Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला तर कंटाळा आला. एक तर
मला तर कंटाळा आला. एक तर जेथे पहात होतो तिकडे लोक खुप गप्पा मारत होते. मग निघून आलो.
कार्सन चे फार्मसी कंपन्यांच्या नफेखोरीवरचे उत्तर ऐकण्यासारखे आहे. असा प्रश्न पडतो की हा खरच डॉक्टर होता का![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
काल सीएनबिसीने सगळे त्यांच्य
काल सीएनबिसीने सगळे त्यांच्य होम पिच वरचे प्रश्न विचारले अर्थातच. टॅक्सेस, फायनान्सेस इ. विचारणारे बेकी क्विक वगैरे. जिम क्रेमर पण येऊन गेला! कँडिडेट्स एक कार्ली फिओरिना वगळता कुणीही धड उत्तरे देऊ शकले नाहीत. आज आता सगळीकडे मॉडरेटर्स च्या नावाने शंख सुरु आहे!! सीएन्बिसीचे उत्तर मला आवडले त्यावरचे.
मी पूर्ण पाहिले नाही पण जेवढे पाहिले त्यात -
बुश ने रुबिओ वर अटॅक केला पण त्याला त्याचा काही फायदा झाला नाही. रुबिओ चे कौतुक होत आहे त्यावरच्या कमबॅक बद्दल. (मला तरी ऐकताना ते माबो टाइप अर्ग्युमेन्ट वाटले मला जे म्हणताय ते तेव्हा त्या अमक्याला का म्हटले नाही इ.) टेड क्रुझने पण मूळ प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी कांगावा करण्यात वेळ घालवला.
ट्रम्प अॅज युज्वल - " माय डॅड गेव्ह मी अ स्मॉल लोन ऑफ १ मिलियन डॉलर्स ...(?!) " "आय नेव्हर वेन्ट बॅन्क्रप्ट" ...ब्ला ब्ला !!
ट्रंप ने कायद्याच्या चौकटीत
ट्रंप ने कायद्याच्या चौकटीत राहुन ५ वेळा कंपनीचे दिवाळे काढुन स्वत: कसे पैसे कमवले (आणि त्या कंपनीच्या ठेकेदार, कामगार आणि कर्ज देणार्याला कसे फसवले ) त्याबद्दल चा स्पष्ट्वक्तेपणा आवडला.
कार्सन हा मनुष्य मला अजिबात
कार्सन हा मनुष्य मला अजिबात आवडत नाही. फार ढोंगी वाटतो. गे मॅरेजेस, परराष्ट्र धोरण यावरची उत्तरे देताना पूर्वी कोलांट्या उड्या मारल्यात. काल स्वतःच्याच फ्लॅट टॅक्स प्लॅनबद्दलही सांगताना तेच.
कालची डिबेट थोडीच बघितली. पण
कालची डिबेट थोडीच बघितली. पण एक म्हणतो १०% फ्लॅट टॅक्स करणार, दुसरी म्हणते ७५००० पानी टॅक्स कोड काढून ३ पानी करणार. तिसरा सिनेटमध्ये सुट्ट्या टाकल्या म्हणून ओरडा खातो शेवटी सगळे मिळून कठीण प्रश्न का काढले म्हणून प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून आम्ही उखाळ्या-पाखाळ्या काढणार. तुम्ही काहीपण प्रश्न विचारा, आम्हाला जे येतं तेच आम्ही सांगणार.
गंमतीशीर पण भीतीदायक होतं.
भीतीदायक - +१११ !!
भीतीदायक - +१११ !!
कार्सन मलाही अतिशय धूर्त लबाड
कार्सन मलाही अतिशय धूर्त लबाड कोल्हा वाटतो. वारा येइल तशी पाठ फिरविणारा. ट्रंप आवडो न आवडो निदान प्रामाणिक वाटतो.
