यंदा रंगपंचमी / धूलीवंदनला पाण्याची नासाडी करावी का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 March, 2016 - 16:43

विषय तसा नेहमीचाच आहे.

दर होळी सणाच्या काही दिवस आधी ‘पाणी वाचवा’ मेसेज सोशलसाईटवर फिरू लागतात. सोबत हिंदू सणांनाच नेमके तुम्हाला निसर्गाची चिंता भेडसावते, मेसेजही लगोलग हजर असतात. मी मात्र दरवर्षी "खेळा बिनधास्त" या गटात असायचो. अर्थात यामागे हिंदू सण परंपरा जपल्याच पाहिजेत असा काही उदात्त हेतू नसून ज्यातून मनोरंजन होतेय ते ते केले पाहिजे असा स्वार्थ असायचा. त्याचबरोबर स्वताच्या लहानपणी होळीच्या आठवडाभर आधीपासूनच आम्ही जी रंगपंचमी साजरी करायचो त्या पार्श्वभूमीवर आताच्या लहान पिढीला उपदेशाचे डोस पाजायचा आपल्याला काही एक नैतिक अधिकार नाही असेही वाटायचे. परीणामी आजवर दरवर्षी लहानांबरोबर आणखी लहान होत टाकीतले पाणी संपेपर्यंत रंगपंचमी खेळत आलोय.

पण यंदा परिस्थिती बिकट आहे. कदाचित आधीच्या वर्षीही असावी, पण आमच्याकडे चोवीस तास मुबलक पाण्याचे सुख असल्याने ती कधी जाणवली नसावी. यावेळी मात्र ऑफिसमधील ईतरांच्या चर्चेतून ती जाणवतेय. तसेच काही दिवसांपूर्वीच मी जे आजवर शॉवरने आंघोळ करायचो ते तांब्याबादलीने आंघोळ करायला सुरुवात करून पाणी वाचवायला चालू केलेय, त्यामुळे ईतरांना उपदेश करायचा थोडाफार नैतिक अधिकार मी कमावला आहे असे वाटू लागलेय. म्हणून हा धागा.

माझे मत क्लीअर झाले आहेच. यंदा पाण्यापासून चार हात लांब राहत हा सण साजरा करता येतो का हे बघायचे. तसेच सुक्या रंगाने खेळायचे ठरवल्यास आंघोळीला चार बादल्या तर लागणार नाहीत ना, आणि रंगलेले अंगण साफ करायला पाण्याचा ड्रम तर रिकामा होणार नाही ना, याची काळजी घ्यायची.

गवताच्या पेंढ्या होळीत टाकून भडका उडवायचा, त्या पेटलेल्या होळीवर बोंबा मारायच्या, आपली आवडती मुलगी होळीला प्रदक्षिणा मारायला आल्यावर उगाचच काठी हातात घेत शायनिंग मारायची, त्याच काठीने अर्धे जळालेले खोबरे होळीतून बाहेर काढत, अर्धे तिला द्यायचे, अर्धे आपण खायचे, घरी जाऊन आईने बनवलेली पुरणपोळी आणि कोंबडीवड्यावर आडवाउभा ताव मारायचा, या ईतर गोष्टींची मौज तशीच राहील. पाण्याला तेवढा अलविदा होईल.

फक्त आता हा निर्धार कितपत टिकतोय हे बघायचेय, कारण आमच्या येथील रंगपंचमी फारच धमाल असते. त्या मोहावर विजय मिळवणे कठीणच..

हे झाले माझे, पण तुमचे काय ? जमेल ..

...............................................................

यावर पोल काढणे गरजेचे वाटले म्हणून .. इथे http://www.maayboli.com/node/58123

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होळीचा सण साजरा करू आणि पाण्याचा अपव्यय टाळू. हि एक भारतीय म्हणून मी प्रतिज्ञा करत आहे.

जय हिंद! जय महाराष्ट्र!

