सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.
भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...
पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
हो हेमाताई .मखमली फुल.,
हो हेमाताई .मखमली फुल., शाल्मली नाव सार्थ वाटतं अगदी गोड.
टोपली कारवी मस्त.
शोभा , तुला वाढदिवसाच्या
शोभा , तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.......
शोभा, वाढदिवसाच्या खूप खूप
शोभा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
From mayboli
हॅप्पी बड्डे शोभा(ज्जी) !!!
हॅप्पी बड्डे शोभा(ज्जी) !!!
fiddle leaf fig
fiddle leaf fig tree
इन्डोअर् प्लान्ट्स
मानुषी, मस्त फोटो. इनडोअर
मानुषी, मस्त फोटो. इनडोअर असुन काय तजेलदार आणि रसरशीत दिसतायत झाडं.
वाह मस्तच... एखाद फुल
वाह मस्तच...
एखाद फुल वाढदिवसाच्या दिवशी मला पन वाहलं असत तर गार्डन आटले असते का तुमचे .. जा बा मी नै
एखाद फुल वाढदिवसाच्या दिवशी
एखाद फुल वाढदिवसाच्या दिवशी मला पन वाहलं >>>>एकच कशाला? गुलाबाचा अख्खा बुके घे की
Belated Happy Birthday, Tina
वाढदिवसाच्या हार्दिक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, शोभा!!!
वाढदिवसाच्या हार्दिक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, शोभा!
बीलेटेड हॅपी बर्थडे टीनातै!
मानुषी, मस्त फोटो. इनडोअर
मानुषी, मस्त फोटो. इनडोअर असुन काय तजेलदार आणि रसरशीत दिसतायत झाडं.>>>> +१
जागू, मागच्या पानावर तू
जागू,
मागच्या पानावर तू टाकलेले पिवळ्या-नारिंगी फळांचे झाड:
हा काजरा किंवा कुचला आहे. अश्विनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष. strychnos nux-vomica
फळे विषारी असतात. मी मागे कधीतरी याबद्दल लिहिलं होतं इथे.
याच्या पानांवर देठापासून तीन शिरा फुटलेल्या दिसतात.
इनडोअर प्लांट्स कसली रसरशीत
इनडोअर प्लांट्स कसली रसरशीत दिसतायत!
जबरदस्ती मागितलेल्या शुभेच्छा
जबरदस्ती मागितलेल्या शुभेच्छा
मस्त फुलं जिप्सी..
ठांकु सर्वांना
सर्वांना शुभेच्छांबद्दल
सर्वांना शुभेच्छांबद्दल धन्यवाद!
वर्षू, ममो., जिप्सी मस्त
वर्षू, ममो., जिप्सी मस्त फ़ुलं.
टीने, वेरी वेरी साॅरी ग.
टीने, वेरी वेरी साॅरी ग. पण वाॅ. अॅ. दिल्या मुळे लक्षात नाही ग आलं.
पण तरीही आता देते वादिहाशु.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/57835
मंडळी, माझी रिक्षा. वाचा नक्की आवडेल.
शोभा, टीना, बिलेटेड वादिहाशु
शोभा, टीना, बिलेटेड वादिहाशु
मॅगी धन्यवाद! टीना,
मॅगी धन्यवाद!
टीना, वादिहाशु.
काजरा आणि कुचला.. अगदी बदनाम
काजरा आणि कुचला.. अगदी बदनाम वृक्ष.. पण मला वाटतं यावर काही प्रक्रिया करून आयूर्वेदात औषधे बनवली आहेत.
टीना तुझापण बड्डे होता का.
टीना तुझापण बड्डे होता का. तुलापण खुप खुप शुभेच्छा.
शोभा, टीना, बिलेटेड वा दि हा
शोभा, टीना, बिलेटेड वा दि हा शु ......
with Love from Uran खाज
with Love from Uran
खाज कुयरी
टिने वादिहाशु....तिकडे फेबु
टिने वादिहाशु....तिकडे फेबु वर दिल्या आहेत बघ. आता इथे फुलं देते. घरची नाही पण दारची....
शोभा आणी टिनाला वादिहाशु!
ही फुलं शोभासाठी
ही फुलं शोभासाठी
मानुषी, थांकु थांकु.
मानुषी, थांकु थांकु.
जिप्स्या, २ नंबरची कसली फळं आहेत? ओळखीची वाटतायत.
दिनेश आपण बोलत होतो आठवतंय
दिनेश
आपण बोलत होतो आठवतंय का? अव्हाकाडोच्या बीया भारतात नेऊन रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे....
इथे मी खूप अव्हाकाडो हाण्ते.
तर जावयाने अव्हाकाडोच्या बीया रीतसर रुजवून छान रोपं केली आहेत. माझ्या इन्डोअर प्लान्ट्सच्या पहिल्या फोटोत उजव्या बाजूला कुन्डीत अव्हाकाडोचं रोप दिसतय पहा.
या वेळी नक्की बीया आणणार आहे.
दारातली तगरी पाहिली का कशी फुललीये?
वॉकिन्ग ट्रेल
मस्त फोटो. बर्फतगर सुरेख . ते
मस्त फोटो. बर्फतगर सुरेख ;).
ते तिस-या फोटोत लाल शिड्या, काय ते कळत नाहीये.
अन्जू.....यू आर म्हण्जे ना
अन्जू.....यू आर म्हण्जे ना अगदी ....हीहीहीही!
तगरी बरोब्बर ओळखलीस. अगं त्या लाल शिड्या नाहीत. तिथे नवीन रोपं लावलीत त्याला लाल पिंजरे केलेत.
Pages