विषय तसा नेहमीचाच आहे.
दर होळी सणाच्या काही दिवस आधी ‘पाणी वाचवा’ मेसेज सोशलसाईटवर फिरू लागतात. सोबत हिंदू सणांनाच नेमके तुम्हाला निसर्गाची चिंता भेडसावते, मेसेजही लगोलग हजर असतात. मी मात्र दरवर्षी "खेळा बिनधास्त" या गटात असायचो. अर्थात यामागे हिंदू सण परंपरा जपल्याच पाहिजेत असा काही उदात्त हेतू नसून ज्यातून मनोरंजन होतेय ते ते केले पाहिजे असा स्वार्थ असायचा. त्याचबरोबर स्वताच्या लहानपणी होळीच्या आठवडाभर आधीपासूनच आम्ही जी रंगपंचमी साजरी करायचो त्या पार्श्वभूमीवर आताच्या लहान पिढीला उपदेशाचे डोस पाजायचा आपल्याला काही एक नैतिक अधिकार नाही असेही वाटायचे. परीणामी आजवर दरवर्षी लहानांबरोबर आणखी लहान होत टाकीतले पाणी संपेपर्यंत रंगपंचमी खेळत आलोय.
पण यंदा परिस्थिती बिकट आहे. कदाचित आधीच्या वर्षीही असावी, पण आमच्याकडे चोवीस तास मुबलक पाण्याचे सुख असल्याने ती कधी जाणवली नसावी. यावेळी मात्र ऑफिसमधील ईतरांच्या चर्चेतून ती जाणवतेय. तसेच काही दिवसांपूर्वीच मी जे आजवर शॉवरने आंघोळ करायचो ते तांब्याबादलीने आंघोळ करायला सुरुवात करून पाणी वाचवायला चालू केलेय, त्यामुळे ईतरांना उपदेश करायचा थोडाफार नैतिक अधिकार मी कमावला आहे असे वाटू लागलेय. म्हणून हा धागा.
माझे मत क्लीअर झाले आहेच. यंदा पाण्यापासून चार हात लांब राहत हा सण साजरा करता येतो का हे बघायचे. तसेच सुक्या रंगाने खेळायचे ठरवल्यास आंघोळीला चार बादल्या तर लागणार नाहीत ना, आणि रंगलेले अंगण साफ करायला पाण्याचा ड्रम तर रिकामा होणार नाही ना, याची काळजी घ्यायची.
गवताच्या पेंढ्या होळीत टाकून भडका उडवायचा, त्या पेटलेल्या होळीवर बोंबा मारायच्या, आपली आवडती मुलगी होळीला प्रदक्षिणा मारायला आल्यावर उगाचच काठी हातात घेत शायनिंग मारायची, त्याच काठीने अर्धे जळालेले खोबरे होळीतून बाहेर काढत, अर्धे तिला द्यायचे, अर्धे आपण खायचे, घरी जाऊन आईने बनवलेली पुरणपोळी आणि कोंबडीवड्यावर आडवाउभा ताव मारायचा, या ईतर गोष्टींची मौज तशीच राहील. पाण्याला तेवढा अलविदा होईल.
फक्त आता हा निर्धार कितपत टिकतोय हे बघायचेय, कारण आमच्या येथील रंगपंचमी फारच धमाल असते. त्या मोहावर विजय मिळवणे कठीणच..
हे झाले माझे, पण तुमचे काय ? जमेल ..
...............................................................
यावर पोल काढणे गरजेचे वाटले म्हणून .. इथे http://www.maayboli.com/node/58123
रश्मी तै..जे बात!
रश्मी तै..जे बात! आवडलेच!
तुमच्या लेकीला पण शाबासकी!
तुमच्या माहेर चे वाचुन अगदी अगदी-- माझ्याआई कडे पण ५ दिवसांनी पाणी येते. पाण्याच्या दिवशी ते दिवसभारात केंव्हाही येते.. रात्र, मध्य रात्र, पहाट केंव्हाही. ते भरुन ठेवण्यासाठी त्यांची धडपड पाहिली की पाणि नासावेसे वाटतच नाही.