तर्पणामागे शास्त्रीय कारण आहे कां??>> तेच जे कबरीवर पाणी टाकल्याने पितराना पोहोचते तेच [इथे फक्त ३ पळ्या लागते तिथे पाईप लागतो]

नरेश माने | 22 March, 2016 - 05:09 नवीन
राजकारण सोडून आपण कधीच विचार करू शकत नाही का? <<<<+१

सस्मित | 22 March, 2016 - 05:11 नवीन
पण काळसुसंगत वागण्यात बहूजनांचे हित आहे.>>> म्हणुनच काळसुसंगत का काय ते वागा असं सगळे घसा आय मीन कीबोर्ड बडवुन सांगताहेत. नैतर अजुन भयंकर काळ येइल. <<< +१

कोणी कितीही चांगल्याच सांगितलं तरी काही लोक मुद्दाम कुसपट काढून राजकारण करणारच.

विठ्ठल&मुकु,
मी मुस्लिम नाही आहे हो पाण्याची टंचाई बघता मला हा निर्ण्य योग्य वाटला काही शास्त्रिय कारण जरी असेल तर ते परिस्थिती नुसार बदलणारे असावे असे त्यांच्या निर्णया वरुन वाटते
जाणकारांणी अधिक प्र्काश टाकावा...

होळीचा सण साजरा करणही चूकच आहे
होळीत जाळायला लाकूड म्हणजे वृक्षतोड शिवाय वायू प्रदूषण होत ते वेगळंच

सगळा मूर्खपणा आहे , परंपरांच्या नावाखाली नैसगिक साधनसंपत्तीचा ऱ्हास

मी मुस्लिम नाही आहे हो पाण्याची टंचाई बघता मला हा निर्ण्य योग्य वाटला काही शास्त्रिय कारण जरी असेल तर ते परिस्थिती नुसार बदलणारे असावे असे त्यांच्या निर्णया वरुन वाटते
जाणकारांणी अधिक प्र्काश टाकावा...>> कुठे टाकयाचा प्र्काश?

कुठे टाकयाचा प्र्काश?<<<<<<<<मुस्लिमांच्या शास्त्रावर जे तुम्हि वर विचारले आहे.

बोल्ड करुन काय होणारे>> पालथ्या घड्यावर पाणी असेही नाही म्हणु शकत.. तोदेखिल पाण्याचाच अपव्यय!

बादवे, चिनुक्स ने वर जे लिहिलंय की होळीच्या अभद्र, वाइट प्रथा होत्या. सभ्य स्त्री-पुरुषांना घाराबाहेर पडणे मुश्किल होते वैगेरे ते कुठे वाचायला मिळेल?

पर्यावरणाला अनुसरुन होळीच काय सगळे सण साजरे व्हायला पाहिजे. नाहीतर हॅपिनेस मधे हिंदुस्थान ११७ वर सुद्धा नसेल कदाचित. Happy

अपेक्षा आहे, सगळेच सहमत असतील? Happy

मुस्लिमांच्या शास्त्रावर जे तुम्हि वर विचारले आहे.>> मी का टाकावा मी त्याच्या भावनात थोडी हात घातला ते पाणी टाकतात यालाही माझा आक्षेप नाही. प्रकाश तुम्ही टाका दोन्ही धर्मांच्या रितीरिवाजावर मग बोला .

पाणी तर चोरतातच, गळ टाकून विज पण चोरतात. या विरुध्द का नाही<<<, हे अदानी अंबानी, मल्याचे भाऊ-बंद आहेत म्हणुन सरकार यांना काही करत नाही.>>>. अहो सकुरातै, औरन्गाबाद मध्ये जायकवाडी धरणात हजारो अनाधिकृत वीजेच्या मोटारी बिल्डर लोकानी बसवल्यात आणी तिथुन ते पाणी चोरतायत असे परवाच टिव्ही वरल्या बातम्यात दाखवले. ते पण काय अदानी, अम्बानी, मल्ल्याचे साथीदार होते काय? हायला, जिथे तिथे काय मोदी, गान्धी आणताय? जरा बाहेर निघा की त्यातुन.

सस्मित, माझे कावण्याचे हेच कारण आहे की एकदा तर घरात प्यायलाही पाणी नसताना, माझ्या कलिगच्या घरुन हन्डा आणी पाण्याच्या ५ कळशा मी आणी आईने रिक्षातुन जाऊन आणल्यात आणी असे नन्तर ३ वेळा घडले. नशीब माझे आता की अशी पायपीट करावी लागत नाही. पण ज्याना असे करावे लागले नाही त्याना त्याची किम्मत काय कळणार? माझ्या आईने आज पर्यन्त प्यायच्या पाण्याच्या ८० मोठ्या ५ लिटर वाल्या बॉटल्स पैसे देऊन घेतल्यात.

