास मुबलक पाण्याचे सुख असल्याने ती कधी जाणवली नसावी. यावेळी मात्र ऑफिसमधील ईतरांच्या चर्चेतून ती जाणवतेय. तसेच काही दिवसांपूर्वीच मी जे आजवर शॉवरने आंघोळ करायचो ते तांब्याबादलीने आंघोळ करायला सुरुवात करून पाणी वाचवायला चालू केलेय, त्यामुळे ईतरांना उपदेश करायचा थोडाफार नैतिक अधिकार मी कमावला आहे असे वाटू लागलेय. म्हणून हा धागा.
माझे मत क्लीअर झाले आहेच. यंदा पाण्यापासून चार हात लांब राहत हा सण साजरा करता येतो का हे बघायचे. तसेच सुक्या रंगाने खेळायचे ठरवल्यास आंघोळीला चार बादल्या तर लागणार नाहीत ना, आणि रंगलेले अंगण साफ करायला पाण्याचा ड्रम तर रिकामा होणार नाही ना, याची काळजी घ्यायची.
गवताच्या पेंढ्या होळीत टाकून भडका उडवायचा, त्या पेटलेल्या होळीवर बोंबा मारायच्या, आपली आवडती मुलगी होळीला प्रदक्षिणा मारायला आल्यावर उगाचच काठी हातात घेत शायनिंग मारायची, त्याच काठीने अर्धे जळालेले खोबरे होळीतून बाहेर काढत, अर्धे तिला द्यायचे, अर्धे आपण खायचे, घरी जाऊन आईने बनवलेली पुरणपोळी आणि कोंबडीवड्यावर आडवाउभा ताव मारायचा, या ईतर गोष्टींची मौज तशीच राहील. पाण्याला तेवढा अलविदा होईल.
फक्त आता हा निर्धार कितपत टिकतोय हे बघायचेय, कारण आमच्या येथील रंगपंचमी फारच धमाल असते. त्या मोहावर विजय मिळवणे कठीणच..
हे झाले माझे, पण तुमचे काय ? जमेल ..
...............................................................
यावर पोल काढणे गरजेचे वाटले म्हणून .. इथे http://www.maayboli.com/node/58123
सगळ्यात जास्त सोशली अनअवेर
सगळ्यात जास्त सोशली अनअवेर लोक्स सोशल मीडियावरच सापडतात. मला होळी धुळवड रंगपंचमी आजिबात आवडत नाही. माझ्या पर्सनल स्पेस मध्ये कोणी येउन रंग लावावा हेच मला पसंत नाही. त्यामुळे कधीच खेळत वगैरे नाही.
बातम्या व पेपर मध्ये दुष्काळाचे वर्णन व पाणी टंचाईचे वर्णन जे येते आहे ते भयानक आहे. मुलीनी लग्ने दूर ढकलली आहेत दुष्काळात आणिक ओझे नको म्हणून. गाय म्हशी बैल हे पाळीव प्राणी व चराचरातील प्राणी पक्षी ह्यांचे पाण्यासाठी होणारी वणवण व हाल बघवत नाहीत. त्या बद्दलही इथे लिहून काही उपयोग नाहीच.
अश्या परिस्थितीत पाणी वाया घालवणे म्हणजे सामाजिक बांधिलकी काही नाही हे अधोरेखित करणे आहे.
ओली होळी खेळू नये ही विनंती.
चिनुक्स ने दिलेले फोटो पाहुन
चिनुक्स ने दिलेले फोटो पाहुन जीव तुटतो खरंच.
पाणी जितके शक्य होईल तितके वाचवा रे सगळ्यांनी.
आम्ही वाचवलं तर त्यांना मिळेल का, परंपरेने साजरे करायलाच पाहिजे सण हे सगळे विचार बाजुला ठेवा. पाणी वाचवा. आपल्याला पिण्या-धुण्यासाठी पाणी मिळतेय त्यात आनंद मानुन राहु नका. त्या पाण्याचा काटकसरीने वापर करा.
यंदा रंगपंचमी / धूलीवंदनला
यंदा रंगपंचमी / धूलीवंदनला पाण्याची नासाडी करावी का?> बातम्या वाचून , ऑफिसमधील ईतरांच्या चर्चेतून यंदा ची परिस्थिती जाणवत आहे तरीही 'यंदा रंगपंचमी / धूलीवंदनला पाण्याची नासाडी करावी का?' हा प्रश्न पडतो आहे याचेच आश्चर्य वाटले.
