सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.
भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...
पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
दिनेशदा, दोन्ही प्रचि
दिनेशदा, दोन्ही प्रचि सुपर्ब...
जागू ताई खंड्या+खेकडा मस्त
फोटो मस्तं भारीये.. गूढ,
फोटो मस्तं भारीये.. गूढ, गंभीर, थंड , चिडीचूप वातावरण जाणवतंय अगदी!!!>>>>+१. सगळ्यांचे फोटो मस्त मस्त.
एखादी चक्कर आपल्या बागेत पण
एखादी चक्कर आपल्या बागेत पण मारत जा...>>>>>>>>
येस्स बॉस्स!
निरु, काय मस्त फोटो... टिने,
निरु, काय मस्त फोटो...
टिने, सासर परदेशातलं मिळाल तर माहेरी यायला तरसशील.. आमच्यासारखे. आपला देश बरा गं, फिरायला जावं अधून मधून परदेशी किंवा आपल्याच देशातल्या अनोळखी प्रदेशी !!!
( बतासिया लूप, दार्जीलिंग )
दिनेश, दार्जिलिंग च्या
दिनेश, दार्जिलिंग च्या सविस्तर वर्णनाची वाट पाहतोय .. + फोटोंची सुद्धा अर्थातच!!
दिनेशदा, मी कुठला फोटो नाही
दिनेशदा, मी कुठला फोटो नाही टाकलाय इथे....
निरु आणि जागू सॉरी, पक्ष्याचे
निरु आणि जागू सॉरी, पक्ष्याचे एवढे नेमके फोटो म्हंटलं....
जागूला अंडर एस्टीमेट केले म्हणायचे मी !!
फोटोला वेळ लागेल बराच.. पण
फोटोला वेळ लागेल बराच.. पण आम्ही जरा चुकीची वेळ निवडली होती.. अजून धुके निवळायचे होते.
टिने, सासर परदेशातलं मिळाल तर
टिने, सासर परदेशातलं मिळाल तर माहेरी यायला तरसशील.. आमच्यासारखे. आपला देश बरा गं, फिरायला जावं अधून मधून परदेशी किंवा आपल्याच देशातल्या अनोळखी प्रदेशी !!!>>> +१००
पुणे, सहकारनगर २, शेवटचा
पुणे, सहकारनगर २, शेवटचा बसस्टाॅप — शेविंग ब्रश फुलायला लागलाय....
आमच्या कुंडीतले टोमाटो .
आमच्या कुंडीतले टोमाटो . हुश्श काढले फोटो नवऱ्याच्या मदतीने, मोबाईलवरून. गोड मानून घ्या.
अंजू, क्या बात है. फार
अंजू, क्या बात है. फार सुंदर.
ओहह हेमाताई, थांकु. आपकी
ओहह हेमाताई, थांकु. आपकी आज्ञा कैसे टाल सकते है ;).
कोलाज नव-याने करुन दिलं, मी करायला सांगितलं. त्याने पण पहील्यांदाच केलं कोलाज.
अंजू, काल रात्री पाहिले
अंजू, काल रात्री पाहिले तेव्हा खूप रात्र झाली होती म्हणुन थोडक्यात लिहीलं नाहीतर तेव्हाच लिहायचं होतं की मी सांगितलेलं लक्षात ठेऊन फोटो टाकलेस ते खूप आवडलं कोलाज मस्त जमलयं
ह्या टोमॅटोंची चव अप्रतिम असणार आणि ते रोज थोडे थोडे मोठे होताना पहाण्याचा आनंद तर अतुलनीय !!!
अंजू — टोमॅटो मस्त
अंजू — टोमॅटो मस्त दिसताहेत...
अंजू, टोमॅटो मस्त
अंजू, टोमॅटो मस्त दिसतायत.
शशांक, शेविंग ब्रशचे प्रचि टाका ना..
अंजू, क्या बात है. फार
अंजू, क्या बात है. फार सुंदर.>>> अगदी अगदी.
थांकू थांकू सर्वाना. ते जास्त
थांकू थांकू सर्वाना. ते जास्त मोठे नाहीयेत, एक करंगळीएवढा आणि एक त्यापेक्षा लहान. फार काळजी घेता येत नाही मला कुंडीतील झाडांची, त्यामुळे असं कोणी माझ्यावर खुश होऊन बहरलं की फार कौतुक वाटतं.
कौतुक नव-याकडे पोचवते.
