यंदा रंगपंचमी / धूलीवंदनला पाण्याची नासाडी करावी का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 March, 2016 - 16:43

विषय तसा नेहमीचाच आहे.

दर होळी सणाच्या काही दिवस आधी ‘पाणी वाचवा’ मेसेज सोशलसाईटवर फिरू लागतात. सोबत हिंदू सणांनाच नेमके तुम्हाला निसर्गाची चिंता भेडसावते, मेसेजही लगोलग हजर असतात. मी मात्र दरवर्षी "खेळा बिनधास्त" या गटात असायचो. अर्थात यामागे हिंदू सण परंपरा जपल्याच पाहिजेत असा काही उदात्त हेतू नसून ज्यातून मनोरंजन होतेय ते ते केले पाहिजे असा स्वार्थ असायचा. त्याचबरोबर स्वताच्या लहानपणी होळीच्या आठवडाभर आधीपासूनच आम्ही जी रंगपंचमी साजरी करायचो त्या पार्श्वभूमीवर आताच्या लहान पिढीला उपदेशाचे डोस पाजायचा आपल्याला काही एक नैतिक अधिकार नाही असेही वाटायचे. परीणामी आजवर दरवर्षी लहानांबरोबर आणखी लहान होत टाकीतले पाणी संपेपर्यंत रंगपंचमी खेळत आलोय.

पण यंदा परिस्थिती बिकट आहे. कदाचित आधीच्या वर्षीही असावी, पण आमच्याकडे चोवीस तास मुबलक पाण्याचे सुख असल्याने ती कधी जाणवली नसावी. यावेळी मात्र ऑफिसमधील ईतरांच्या चर्चेतून ती जाणवतेय. तसेच काही दिवसांपूर्वीच मी जे आजवर शॉवरने आंघोळ करायचो ते तांब्याबादलीने आंघोळ करायला सुरुवात करून पाणी वाचवायला चालू केलेय, त्यामुळे ईतरांना उपदेश करायचा थोडाफार नैतिक अधिकार मी कमावला आहे असे वाटू लागलेय. म्हणून हा धागा.

माझे मत क्लीअर झाले आहेच. यंदा पाण्यापासून चार हात लांब राहत हा सण साजरा करता येतो का हे बघायचे. तसेच सुक्या रंगाने खेळायचे ठरवल्यास आंघोळीला चार बादल्या तर लागणार नाहीत ना, आणि रंगलेले अंगण साफ करायला पाण्याचा ड्रम तर रिकामा होणार नाही ना, याची काळजी घ्यायची.

गवताच्या पेंढ्या होळीत टाकून भडका उडवायचा, त्या पेटलेल्या होळीवर बोंबा मारायच्या, आपली आवडती मुलगी होळीला प्रदक्षिणा मारायला आल्यावर उगाचच काठी हातात घेत शायनिंग मारायची, त्याच काठीने अर्धे जळालेले खोबरे होळीतून बाहेर काढत, अर्धे तिला द्यायचे, अर्धे आपण खायचे, घरी जाऊन आईने बनवलेली पुरणपोळी आणि कोंबडीवड्यावर आडवाउभा ताव मारायचा, या ईतर गोष्टींची मौज तशीच राहील. पाण्याला तेवढा अलविदा होईल.

फक्त आता हा निर्धार कितपत टिकतोय हे बघायचेय, कारण आमच्या येथील रंगपंचमी फारच धमाल असते. त्या मोहावर विजय मिळवणे कठीणच..

हे झाले माझे, पण तुमचे काय ? जमेल ..

...............................................................

यावर पोल काढणे गरजेचे वाटले म्हणून .. इथे http://www.maayboli.com/node/58123

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कन्येला पहिल्यांदा होळीला नेले परवा. तिला खेळु दिले पण मी नाही खेळले. मोह झाला पण माहेरी ४-५ दिवसातुन एकदा पाणी येते हे आठवुन नाहीच इच्छा झाली.

दुष्काळी भागात आपल्याकडले पाणी नेणार असाल तर मी पाण्याने होळीही खेळणार नाही. अन ते पाणी तिकडे पाठवून देऊ.

नेणार का कोणी?

घ्यायला हरकत नाही पण लोकांना खरेच पाणी टंचाईची चिंता आहे की नाही ते तर कळू द्या.>>>>:राग: ऋन्मेष, आज मला तुझा खरोखर अतीशय राग आलाय. काय मुर्खासारखे विधान करतोयस? टिव्ही वरच्या बातम्या बघत नाहीस? पेपर वाचत नाहीस? आणी हो नसशील वाचत, बघत तर निदान सोशल नेटव्रचे मेसेज तरी गाम्भिर्यानेच घे, कृपया.

