Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Oh forgotun gelo aadhi ka
Oh forgotun gelo aadhi ka naahi ikde lihila...fsss
>>शेंडेनक्षत्र, रॉमनी
>>शेंडेनक्षत्र, रॉमनी स्त्रिया, इमिग्रंटस, फिलिपिनो, कडवा ज्यू सपोर्ट आणि तरुणांमुळे हरला ना? तसच नाही होणार का? वेडगळपणाचा प्रश्न असेल तर सोडून द्या
<<
रॉमनी हा परीटघडीचा कपडे घालणारा, हँडसम वगैरे होता. पण तो इतका आदर्शवत (परफेक्ट) असल्याचे दाखवत होता की तो एक बेगडी पुतळा असल्याचा भास होऊ लागला. कुठलीही ठोस भूमिका नाही, वादग्रस्त विधानापासून शक्य तितका अलिप्त वगैरे. असला उमेदवार फारच सपक वाटतो. आणि तसेच झाले.
ट्रंप असले काही करत नाही. एक घाव आणि दोन तुकडे असे त्याचे रोख्ठोक धोरण असते आणि निदान काही लोकांना तरी ते आवडतेच.
रॉमनी म्हणजे कसा? केसाची बटही आपल्या जागेपासून विचलित असणार नाही. उलट ट्रंपसाहेबांचे केस हे असंख्य विनोदांचा विषय बनून राहिले आहेत.
इमिग्रंट्स अर्थात मूळचे परदेशी आणि आता अमेरिकेत स्थायिक झालेले लोक हे सरसकट सगळे ट्रंपचा तिरस्कार करत आहेत असे मला वाटत नाही. खरे खोटे काळच ठरवेल. पण ट्रंपची भूमिका ही बेकायदेशीररित्या घुसखोरी करण्याबद्दल होती. कायदेशीर स्थलांतर करण्याविरुद्ध ट्रंप इतका आक्रमक नाही असा माझा समज आहे. तसे असेल तर त्यात इतके भयंकर काही नाही.
डिबेट बघायला वेळ नाही झाला.
डिबेट बघायला वेळ नाही झाला. वॉशिंग्टन पोस्ट मधला हा लेख ईंटरेस्टींग आहे. https://www.washingtonpost.com/opinions/ted-cruz-is-not-eligible-to-be-p...
ट्रंपच आपल नेहमीच चालू आहे.
"Its not me saying it, its others telling me and saying it"
शेंडेनक्षत्र रॉमनी बद्दल अगदी.
ट्रंप लिगल इमिग्र्शन ला सपोर्ट करतोय बट विथ कॉशन. म्हणजे h1 प्रीव्हेलिंग वेतन वाढवा म्हणतोय तो. थोडक्यात चीप लेबर चीप न ठेवता एक्स्पेन्सिव्ह करा जेणेकरून नेटिव्ह लोकांना जास्त हायर करतील. पॉलिटिकली नॉट बॅड मुव्ह अॅट ऑल.
पॉलिटिको ची नवीन कार्टून्स
पॉलिटिको ची नवीन कार्टून्स मस्त आली आहेत. चेक करा.
http://www.politico.com/gallery/2016/01/the-nations-cartoonists-on-the-w...
http://www.politico.com/gallery/2016/01/the-nations-cartoonists-on-the-w...
स्लाईड्स असल्याने तेथेच पुढे मागे करून इतर पाहता येतील.
http://idknottrumptho.com/ वर
http://idknottrumptho.com/
वरील साईट बघा. "मला माहित नाही (कुणाला मत द्यायचे ते) पण ट्रंप नक्कीच नको" अशा विचारांच्या मतदारांकरता ही आहे. असे बंपर स्टिकर वा फलक बनवून ते कारवरती वा आपल्या घरापाशी लावावेत अशी सूचना आहे.
