Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पोप बद्दल रिॲक्शन प्रेस मध्ये
पोप बद्दल रिॲक्शन प्रेस मध्ये रिलिज झाले
jebbush.com ची साईट ट्रम्प च्या साईट वर घेउन जाते. (ट्रम्प ने हे डोमेन नेम विकत घेतले आहे असे वाटते)
jebbush.com ची साईट ट्रम्प
jebbush.com ची साईट ट्रम्प च्या साईट वर घेउन जाते. >>>
आयला खरंच! अब रातको जमके
आयला खरंच! अब रातको जमके आतिशबाजी होगी...
(No subject)
ट्रम्प आता पोप बद्दलच बोलला
ट्रम्प आता पोप बद्दलच बोलला म्हणजे लाईन क्रॉस केली की नाही ते कळेल :).
रुबियो ने 'टाउन हॉल' मीटिंग्ज ठेवल्या आहेत, ज्याच्यात लोकांना प्रश्न विचारायची संधी मिळणार नाही
तिकडे एमएसएनबीसी ने ट्रम्प ला एकदम सॉफ्ट प्रश्न विचारले म्हणे. म्हणजे त्याची इमेज चांगली करून इतर रिपब्लिकन कॅण्डिडेट्स ची पंचाईत करायचा प्लॉय असेल
बाय द वे आज फॉक्स वर केली
बाय द वे आज फॉक्स वर केली फाईल्स मधे रुबियो व कार्सन, तर हॅनिटी मधे ट्रम्प आणि केसिक आहेत.
>>हे डोमेन नेम विकत घेतले आहे
>>हे डोमेन नेम विकत घेतले आहे असे वाटते)>> मी रेडिओवर ऐकलं ट्रम्पने ते डोमेन विकत घेतल्याबद्दल.
कालच्या दैनिक सकाळच्या पैलतीर
कालच्या दैनिक सकाळच्या पैलतीर या सदरामधे दोन्ही पक्षाच्या उमेदवारान्ची ओळख वाचली त्यात जे वाचले ते लिहित आहे. १) ज्युदैसम हा धर्म नसुन भावना आहे. व २) हिलरी क्लिन्तन या पारशी आहेत. याविशयि तुमचे मत घेण्यासाठी हा प्रयत्न.
वॅटिकन सिटी इटसेल्फ इज
वॅटिकन सिटी इटसेल्फ इज सराउंडेड बाय ए बिग टाॅल वाॅल - पोपचा पोपट होइल का?
पोप हा नसती बडबड करत आहे.
पोप हा नसती बडबड करत आहे. त्याने देव, अध्यात्म, मुक्ती वगैरे बघावे. इतर देशाच्या सीमा, देशात येण्याजाण्यावर असणारी बंधने ह्यावर समालोचन करायची गरज नाही. अमेरिका हा देश तत्त्वतः धर्म आणि सरकार वेगळे ठेवण्यावर विश्वास ठेवतो त्यामुळे अमके कायदे केले आणि पाळले तर तो ख्रिस्ती नाहीच असे म्हणण्याची काय गरज आहे? उद्या कुणी ज्यू, मुस्लिम वा अन्य धर्मीय राष्ट्राध्यक्ष झाला तर पोपाची हिंमत होईल का असे म्हणायची?
पोपने आपली नेहमीची पोपटपंची करावी सवंग लोकप्रियतेसाठी अमेरिकन राजकारणात काड्या सारू नयेत. असे माझे मत.
पोप ने नक्कि काय म्हणाला ते
पोप ने नक्कि काय म्हणाला ते कुठे वाचायला मिळेल?
पोप ने नक्कि काय म्हणाला ते
पोप ने नक्कि काय म्हणाला ते वाचायला स्पॅनिश पेपर / साईट वर जावे लागेल. बाकी सगळीकडे भाषांतर मिळेल त्यात थोडाफार फरक असेल. पोपनी जो माणुस भिंत बाधेल त्या माणसाच्या धर्मावर शंका घेतली आहे.