ओपनिंग क्वश्चन - योर
ओपनिंग क्वश्चन - योर बिग्गेस्ट विकनेसला थेट उत्तर ट्रंप, हकबी, बुश यांनीच दिलं; बाकिच्यांची उत्तरं त्यांना प्रश्न कळला नाहि अशी शंका घेण्याला वाव देणारी होती.
माझ्यामते टृंप, रुबियो, क्रुझ आणि क्तिस्ती वेर विनर्स. फियोरीना, हकबी, पॉल वेर ओके अँड कार्सन, बुश वेर डिझास्ट्र्स. कार्सन फंबल्ड ऑन हिज टॅक्स प्लॅन, एंडॉर्स्मेंट्स अँड बुश अॅपिअर्ड टु बी सो नर्वस; आय अॅम ग्लॅड हि डिडंट ब्रिंग अप हिज ब्रदर ड्युरिंग्द डिबेट. (दहा वर्षांपुर्वि, लोक म्हणायचे कि जेब इज ब्रिलीयंट; या कँपेन्मधली त्यांची आतापर्यंतची वाटचाल पहाता, हि मेक्स डब्लु लूक गूड अँड स्मार्टेस्ट बुश...)
आय हॅ अ फिलिंग - टृंप विल विन द जीओपी नॉमिनेशन. हकबी थंडर्ड यस्टर्डे - "ट्रंप वुड बी अ बेटर प्रेसिडेंट एवरी डे ऑफ द वीक अँड ट्वायस ऑन संडे दॅन हिलरी क्लिंटन"
दॅट प्रिटी मच सम्स अप द डिरेक्शन आरेन्सी इज हेडिंग...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भीतीदायक >>+१
भीतीदायक >>+१
जर ट्रम्प ने नॉमिनेशन जिंकलं
जर ट्रम्प ने नॉमिनेशन जिंकलं तर त्याच्या टिकेट वर व्हिपीसाठी कोण कँडिडेट असेल/ असावं ???![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्हिपीसाठी नुस्ता विचार केला तर फिओरिना ऑर रुबिओ मेक मोस्ट सेन्स पण दोघांचेही ट्रम्पच्या कँपेन शी जमणे अवघड आहे.(सध्या)
केसिक चांगला वाटला बोलायला
केसिक चांगला वाटला बोलायला काल. त्याची सुरवातही चांगली होती (प्रश्नाला उत्तर नाही दिले पण आऊटसाईडर्स बद्दलचा टोमणा बरोबर होता)
तसेही सगळ्यांनीच प्रश्न टाळून इतरच उत्तरे दिली. बुश मात्र मागे पडणार आता!
>>व्हिपीसाठी कोण कँडिडेट असेल
>>व्हिपीसाठी कोण कँडिडेट असेल <<
दे आर ओल्ड बडीज...
गवर्नर क्रिस्टी?
एचपी च्या फोर्मर सीईओला ७५०००
एचपी च्या फोर्मर सीईओला ७५००० पानी tax कोड ३ पानात बसवायला बारीक फोन्ट वापरणार का विचारलं: ;). मला एकदम तांदुळाच्या दाण्यावर भगवद्गीता आठवली.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
क्रिस्टीची जर्सी standard मध्येही रूड वाली कमेंट पण जाम फनी होती.
ख्रिस्टीच्या गावचे, त्याला
ख्रिस्टीच्या गावचे, त्याला ओळखणारे, लोक म्हणतात त्याला अॅटर्नी जनरल व्हायला आवडेल. नुकतेच त्याने म्हंटलेहि आहे की न्यू जर्सीत असताना त्याला हेच काम आवडले होते.
मला एकदम तांदुळाच्या दाण्यावर
मला एकदम तांदुळाच्या दाण्यावर भगवद्गीता आठवली. >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
GOP debate पेक्षा काल बिल माहेर चा रिपीट शो जास्ती चांगला होता बर्नी सँडर्स वाला. I'm impressed with him. नुसत्या socialist label मूळे लटकणार पण.