वर्षुताईनी पण सांगितलं होतं
वर्षुताईनी पण सांगितलं होतं फोटो टाकायला. त्यांचीपण आठवण आली मला. दिनेशदा ह्यांनी सांगितल्याप्रमाणे टोमाटो झाडावरून काढले आता आणि बाहेरच ठेवलेत पिकवायला.
शशांकजी तुमच्या बागेतल्या टोमाटोचे फोटो हवेत. छान वाटेल बघायला.
अन्जू, हेल्दी आहेत
अन्जू, हेल्दी आहेत टोमॅटो.
दार्जीलींगला जाताना वाटेत कुरसाँग या गावी चहा प्यायला थांबलो होतो. तिथून टिपलेला फोटो. सातपुड्याच्या उत्तरेला गेलो कि झाडांची उंची आपल्या टोप्या खाली पाडते. या फोटोत नीट बघा, दोन झाडांच्या मधे पूर्ण सूर्यबिंब आहे आणि मग त्यावरुन झाडाच्या उंचीची कल्पना करा..
अंजू.. फारच क्यूट आहेत तुझे
अंजू.. फारच क्यूट आहेत तुझे हेल्दी टोमॅटोज.. फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद, आणी कोलाज पण मस्तं जमलंय
अबब!!!!!!!!!!! केव्हढी उंच झाडं.. इतकी उंच ताडमाड फक्त देवदारच असतात असं वाटायचं .. पण ही काही वेगळीच आहेत.
वर्षू, महाराष्ट्रात सगळीकडे
वर्षू, महाराष्ट्रात सगळीकडे कातळ, म्हणून बहुदा झाडे एवढी वाढत नाहीत. तिकडे तर नेहमीची अर्जून, पळस झाडेही अशी ताडमाड वाढलेली दिसली.
ओह ओक्के.. अजून किती दिवस
ओह ओक्के.. अजून किती दिवस मुक्काम आहे तुझा भारतात??
मी सध्या दुबईत.. ऑफिशियल
मी सध्या दुबईत.. ऑफिशियल व्हीजीट !!!
थांकु, थांकु. दिनेशदा कसलं
थांकु, थांकु.
दिनेशदा कसलं उंच आहे ते झाड, नाव काय? फोटो सॉलीड आहे. सुर्यबिंब क्लासंच, क्युट.
अन्जू.. मस्त टमाटे हं.. उंचच
अन्जू.. मस्त टमाटे हं..
उंचच उंच झाडे सुद्धा मस्तच दा..
आज पळसाची फुले वेचुन
आज पळसाची फुले वेचुन आणलेली...:)
वा मस्त धावतोय धागा,
दिनेश दा मस्त फोटो....
अन्जु ताई कसले गोडुले , गोडुले टोमाटो लागलेत तुझ्या कडे..फोटु मस्तच...
पिवळ्या जास्वंदीचे पहिले
पिवळ्या जास्वंदीचे पहिले वहिले फुल... (कळ्या लागलेलेच रोप आणलेले :डोमा:)
https://lh3.googleusercontent.com/-l4NR2Q7TdCg/VtPlofTR5WI/AAAAAAAABrA/S..." height="800" width="600" /
चेंडु-फळी.... (नाव शांकली
चेंडु-फळी.... (नाव शांकली कडुन सभार...:)
इथल्या गप्पा नेहमी वाचते, पण
इथल्या गप्पा नेहमी वाचते, पण आज पहिल्यांदाच इथे लिहिते आहे.. मी विदर्भात, नागपुरमधे नवीन राहायला आले आहे.. इथे आमची छान टुमदार बाग़ आहे. तिला इथल्या गप्पान्च्या सहाय्याने अजुन फुलवायचा विचार आहे. तर, माझा पहिलाच प्रश्न.. मी इथे मुंबईहुन दोन सोनचाफ्याची झाडे आणली आहेत. इथे सोनचाफा अगदीच दुर्मिळ दिसतो आहे. महिन्याभरातच एक झाड़ (मोठ्या कुंडीत लावलेले) सुकलेले दिसते आहे. दूसरे (जमिनीत लावलेले) अजुन हिरवे आहे पण १-२ फांद्या सुकल्या आहेत. त्यांची मी कशी काळजी घेऊ? त्यानी इथे रुजुन बहरण्यासाठी काय करू?
अजुन एक, पुदीन्याचा जुडितला पुदीना कुंडीत लावला तर रूजेल का? पुदीना कसा लावतात?
Pages