माझ्या माहेरी आम्ही भयानक पाणी टन्चाई सोसलीय. आणी ती अजूनही आहे. तुझ्या सारख्या लोकाना ते कधीच कळणार नाही, कारण झापड लावलीत तुम्ही डोळ्याना. उघडा जरा ती. आणी परत असले बाष्कळ बाफ काढु नकोस. लोकाना अकला आहेत. आणी तरीही कळत नसेल तर मराठवाडा, खानदेश व विदर्भात जा आणी मग इथे येऊन लिही.

रश्मीताई, जिथे पाणीटंचाई असते तिथे किंमत असणारच. आणि तिथे खेळायला पाणीच नसल्याने हा प्रश्न उद्भवणारच नाही. हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे जिथे पाणीटंचाई तितकीशी किंवा जराही नाहीए, जिथे रंगपंचमी खेळायलाही पाणी खूप आहे.

काय लोक असतात एकेक... तिथे एक लेखक शेतकरी आत्महत्या विनोद निर्मिती साठी वापरतोय
http://www.maayboli.com/node/58109

.....इथे रंगपंचमी धूलीवंदन ची चिंन्ता आहे......
आलेत अछे दिन आलेत....

Holi aali pani vachava asa ek basic BB kadhoon tyakhali darvarshi vicharvantanni mat lihili tar te jaast sayuktik tharel.

रश्मीशी सहमत.
हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे जिथे पाणीटंचाई तितकीशी किंवा जराही नाहीए, जिथे रंगपंचमी खेळायलाही पाणी खूप आहे.<<<<<<<<<< नैसर्गिक स्रोताचा अपव्यय वाटत नाही का? आणि सामाजिक जबाबदारी वगैरे काही प्रकार असतो ना!

अर्धा भारत रोज अर्धपोटी राहतो म्हणून ज्यांच्याकडे देवाच्या कृपेने जेवायला आहे त्यांनी पण उपाशी झोपायच का? ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी होळी खेळली नाही म्हणून दुष्काळग्रस्त भागात कसे पाणी मिळेल? भारतात एकाच वेळेस एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे पूरपरिस्थिती असू शकते. पूरग्रस्तांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपव्यय कसा टाळावा?

राजसी, कॉमन सेन्स आणी माणुसकी या दोन गोष्टी अन्गी बाणवता आल्या तर बघा जरा. आणी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्ही सुपात आहात म्हणून उड्या मारु नका, कारण उद्या तुम्ही जात्यात जाण्याची वेळ तुमच्यावर असल्या हलगर्जी पणामुळे येऊ शकते.

हिन्दु सण गेले तेल लावत आता या उधळपट्टीमुळे जन्गले नष्ट झालीत, आणी तहानेने मरायची वेळ माणसान्वर व जनावरान्वर आलीय. उद्या झाडे पूर्ण नष्ट झाली की माणसे ऑक्सिजन वाचुन आपोआप मरतील, मरा तिच्या आयला. भोआकफ.

ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी होळी खेळली नाही म्हणून दुष्काळग्रस्त भागात कसे पाणी मिळेल?
>>नाशिकचे पाणी पानी मर्र्राथवावाड्याला मिलू शकते ते सोडत नाहीत.पुण्याचे पानी सोलापुरला म्मिळु शकते ते सोदत नाहीत. सोलापुर्चहे पानी उस्मानाबादला मिळु श्कते ते सोडायल तयार नाहीत.

पुण्यात तर गाड्या धुवायला ,रस्ते बांधाय्ला प्यायचे पाणी वापरतात.

खरे तर सम्न्यायी पानी वाटप तत्वानुसार हा दुष्काळी भागावर अन्याय आहे. पण राज्कीय फायद्यासाठी आम्ही पाणी सोडणार नाही अशी चुकीची भुमिका घेतली जाते.

---
मी तशी अंधश्रध्द नाही ,पण होळीसाठी पानी वाया घालवणार्‍यांना कामा निमिता लातुरातल्य खेदेगावत्वात रहायला दे ही इशचरणी प्रार्थना.

मी हिंदू हा शब्द माझ्या कोणत्याही पोस्ट मधे वापरलेला नाही.

कॉमन सेन्स ---- म्हणजे असा की दुसरे उपाशी असतील तरी मला जेवायला मिळतय तर मी पोटंभर जेवणार.

माणुसकी ---- म्हणजे अशी की पोटंभर जेवलो म्हणून काय झालं होळी खेळलो नाही की मिळवलं

हाताची पाचही बोटं समान असतात का? जिथे निसर्ग समानता ठेवत नाही तिथे समानतेचा टेंभा मिरवणारे आपण कोण?

देवकी, आपण माझी कोट केलेली पोस्ट आणि पुढचा आपला रिप्लाय याचा तालमेळ लागत नाहीये.

