सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.
भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...
पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
सायली मस्त. डोंबिवलीत पण खूप
सायली मस्त. डोंबिवलीत पण खूप आहेत रेन ट्री. बहरतायेत आता.
रेन ट्री मस्त. म्हण्जेच शिरीष
रेन ट्री मस्त. म्हण्जेच शिरीष का?
नाही असं वाटतयं, मानुषी.
नाही असं वाटतयं, मानुषी. दोन्ही वेगवेगळे आहेत.
आता अशी होईल रंगांची होळी
आता अशी होईल रंगांची होळी निसर्गाची
From mayboli
आहाहा, आहाहा.
आहाहा, आहाहा.
चैत्रबहराचा मागोवा घेण्यासाठी
चैत्रबहराचा मागोवा घेण्यासाठी शनिवार दि.९ एप्रिल (महिन्यातील दुसरा शनिवार) रोजी राणीबाग गटग.
(शुक्रवार दि.८ एप्रिल रोजी गुढिपाडव्याची सुट्टी आणि दुसर्या दिवशी रविवार आहे. सो शनिवारी बहुतेक सगळ्यांनाच जमेल असा कयास आहे. )
सध्यातरी मी,साधना, नितीन, उजु फिक्स आहोत. बाकीच्यांनी सांगा.
साधारण प्लान असा असेलः
भल्या पहाटे ठिक ७ वाजता व्हिटी स्टेशनला भेटायचे. तेथुन नेव्ही नगरला सागर उपवनला जायचे. १० वाजेपर्यंत सागर उपवन (हे उदयान सकाळी ५ ते १० व संध्याकाळी ४ ते १० असे सुरू असते). तेथुन थेट राणीबागेत (साधारण १०:३० ते १०:४५ पर्यंत). राणीबागेत भटकंती, नंतर खादाडी आणि मग घरी (आपआपल्या).
ज्यांना भल्या पहाटे सागर उपवनला यायला जमणार नाही त्यांनी १० वाजता थेट राणीबागेत आले तरी चालेल.
हे कोण आहे ते सांगा.
हे कोण आहे ते सांगा. माझ्या ऑफीसच्या वाटेवर हे झाड आहे त्याचे नाव सांगा
फोटो मोबाईल मधे काढलेले आहेत त्यामुळे खास आलेले नाहीत, स मजुन घ्या.
स्निग्धा, तो पळस आहे
स्निग्धा, तो पळस आहे
तूम्हाला वेळ असेल तर कुलाबा
तूम्हाला वेळ असेल तर कुलाबा वूड्स या जंगलाला पण भेट देता येईल. हे जंगल हॉटेल प्रेसिडेंट, कफ परेडच्या जवळ आहे.
स्निग्धा, तो पळस आहे >> खरेच
स्निग्धा, तो पळस आहे >> खरेच दिनेशदा. मी आत्ताच गुगलून पण पाहिले. इतका गर्द पानांनी आणि फुलांनी एकाच वेळी बहरलेला पलाश पहिल्यांदाच पाहिल्याने ओळखताच आला नव्हता मला. जनरली या दिवसात बाहेरगावी कुठे गेलो तर दिसतो पण फक्त फुलंच दिसतात, ती पण दुरुन इतक्या जवळुन पहिल्यांदा दिसला. धन्यवाद दिनेशदा
>>रेन ट्री मस्त. म्हण्जेच
>>रेन ट्री मस्त. म्हण्जेच शिरीष का?>>
मानुषी,
नाही. शिरीषाची फुलं पोपटी रंगाची, रेनट्री सारखीच झुबकेदार असतात.
सध्या आमच्याइथे एन्डीए-पाषाण रस्त्यावर शिरीष वेड्यासारखे फुलले आहेत सगळा रस्ता घमघमतो आहे.
जमल्यास फोटो टाकेन.
ही. शिरीषाची फुलं पोपटी
ही. शिरीषाची फुलं पोपटी रंगाची, रेनट्री सारखीच झुबकेदार असतात.++१००
हेमा ताई मस्त फोटु
मध्यंतरी पळस खुप बहरला होता,
मध्यंतरी पळस खुप बहरला होता, गडद ,मोह्क रंग, येता जाता लक्ष वेधुन घेत होते...
या झाडावर खुप पोपट मनसोक्त बागडत होते, जणु काही प्रतिक्षेत होते कधी एकदाचा फाल्गुन येतो अन पळस बहरतो....:)
आता अवेळी पावसा मुळे बहर कमी झालाय..
मग काय रोजच फुले वेचुन आणायचे...
आणि एक तरी कोपरा सजवायचा....:)
वॉव सायु, कसला गोड दिसतोय
वॉव सायु, कसला गोड दिसतोय फ्लॉवर पॉट
जब जब मेरे घर आना तुम, फुल
जब जब मेरे घर आना तुम,
फुल पलाशके ले आना तुम,
इन फुलोमे प्यार छुपा है,
भुल ना इसको पाओगे तुम.
हे आठवलं अगदी.
माहेरी कोकणात घराजवळच झाड आहे त्यामुळे पळसाची पानं आम्ही कोरड्या वस्तु खायला वापरायचो. डोंगरावर जाताना बरोबर दडपे पोहे, चिवडा असं न्यायचो आणि पळसाची पानं बरोबर. झरा होता त्यामुळे पाणी घरुन न्यायला नाही लागायचं, मस्त बसून खायचो. रम्य ते बालपण.