:डोमाआपले हिरो हे सयाजी, नाना
:डोमाआपले हिरो हे सयाजी, नाना आणी मकरन्द सारखे हवेत. पण लोकाना आवडते कोण?
>>
रश्मी तै,

हे वाक्य ऋ च्या धाग्यावर?????
राहुल नीरा, धन्यवाद! आज आपण
राहुल
नीरा, धन्यवाद! आज आपण सुपात आहोत, पण उद्या जात्यात जायची वेळ येऊ शकते हीच ती काळजी सर्वानी घ्यावी अशी क्षुल्लक अपेक्षा.
वर कोणीतरी होळीच्या
वर कोणीतरी होळीच्या गैरप्रकाराबद्दल लिहिलं आहे त्याबद्दल . तर त्या काळात नक्की काय चालू होत हे माहीत नाही पण आजच्या काळातही हे प्रकार होत असतात . कदाचित माबोवर हे मागे मी लिहिलं असेनही .
हा किस्सा मागच्या होळीचा आहे. त्या रात्री औषध संपली म्हणून आणायला माझे काका घराबाहेर पडले .वेळ साधारण रात्री ११ नंतर . जवळपास मिळाली नाहीत म्हणून ते स्टेशनला गेले. स्टेशनच्या बाजूलाच रिक्षास्टँड आहे . तिथे एक तरुणी रिक्षेची वाट बघत होती . पेहरावावरून एअर होस्टेस असावी . अकरा नंतर स्टेशनचा एरिया फार गजबजलेला नसला तरिही बऱ्यापैकी वर्दळ असलेला असतो . पण त्या दिवशी होळी असल्याने गजबज कमी होती . काका मेडिकलमध्ये औषध घेत होते . तेवढ्यात एक टपोरी टोळकं आलं आणि तिला एकटीला पाहून आपले उद्योग सुरु केले. भांग वगैरे प्यायले असावेत . एकाने कुणी जवळपास नाही बघून तिच्या अंगावर रंग टाकला आणि निर्लज्जपणे बुरा न मानो होली है अस म्हटलं . तिने आरडाओरड सुरु केली . तो आवाज ऐकून काका आणि एक दोन माणसं धावत पोचली . काकांनी त्या टोळक्याला ह्याचा जाब विचारला तर त्यांना अधिकच चेव आला . काकांनाच ते लोक दमदाटी करू लागले . तोपर्यत टिपिकल बघे जमा झाले होतेच शेवटी काकांनी आवाज चढवला तेव्हा ते ठिकाणावर आले . ते पाहून इतरांनाही चेव आला . गर्दी वाढलेली बघून त्या टोळक्याने काढता पाय घेतला . मग पोलीस वगैरेनी पुढचं काम केलं .
त्या दिवसापासून होळी म्हटलं की नेमकं हेच आठवत .
बाकी ते हिंदू सणांच्या वेळेला
बाकी ते हिंदू सणांच्या वेळेला लिहिले गेलेय त्याबद्दल .
only the change is constant .तेव्हा करत होते म्हणून आताही तेच करायचं हा शुद्ध वेडेपणा आहे . होळी वगैरे न खेळल्याने काही हिंदू धर्म खतरेमे येत नाही . एवढा तो लेचापेचा असता तर एवढ्या आक्रमणे झाली तेव्हाच नामशेष झाला असता. एवढी वर्ष इव्हॉल्व होऊन आजचा धर्म समोर आहे. कालानुरूप त्यात योग्य ते बदल व्हावेत . नको त्या गोष्टीकरता कर्मठपणा करण्यापेक्षा सर्वसमावेशक अस रूप करता यावं याकडे लक्ष देण्यात यावं. शेवटी माणसाकरता सण आहेत , सणाकरता माणस नाहीत . ज्या रूढी कालबाह्य आहेत , ज्यांचा पर्यावरणला हानिकारक आहेत त्या बंद व्हायलाच हव्यात . नाहीतर खतरेमे है वगैरे घोषणा देता देता आपणच खतरेमे येऊ. तसही निसर्गात चुकीला माफी नसतेच ..