चिनूक्स यांनी दिलेल्या
चिनूक्स यांनी दिलेल्या लिंकमधील १३ चित्रे ( ४० %) भारत व पाकिस्तानातील आहेत.
तरीही आपण शिकत नाही!!!!!!!!!!!
माझ्या घरा मागील पोलिस अकादमीत गाड्या रोज पाईपने धुतल्या जातात, लॉनला पाणी दिले जाते, बसायचे बेंच फ्ल्श केले जातात. मी जाऊन डायरे क्टर् शी बोललो. ढिम्म्म्म्म !!!
नुसते होळीच्या चार बादल्या
नुसते होळीच्या चार बादल्या पाणी वाचवून काय होणार आहे? मुंबई आणि नवी मुंबईतल्या जलवाहिन्या चिक्कार ठिकाणी मुद्दाम फोडण्यात आल्या आहेत, त्यांच्या आजूबाजुच्या झोपडपट्ट्या, वाहने, नमुत टँकर, वीटभट्टया इ. उद्योग वर्षभर या फुटक्या जलवाहिन्यांच्या जीवावर चालतात. या फुटक्या जलवाहिन्या दुरुस्त करून परत फुटणार नाहीत याची काळजी घेतलि तरी भरपूर पाणी वाचेल.
खारीने पाठीवर वाळूचे कण नेवून
खारीने पाठीवर वाळूचे कण नेवून काय उपयोग झाला ?? मूर्खच म्हणायची ती !!!!!!!!!!!
नुसते होळीच्या चार बादल्या
नुसते होळीच्या चार बादल्या पाणी वाचवून काय होणार आहे?>> पण म्हणून तेवढेही करायचे नाही का?
या फुटक्या जलवाहिन्या दुरुस्त करून परत फुटणार नाहीत याची काळजी घेतलि तरी भरपूर पाणी वाचेल.
>> त्या साठी बी एम सी किंवा नवी मुंबई पालिकेत पाठ पुरावा केला पाहिजे.
पण हौसे हौसेने होळी खेळून फोटो फेसबुक वर वॉट्सॅप वर टाकले नाहीत तर काही खरे नाही. फूटेज खाउ बाफ आहे निव्वळ. आता गुढी पाडव्या चा बाफ येइपरेंत चालेल.
अहो रेव्यु, खारीने पाठीवरून
अहो रेव्यु, खारीने पाठीवरून वाळू नेली तेव्हा राम दगड उचलत होता. प्रत्येकाने आपला वाटा उचलायला हवा. जलवाहिन्यातून जे पाणी चोरले जाते ते वर्षभर चोरले जाते. त्याला प्रतिबंध करायला हवाच.
तिने रामाला विचारून सुरुवात
तिने रामाला विचारून सुरुवात केली नाही.... तिने प्रसंग ओळखला अन सुरुवात केली....... इट स्टार्ट्स विथ मी ..... हजारो उदाहरणे आहेत... पण जाऊ द्या.........
राम दगड उचलत नाही ना, मग
राम दगड उचलत नाही ना, मग खारीने कशाला वाळू न्यायला पाहिजे, असंच ना साधना?
सगळ रामाला विचारून करावे.
सगळ रामाला विचारून करावे. मंदीर वही बनायेंगे.
सरकारने कोकाकोला कंपनीला विदर्भात प्लांट लावायला मंजूरी दिली आहे. मेक इन महाराष्ट्र
मला आजही आठवते ती १०-१५
मला आजही आठवते ती १०-१५ वर्षांपूर्वीची होळी आणि रंगपंचमी. काय मज्जा करायचो आम्ही. खूप पाणी आणि रंग उडवायचो एकमेकांवर. सकाळी ७ वाजता सुरुवात करून दुपारी १-२ वाजेपर्यंत घरात शिरायचो मग तो अंग घासून तो रंग काढायचो. दुसर्या दिवशी शाळेत गेल्यावर ज्याच्या शरीरावर अजुनही रंग टिकून आहे तो खूप भाव खायचा जास्त रंग लागला म्हणून.