वा सगळ्या पोस्ट मस्त. कालचा
वा सगळ्या पोस्ट मस्त.
कालचा चंद्र आणि रोहीणी
दोन तासांनंतर खाली आलेली रोहीणी
स्निग्धा, दिनेश ते पळस की
स्निग्धा, दिनेश ते पळस की अफ्रिकन ट्युलिप? पहिला फोटो पाहिल्यावर मला आफ्रिकन ट्युलिपच वाटला. पण दुसरा पळसासारखा वाटतो. पण पळस फुलताना सहसा पाने नसतात.
स्निग्धा पळसाला पाने तीन ह्या वरुन तुला परिक्षा करता येईल. ह्या लिंका पण जरा बघ.
http://www.flowersofindia.net/catalog/slides/African%20Tulip%20Tree.html
http://www.flowersofindia.net/catalog/slides/Flame%20of%20the%20Forest.html
सायु फ्लॉवरपॉट मस्त!! मागल्या पानावरचा पर्जन्यव्रुक्ष खुप सुन्दर! माझ्या खिडकीतुन सुद्धा सध्या दिसतोय... आणि पिम्पळाला कोवळी ताम्बुस पालवी येतेय!
राणीचा बाग गटग - मला यायचय पण एप्रिल २-३ पर्यन्त कन्फर्म करेन...
जागु मस्त फोटो.
जागु मस्त फोटो.
तो पळस पळस पळसच आहे vt220
तो पळस पळस पळसच आहे vt220
अमीर खुस्रोची एक रचना आहे....चैत्रबहराचं नर्णन करणारी ...ती आठवली:
सकलबन फूल रही सरसों।
अम्बवा फूटे, टेसू फूले, कोयल बोले डार-डार,
और गोरी करत सिंगार,
मलनियाँ गेंदवा ले आईं कर सों
(टेसू:पळस)
अन्जु ताई, काय मस्त ओळी आहेत
अन्जु ताई, काय मस्त ओळी आहेत गाण्याच्या..:)
जागु , खुप सुरेख फोटो...
का रोहीणीस वाटे, चंद्रासवे असावे
हे भावस्वप्न अपुरे साकार तू करावे..
प्रतिमा उरी धरोनी, मी प्रीतीगीत गावे
मला सुद्धा हे गाणं आठवल बघ....:)
क्या बात है, आदिजो.. बोहोत खुब!!!!!
अमीर खुसरो, मस्त रचना. सायली
अमीर खुसरो, मस्त रचना.
सायली मस्त आठवलं तुला.
सायली मी जुनियर कॉलेजमध्ये होते तेव्हा दुपारी 'पलाश के फुल' हि हिंदी सिरीयल लागायची, त्याचं टायटल song आहे ते. कमी भागांची फार गोड होती ती सिरीयल.
.
.
पळस पुराण मस्तच माझाच एक
पळस पुराण मस्तच
माझाच एक धागा आठवला
"Flame of the Forest" - किंशुक आणि परिभद्र
जिप्सी, मला तुच आठवलास पळस
जिप्सी, मला तुच आठवलास पळस बघितला तेव्हा. फक्त इथे लिहीलं नाही.
मस्त फोटो मानुषीताई, सुंदर
मस्त फोटो मानुषीताई, सुंदर झाड. झाडाचं नाव मात्र कोणी अरसिकाने ठेवलंय.
अरे फोटो कुठे गेले मा. ताई.
अरे फोटो कुठे गेले मा. ताई. टाका परत. माझी कमेंट फुकट जाईलना ;).
पळ्स पुराण मस्तच. सायु अदिजो
पळ्स पुराण मस्तच. सायु अदिजो अन्जू खूप गोड गाण्यांची आठवण करून दिलीत.
काल रस्त्यात भेटलेलं डॉगवुड चं झाड भेट्लं....इतकं सुंदर दिस्त होतं की फक्त गाडीतून फोटो काढून समाधान झालं नाही.
पण हा गाडीतून काढलेला.....मुरमुर्याचं झाड वाट्त ना?
हा फुलांचा क्लोजप
झाडाखालची रांगोळी....पाकळ्यांची.
अन्जू.....काहीतरी गड्बड झाली होती आणि एकच फुटु ४ वेळा आला होता.
जागू चंद्राचे फोटो मस्त.
जागु चंद्राचे फोटो मस्तच,
जागु चंद्राचे फोटो मस्तच, माझे सुद्धा हेच निरिक्षण चालू होते.
जिप्सी, पळस आणि परिभद्र -
जिप्सी,
पळस आणि परिभद्र - धागा फार छान आहे!
शांता शेळकेंच्या एका कवितेच्या ओळी:
गगनास गंध आला, मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी, जळत्या ज्वाला
मधुमास धुंद झाला !
आले वनावनांत सहकार मोहरून
भ्रमरास मंजिरीची चाहूल ये दुरून
भरला मरंद कोषी, भरला प्याला!
वेलीस अंकुरांची वलये किती सुरेख !
लिहितात अंगुलींनी वार्यात प्रेमलेख
संदेश प्रेमिकांना दुरुनी आला!
डॉगवूडची फुलं मस्तच! डॉगवुड,
डॉगवूडची फुलं मस्तच!
डॉगवुड, मॅग्नोलिया, आयर्नवूड अशी नावं वाचली की राम पटवर्धनांचं 'पाडस' आठवतं.
Pages