अहो खाण्याचे पदार्थ कसे जोडता
अहो खाण्याचे पदार्थ कसे जोडता येतील ह्या लिस्ट मधे! बियर ते चहा पिणे म्हणजे अन्न ग्रहण करणे होय , त्या हिशेबाने डायटीशियन लोकं दिवसाला ८ का दहा लिटर्स पाणी प्या म्हणतात ते ही वेस्टेज मानावे काय?? हां आता ते बियर चहा वगैरे तयार करून प्राशन करायच्या जागी मोरीत नेऊन ओतले तर वेस्टेज म्हणता येईल असे वाटते . बादल्या बादल्या पाणी मातीत (झाडे शेती वगैरे सोडुन) घालणे ते ही परंपरेच्या नावावर ही चक्क नासाड़ीच म्हणावे लागेल
बरं, धर्माचा विचार केला तरी मुळात सणाच्या नावावर कोणी कंसेंट्रेट केले नाहीये का? हा सण "धूलिवंदन" आहे न? इंग्लिश मधे विचार केल्यास "हार्वेस्ट फेस्टिवल" इथे मुठभर बिया फेकता कणगीभर धान्य देणाऱ्या माती ला वंदन करायचे आहे उर्फ़ धूळवड करायची आहे न? तरी जर आपण हिंदु सण टारगेट केले जात आहेत असे म्हणत असू तर धूळवडीत पाणीच वापरा हे कुठल्या पुस्तकात लिहिले आहे? कारण पाणी is a scarce resource available in abundance आहे तस्मात् त्याचे संवर्धन अन शाश्वत वापर करावा हे विज्ञानाच्या पुस्तकांत लिहिलेले ही असते अन ते कालानुरूप सिद्ध सुद्धा झाले आहे असे वाटते
हा सण "धूलिवंदन" आहे न?
हा सण "धूलिवंदन" आहे न? इंग्लिश मधे विचार केल्यास "हार्वेस्ट फेस्टिवल" इथे मुठभर बिया फेकता कणगीभर धान्य देणाऱ्या माती ला वंदन करायचे आहे उर्फ़ धूळवड करायची आहे न?
>>
सोन्याबापू, छान अर्थ सांगितलात. धुलिवंदनाचा हा अर्थ मलातरी माहितीच नव्हता.
धूलिवंदनाचा खरा अर्थ मलाही
धूलिवंदनाचा खरा अर्थ मलाही माहीत नाही. पण आजवर समजायचो की होळी पेटवल्यावर दुसर्या दिवशी जी राखेची धूळ उरते तिला माथ्याला लावून वंदन करायचे म्हणून होळीच्या पुढचा दिवस धूलिवंदन. पाण्याची रंगपंचमी हे फारफार पूर्वी कधीतरी आलेले फॅड असावे जे त्यात मौजमजा असल्याने जपले गेले असावे.
मागच्या पानांवर काही
मागच्या पानांवर काही पाण्याच्या अपव्ययाची उदाहरणे तुलना करायला दिली गेली आहेत.
मला वाटते की जर कोणी नेता आपल्या घरच्या समारंभासाठी किंवा मोठेपणा मिरवायला घातलेल्या घाटासाठी पाण्याची नासाडी करत असेल तर तो अपराध ठरावा. मात्र क्रिकेटच्या सामन्यासाठी वापरलेल्या पाण्याला त्याच तागडीत तोलू नये. कारण तसे प्रत्येक कामात पाणी लागतेच. तर सारेच सोडून देणार का. अश्याने ना मनोरंजन उरणार ना कोणाला रोजगार मिळणार. त्यामुळे एखाद्या गोष्टीची गरज समजणे गरजेचे आहे. रंगपंचमी खेळणे आपल्यासाठी किती गरजेचे आहे त्यानुसार किती पाण्याचा वापर करून खेळावी हे ज्याने त्याने आपापले ठरवावे. आजच्या दिवशी पाणी वाचवा हे फक्त आवाहन आहे, सक्ती वा आदेश नाही. तर शक्य झाल्यास असे आवाहन करणार्यांना जाओ पहले उस आदमी की साईम लेके आओ म्हणत उलट जाबही विचारू नका
ऋन्मेषा, तू माझ्या प्रश्नाचे
ऋन्मेषा, तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस. धागा काढणार की नाही ते सांग. अर्थात उत्तर दिले नाहीस म्हणजे काढणार नसशीलच. क्रिकेटला वापरले जाणारे पाणी मनोरंजनासाठी म्हणून तुला योग्य वाटते आणि रंगपंचमी आली की एका दिवसासाठी पाण्याची काळजी वाटते यातच खरं काय ते दिसून आलं आहे.