कालची कसिक ची टाउन हॉल मिटींग आवड्ली. कोणावर आरोप नाही, देशाची ईकोनोमी कशी सुधारावी ह्यावर जास्त भर. ( त्याचा राज्यात राहात असल्याने , मुलगा त्याने शिकलेल्या युनिवर्सिटी मध्ये जात असल्याने आणि त्याने त्या युनिवर्सिटी ची फी जो पर्यन्त गवर्नर आहे तो पर्यन्त वाढवणार नसल्याने कदाचित माझे मत बायस असु शकते)
रमा, गूगल वर "what did pope"
रमा, गूगल वर "what did pope" एवढे टाईप केलेस तर ट्रम्प च्या बातमीबद्दलचेच सजेशन्स येतील :). पण त्यातले बहुतेक ट्रम्प च्या प्रतिक्रियांबद्दल आहेत. मी एनपीआर ची वाचली
http://www.npr.org/2016/02/18/467229313/pope-says-trump-is-not-christian
केसिक चा कॅम्पेन अॅडव्हायझर काय करत आहे कल्पना नाही. या सगळ्या रॉट मधे एक रिझनेबल उमेदवार म्ह्णून उठून दिसायची चांगली संधी आहे त्याला. रिपब्लिकन एटॅब्लिशमेण्ट, फायनान्सर्स शोधत आहेत कोणी नॉर्मल उमेदवार आहे का म्ह्णून (बुश चे फायनान्सर कुंपणावर आहेत म्हणे सध्या - १ मार्च च्या प्रायमरीज होईपर्यंत, असे वाचले).
सध्या त्याची इमेज आजूबाजूला भांडणे चालू असताना हताशपणे त्यावर कॉमेण्ट करणार्या एखाद्या व्यक्तीची वाटते. त्यात त्याची स्वतःची मते ते 'मी ओहयो मधे बजेट बॅलन्स केले व रीचिंग अॅक्रॉस द टेबल' च्या पुढे लक्षात राहात नाहीत.
जरा फर्म्/अॅसर्टिव्ह इमेज, थोडा चार्म कोठून्तरी पैदा केला व रिपब्लिकन पार्टीला आपणच मूळ रूपात परत आणू शकतो - कॉन्झर्वेटिवनेस (? योग्य शब्द आठवला नाही), टॅक्स बद्दलची मते वगैरे आपण बाकी इतर उमेदवारांसारखी भंकस न करता राबवू शकतो, आणि त्याचबरोबर ओबामा सरकारवर माफक टीका ई केले तर इतरांच्यात तो उठून दिसेल असे उगागच वाटते.
बाय द वे, निकी हेलीला म्हणे
बाय द वे, निकी हेलीला म्हणे व्हाईस प्रेसिडेण्ट साठी खूप चान्सेस आहेत. तिने रुबिओ ला पाठिंबा देऊन सुद्धा बाकीचे लोक तिच्यावर टीका करायचे टाळत आहेत. अर्थात २० तारखेची साउथ कॅरोलिना ची प्रायमरी झाल्यावर हे बदलू शकेल. पण एकूण पार्टीमधे तिचे स्थान जबरी दिसते. तिच्याबद्दल वाचले तर गेल्या १०-१२ वर्षात बरीच मजल मारली आहेत तिने. त्यात मूळ भारतीय वंशाची असल्याने जास्त कुतूहल.
पोप ची कमेन्ट आश्चर्यकारक
पोप ची कमेन्ट आश्चर्यकारक होती
ट्रम्प ने प्रत्यक्ष पोप बद्दल डिसग्रेस्फुल वगैरे म्हटल्याने त्याच्या रेटिंग्ज मधे किती फरक पडतो हे बघणे इन्टरेस्टिंग असेल!! विशेषतः या पोप ची पॉप्युलॅरिटी बरीच आहे. माझ्या हपिसात फिली एरियातून येणारे एक दोन टिपिकल कॉन्झर्वेटिव कलिग्ज "दॅट्स इट ! इट्स ऑफिश्यल नाउ ,नो ट्रम्प " असे म्हणाले. 

