अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतं बुश, कार्सन आणि केसिक यांनी आता माघार घ्यावी.

रेसमध्ये टिकण्यासाठी बुशने आईला आणलं, उद्या भावाला आणणार आहे; उसका बस चले तो वो बिमार पिताश्री को भी ले आएगा. बट इट्स नाॅट वर्किंग. कार्सनला डिबेटमध्ये उत्तर द्यायचंच नाहि, त्याच्या मते सगळी उत्तरं त्याच्या कॅंपेन वेबसाइटवर आॅलरेडी आहेत... Proud

कालच्या रिपब्लिकन चर्चेत धुमाकूळ होता. >> +१. काल ट्र्म्प लाईन क्रॉस करून गेला रिपब्लकिनसाठी. अभी तो पार्टी शुरू हुयी है Wink

कालचं डिबेट लाइव्ह पाहता आलं नव्हतं म्हणून नंतर कुठल्यातरी लिंकवरून पाहिलं. त्याच्या बाजुलाच ट्विटर फीड पण दिसत होती. ट्विटरवर लोकांनी धमाल सुरु केली होती. माबोवरचे टीपी धागेच आठवले मला Proud

मधल्या वादावादीत "गच्च्चीचा कांय तां?" टाइप हाणामारी सुरु होईल का अशीच लक्षणं होती. ट्रम्पने मात्र ठरवलंच होतं आज जो सापडेल त्याला धु धु धुवायचा. बुशच्या आणि त्याच्या फाइटमध्ये रुबियोला नक्की कशासाठी पडायचं होतं काय कळलंच नाही. मध्येच क्रुजला स्पॅनिश बोलता येतं का नाही यावरून पण काहीतरी बोलणं झालं..टोटल टाइमपास. क्रुज जरा जास्तच पोलिटिकल वाटायला लागला. आवडो न आवडो पण ट्रम्प आता वासरात लंगडी गाय शहाणी म्हणावी असं वाटायला लागलंय Proud

>>कार्सनला डिबेटमध्ये उत्तर द्यायचंच नाहि, त्याच्या मते सगळी उत्तरं त्याच्या कॅंपेन वेबसाइटवर आॅलरेडी आहेत..
कुणीतरी ट्विटरवर इमिडियेटली लिहिलं होतं How many times he is goanna market that site? I AM NOT GOING THERE Wink

बुशवर आक्रमक हल्ला करत असताना ट्रंपची उपस्थित प्रेक्षकांनी हुर्यो उडवायला सुरवात केली (बू करणे). त्यावर विचलित न होता ट्रंपसाहेबांनी हे सगळे बुशचे लॉबिस्ट आहेत असा दणका दिला! नंतर "लॉबिस्टांनो, मी खरे तेच सांगतो आहे" असे सांगून त्यांची हुर्यो थांबवली.
आयसिसला तोंड देताना रशियाला शत्रू समजायचे का जोडीदार असा तो प्रश्न होता. बुश रशियाला विरोधक समजण्याच्या पक्षातला तर ट्रंपच्या मते पहिला शत्रू हा आयसिस. नंतर बाकीचे. बुशचे मत असे की स्थानिक सुन्नी बंडखोरांची फळी उभी करून आधी असादला हाकला आणि मग आयसिस. हे माझ्या मते अत्यंत घातक आहे. तथाकथित सुन्नी बंडखोर असादला विरोध करता करता हळूच आयसिसमधे सामील होणे शक्य आहे. पूर्वीही तसे झालेले आहे. असे असताना तोच अट्टाहास करणे मूर्खपणाचे वाटते.

ह्याबाबतीत ट्रंपची भूमिका जास्त योग्य आहे (माझे मत).

बेन कार्सन हा जास्तीत जास्त दयनीय वाटत आहे. लवकरच तो रजा घेईल असे वाटते.

प्राजक्ता, ही बघ. शक्यतो टी.व्ही.वर प्रोजेक्ट कर. ट्वीटरचे फीड आरामात वाचता येतात. इतर डिव्हायसेसला पण प्रॉब्लेम नसेलच. एंजॉय Happy

FULL CBS News GOP Republican debate - CBS Republican South Carolina Debate Feb.13th 2016 HD

https://www.youtube.com/watch?v=89Z33XKWa_w

यावेळेस डीबेट हुकल्याने नंतर क्लिप्स पाहिल्या. टोटल क्रेझी.

बाकी ट्रम्प इतकी खुलेपणाने इराक युद्धाच्या निर्णयावर, डब्ल्यू वर टीका रॉन किंवा रॅण्ड पॉल यांनी केली होती का लक्षात नाही. इराक वर होती, पण डब्ल्यू बुश वर तरी नव्हती.

बाकी ते क्रूज व रुबियो च्या "याने इमिग्रण्टना नागरिकत्व देण्याला समर्थन दिले होते/नव्हते" वादात दोघांनी कधी समर्थन तर कधी विरोध केला आहे इतकेच लक्षात राहते Happy

क्रूज चे सहज खोटे बोलायचे कसब वाखाणण्यासारखे आहे.