असले बोर्ड लावणारे लोक प्रामुख्याने कॅलिफोर्निया वा तत्सम "पुरोगामी" "उदारमतवादी" मानल्या गेलेल्या राज्यात असणार. अशा राज्यात ट्रंप प्रचारही करेल की नाही शंकाच आहे. (कदाचित न्यू यॉर्कचा अपवाद कारण ट्रंपसाहेब तिथले आहेत).
मला वाटते असल्या प्रकारामुळे ट्रंपची उमेदवारी अन्य कुणापेक्षा जास्त अधोरेखित होते आहे. कदाचित त्यामुळे ट्रंपला फायदाच होईल असे वाटते.
हिलरी क्लिन्टन कन्टाळा आला
हिलरी क्लिन्टन कन्टाळा आला आहे, बोलणे खुप पोकळ वाटते. सॅन्डर्स आष्वासक आणि आपला वाटतो पण तो अनेक गब्बर मोठ्या लोकान्ना शिन्गावर घेतो आहे.
ट्रम्प सगळीकडे चर्चेचा विषय होतो... TRP साठी ट्रम्प वर चर्चा होणे अपरिहार्य झालेले दिसते आहे...
हिलरी क्लिन्टन - टेड क्रुज अशी लढत होणार असे वाटते.
ट्रम्प सगळीकडे चर्चेचा विषय
ट्रम्प सगळीकडे चर्चेचा विषय होतो...... अमेरिकेत नाही तर जगभर. ब्रिटन च्या पार्लमेंट मध्ये पण ट्रम्प ला त्याचा देशात यौ द्यायचे नाही आणि त्याला ट्रॅक करुन त्याचा विमानाला आपल्या देशावरुन जाउ द्यायचे नाही ह्या विषयावर चर्चा झाली. असे आज CNN news वर होते.
डेमोक्रेटिक डिबेट थोडी रंगली
डेमोक्रेटिक डिबेट थोडी रंगली होती. बर्नीकाका थोडे थोडे आक्रमक बनू लागले आहेत. पूर्वी कसे तुम्हीही छान आम्हीही छान टाईपचे परस्परस्तुतीसुमनांची उधळण असणारे कंटाळवाणे वाद असायचे आता रोखठोक बनू लागले आहेत. बर्नीचा हा मुद्दा बिनतोड आहे की अब्जावधी डॉलर दंड भरलेल्या गुन्हेगारी कंपनीकडून हिलरीने लक्षावधी रुपये भाषण करायचे मानधन म्हणून का घेतले? त्या बदल्यात काही परतफेड होणार आहे का? आणि अशा धनाढ्य लोकांच्या मिंध्या व्यक्तीने त्यांच्या विरुद्ध वेळ पडेल तेव्हा कारवाई करण्याची धमक कशी बरे दाखवायची? हिलरीबाईंना फारसे उत्तर देता आले नाही.
ब्रिटनचा अतिरेकी लिबरलपणा अनाकलनीय आहे. त्यांच्या देशात अनेक इमाम, मौलवी सतत गरळ ओकत असतात. सरळ सरळ असे म्हणतात की आम्हाला इंग्लंड हे इस्लामच्या आधिपत्याखाली आणायचे आहे. तिथे शरिया लादायचा आहे. अमेरिका आणि अन्य पश्चिमी देश सैतानाची औलाद आहेत, ज्यू हे जनावरांपेक्षा नीच आहेत वगैरे. अशा लोकांना ब्रिटन हाकलून देत नाही. उलट ते यथास्थित सगळ्या सरकारी सुविधांवर ताव मारत टीकेचा भडिमार करत रहातात. मात्र ट्रंपवर बंदी घालायची असेल तेव्हा हिरिरीने समर्थन करतात. असे का?
ट्रंपसाहेबांची घसरण सुरू झाली
ट्रंपसाहेबांची घसरण सुरू झाली असे वाटते. सॅरा पेलिन ह्या माजी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराने ट्रंपला पाठिंबा जाहीर केला आहे! ह्या बाईंची कुवत इतकी अफाट की धाकले बुश तिच्यासमोर विद्वान, विचारी, अभ्यासू गृहस्थ वाटतील!