>>>>मात्र क्रिकेटच्या
>>>>मात्र क्रिकेटच्या सामन्यासाठी वापरलेल्या पाण्याला त्याच तागडीत तोलू नये. <<<<<
>>>>कारण तसे प्रत्येक कामात पाणी लागतेच. तर सारेच सोडून देणार का. <<<<
>>>> अश्याने ना मनोरंजन उरणार ना कोणाला रोजगार मिळणार. <<<<<
हा मुद्दा खास आहे. इथे दिल्याबद्दल धन्यवाद. तर, नेमके हिंदु सणांमधुन लोकांचे होत असलेले मनोरंजन व मिळत असलेला रोजगार, याच बाबी नेमक्या काही विशिष्ट विचारधारांना का खुपाव्यात, हा मला पडलेला प्रश्न आहे.
शिवाय फुकट जाणे वगैरे क्लेम्स क्वान्टीटीवाईज अन्य बाबींचे तुलनेत बघता किती फुटकळ व खोडसाळच आहेत हे आकडेवारीने दाखवुन देऊनही, तरीही, हिंदु सणांचे बाबतच बोंब का माराविशी वाटते, या मागे खरोखर सुधारणा होणे अशी इच्छा आहे की "हिंदुचे मनातच" आपल्या धर्माविषयी किंतु रुजावा ही इच्छा आहे हे तपासुन घ्यायची वेळ देखिल निघुन गेलेली आहे असे मला वाटते.
>>>>क्रिकेटला वापरले जाणारे पाणी मनोरंजनासाठी म्हणून तुला योग्य वाटते आणि रंगपंचमी आली की एका दिवसासाठी पाण्याची काळजी वाटते यातच खरं काय ते दिसून आलं आहे <<<<
यू सेड इट चैत्रगंधा..... (खरी डबल ढोलकी या वरील पद्धतीच्या विचारातच असते.... असे माझे मत... डबल ढोलकी हा शब्द असंसदीय वाटत असेल, तर मी मागे घेतो, पण हाच शब्द माझेबाबत अनेक वेळेस वापरला गेलेला आहे, त्याचे तात्पर्य/अर्थ असा की वेगवेगळ्या गोष्टींना /घटकांना समान न्याया ऐवजी वेगवेगळे निकष वापरणारे ते डबल ढोलकी//)
फक्त मला वाईट याचे वाटते की काहि मुठभर निधर्मी/बुप्रावादी लोकांचे अवसानघातकी व तरीही "साळसूद" भासणार्या अन म्हणूनच श्रद्धास्थानांबाबत्/श्रद्धाविषयांबाबत बुद्धिभेद करु पहाणार्या क्लेम्सना/दाव्यांना/आवाहनांना भुलुन बाकी सुशिक्षितही जराही तार्किक विचार करण्याचे कष्ट न घेता त्यांच्या "रीऽऽ" मधे री मिसळतात. असो.
आज धुलवड, होळीच्या रक्षेत
आज धुलवड, होळीच्या रक्षेत न्हाऊन निघुन अंगास गोमय/गोमुत्राने लेपुन घेउन उन्हात वाळवत बसायचे...