Harvard चा एक law professor पण उभा आहे जो congress बदलणे जरुरी आहे ह्या एका मुद्द्यावर लढतोय.
लिंडसी ग्रॅहॅम्स हिलेरीयस
लिंडसी ग्रॅहॅम्स हिलेरीयस कमेंट आॅन डेमक्रॅट्स फ्रंटरनर्स फ्राॅम यस्टरडेज डिबेट -
"The No. 1 candidate says she was flat broke even though she spent 8 years in the White House," he said, referring to Hillary Clinton's much-criticized comments that she was broke after her husband's presidency.
His assessment of Bernie Sanders, a self-described "democratic socialist," was harsher.
"The No. 2 guy went to the Soviet Union on his honeymoon and I don't think he ever came back," Graham said...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
The No. 2 guy went to the
The No. 2 guy went to the Soviet Union on his honeymoon and I don't think he ever came back," >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कार्सन मलाही पहिल्या एक दोन
कार्सन मलाही पहिल्या एक दोन डिबेट्स मधे जितका रिस्पेक्टेबल वाटला तितका आता वाटत नाही. आयोवा मधे ट्रम्प वर लीड घेतला यातून ती शंका बळकट होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काल कोण होता तो म्हंटला की एका envelope मधे लोकांना त्यांचा टॅक्स किती आहे कळवू आणि आयआरएस बरखास्त करू? यांची वक्तव्ये ऐकली की मर्फी लॉज मधे वाचलेली एक आठवते For every complex problem everybody has a simple solution that does not work![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टेड क्रूझने ह्या
टेड क्रूझने ह्या कार्यक्रमाच्या मध्यावर एन्बीसी वर तोंडसुख घेतले ते पटण्यासारखे होते. चर्चेच्या एकाही आयोजकाला वा सूत्रसंचालकाला रिपब्लिकन पक्षाला मत देण्यात स्वारस्य नाही. काही भांडखोर कोंबड्यांना पिंजर्यात कोंबून त्यांना डिवचून आपापसात झुंजवा आणि दोन घटका करमणूक होऊ द्या अशा हेतूने प्रश्न विचारले जात आहेत की काय अशी शंका आली.
बेन कार्सन ह्या माणसाच्या बुद्धीमत्तेबद्दल माझ्या मनात मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे. आपल्या काळे असण्याचा नको इतका फायदा ह्याला मिळतो आहे का असे वाटते. उत्क्रांती हा सैतानाचा विचार आहे अशी मध्ययुगातील विचारसारणी बाळगणारा माणूस इतका लोकप्रिय असणे घातक आहे. बिग बँग हे थोतांड आहे हे असलेच. ज्या पुराव्यांच्या आधारे असा महास्फोट झाला असावा असे मानले जाते ते अत्यंत वैज्ञानिक पुरावे तोडीस तोड वैज्ञानिक पद्धतीने खोडता आले पाहिजेत पण तसे काही न करता उथळ काहीतरी बोलून ते खोडायचा प्रयत्न करणे हास्यास्पद आहे. ह्या तशा छोट्या गोष्टी वाटल्या तरी शितावरून भाताची परीक्षा ह्या न्यायाने आत बरेच काही घोटाळे आहेत असे जाणवते. केवळ सवंग मते मिळवण्याकरता केलेला हा एक खोटारडेपणा आहे असेही असू शकेल. पण मग कार्सन हा एक कसलेला अभिनेता असावा असे वाटते.
अजूनही मला ट्रम्पच बरा वाटतो आहे. अनेकांना तो उर्मट वाटतोच पण प्रामाणिक आहे असे वाटते. कोलांट्या उड्या मारत नाही.
कोणी बघितलेलं दिसत नाहि कालचं
कोणी बघितलेलं दिसत नाहि कालचं डिबेट.