स्चॅलियाच्या निधनामूळे ह्या निवडणूकीला वेगळाच आयाम मिळण्याची शक्यता आहे. ३०० दिवस बाकी असताना 'We need to hear people's choice' हे ऐकायला विचित्र वाटते. ट्र्म्प काय बोलतो ह्यावर बघूया. ओबामा बहुधा ब्लॅक नॉमिनेशन करून Dem turnout वाढवायचा प्रयत्न करेल. हिस्पॅनिक representation आधीच आहे.

टोटल क्रेझी??? शेवटी शेवटी त्यांचं त्यांनाच कळेनासं झालं होतं आपण नक्की कुठल्या मुद्द्याला समर्थन देत आहोत Lol
पकडू पकडू आणून मुद्द्यावर बसवत होते.
त्याच्या आधीची बर्नी-क्लिंटनची 'नो नॉन्सेस', मुद्द्याला धरून चालणारे डिबेट पाहून चुकल्यासारखं झालं. खरं सांगायचं तर थोडा कंटाळाच आला ;).

३०० दिवस बाकी असताना 'We need to hear people's choice' हे ऐकायला विचित्र वाटते >> Lol

म्हणजे ३०० दिवसांमध्ये काहीही निर्णय घ्यायचे नाहीत का? न होवो पण एखादी आपत्ती आली तर तिच्याकरता इमर्जन्सी पण ३०० दिवस लागू करायची नाही का !

वॉरेन नी मस्त रिप्लाय लिहीला आहे. तो वाचा.

>>ओबामा बहुधा ब्लॅक नॉमिनेशन करून Dem turnout वाढवायचा प्रयत्न करेल.<<

दोन नॉमिनीज भारतीय ओरिजीनचे (श्रिनिवासन, कट्याल) हि आहेत. पण जीओपी डॉमिनिटेड सिनेट ओबानाचा प्लॅन हाणुन पाडणार...

>>मुद्द्याला धरून चालणारे डिबेट पाहून चुकल्यासारखं झालं. खरं सांगायचं तर थोडा कंटाळाच आला

अंजली आमच्या घरची मंडळी अलमोस्ट हेच म्हणाली. कुणीतरी ट्विटरवर लिहिलं होतं की दिस इज बेटर दॅन १० पिप्ल ऑन बजेट आणि जस्ट टू. हिलरी आजकाल कान किटवणार्^या सुरात बोलतेय असं वाटतं.

अ‍ॅक्च्युअली इथे हा जस्टिस कोण निवडणार हा मुद्दा खरंच इतका कळीचा आहे की फाल्तु टीपी/पॉलिटीक्स्/लोकांचं ध्यान मुद्द्यावरून उठवणं वगिरे नेहमीचे पोलिटीकलपणा सुरु आहेत?

पण जीओपी डॉमिनिटेड सिनेट ओबानाचा प्लॅन हाणुन पाडणार... >> ते तर तसेही होणारच आहे. पण ब्लॅक नॉमिनी reject केला कि त्यावर रान उठवून त्यांचा turnout वाढवला जाणार. त्याच बाबतीत, contraceptive बद्दल जैसे थे निकाल जूनमधे आला कि क्रुज त्याचा फायदा घेणार हेही नक्की. ह्या घटनेचा सगळ्यात अधिक फायदा क्रुज उचलेल असे वाटते. त्याने आधीच फिलीबस्टरची घोषणा करून शिंग फुंकलेय.

'American democracy कुठलाही final voice नसल्यामूळे हि अतिशय dysfunctional झाली आहे नि अशी system फार काळ तग धरू शकत नाही 'असे बरेच political academics म्हणतात. इच्छूकांनी वीक वाचावा.

डिबेट मधे निव्वळ आदळ आपट होती. ट्र्म्प अनेकान्च्या बोलण्यात अडथळे आणत होता, त्याला थाम्बण्याचे कसब चर्चा आयोजकान्कडे नव्हते. बुश, रुबियो समर्थक (ट्रम्प विरोधक) यान्चा ओरडा, आणि आयोजकान्नी रुबियोला न विचारलेले शेवटचे प्रश्न, बोल आता कुठल्याही विषयावर. विचारलेल्या प्रश्नान्ना उत्तरे देण्यापेक्षा कार्सन पुन्हा मागे जात आधीच्या प्रश्नान्ना उत्तरे देत होता. क्रुझ सफाईदारपणे खोटे बोलतो हे रुबियो तसेच ट्रम्पने पुन्हा सान्गितले.

डिबेट मधे वैचारिक चर्चा कमी आणि हुल्लडबाजीच जास्त होती.

पण ब्लॅक नॉमिनी reject केला कि त्यावर रान उठवून त्यांचा turnout वाढवला जाणार. >> >ही एक जबरी राजकीय खेळी होईल डेम्स च्या बाजूने.

