सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.
भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...
पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मेधा धन्यवाद, मलाही फुले
मेधा धन्यवाद, मलाही फुले पाहिल्यावर केशरच आठवले होते. मला वाटले कुठेतरी केशर फार्ममध्ये घेतले असावेत फोटो.
बाकी सगळॅ फोटोही मस्त आहेत मानुषी.
आला आला वसंत ऋतु आला भुंड्या
आला आला वसंत ऋतु आला
भुंड्या खराट्यांना अचानकच रंगित धुमारे फुट्लेले दिसताहेत
मस्त, मस्त.
मस्त, मस्त.
माझ्या कडले अनंत फुलले...
माझ्या कडले अनंत फुलले...:) एकेरी आहे, सिंगल पाकळीचे..
काल संध्याकाळी फुलले, मस्त दरवळ....:)
(शास्त्रिय नाव, गार्डेनिया रेसिनिफेरा,कॉफी कुळातील आहे,माहिती साधना कडुन सभार..:)
मानुषि ताई, मस्त फोटु...
मानुषि ताई, मस्त फोटु... कुठली फुले आहेत? पांगारा का?
हे माझ्याकडे पण आहे सायु.
हे माझ्याकडे पण आहे सायु. डिकामेलीही म्हणतात याला.
काही महिन्यांपूर्वी काढलेला हा फोटो.
धन्स जागु, हो डीकेमाली नावाने
धन्स जागु, हो डीकेमाली नावाने शोधल्यावर दिसते आहे हे फुल...
काय सुरेख काढलाय फोटो, अगदी प्रोफेशनल सारखा...
डिकेमाली ना ? याची फांदी
डिकेमाली ना ? याची फांदी मोडल्यावर एक उग्र गंध येतो. काही दिवसांनी तिथे चीक जमा होऊन त्याचा गोळा बनतो. तो गोळा बाळघुटीत वापरतात. बहुदा पोटदुखीवर बहुतेक !
आणि हे खास सायुसाठी.. नॅचरल इकेबाना !!
फोटो मस्तच सर्व. सिंगल पाकळी
फोटो मस्तच सर्व.
सिंगल पाकळी अनंत मी पहिल्यांदाच बघतेय.
काल दुबईत गडगडासह पाऊस पडला.
काल दुबईत गडगडासह पाऊस पडला. रस्त्यावर पाणीच पाणी. संध्याकाळी ऑफिसमधून निघालेल्या लोकांच्या गाड्या सकाळपर्यंत घरी पोहोचल्या नव्हत्या. रात्री मेट्रोतून एक फेरी मारली तर सगळीकडची वाहतूक तूंबलेली दिसली.
आजही तूफान व्हायची शक्यता आहे. बर्याचश्या मेट्रो यार्डात उभ्या आहेत. रस्त्यावरचे पाणी अजून ओसरलेले नाही.
शेवटी काय, कितीही स्मार्ट सिटी असू द्या. निसर्गाच्या एका लहरीसमोर काही चालत नाही.
वॉव दिनेश दा ,मस्त कर्व्ह
वॉव दिनेश दा ,मस्त कर्व्ह टिपलायत...
फुले कीत्ती गोडुली गोडुली..:)
ओह डिकेमाली असे दिसते होय.
ओह डिकेमाली असे दिसते होय. लहान मुलाना दात येताना हिरड्यावर चोळतात ना?
डिकेमाली लहान मुलांना दात
डिकेमाली लहान मुलांना दात येताना चोळतात. बरोबर मृनीश.
सायु.....ही फुलं कसली आहेत माहिती नाही. पण स्प्रिन्ग सुरू झाला की हीच फुलं दिसतात आधी सगळीकडे.
मेधा....केशरफुलांच्या माहिती बद्दल धन्यवाद.
जागुले मस्त फोटो.
सगळ्यां चे फोटो आणि माहिती मस्त.
मानुषि ताई, मस्त फोटु...
मानुषि ताई, मस्त फोटु... कुठली फुले आहेत? पांगारा का? >>
वॉशिंग्टन डी सी भागात पांगारा असा बाहेर टिकणार नाही. बहुतेक मेपल चा फोटो असावा. नव्या डेव्हलपमेंट लावण्याकरता बिल्डर लोकांचा फेवरिट ( पक्षी, स्वस्तात, सहज मिळणारा ; बर्यापैएकी लवकर वाढणारा, डिसीझ रेझिस्टंट ) वृक्ष आहे .