राजसी, दुष्काळग्रस्त भागात ते पाणी पोचेल की नाही हे एकवेळ बाजूला ठेवूया. पण मला वाटते यंदा पाणी टंचाई महाराष्ट्रभर आहे. मुंबई उपनगरे तसेच नवी मुंबईकर देखील त्रस्त आहेत. पावसाळा उशीरा लांबला तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

सगळीकडे पाण्याने होळी खेळु नका म्हणत आहेत ते पण चुक वाटते मला. रंग खेळल्यावर ते धुवायला कुठुन आणणार पाणी? Uhoh त्यामुळे फक्त लै बोंबा मारा.

गेल्या वर्शीही पाणी टंचाई होती , होळी न खेळण्याची आवाहने होती . आमच्या सोसायटीत सालाबादप्रमाणे दणक्यात रंगपंचमी खेळली गेली.

यंदाही पाणी टंचाई आहे, होळी न खेळण्याची आवाहने होतायेत . यंदा आमच्या सोसायटीत कोरड्या रंगपंचमीची नोटीस आहे.पालकाना तंबी आहे - ३-४ दिवस अगोदरपसून मुलांना पाण्याच्या पिचकार्या आणि फुगे घेउन सोडू नये
कारवाई केली जाईल .

एका वर्शात काय बदलले --- मुलं आणि पालक जागरूक झाले ?????
कदाचित १०% असेलही . पण गेल्या उन्हाळ्यात पाणी टंचाई असले तरी आमच्याकडे २० तास पाणी असायचे . यंदा फेब्रुवारीपासूनच १२ तास पाणी असते.
जो पर्यंत आग घरापर्यन्त येउन पोचत नाही , लोकाना शेकोटीची मजा वाटतेच .

जिथे निसर्ग समानता ठेवत नाही तिथे समानतेचा टेंभा मिरवणारे आपण कोण??? >>
निसर्गाने समानता ठेवली आहेच. वरच्या भागत धरणे बांधुन खाल्च्या लोकसंख्येचे हक्काचे पाणी अडवण्याचा आगौपना मान्साने केलाय.

>>>> गवताच्या पेंढ्या होळीत टाकून भडका उडवायचा, <<<<
तिकडे जनावरे गुरेढोरे उपाशी मरताहेत, "चारा छावण्या" बंद केल्यानी, अन तुम्ही गवताचे भारे जाळणार?

(आता चारा छावण्या बंद करण्यामागची "कारणे" फारच वेगळी असणार.... तो विषय येथिल नाही)

एकंदर बातम्या आणि चित्रं बघून यावेळी जास्त पाणी वापरायला मन धजणार नाही.पाऊस चांगला नाही झाला तर जात्यात काय सुपात काय, सगळे तव्यावर येण्याची वेळ दूर नाही.
सोसायटीतल्या बायकांना (तसे आमचे थोबाड त्यांना सणावाराला आणि गणेशोत्सवालाच दिसते, बाकी वेळी आम्ही येईपर्यंत ते जेवणं होऊन शतपावलीच्या आणि झोपण्याच्या तयारीत असतात.) 'नैसर्गिक(किंवा स्वच्छ करायला सोपा) रंग वापरा' म्हणून बरेच सांगून झाले आहे(मागच्या दोन होळ्या बीट उकडून मॅश करुन त्याचा रंग बनवला होता पण तो बाकीच्यांनी लावलेल्या साध्या केमिकल रंगात मिसळून आणि दुर्धर मिश्रण तयार झाले, यावर्षी हा खटाटोप नाही.) सात्विक चे नैसर्गिक रंग मागवून ठेवलेत.तसे 'पाणी वापरायला नको. कोरडे रंग खेळू' हे दरवर्षी बायकांना पटत असतेच, पण एखादी न राहवून मगाने भसकन पाणी टाकून केसात रंग टाकतेच.

म्हणजे मुंबईत पाणीटंचाई आली म्हणून तुम्हाला त्याचे यंदा महत्त्व. वर इतर ठिकाणी (मराठवाडा) आयुष्यभर राहिलेल्या लोकांना पूर्वापार पाणीटंचाई माहीत आहे आणि होळी न खेळणे हा प्रमुख उपाय पण माहित आहे.

मी पहिल्या पोस्टमधे तेच सुचवले होते की एक मुख्य बीबी काढा - आली होळी, टाळा पाणी. त्या हेडर खाली वर्ष २०१०, २०११ ..... २०१६ असे दरवर्षी बीबी काढता येतील. कारण नेमेचि येते होळी आणि दरवर्षी (कोणाच ना कोणाची) नका खेळू होळी असतचं.