अत्यंत उथळ, कित्येकदा अर्थहीन बोलणे, अलास्काची जबाबदारी अर्ध्यावर सोडून देणे, आणि एकंदरीत निवडून यायला असमर्थ असणे हे गुण सॅराबाईंकडे आहेत. एकंदरीत असल्या व्यक्तीचा पाठिंबा घातक असेल असे वाटते.
ह्या बाईंची कुवत इतकी अफाट की
ह्या बाईंची कुवत इतकी अफाट की धाकले बुश तिच्यासमोर विद्वान, विचारी, अभ्यासू गृहस्थ वाटतील! >>
२००८ मधे जॉन मॅके ने कशाच्या
२००८ मधे जॉन मॅके ने कशाच्या आधारावर तिला सोबत घेतले होते ?
>> २००८ मधे जॉन मॅके ने
>> २००८ मधे जॉन मॅके ने कशाच्या आधारावर तिला सोबत घेतले होते ?
त्यावेळेस झाकली मूठ सव्वा लाखाची होती. काळ्या वंशाच्या उमेदवाराला उत्तर म्हणून बाई उपाध्यक्षपदाकरता असणे फायद्याचे होते. अलास्काच्या बाहेर बाईंची फार ख्याती नव्हती. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीला तोंड द्यायची कधी वेळ आली नव्हती. पण जेव्हा ती अग्नीपरीक्षा झाली तेव्हा त्यात ह्या बाई सपशेल नापास झाल्या असे माझे मत आहे.
अनेक मुलाखतीतून, भाषणातून बाईंच्या बिनडोकपणाची प्रचिती आलेली आहे. टिना फे ने तिची नक्कल करुन त्यात भर घातली.
आपण कुठली वर्तमानपत्रे वाचता? ह्या साध्या प्रश्नालाही उत्तर देऊ न शकणार्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडीच!
त्यांच्या अपत्यांचेही कर्तृत्व नको तिथे दिसते. पारंपारिक, लग्नसंस्थेवर विश्वास असणारे जुन्या वळणाचे लोक अशी आपली प्रतिमा करत असताना त्यांच्या लेकीने लग्नाशिवाय दोन मुले जन्माला घातली!
ती लेक लग्नापूर्वी लैंगिक संबंध ठेवणे कसे चुकीचे आहे ह्यावर लोकांपुढे प्रवचने झाडत असे! ड्रग्ज वगैरे गोष्टीही ह्या कन्येला वर्ज्य नाहीत. एकंदरीत खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे ठेवण्यात समस्त खानदान प्रवीण आहे!
ट्रंप कँपेनचं लस्टर काहिसं
ट्रंप कँपेनचं लस्टर काहिसं मंदावलं होतं, लेटली; म्हणुन सेरा पेलिन नावाचा फटाका...
आपण कुठली वर्तमानपत्रे वाचता?
आपण कुठली वर्तमानपत्रे वाचता? ह्या साध्या प्रश्नालाही उत्तर देऊ न शकणार्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडीच! >> online yahoo news वगैरे follow करत असेल, तुम्ही लोक म्हणजे ना !
पेलिनला काही म्हणू नका हां.
पेलिनला काही म्हणू नका हां. आपल्या त्या ह्यांना राग येईल. ह्या त्यांच्या लाडक्या आहेत.!
तिकडे मेलानियाकाकींचं बीपी हाय झालं असेल ते वेगळंच.
रिपना यावेळी हसरं कुटुंब सुखी
साराकाकूंनी खरेदी केलेल्या
साराकाकूंनी खरेदी केलेल्या कपड्यांचं बिल पण फारच गाजलं होतं. पैसे भरणार्या डोनरला बिल पाहून फेफरं आलं होतं.