पण आत्ता गेल्या काही महिन्यांपासून रादर वर्षभरापासून अशी काही वेळ आली आहे आमच्याकडे कि सांगता येत नाही. आधी लोक आमच्याकडून पाणी घेऊन जायचे आणि आत्ता आम्हांलाच लोकांकडे भिका मागाव्या लागतात पाण्यासाठी. रोज रोज पायपीट करावी लागते पाणी आणण्यासाठी. मी आणि बहिण ऑफिसला जातो त्यामुळे आईच असते घरी आणि पाणी पण ९ वाजता येत (ते नळाला आलाय कि नाही ते पण दिसत नाही ९ ते ११ च्या दरम्यान जेमतेम ४ च भांडी भरतात ) त्यामुळे तिलाच सगळी कसरत करून पाणी भराव लागत खूप वाईट वाटत तेव्हा, जेव्हा तीला जमत नसतानाही हे कराव लागत (तिला गुढगेदुखी - सांधेदुखीचा त्रास आहे). त्यामुळे अगदी एक एक थेंब पाणी आम्ही जपून वापरतो. गेल्या वर्षभरापासून एकही पाहुणा राहायला घरी थांबू दिला नाहीये कारण पाणीच नाहीये. (मराठवाड्याच काय घेऊन बसलाय मी इथे मुंबईतच माझ स्वत:च लग्न पुढे ढकललय पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे )
ह्यावर्षीहि रंगपंचमी साजरी नाही करणार हे ठरवलं आहे कारण आधीच पाण्याच दुर्भिक्ष्य आहे. आहे तेच जर संपवलं तर नंतर कुठून मिळणार. (ज्याची जळते त्यालाच कळते )
कप्पाळ..... विपर्यास कसा
कप्पाळ..... विपर्यास कसा करावा हे शिका इथून.
मी स्वतः होळी खेळत नाही गेले कित्येक वर्षे, पण हे मेसेज वाचून करमणूक होते. ज्यांना खरेच आंच आहे ते मेसेजची वाट पाहात नाही आणि बाकीच्यांना फरक पडत नाही. फक्त टीपी होतो असल्या मेसेजनी.
पाण्याचे अपव्यय थांबवले
पाण्याचे अपव्यय थांबवले पाहिजे. जबाबदारी सर्वांची आहे.
सण साजरे करुया पण त्यामुळे इतरांना त्रास होणार नाही हे सुद्धा पाहिले पाहिजे.
पाण्याचा अपव्यव कसा टाळायचा
पाण्याचा अपव्यव कसा टाळायचा असा धागा पाहिजे.
त्यात धुळवड टाळणे ही गोष्टपन येईलच.
अनेक गोष्टी आहेत ज्या मुळे पाण्याचा प्रचंड अपव्यय होतो.
१ ग्लास वाईन बनवण्यासाठी १०० लिटर पाणी लागते!
http://www.sacbee.com/food-drink/wine/dunne-on-wine/article2622749.html
सॉफ्ट ड्रिंक्स साठी अडिच पट, इत्यादि.
अशा चिकार गोष्टी असतील.
केवळ धुळवडीच्या वेळेला धागा काढुन काय उप्योग.
पाण्याचा अपव्यय जागरुकतेने नेहमीच टाळावा.
स्वरा, पूर्ण सहमत. आईकडे सन
स्वरा, पूर्ण सहमत.
आईकडे सन सिटी ला पण सध्या दिवसातून २ तास पाणी येतं आहे.
आमच्या सोसायटीतल्या पाईपने गाड्या धुणार्या बिग शॉट ना आम्ही अडवू शकलेलो नाही(तसे त्यांच्या मुलांना सोसायटीत गाड्या उडवायलाही थांबवू शकलेलो नाही.'जवानी का जोश है, अब नही करेंगे तो कब' वगैरे भिकार-- डायलॉक ऐकवतात सोसायटी मिटिंगमध्ये.)जितकं जमतं तितकं करणार.
जगभरातील वर्षातील विशिष्ट
जगभरातील वर्षातील विशिष्ट काली असलेल्या परिस्थितींचा त्या ४० फोटोंचा अन होळीचा संबंध मला कळला नाही.