पाणी जीवन आहे असे उगाच म्हणलेले नाहीये. स्वरा, तुझ्या आईबद्दल वाचुन खरच डोळे पाणावले, कारण माझ्या आईची हीच हालत आहे. असो, देवाच्या दारीचा न्याय उशिरा का होईना मिळेल. तुला शुभेच्छा.

र्यावरणाला अनुसरुन होळीच काय सगळे सण साजरे व्हायला पाहिजे >>> + १ हेच माझेही म्हणणे आहे.

गालाला गुलाल लावून रंग खेला. गुलालाच्या जागी नैसर्गिक रंग वापरा. आता पालक, बीट, हे ही रंगासाठी वापरू नका हे प्लीजच नको हा...

आम्ही ही गावकडे लहानपणी दर उन्हाळ्ञात लांबून पहाटे ४ ला उठून पाणी भरलय. सबब पाण्याची किंमत चांगली माहिताय. तेव्हा ते नासूनकाच. पण सणाचा आनंद ही नासू देऊ नका. रोजची अंगोळ कोरडा रंग खेल्ल्यान<तर करा न काय...

मुकु, जरुर टाकते प्रकाश ...त्यासाठी काही मुस्लिम मित्रांना विचारायला लागेल माहिती घेऊन टायपते
धन्यवाद.

थोबाडं रंगवणं आय मीन रंग खेळणं कंपल्सरीच आहे का?

हो अर्थातच कारण आपल्या महान परंपरा आपण जपल्याच पाहिजेत
पाणी बचत वगैरे सगळ थोतांड आहे , परंपरा महत्वाची बाकी सगळ गेल उडत

तिकडे परदेशी टोमॅटोची रंगपंचमी खेळतात. कितीतरी नासोडा होतो. त्यावर काही आक्षेप

जेथे जेथे पर्यावरणास हानीकारक पध्दती असतील तिथे आपण असेच आवाज उठवाल ही अपे़क्षा आहे. नुसते धर्म धर्म धर्म करत मुद्दे मांडतांना त्या त्या आईडी ची प्रतिमा चांगली निर्माण होत नाही.

धरणे बांधण्यात भ्रष्टाचार,
प्यायला पाणी नाही, आणी उसाला भरपुर पाणी.
अवेध नळ कनेक्श्न आणी पुरवठा,
पाणी विक्री वर बंदी असावी, (फुकट द्यावे.)
दारु / शित पेय कंपनी चा पाणी पुरवठा बंद / कमी करणे,
वृक्ष लावणॅ,
वृक्ष तोड थांबवणे., बरेच आहे.

प्रत्येकाने यात सहभाग नोंदवा.
शेवटी ज्याची त्याची इच्छा.
जगायचे कसे. काड्या करत की.....आनंद देवुन

मुकु, जरुर टाकते प्रकाश ...त्यासाठी काही मुस्लिम मित्रांना विचारायला लागेल माहिती घेऊन टायपते
धन्यवाद.>> सोबत विठ्ठलालाही न्या

पण ज्याना असे करावे लागले नाही त्याना त्याची किम्मत काय कळणार? माझ्या आईने आज पर्यन्त प्यायच्या पाण्याच्या ८० मोठ्या ५ लिटर वाल्या बॉटल्स पैसे देऊन घेतल्यात. <<< मी सुद्धा आठवड्याचे सगळे कपडे (आम्हा तिघांचे ऑफिसचे जोड मोठ्या बहिणीकडे कांदिवलीला रिक्षाला पैसे घालून धुऊन आणते, नाही परवडत हो पन पर्याय नाहि) Sad

स्वरा, तुझ्या आईबद्दल वाचुन खरच डोळे पाणावले, कारण माझ्या आईची हीच हालत आहे. असो, देवाच्या दारीचा न्याय उशिरा का होईना मिळेल. तुला शुभेच्छा.<<< थांक्यू रश्मी ताई

<<तिकडे परदेशी टोमॅटोची रंगपंचमी खेळतात. कितीतरी नासोडा होतो. त्यावर काही आक्षेप>>

ते मूर्ख आहेत म्हणून आपणही मूर्खपणा केला पाहिजे असा काही नियम आहे का ?

Pages