बाकी "व्हॅटिकन ला पण वॉल्स आहेत" ही कमेन्ट ऐकून खरंच हसू आलं
अमेरिकेत कॅथालिक लोक जास्त
अमेरिकेत कॅथालिक लोक जास्त न्यु जर्सी, फिली या राज्यात आहेत. तिथे ट्रम्पच्या वक्तव्याचा थोडाफार परिणाम होइल. मात्र मिडवेस्ट, वेस्ट व दक्षिणेत कॅथालिक फारसे नाहीत. बर्याच लोकांची मुळे प्रोटेस्टंट/न्यु एज ख्रिश्च्नैटी मध्ये आहेत. त्यांना पोपवर केलेल्या टिकेचा फार फरक पडणार नाही. उलट हे लोक कॅथॉलिकांची यथेच्च्छ टिंगल करत असतात.
व्हॅटिकन ला पण वॉल्स आहेत" >>
व्हॅटिकन ला पण वॉल्स आहेत" >>
हे कोण म्हणालं? ट्रम्प का? टायमिंगचा फॅन होणारे मी त्याच्या.
हो अमित. तो पुढे म्हणाला
हो अमित. तो पुढे म्हणाला त्याचा भावार्थ तिथल्या वॉलमधून जसं लोकं लिगली जातयेत असतात तसंच या वॉलमधून आम्ही लिगली माणसाना ये-जा करायला देऊ.
खरं या विषयावर तरी एकंदरित पोपबद्द्ल बराच आदर बाळगून ट्रंम्प बोलला असं वाटतं. त्याचा कुणीएअॅडवायजर असेल त्याने बरंच शांत करून पाठवलं असणार त्याला. मला ती कमेंट सीएनेनच्या अँडरसनने सांगितली तशी कळली असेल तर या कमेंटचं पोपला काय प्रयोजन ते कळलंच नाही. म्हणजे हेच विधान आपल्या जम्मु-कश्मीरबाबत अमेरिका वगैरे करत असेल तर आपल्याला तो इतिहास्/तिथली परिस्थिती माहित असल्यामुळे कसं दुसर्^याने नाक घातल्यासारखं वाटेल तसं.
फारेण्डची एनपिआरची लिंक नंतर पाहाते.
>>एकंदरित पोपबद्द्ल बराच आदर
>>एकंदरित पोपबद्द्ल बराच आदर बाळगून ट्रंम्प बोलला असं वाटतं. <<
करेक्ट. हुम टु पिकअप इन ए फाइट, याचं शहाणपण त्याला आलंय...
पोप जे बोलला ते मिडियाने
पोप जे बोलला ते मिडियाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून होतं.
त्याने देव, अध्यात्म, मुक्ती वगैरे बघावे. इतर देशाच्या सीमा, देशात येण्याजाण्यावर असणारी बंधने ह्यावर समालोचन करायची गरज नाही. अमेरिका हा देश तत्त्वतः धर्म आणि सरकार वेगळे ठेवण्यावर विश्वास ठेवतो त्यामुळे अमके कायदे केले आणि पाळले तर तो ख्रिस्ती नाहीच असे म्हणण्याची काय गरज आहे? उद्या कुणी ज्यू, मुस्लिम वा अन्य धर्मीय राष्ट्राध्यक्ष झाला तर पोपाची हिंमत होईल का असे म्हणायची?
>>> हे वरचं पटलं मला. शिवाय ट्रंप जे म्हणाला की व्हॅटिकनला पण तकिवॉल आहे हे फारच पटलं.
>>>>> हे वरचं पटलं मला. शिवाय
>>>>> हे वरचं पटलं मला. शिवाय ट्रंप जे म्हणाला की व्हॅटिकनला पण तकिवॉल आहे हे फारच पटलं.
शूम्पे, हे न्यूयॉर्कटाइम्स आर्टिकल वाच.. In Defense of Trump, Some Point (Wrongly) to Vatican Walls
मी एक अज्ञानी प्रश्न विचारू
मी एक अज्ञानी प्रश्न विचारू का?
वॉल्स (म्हणजे कुंपणाच्या भिंती - लाकडी, किंवा इतर) आपल्या घरांभोवतीही असतात ..