माझं रिडींग, इन द आॅर्डर आॅफ विनर टु लुजर:
ट्रंप - काम, कंपोज्ड, प्लेयींग अलाॅंग, ट्राइंग टु बी प्रेसिडेंशियल
कार्सन - ओके बट नाॅट आउटस्टॅंडिंग
रुबियो - गुड शो बट हिज ट्रॅक रेकाॅर्ड विल हाॅंट हिम
क्रुज - गुड शो, वन टु वाॅच इन कमिंग विक्स
पाॅल - सरप्राइज पॅकेज, ब्राॅट अप गुड पाॅइंट्स आॅन आयसिस सिचुएशन
फियोरिना - स्टोल थंडर फ्राॅम बुश आॅन सिरिया इशु
केसीक - सपोर्टेड बेलआउट फाॅर "टू बिग टु फेल", कुडंट आर्ग्यु रिबटल
बुश - मिस्ड गोल्डन अपाॅरचुनिटी आॅन सिरिया इशु व्हाइल प्रुविंग ट्रंप राॅंग
ओवरआॅल, ग्रेट डिबेट. एफबीएन वाज विनर टू, विथ १३+ मिलियन्स व्युवर्स...
काल वेळ नाही मिळाला आज बघत
काल वेळ नाही मिळाला आज बघत आहे.
बरेच जण टॅक्स reform बद्दल बोलत आहे. आज परत ३ पानाचा टॅक्स कोड बद्दल फियोरिना बोलत होती. पन मला नाही वाटत ते अमेरिकेत ते शक्य आहे. नुसत्या हवेत गप्पा आहेत.
By the way Singapore has very simplified tax code which can easily fit in 3 A4 size pages with font size of 10. There is no payroll deduction & for 90% people there is no need to file tax return. IRS (Income tax authority of Singapore) collects the information from your company, rental agreements, bank, charitable institutes etc & calculate your tax & send it by email. Then one can pay it in 30 days. If you provide your bank account number to government then one can get 12 interest free installment. So there is no job H&R Block or similar companies for individual.
मी पाहिले. कालचे चांगले झाले
मी पाहिले. कालचे चांगले झाले - आधीच्या सीएनबीसी वाल्या डीबेट च्या तुलनेत तर खूपच चांगले. ट्रम्प ने कोणाचा तरी सल्ला फायनली ऐकलेला दिसतोय. बेस्ट बिहेवियर वर होता :). इतर लोक वादामधे इतरांना कट करून बोलत असताना फक्त हा मॉडरेटर्स कडे बघून हात वर करायचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बेन कार्सन आता पहिल्यासारखा रिस्पेक्टेबल वाटत नाही. त्यात तो चांगलाच कर्मठ आहे असे दिसत आहे. फिओरिना चांगली बोलली.
बुश चे मात्र आश्चर्य आहे. रेस च्या सुरूवातीला तो हिलरी इतकाच ऑब्व्हियस उमेदवार वाटत होता. आता खूपच पिछाडीवर गेला आहे.
अमेरिकास्थीत संपन्न लोकांसाठी
अमेरिकास्थीत संपन्न लोकांसाठी एक सर्वे; मत कोणत्या उमेदवाराला द्यायचं हा प्रश्न कदाचित (तुमच्यापुरता) सुटु शकतो. अर्थात सगळ्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं दिल्यावर...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुस्लीमांना अमेरिकेत
मुस्लीमांना अमेरिकेत प्रवेशबंदी ! ट्रम्प चा नवा बाँब ! खरोखर ट्रंप म्हणजे एखाद्या बागेतल्या पिकनिक मध्ये घुसलेला ओरँग उटान आहे.