पाणी आम्ही वाचवतोच. अगदी दुष्काळी परिसरातही राहिलो आहोत. तो अनुभव गाठीशी आहेच्चे. पण म्हणून पुण्यामुंबईत होळी खेळूच नका, वा तुमचे सण "असलेच" अशा प्रकारचे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे कशासाठी? हे नक्राश्रु आहेत व तसे नक्राश्रु वाहविण्यात मी सामिल होणार नाही.
माझ्यापरीने पाण्याची बचत मी प्रत्यही करीतच असतो, पण ते सिद्ध करण्यासाठी "होळी/रंगपंचमी" खेळूच नका या "पुनर्विचाराशी" मी सहमत नाही.
जिथे पाणी उपलब्ध असेल, तिथे जरुर खेळा. जिथे ढुंगण धुवायलाही पाणी नाही, तिथे कुणी खेळायला जातच नाहि, मग नेमके हिंदू सणांच्या वेळेसच हे "अक्कलेचे डोस" पाजणे का होते? अन वर दहा चुकानंतरचि अकरावी चुक का करावि हा वैचारिक शिरजोर पणा का?
बाकीच्या दहा नै तर शंभर चुका होताहेत, त्या आधि बंद करा ... !
निव्वळ "धार्मिक" बाबींवर हल्लाबोल करायची ही फ्याडे आता पब्लिकलाही कळू लागली आहेत.
जिथे "धंदा' होतोय, पैका मिळतोय, तिथे एक शब्द विरोधाचा नाही, उलट त्यातच सामिल. पण हिंदु धार्मिक बाब आलिरे आलि की गेली काही वर्षे सातत्याने त्यावर नकारात्मक टीका.. हे एकतर्फी फार काळ चालू शकत नाही.
वर माणकु यांनी उदाहरणे दिली आहेतच, अशी असंख्य उदाहरणे आहेत. होळीला विरोध करणार्यांकडुन त्याबाबत मात्र कुठे काही कन्स्ट्रक्टिव्ह होताना दिसत नाही कधीच.
जर माझ्याकडे धोधो पाणी असेल, तर मग त्यात बुचकळून निघुन खेळेन.
अन माझ्याकडे जर एकच ताब्याभर पाणी असेल, तर त्यातुनही किमान एक पळीभर पाणी अंगावर उडवुन का होईना, मी रंगपम्चमी खेळणारच.
दिवसातून २ तास पाणी येतं
दिवसातून २ तास पाणी येतं आहे.>>>> माझ्या कडे दिवसातुन अर्धा तासच पाणी येतं. ते ही जास्त जोरात नसतं. एकुण पाणीकपात सगळीकडेच आहे. आता नसेल तर होणार आहे. विचार करा.
लिंबु, होळी खेळू नका म्हणणारे
लिंबु, होळी खेळू नका म्हणणारे 'ब्रिगेडी/नक्षली/अंनिस्/बुप्रावादी' आहेत हे पालुपद राहिलं. बाकी ईतर धर्मांमधे असे पाण्याचा अपव्यय करणारे सण आहेत का हे तुमच्यासारख्या धर्मशास्त्र्यांनाच ठाउक असेल.
आय मिस आसुमल. टँकरच्या टँकर
आय मिस आसुमल.
टँकरच्या टँकर खास नागपुरात मागवत होता आणि मनसोक्त होळी खेळत होता.
आय मिस मंजोपंत टू !
आय मिस मंजोपंत टू !
कम्युनिष्ट विठ्ठल, उद्या
कम्युनिष्ट विठ्ठल, उद्या तुम्ही गणपति/देवी/निर्माल्य विसर्जन यावर पण आक्षेप घ्याल.
नेमके हिंदू सणांच्या वेळेसच हे "अक्कलेचे डोस" पाजणे का होते? अन वर दहा चुकानंतरचि अकरावी चुक का करावि हा वैचारिक शिरजोर पणा का?
बाकीच्या दहा नै तर शंभर चुका होताहेत, त्या आधि बंद करा ... ! स्मित
निव्वळ "धार्मिक" बाबींवर हल्लाबोल करायची ही फ्याडे आता पब्लिकलाही कळू लागली आहेत.जिथे "धंदा' होतोय, पैका मिळतोय, तिथे एक शब्द विरोधाचा नाही, उलट त्यातच सामिल. पण हिंदु धार्मिक बाब आलिरे आलि की गेली काही वर्षे सातत्याने त्यावर नकारात्मक टीका.. हे एकतर्फी फार काळ चालू शकत नाही.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/sadhus-to-play-holi-with-c...