म्हणजे ३०० दिवसांमध्ये काहीही निर्णय घ्यायचे नाहीत का? न होवो पण एखादी आपत्ती आली तर तिच्याकरता इमर्जन्सी पण ३०० दिवस लागू करायची नाही का ! >> ध, तसे नाही. त्या मुद्द्यात तथ्य आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची निवड एकदा केली की सहज बदलता येत नाही. मग ज्या सरकारचे थोडे दिवस उरले आहेत त्यांनी हे करावे का हा रास्त प्रश्न आहे. पण दोन्ही सभागृहांच्या कन्फर्मेशन नेच होत असल्याने नेमणूक करण्यात चुकीचे नाही असे मला वाटते.

मुळात 'लेम डक' हा उल्लेख सहसा नोव्हेंबर ते जानेवारीच्या दरम्यानच्या काळाकरता जास्त वापरला जातो. इथे ऑल्मोस्ट एक वर्ष बाकी आहे.

बाय द वे कार्सन चा उभे राहण्याचा मुख्य हेतू स्वतःच्या वेबसाईटचे मार्केटिंग करणे हा आहे की काय अशी शंका येते Happy

मग ज्या सरकारचे थोडे दिवस उरले आहेत त्यांनी हे करावे का हा रास्त प्रश्न आहे. >> अरे तेच म्हणतो ना ३०० दिवस म्हणजे जवळ जवळ १ वर्ष झालं. हा काही कमी काळ नाही. आणि तू लिहिल्याप्रमाणे तशीही नेमणूक ही दोन्ही सभागृहांच्या कन्फर्मेशन नेच होणार आहे मग प्रेसिडेंट ला तूम्ही नेमणूक करूच नका असे सांगणे म्हणजे त्याला काम न करू देण्यासारखे झाले. तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही रिजेक्ट करा.

आणि प्रेसिडेंट ला आधीच्या इलेक्शन मध्ये मिलियन हून अधिक फरकाने निवडून दिलेले आहे म्हणजे त्याच्याकडे ४ वर्ष गव्हर्न करण्याचा अधिकार आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहे !!

फा president चे एक वर्ष म्हणजे हाऊसचा अर्धा कालावधी नि काही सिनेटचा अर्धा तर काहींचा पाव कालावधी. त्यामूळे वर्षभराचे argument amusing बनते. कमीत कमी कोण nominate होते आहे ते येइतो तरी थांबायला हवे Wink

अ‍ॅक्चुअली, सिनेट इलेक्शन (३४/१००) हि यावर्षी आहे. डेमोक्रॅट्सनी जोर लावुन बहुमत आणलं तर वेगळं चित्र दिसेल...

न्यायाधीश नेमणूकीचा मुद्दा उगीचच निघाला असे वाटते. कुठलाही न्यायधीश नेमला तरी तो आर्थिक स्थितीत काहीही बदल करू शकणार नाही, नोकर्‍या, आरोग्य व्यवस्था, अर्थव्यवस्था, संरक्षण हे खरे सामान्यांना भेडसवणारे मुद्दे आहेत. न्यायाधीश प्रकरणामुळे गर्भपात असावा का नाही, समलिंगी लोकांना समान हक्क असावा का नाही, लोकांना शस्त्रास्त्रे बाळगायचे स्वातंत्र्य असावे का नाही हे अत्यंत (माझ्या मते) दुय्यम मुद्दे आता जास्त चर्चेत येणार. त्यामुळे प्रचाराला एक जुन्या वळणाचे विरुद्ध आधुनिक विचाराचे असे अत्यंत अनिष्ट वळण लागणार. त्यामुळे क्रुजसारखे टोकाचे धर्मवेडे उमेदवार कदाचित पुढे जातील. ट्रंपसारखे लोक जे थोडे जुने व थोडे नवे विचार बाळगतात ते मागे पडतील.
न्या स्कलियाचा मृत्यू अगदीच "अकाली" वाटू लागला आहे!

"सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची निवड एकदा केली की सहज बदलता येत नाही" - मला वाटतं, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची नेमणुक आजीवन असते. ती बदलता नाही येत.

होय फेरफटका. इम्पिचमेण्ट वगैरे असे फक्त अपवाद. म्हणूनच तसे म्हंटले.

त्यामुळे प्रचाराला एक जुन्या वळणाचे विरुद्ध आधुनिक विचाराचे असे अत्यंत अनिष्ट वळण लागणार >>> हे पुन्हा बुश वि. केरी च्या वेळेस २००४ मधे झाले होते तसेच व्हायची शक्यता आहे. पण आफ्रिकन अमेरिकन माणूस रेकमेन्ड करून डेम्स त्याला शह देउ शकतात.

त्यातले वर्णन बरोबर वाटले प्राजक्ता. मात्र हे आर्टिकल ट्रम्प आणि बर्नी बद्दलच आहे. क्रूज, हिलरी, रुबिओ बद्दलही असते तर मग पूर्ण समरी वाटली असती.

काल इथल्या रेडीओवर रिप पार्टीलाच बर्नी यायला नकोय. NH मध्ये बर्नी जिंकूनही प्रयामरीला हिलरीचे जास्त लोक गेले असं काही ऐकलं. सर्च करायला अजून जमलं नाहीये. लिंक सापडली की टाकतो.

Pages