काही कृती संकेतात्मक , प्रतिकात्मक किंवा सह अनुभूती व्यक्त करण्यासाठी केल्या जातात. उदा . पाण्याने होळी न खेळणे.... याचा अर्थ त्यामुळे पाण्याची टंचाई दूर होईलच असा नाही. पण तुमच्या टंचाईत, दु:खात आम्ही सहभागी आहोत, आम्हास जाणिव आहे असा आहे.
मी पाण्याने होळी किंवा रंग खेळला नाही तर ते पाणी दुष्काळ ग्रस्त भागात पाठवता येते असा नाही. समाजाचा एक वर्ग होरपळत असतांना दु:खात असतांना , ज्या कारणाने ते होरपळत आहेत त्याचा अपव्यय न करता आपली सह वेदना आपण व्यक्त करत असतो. युध्द काळात सोमवारी सायंकाळचे जेवण सोडण्याचा संकल्प आपण भारतीयांनी शास्त्रीजींच्या नेतृत्वाखाली केला होता. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण त्यातील काही भाग वृध्दाश्रम्नासाठी खर्च केला तर तेथील व्यथा काही अंशी कमी होतात. एवढेच!
प्रत्येक गोष्ट्,कृती व्यवहाराच्या पलड्यात तोलता येत नाही.

लिम्बुभाऊ, सगळे मायबोलीकर तुमच्या नावाने शिमगा का करत असतात ते आत्ता तुमच्या या पोस्टमुळे कळले.:अरेरे::खोखो: तुमचा अनुल्लेख होऊ नये असे वाटत असेल तर निदान असल्या बीनबुडाच्या समर्थन वाल्या पोस्टी टाळा. ( हा आदेश नाही वा धमकी नाही तर फुकटचा सल्ला आहे.:फिदी:)

अहो मॅडम सुशिक्षीतपणाचे टेम्भे तर तुम्ही मिरवताय नाचुन. अहो या दुष्काळात होरपळुन तावुन सुलाखुन निघालोय. तुमच्या सारखे महानगरात बसुन कीबोर्ड फुकटचे बडवत नाही. जरा जाता का मराठवाड्यात? खानदेशात? विदर्भात? घ्या ना जरा बदली करुन घ्या. हवय कशाला बन्गलोर आणी पुण?

मी जन्माने, कर्माने पुणेरीच असल्याने असले खवचटच बोलणार.

ऋ, तु सगळं प्रामाणिकपणे कुठलाही आव न आणता लिहितोस ते आवडतं. Happy

रश्मी, 'पण लोकांना खरेच पाणी टंचाईची चिंता आहे की नाही ते तर कळू द्या.' ह्या प्रश्नाने तुम्ही का कावलात एवढ्या?
अगदी योग्य प्रश्न आहे हा.
सोलापुर का विदर्भात दुष्काळ पडलाय म्हणुन मुंबैइतल्या एकुण एक माणसाने चिंता वाटुन पाणी बचत सुरु केलीय असा गैरसमज नाही ना तुमचा.

मी कधीच होळी रंग खेळत नाही. ह्यावेळी मुलांनाही खेळु देणार नाहीये.
पाणी वाचवायला सुरुवात आधीच केलीये.
ऋ, शॉवर टु बादली आमच्याकडेपण. Happy

प्रत्येक गोष्टीला / कृतीला कार्यकरणभाव शोधायची गरज पडायला नको. मला वाटलं, मी केलं हे योग्य. आता मी केलं म्हणून जगाला शहाणपणा सांगणार हे कशाला?

मी कुठे म्हंटल, मी सुशिक्षीत आहे? आणि नाचताना मी कधिही वेब्कॅम ऑन ठेवत नाही, त्यामुळे इतरांना कसं काय कळलं असेल बरं माझं नृत्यनैपुण्य ? Happy

अहो या दुष्काळात होरपळुन तावुन सुलाखुन निघालोय-----मी जन्माने, कर्माने पुणेरीच असल्याने>>> ह्यालाच oxymoron / विरोधाभास म्हणत असावेत का?

रेव्यु, नाईस पोस्ट.

माझ्यामते फक्त एखादा टिळा लावावा रंगाचा आणि सगळ्यांनी जमुन गप्पा-गोष्टी कराव्यात. कोरडी होळी म्हणून अति रंग लावले तर परत पाणी लागणारच जास्त, आंघोळीला, कपडे धुवायला. अर्थात हे माझं वै. म.

नालासोपा-याला दहा वर्ष बरेच हाल काढलेत पाण्याचे आणि आता डोंबिवलीत प्यायचं पाणी एक दिवसा आड असलं तरी बोरींगचं पाणी भरपुर आहे घरात, त्यामुळे दोन्ही टोकं बघितली आहेत.

Pages