ह्या सगळ्या वॉल्स (इन्क्लुडींग ट्रम्प ला अमेरिका आणि मेक्सिको मध्ये बांधायची आहे ती भिंत) ह्या सगळ्या कम्पेरेबल आहेत का त्यावरून एकमेकांनां टोमणे मारायला आणि त्यावर इतकी हाईप क्रिएट करायला?
ट्रंप जी भिंत बांधायचे म्हणतो
ट्रंप जी भिंत बांधायचे म्हणतो आहे (हे प्रत्यक्षात कितपत येईल याबद्दल मी साशंक आहे) ती बेकायदा घुसखोरी थांबवण्याकरता आहे. कायदेशीर स्थलांतराला त्याची ना नाही. हे त्याने स्पष्ट केले असतानाही त्याला वर्णद्वेष्टा वगैरे शिव्या दिल्या जातात. आणि माध्यमांच्या ह्या बदनामीला बहुतेक लोक बळी पडतात. खरे तर बहुतांश अमेरिकास्थित भारतीय एच १, ग्रीनकार्ड वगैरे दीर्घकाळ चालणार्या सोपस्कारांच्या अग्निदिव्यातून गेलेले असतात त्यामुळे ह्या देशात कायदेशीर स्थलांतराकरता काटेकोर नियम आहेत हे आपल्याला व्यवस्थित माहित असते तरी मेक्सिकन घुसखोरांना ते नियम डावलून सहज नागरिकत्व देण्याला ते पाठिंबा का देतात ते अनाकलनीय आहे.
तुम्हाला खरोखर बेकायदा घुसखोरीला मान्यता द्यायची असेल तर अमेरिकेच्या सीमा कायदेशीररित्या खुल्या कराव्यात. ज्याला यायचे असेल त्याला दार कायम उघडे! पण जर अमेरिका प्रवेशाकरता असणारे कायदे तुम्हाला मान्य असतील तर बेकायदा घुसखोरीकडे काणाडोळा करुन त्याला उदारपणाचे कवच घालणे हा ढोंगीपणा आहे. भविष्यात कधी कुणी अतिरेकी जर मेक्सिकोद्वारा अमेरिकेत घुसला आणि काही कारवाया केल्या तर हाहा:कार उडेल. तो उडायची वाट न बघता आधीच ह्याला प्रतिबंध घालता आला तर जास्त बरे नाही का?
पोप जे म्हणाला ते थोड्या
पोप जे म्हणाला ते थोड्या फिलॉसॉफिकल दृष्टीकोनातून पहायला हवे. त्याचे म्हणणे आहे की समाजाला जोडण्याऐवजी जो असा मध्येच भिंती बांधून कुटूंबांना तोडतो आहे तो येशूच्या प्रेमाच्या मूळ संदेशानुसार वागत नाहीये.
खरे तर बहुतांश भारतीय एच १,
खरे तर बहुतांश भारतीय एच १, ग्रीनकार्ड वगैरे दीर्घकाळ चालणार्या सोपस्कारांच्या अग्निदिव्यातून गेलेले असतात >> हे वाक्य बहुतांश मायबोलीवरचे भारतीय करणार का?
>>हे वाक्य बहुतांश
>>हे वाक्य बहुतांश मायबोलीवरचे भारतीय करणार का?
योग्य तो बदल केला आहे. धन्यवाद!
अमित, मायबोलीवरचे बहुतांश
अमित, मायबोलीवरचे बहुतांश भारतीय म्हणायचंय ना?
हो हो. हा जोक पकडणे हे
Donald J. Trump ✔
Donald J. Trump ✔ @realDonaldTrump
Boycott all Apple products until such time as Apple gives cellphone info to authorities regarding radical Islamic terrorist couple from Cal
4:38 PM - 19 Feb 2016
हा भाऊ कशावरही मत ठोकून देतो का?
आणि पूर्ण माहितीशिवायही देतो
आणि पूर्ण माहितीशिवायही देतो असे दिसते. अॅपल ने त्या स्पेसिफिक फोन ची माहिती द्यायला नकार दिलेला नाही. अशी माहिती कोणत्याही आयफोन वरून काढता यावी म्हणून आयओस ला बॅकडोअर एण्ट्री द्यायला दिलेला आहे
Pages