कालच्या डीबेट बद्दल एकही
कालच्या डीबेट बद्दल एकही पोस्ट नाही? ट्रंप बाकी ठीक होता- ती फॅमिलीज बद्दल ची कॉमेण्ट सोडून. ती बरेच दिवस राहणार चर्चेत. डेम्स च्या पॉलिटिकल करेक्टनेस बद्दल बरेच लोक बोलत होते. मात्र त्या रुबियो व क्रूझ च्या कोणत्या बिल मधे कोणी काय केले चर्चेचा कंटाळा आला.
कालनंतर बहुधा फिओरिना, ट्रंप, ख्रिस्ती वगैरेंचे रेटिंग चढेल. रॅण्ड पॉल तर चुकून डेम्स वाला तिकडे गेला आहे असे वाटते. ख्रिस्ती बहुधा यानंतर मुख्य ग्रूप मधे राहील.
सँटोरमची कमेन्ट ऐकली का
सँटोरमची कमेन्ट ऐकली का स्त्रियांना मिलिटरीत मह्त्त्वाची पदे देण्यासंदर्भात ? ते त्याने माबोवर लिहिलं असतं तर कित्ती मज्जा आली असती असं वाटलं मला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नंतर मुख्य डीबेट फार पाहिलं नाही मी . बघताना झोप आली !
रॅण्ड पॉल लिबर्टेरियन आहे
रॅण्ड पॉल लिबर्टेरियन आहे फा. डेम नाही. तो तर सगळ्यात जास्ती फ्रीडम वाला आहे.
>>ट्रंप बाकी ठीक होता- ती
>>ट्रंप बाकी ठीक होता- ती फॅमिलीज बद्दल ची कॉमेण्ट सोडून<<
हि इज राइट टु ए सर्टन एक्स्टेंट...
त्याच्या म्हणण्याप्रमाणे फॅमिली मेंबर्स, ज्यांनी काहि संशयास्पद हालचाली दिसत असतानाहि अतिरेक्यांना रोकलं नाहि किंवा ऑथॉरिटीजना पुर्वसुचना दिली नाहि, अशा फॅमिली मेंबर्सना अकाउंटेबल धरलं गेलं पाहिजे.
सॅन बर्नंडिनोच्या केसबाबत, घरात अॅसॉल्ट रायफल्स/अॅमोज येतात, पाइप बाँब्स बनवले जातात, याचा घरात रहाणार्यांना अजिबात मागमुस लागत नाहि? गुन्ह्याकडे जाणुन-बुजुन कानाडोळा करणे हा देखिल कायद्यानुसार गुन्हा आहे; मग हाच नियम इथे लागु का होत नाहि?..
झालंय काय टृंप त्याच्या लाउड प्र्स्नॅलिटीमुळे कान्फाट्या झालेला आहे. त्याच्या इतर मुद्द्यांबाबत देखिल (इंटर्नेट शट्डाउन, बॅन ऑन मस्लिम्स इ.) सगळे डिटेल्स विचारात न घेता विरोधक त्याला धोपटण्यात धन्यता मानतायत...
त्याच्या म्हणण्याप्रमाणे
त्याच्या म्हणण्याप्रमाणे फॅमिली मेंबर्स, ज्यांनी काहि संशयास्पद हालचाली दिसत असतानाहि अतिरेक्यांना रोकलं नाहि किंवा ऑथॉरिटीजना पुर्वसुचना दिली नाहि, अशा फॅमिली मेंबर्सना अकाउंटेबल धरलं गेलं पाहिजे. >> हो तो भाग पटतो. पण तो 'फॅमिलीज ना मारू' असे काहीतरी म्हंटला त्यामुळे टीका होत आहे. अकांउण्टेबल धरण्याबाबत बरोबर आहे.
अता पर्यन्त प्रत्येक फॅमिलीने
अता पर्यन्त प्रत्येक फॅमिलीने हात झटकले आहेत... ताज्या गोळीबाराच्या प्रकरणात तर घरच्यान्नी कानावर हात ठेवले आहेत. आम्हाला काहीच माहित नव्हते...
Pages