जसे ते हत्ती करतात, गेंडे/पानघोडे करतात..... निसर्गातील घटकांकडून , निसर्गापासुनच संरक्षण व निसर्गानुरुप सामावुन जाण्याचे शिक्षणाचा एक भाग..... अंगाला राख फासणे, चिखलमातीपासुन अंगावर लेप चढवुन किडामुंगी कीटक जीवजंतु यांचे पासुन शरीराचेरक्षण करण्याची पुर्वापार कला, जी सर्वच प्राण्यांमधे उपजत अस्तित्वात असते.... मानव तेव्हढा अधिक अक्कलवान, पुढचे पाठ मागचे सपाट त्याचे.... म्हणून त्यास परत परत आठवण व्हावी मूळ रुपाची, याकरता हा सण... असे माझे मत.
आज धुलवड, होळीच्या रक्षेत
आज धुलवड, होळीच्या रक्षेत न्हाऊन निघुन अंगास गोमय/गोमुत्राने लेपुन घेउन उन्हात वाळवत बसायचे...
>> व्वा वा! होळी खेळण्याचा हा नवीनच प्रकार जगासमोर आणून दिल्याबद्दल समस्त मानव जातीकडून आपणास अभिवादन!!
होळीच्या रक्षेत न्हाऊन निघुन
होळीच्या रक्षेत न्हाऊन निघुन अंगास गोमय/गोमुत्राने लेपुन घेउन उन्हात वाळवत बसायचे...>>>> ऐतेन
आमच्या कडे काही धर्म रक्षक
आमच्या कडे काही धर्म रक्षक गोमय/गोमुत्राने खातात पण..
लिंबुशास्त्री , आपला फोटो
लिंबुशास्त्री , आपला फोटो टाकावा लिंपुन बसलेला
जाई, त्यात नवल काहीही नाही.
जाई, त्यात नवल काहीही नाही. आयुर्वेदात तर "मृत्तिकास्नानही" सांगितले आहे, ज्यातहि अन्य वनौषधींबरोबरच वरील पदार्थांचाही समावेश होतो.
अर्थात "आयुर्वेद" थोतांड असे मानणार्यांचे मत स्विकारलेस, तर तुला "शीऽऽ/याऽक च्या जोडीने नवल वाटणे साहजिकच असेल.
आजही, साधू बनलेले लोक सर्वांगास केवळ राख फासुनच जिवित व्यतित करतात, कोणत्याहि प्रदेशात, कोणत्याहि हवामानात. मानसिक व शारिरीक क्षमतेचा तो एक वेगळाच विषय आहे. असो.
लिंबूटिंबू चैत्रगंधा, एकेक ओळ
लिंबूटिंबू चैत्रगंधा, एकेक ओळ कोट करण्यापेक्षा पुर्ण परीच्छेदाचा आशय समजून घ्या.
क्रिकेटचा मुद्दा मान्य करायचे झाल्यास एकूण एक मैदानी खेळ बंद करावे लागतील ते तुम्हाला मान्य होईल का हे सांगा.
खेळच का एकूण एक गोष्टींमध्ये पाणी हे लागतेच, तर कुठलेच उपक्रम राबवायचे नाहीत का.
अर्थात हे वादाला वाद घालण्यासाठी जगात पाणी वापरले जाणारे सर्व गोष्टी इथे मांडता येतील पण त्याला काही अर्थ असेल का.
पाणी बचतीच्या बाबत आपणच आपली गरज आणि प्रायोरीटी ठरवायची आहे.
याऊपर तुम्हाला रंगपंचमी खेळणे तसेच गरजेचे वाटत असेल तरी माझी काही हरकत नाही, किंबहुना मी तुमच्यावर पाण्याची नासाडी करणारे असा आरोप लावायलाही उतावीळ झालो नाहीये. मी वर म्हणालो तसे हे आवाहन आहे सक्ती नाही. रंगपंचमीची पाण्याची नासाडी वाचवणे हे आपल्या सर्वांच्या हातात आहे म्हणून हे आवाहन आहे हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ मी लोकांना दारू पिऊ नका असे आवाहन करू शकतो पण दारू विक्रेत्याला तसे आवाहन करून फायदा नाही. तिथे दारूबंदी कायदा व्हावा म्हणून सरकारकडेच दाद मागावी लागेल.