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=CTR1oZimeAM
मानुषी साठी. अवाकाडो कसा लावायचा !!
थॅन्क्स दिनेश.... हे घरातलं
थॅन्क्स दिनेश....
हे घरातलं रोप पहाता असं वाट्तय की माझ्या जावयाने हाच व्हिडिओ बघूनच अव्हाकाडोचं रोप केलं असावं.
आणि हे कुन्डीत हलवलेलं
हा रस्त्याकडेचा गुलाबी बहर
आणि ही अशी बांबूची बेटं ही अनेक ठिकाणी दिसली. बहुतेक ग्रीनरी व ओव्हरऑल इकॉलॉजिकल बॅलन्ससाठी लावलेली असावीत.
सर्व फोटो मस्त आहेत. मी पण
सर्व फोटो मस्त आहेत. मी पण चार आठवड्यांपासून एक अवाकाडोचे बी रुजत ठेवले आहे.
फोटो मस्तच मानुषीताई. गुलाबी
फोटो मस्तच मानुषीताई. गुलाबी बहर सॉलिड.
बांबूचं बेट बघून कोकणातलं माहेरचं घर आठवलं, घरापासून जवळ आहे आमचं बांबूचं बन.
या धाग्यावर आलं की सगळा ताण
या धाग्यावर आलं की सगळा ताण निघून जातो. धन्यवाद सर्वांना.
मानुषीताई तिसरं प्रचि कशाचं आहे? गुलाबी गुलाबी दिसतय.
संशोधक खरं म्हणजे अगदी
संशोधक खरं म्हणजे अगदी नेहेमीची झाडं आहेत पण नाव नाही माहिती.
रोजच्या वॉकच्या वाटेवरची हरणं
कसले काँटीनेंटल फोटो टाकतेयस
कसले काँटीनेंटल फोटो टाकतेयस गं मानुषी एवढ्यात.. मस्तच..
ती हरण तुला बघुन घाबरलीए का गं.. म्हणली असेल हि नवीच दिसतेय.. मग दुसरीन पन मान उंचावून बघितल असेल.. मग एका सुरात हो गं नवीनचे म्हटली असणार
टिने
टिने
वा मानुषीताई, लकी हा. रोजच्या
वा मानुषीताई, लकी हा. रोजच्या वाटेवर छान छान दोस्त लोक्स दर्शन देतात.
हो अन्जू...या पार्कमधे एक
हो अन्जू...या पार्कमधे एक प्रचन्ड मोठा जॉगिन्ग वॉकिन्ग ट्रॅक आहे. तिथे ही दोस्त मंड्ळी स्प्रिन्गमधे दर्शन देतात.
टोळ्या किंवा कुटुंब एकत्र फिरतात. आणि माण्सांची अस्तित्वाची जाणीव त्यांना झाली की एकदा नजरेला नजर देतात आणि पाठ फिरवून चालू लागतात. ते उलटे वळले की एकदम रंगच पालटतो सगळा. कारण त्यांच्या झुबकेदार पांढरट शेपट्या!
Aaahhh... Invaders अस म्हणून
Aaahhh... Invaders अस म्हणून रोजचच आहे हे असा तुच्छ कटाक्ष टाकून निघुन जात असतील हे..
बर आहे प्राण्यांना सगळ काही माझ आणि माझ्याच्पुरतं अस म्हणायची खोड नाही..
वा मानुषी, कसली किरकोळीत हरणं
वा मानुषी, कसली किरकोळीत हरणं दिसताहेत तुला !! आणि तीही दररोजच्या चालण्यात ?? मज्जा आहे बुवा.
आमच्या गच्चीतुन
आमच्या गच्चीतुन नजारा...
मानुषि ताई,एक से बढ कर एक प्र.ची..
He kasle zad ahe saayu
He kasle zad ahe saayu
देवकी पर्जन्य वृक्ष आहे ते..
देवकी पर्जन्य वृक्ष आहे ते.. rain tree ..:)
मानुषी तुझ्यामूळे अमेरिकेतला
मानुषी तुझ्यामूळे अमेरिकेतला वसंत ऋतु पहायला मिळतोय आम्हाला.
सायु, रेन ट्री मस्त दिसतोय. मुंबईत ही आता बहरलेला रेन ट्री दिसु लागला आहे.
Pages