लिंबुभाऊ तुमचे मित्रमंडळ खेळत आहे. आपण कधी जाणार ?
रंग पंचंमी ला भक्ती रसात
रंग पंचंमी ला भक्ती रसात न्हाहुन निघा. रंग आणी पाणी यांना फाटा द्या.
रंग दे चुनरीया, रंग दे..
होळीत वाईट विचारांचीं होळी करा.
होळीपुर्वी भांडत काय बसता? एक व्हा, संघटीत व्हा., प्रत्येक सणाला विवादात अडकवु नका.
शेवटी निर्णय तुमचा.
जगायचे कसे.
बुप्रावादी मायबाप, उद्या
बुप्रावादी मायबाप, उद्या तुम्ही दहीहंडी आणि गोविंदांवर उडवले जाणारे पाणी यावर पण आक्षेप घ्याल.
नेमके हिंदू सणांच्या वेळेसच हे "अक्कलेचे डोस" पाजणे का होते? अन वर दहा चुकानंतरचि अकरावी चुक का करावि हा वैचारिक शिरजोर पणा का?
बाकीच्या दहा नै तर शंभर चुका होताहेत, त्या आधि बंद करा ... ! स्मित
निव्वळ "धार्मिक" बाबींवर हल्लाबोल करायची ही फ्याडे आता पब्लिकलाही कळू लागली आहेत.जिथे "धंदा' होतोय, पैका मिळतोय, तिथे एक शब्द विरोधाचा नाही, उलट त्यातच सामिल. पण हिंदु धार्मिक बाब आलिरे आलि की गेली काही वर्षे सातत्याने त्यावर नकारात्मक टीका.. हे एकतर्फी फार काळ चालू शकत नाही.
पण मी काय म्हणतो तो "उज्जैन"
पण मी काय म्हणतो
तो "उज्जैन" मधे जे चालू केले आहे. तिथे लिंबूभाउ का जात नाही
काही
काही ब्रिगेडी/नक्षली/कम्युनिस्ट लोकं आधीच दूधा/मधाच्या अभिषेकावर आक्षेप घेताहेत .
नेमके हिंदू सणांच्या वेळेसच हे "अक्कलेचे डोस" पाजणे का होते? अन वर दहा चुकानंतरचि अकरावी चुक का करावि हा वैचारिक शिरजोर पणा का?
बाकीच्या दहा नै तर शंभर चुका होताहेत, त्या आधि बंद करा ... ! स्मित
निव्वळ "धार्मिक" बाबींवर हल्लाबोल करायची ही फ्याडे आता पब्लिकलाही कळू लागली आहेत.जिथे "धंदा' होतोय, पैका मिळतोय, तिथे एक शब्द विरोधाचा नाही, उलट त्यातच सामिल. पण हिंदु धार्मिक बाब आलिरे आलि की गेली काही वर्षे सातत्याने त्यावर नकारात्मक टीका.. हे एकतर्फी फार काळ चालू शकत नाही.
बरोबर आता नॅस्ट्राडेमस ने
बरोबर आता नॅस्ट्राडेमस ने उल्लेख केलेल्या हिंदू संरक्षक आला आहे. त्यामुळे हे फार काळ चालणार नाही
होळी न हिंदूधर्मविरोधी
होळी न हिंदूधर्मविरोधी पर्यायाने राष्ट्रविरोधी कृत्य गणले जाईल. कारण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व!
एक दिवस होळी सणाला पाणी
एक दिवस होळी सणाला पाणी नासाडी होते असे
म्हणतात,
पण काही लोक असे आहेत, जे रोज पाणी नदीवर, तलावात मोटार लावुन सर्रास चोरतात. पाणी विकतात.
खर तर पाणी विकणार्याला, चोराला शिक्षा व्हायला पाहिजे, त्याबद्दल सगळे मुग गिळुन आहेत.
खोटारडे आहेत सगळे, मुखवटे आहेत.
Pages