हेच क्रिकेटबाबत बोलायचे झाल्यास माझ्या आजूबाजुची मुले क्रिकेट खेळताना अशी पाण्याची नासाडी करताना दिसली असती तर हेच आवाहन मी त्यांनाही केले असतेच. किंबहुना आम्ही स्वताही कधी असे मैदान वा गल्ली धुण्याचे लाड केले नाहीयेत. सुका कचरा काढायचो आणि खेळायचो
याऊपर मी तुमच्या सणांच्या मागे लागायला हा धागा काढला अहे असे वाटत असेल तर माझी हेडर पोस्ट पुन्हा वाचा. मी स्वता रंगपंचमी प्रेमी आहे. दरवर्षी उर फुटेस्तोवर खेळत आलोय. तरी त्या किस्स्यांवर आणि आठवणींवर आपली हरकत नसेल तर मी एखादा नवीन धागा काढू शकतो. पण या वर्षी मात्र खेळलो नाही म्हणून आज दुपारी ही पोस्ट टाकायला ईथे हजर आहे.
क्रिकेटचा मुद्दा मान्य करायचे
क्रिकेटचा मुद्दा मान्य करायचे झाल्यास एकूण एक मैदानी खेळ बंद करावे लागतील ते तुम्हाला मान्य होईल का हे सांगा.>>>>
ऋन्मेष, इथे कायमस्वरूपी बंदीवर चर्चा चालली नाहीये
जर जनावरांनासुद्धा प्यायला पाणी नाही आहे तर अशा स्ठितीत १५००,२५०० लिटर पाणी मॅचेससाठी मैदानावर फवारून नासाडी होत नाही का?
गल्लीतल्या क्रिकेटबद्दल नाही बोलत आहे मी. आयपीएल आणि तत्सम मॅचेसबद्दल बोलतेय. दुष्काळग्रस्त परिस्ठिती आहे तरी या मॅचेसवर आक्षेप का घेत नाहीये असा माझा प्रश्न आहे. पण क्रिकेट हा सगळ्यांचा वीकपॉईंट असल्याने कोणी अर्थात हे बोलणार नाहीच.
रच्याकने, मी अजिबात रंगपंचमी प्रेमी नाही. गेले १५ वर्ष मी रंग खेळले नाहीये. पण आपल्या तो बाब्या आणि दुसर्याचे ते कार्ट असा अॅटिट्युड दिसला म्हणून रहावले नाही इतकच.
>>>>> तिथे दारूबंदी कायदा
>>>>> तिथे दारूबंदी कायदा व्हावा म्हणून सरकारकडेच दाद मागावी लागेल. <<<<
एक्झॅटली.... देअर यू आर.. यू सेड इट..... अन जशा प्रकारे दारुबंदी करण्याकरता कायदा व्हावा म्हणून तुम्ही राजरोस मागणी करु शकता/शकलेले आहात, त्याचप्रकारे पुढे जाऊन "हिंदु सणांवर बंदी आणण्याची" पुढचि स्टेप तुम्ही (वा अन्य कोणिही) घ्यायला जाऊ नये म्हणूनच तुमच्याच युक्तिवादातील ठीसुळपणा दाखवुन द्यायचे काम करतो आहे.
किंबहुना अशा मागण्यांचि ही पूर्व तयारीच सुरू आहे असे माझे मत.
हिन्दुन्चे फक्त होळी आणी
हिन्दुन्चे फक्त होळी आणी रन्गपन्चमी हेच सण उरलेत का? खालील सण कशासाठी आहेत?
१- दिवाळी- अन्धाराकडुन प्रकाशाकडे, अज्ञान नष्ट करुन ज्ञानज्योतीकडे जाणे.
२- होळी- दुर्गुणान्चा नाश करुन त्याना अग्नीत नष्ट करणे
३ - गुढी पाडवा- नव्या वर्षाचे आरोग्यदायी स्वागत.
४- सन्क्रान्त- मैत्री व नात्यातील गोडवा.
५- दसरा- नात्यातील प्रेमरुपी सोने टिकुन रहावे यासाठी.