काल ट्रंपने बाँब टाकला -
काल ट्रंपने बाँब टाकला - उद्याच्या फॉक्स डिबेटमध्ये तो भाग घेणार नाहि. फॉक्स न्युजला त्याने जवळ-जवळ वाळीतच टाकलेलं आहे. त्याचा हा वार फॉक्सच्या वर्मावर बसतो कि त्याच्यावरच पलटतो हे आता पहायचं...
टीआरपी जाणार फॉक्स चा.
टीआरपी जाणार फॉक्स चा.
फॉक्सने त्याला कसलच कवरेज
फॉक्सने त्याला कसलच कवरेज द्यायचं नाही, त्याच्याबद्दलच्या कोणत्याच बातम्या दाखावायच्या नाहेत अगदी माबोसारखा अनुल्लेख करायचा ठरवला तर ते बाकी जगाच्या फायद्याचं ठरेल...
काल ट्रम्पबाबा आमच्या गावात
काल ट्रम्पबाबा आमच्या गावात आले होते. लै गर्दी होती. लोकल लोकांना ट्रम्प जाम आवडतो. पण जे एवँजेलिकल आहेत त्यांचा पाठिंबा बहुतेक क्रुझ बाबाला आहे. बाकी कोणाचे नाव इथे कुणी घेतही नाहियेत
फॉक्स कॅनॉट इग्नॉर ट्रंप.
फॉक्स कॅनॉट इग्नॉर ट्रंप. रॉजर एल्स ट्रंपशी फोन काँटॅक्ट करायचा प्रयत्न करतोय पण ट्रंप त्याचा फोन रिटर्नच करत नाहि आहे. ट्रंपला आता डायरेक्ट मर्डॉकशीच बोलायचंय...
मला अॅक्चुअली अजून तरी कौतुक
मला अॅक्चुअली अजून तरी कौतुक वाटत आहे फॉक्स चं, मेगन केली ला त्यांनी सो फार सपोर्ट केले आहे त्याबद्दल! पुढे काय होईल माहित नाही.
ट्रम्प डिबेट मधे नसेल डिबेट
ट्रम्प डिबेट मधे नसेल डिबेट मधे काही मजा नाही.... फॉक्सला जड जाणार आहे. भाग न घेताही सर्वत्र चर्चेत ट्रम्पच रहाणार. त्याला डावलुन चर्चा होणे केवळ अशक्य आहे अशी परिस्थिती ट्रम्पने निर्माण केली आहे.
टेड क्रुझ न. १ आणि ट्रम्प न.
टेड क्रुझ न. १ आणि ट्रम्प न. २ वर येणे मला अनपेक्षित होते... ट्रम्पच्या नावाची खुप चर्चा झाली होती पण मार्को रुबिओने त्याला चान्गलाच धक्का दिला आहे.
>>टेड क्रुझ न. १ आणि ट्रम्प
>>टेड क्रुझ न. १ आणि ट्रम्प न. २ वर येणे मला अनपेक्षित होते<<
आयोवा मध्ये अपेक्शित होते; परंतु न्यु हॅंपशरमध्ये ट्रंपचा बर्यापैकि होल्ड आहे. तिथे जर नाहि जिंकला तर ट्रंपच्या तंबुत घबराहट होइल...
उदय, टेड क्रुझ आपला माणूस आहे
उदय, टेड क्रुझ आपला माणूस आहे
टेड क्रुझ आपला माणूस आहे
टेड क्रुझ आपला माणूस आहे >>>> तोच तर प्रॉब्लेम आहे
निसटता का होइना, हिलरीबाईंनी
निसटता का होइना, हिलरीबाईंनी विजय जाहिर केला...
टेड क्रुझ आपला माणूस आहे >>>>
टेड क्रुझ आपला माणूस आहे >>>> तोच तर प्रॉब्लेम आहे >>
Pages