निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्जू अगं हीहीही म्हण्जे हसले गं मी. तू तगर कशी बरोब्बर ओळखलंस म्हणून.
सध्या खूप थंडी आहे इथे.कालपासून थोडं बरं आहे. तरी आम्ही पूर्ण पॅक होऊन (४ लेअर कपड्यांचे) बाहेर पड्ण्याचाप्रयतन करतो. तेव्हा जरा निसर्ग दिसतो.

मानुषी, अगदी निघता निघता तयार झालेला अव्हाकाडो सामानात घ्या आणि इथे आल्यावर रुजवा. ते झाड तसे काटक असते. गोव्याच्या उष्ण व दमट हवेत तसेच कुर्गच्या थंड हवेतही छान वाढते. तूमच्याकडेही नक्की वाढेल. पण त्याच्या पुढचा होणारा पसारा बघता ते जरा मोकळ्या जागेवर लावावे लागेल.

आणखी एक म्हणजे, कुत्र्याला अवाकाडो अजिबात खाऊ द्यायचा नाही. त्यांना तो बादतो.

थांकू थांकू मानुषीताई, तो लांब गाडीवर बर्फ दिसतोय, आणि अजून थोडा दुसरीकडे दिसतोय म्हणून ओळखलं.

वेका वर्षु...हॅप्पी स्प्रिन्ग यू टू.
ओह्ह...दिनेश ..... कुत्र्याला अव्हाकाडो बाधतो माहिती नव्हतं.

अन्जू....जिथे नवीन झाडं लाऊन लाल पिन्जर्‍याचं कुंपण (शिड्या..:डोमा:)आहे ....तिथला बोर्ड

K

शोभा वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा.

जिप्स्या फोटो मस्तच.

आदिजो धन्यवाद.

मानुषी केसर फुले मस्त.

व्वा मस्त धावतोय धागा, सगळ्या गप्पा प्र.ची. खुपच छान..
योगेशे , मानुषि ताई काय मस्त प्र.ची ..व्वा
गुलाबी बहावा , केशर फुले..क्या बात है!

मानुषी, काहि कुत्र्यांना ते बादू शकते. नेटवर उलटसुलट चर्चा आहे.
अवाकाडोची सावली घनदाट असते आणि पानगळही पूर्णपणे होत नाही. फळे कच्ची असताना कुणालाच खाण्यासारखी नसतात आणि पानेही बहुदा गुरे खाणार नाहीत.. ( त्यामूळे झाडाचे नुकसान होणार नाही ) या कारणासाठी अवाकाडोची लागवड व्हायला हवी.

ती केशर फुलं आहेत? गंमतच आहे. सहज रस्त्याकडेला मातीत नुसतीच फुलं दिसली म्हणून पाहिलं आणि फोटो घेतला.
आणि दिनेश अवाकाडोची माहिती इन्टरेस्टिन्ग.
काल आकाशखूप, क्लिअर होतं....खूप दिवसांनी

आहाहा.. सुपर लाईक फोटोज.. मानुषी..अगदी भरभरून एंजॉय करते आहेस ना.. Happy
चक्क केशर फुलं तुझ्या वाटेवर.. वॉव.. बघ बघ .. गुलबकावली चं फूल मिळतंय का Happy
अवाकाडो बद्दलची माहिती मस्तं ..
दिनेश घरी पोचलेला दिसत नाहीये अजून..

येस्स वर्षू......अजून तरी Wink संध्याकाळ्चे लॉन्ग वॉक चालू आहेत!
आणि सीझन बदलतोय ना....! अगं आणि केशरफुलांची गंमतच वाट्तीय. खाली मातीत आणि झाडावरही फारशी फुलं नाहीत कुठेच. त्यामुळे ही जमिनीवरची अगदी नजरेत भरली. माहिती नव्हतं ही केशरफुलं आहेत ते.
खरंच म्हणूनच इथे आलं की मस्त वाट्तं . कित्ती नवीन माहिती अचानक समोर येते.
आणि हो गुलबकावलीचं फूल मिळालं तर नक्की भेटू.....एकाच टाइम झोनात आहोत...:डोमा:

मानुषी,, तो फोटो लपवायला हवा. अशी वाटेवर केशराची फुले फुलतात असे लोकांना कळले तर....
फार काही नाही, केशराचे भाव तेवढे गडगडतील Happy

. माहिती नव्हतं ही केशरफुलं आहेत ते. खरंच म्हणूनच इथे आलं की मस्त वाट्तं . >> ती बहुतेक साधी क्रोकस फुलं असावीत. केशर Crocus sativus फुलांमधून मिळते.

पेन्सिल्व्हेनियाच्या काही काउंटीज मधे डच / फ्लेमिश सेटलमेंट्स आहेत. तिथली पारंपारिक शेतकरी कुटुंबे स्वतः च्या वापरासाठी Crocus sativus पेरतात . बाकी इथे आढळणारे सर्व क्रोकस genus मधल्या इतर species असतात.

स्निग्धा फोटु कीत्ती छान, माझाही वाढ दिवस आहे असे म्हणावेसे वाटते आहे... Lol Lol :

मानुषि ताई क्लास आलाय फोटो..

जगु खंड्या सुरेखच...

माझाही वाढ दिवस आहे असे म्हणावेसे वाटते आहे >>> कधी असतो तुझा वादि. असाच ताजा ताजा फोटु काढून तुलाही शुभेच्छा देईन Happy

Pages