पण आता काय झालेय? होळी व रन्गपन्चमी मध्ये बॉलीवुडची बीभत्सता, विकृती आलीय.
दिवाळी मध्ये फटाक्यान्चे प्रदुषण आलेय. आणी मग यात हिन्दुन्चे सण राहीलेत कुठे? हीच अपेक्षा आहे का या सणान्कडुन? वर सोन्याबापुनी सान्गीतलेले विसरलेले दिसतेय.
पाण्याची नासाडी ही कुठल्याही
पाण्याची नासाडी ही कुठल्याही प्रकारे अयोग्यच!!!
पण मी चुकुन त्य पोलाच्या धाग्यावर टाकलेले इथेहि पोस्टतो..
मुळात ३६५ दिवसापैकी एक दिवस होळी खेळली जाते.. मोजुन पहा किती लोकं होळी खेळतात? माणशी किती पाणी वाया जाते? तसेच अश्या दुष्काळी उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय टाळावा. पण हे करीत असता जे नियमीत पाणी प्रचंड प्रमाणात वाया घालवितात त्या कंपन्या(विशेषतः मद्यार्के व शित पेये बनविणार्या... ) ह्यांच्या रिफिल बाटल्या धुण्याकरीता एकेक कंपनी रोज हजारो क्युबिक मिटर पाणी वाया घालविते ( फॉर्मुलेशन साठी डी एम वॉटर वेगळे).. त्याचे काय?
क्रिकेट मैदानावर लाखो लिटर पाणी रोज..... तेही ह्या दुष्काळाच्या ऐन उन्हाळ्यात......
होळी तसा मी देखिल खेळत नाही . पण आपण नेहमी पहातो असे बॅन्का जश्या मोठे कर्जदार चुना लावून जातात आणि लहान कर्जदारांवर जप्ती आणतात तसा हा प्रकार वाटतो मला!
अशी कित्येक उदाहरणे देता येतिल पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल?
७२ च्या ऐन दुष्काळात नगर सारख्या ठिकाणी अगदी बाल वयात अनुभवलयं पाण्याचे महत्व. त्यामुळे जाणीव आहे.
http://www.loksatta.com/mumba
http://www.loksatta.com/mumbai-news/blog-on-holi-celebration-by-morehwar...
काय आहे ना कृष्णा. अजूनही या उतरत्या वयात माझ्या आईला पाण्यासाठी तळमळाव लागत, रात्र-रात्र जागाव लागत, याचा मानसीक त्रास होतो. नाही कळणार अशी काळजी होळी खेळणार्याना, पाणी नासणार्याना आणी मला त्याचे काय असली वृत्ती असणार्याना. देव करो आणी यान्च्याच उतरत्या वयात याना आणी यान्च्या पुढच्या पिढीला अशी पायपीट करायला न लागो.
चिनुक्सला अनेक धन्यवाद फोटोन्बद्दल.
विषयात पाण्याची नासाडी आहे
विषयात पाण्याची नासाडी आहे तेव्हा होळीत होणारी नासाडी आणि इतर होणारी नासाडी यावर सुद्धा विचार व्हायला हवा.
अमुक गोष्टींचे प्रतीक म्हणुन अमका सण साजरा करणे, त्याच प्रमाणे दुष्काळग्रस्त भागातील लोकांप्रती संवेदनेचे प्रतीक म्हणुन होळीत रंग न खेळणे, असे केवळ एक प्रतीक होउ नये.
रंग खेळणे टाळणे यासोबतच अजुन काय करता येईल हे सुद्धा बघायला हवे. माणकुंच्या पोस्ट मधील काही मुद्दे पटले, एकीकडे वाचवले आणि दुसरीकडे आपण किती घालवतोय याची आपल्यालाच कल्पना नसावी असे होउ नये.
पुढे जाऊन "हिंदु सणांवर बंदी
पुढे जाऊन "हिंदु सणांवर बंदी आणण्याची" पुढचि स्टेप तुम्ही (वा अन्य कोणिही) घ्यायला जाऊ नये म्हणून
>>>>>>>>>>
माझा चर्चेचा हेतू वेगळा आहे.
आपला विरोधाचा हेतू वेगळा आहे.
आपल्यातील चर्चेतून निष्पन्न शून्य होणार आहे.
माझ्यासाठी धर्म म्हणजे मानवता. आणि सण तो जो लोकांना जोडायचे काम करतो.
माझ्या या व्याख्यांना अनुसरून जसे वागायचे होते तसे मी आज वागलो आहे.
http://zeenews.india.com/mara
http://zeenews.india.com/marathi/news/maharashtra/drought-bjp-banner-in-...
जरा इथे हि लक्ष द्यावे
शिमगा सरला कवित्व उरले
शिमगा सरला कवित्व उरले
माझ्यासाठी धर्म म्हणजे मानवता. आणि सण तो जो लोकांना जोडायचे काम करतो.
माझ्या या व्याख्यांना अनुसरून जसे वागायचे होते तसे मी आज वागलो आहे.
ॠनम्या - म्हणजे नक्की कसा वागलास आणि त्याकरता ह्या धाग्याचा कसा उपयोग करून घेतलास ते वाचायला आवडेल.
सकुरा यांनी टाकलेले फोटोवर
सकुरा यांनी टाकलेले फोटोवर अॅडमिनला आपत्ती वाटली नाही काय? की ते प्रताधिकार मुक्त होते.
आता हा सकुरा कोण, कुठली लिंक
आता हा सकुरा कोण, कुठली लिंक ???
हर्पेन, मी काही तुमच्या एवढा
हर्पेन, मी काही तुमच्या एवढा थोर नाही (हा उपरोध नाही, तुम्ही आहात) पण जे पटते त्यातले झेपते तेवढे तरी करू शकतो.
दुष्काळाच्या बातम्या वाचून रोजच्या जीवनात पाणी वाचवले जातेच कारण आज आमच्याकडे चोवीस तास पाण्याची सोय असली तरी बालपण दोन वेळा एकेक तास पाणी असे गेलेय, वेळप्रसंगी इथून तिथून पाण्याचे हंडे बादल्या आणाव्या लागल्या आहेत. त्यामुळे पाण्याची किंमत आहेच. रोजचे पाणी वाचवण्यासोबत आपण होळीच्या दिवशी जादाचे पाणी वाचवू शकतो तसेच आणखी चार लोकांनी ते वाचवावे या साठी कारणीभूत ठरू शकतो हे जाणवले. मायबोलीसारख्या सोशलसाईटवर चर्चा घडवून आणू शकतो, व्हॉटसपवर टिपिकल फॉर्वर्डेड मेसेजच्या जागी स्वतातर्फे स्वताच्या शब्दात मित्रांना आवाहन करू शकतो. कॉलनीतल्या मुलांच्या डोक्यात हा विचार सोडू शकतो, कोणाच्या डोक्यात आधीच असा विचार असेल तर त्याला उचलून धरू शकतो.
हल्लीच्या जनरेशनला रंगपंचमी खेळण्यापेक्षा रंगलेले चेहरे सेल्फी काढत फेसबूकवर अपलोड करण्यात जास्त क्रेझ वाटते. त्यांना जर तेवढे करा पण पाण्याची नासाडी टाळा असे सुचवले तरी ते कबूल होतील. एक सहज घडलेले सांगतो. यावेळी मी होळीला आमच्याईकडच्या मुलांना एक आयडीया दिलेली, होळीवर फोकस मारता त्यापुढे रंगाचे चक्र फिरवा, जसे गणपतीला असते. मी सुद्धा कुठेतरी पाहिलेलेच हे. परीणामी बॅकग्राऊंडला कमीजास्त होणार्या होळीच्या ज्वाळा आणि तोंडावर पडणारी रंगीत लाईट असे होळीच्या समोर उभे राहून पोरांनी धमाल सेल्फी काढले. वेगळे रंगलेले तोंडांची गरज पडली नाही. थोडेफार गुलालाने माखणे पुरेसे ठरले.
असो, दरवेळी सारखे मी पाणी वापरले नाही हेच समाधान माझ्यासाठी पुरेसे आहे.
Pages