Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरोखर ट्रंप म्हणजे एखाद्या
खरोखर ट्रंप म्हणजे एखाद्या बागेतल्या पिकनिक मध्ये घुसलेला ओरँग उटान आहे. >>
पण तो अमेरिकन लोकांना आवडू लागला आहे. ट्रंप म्हणजे सारा पेलिनची सुधारित आवृत्ती आहे.
टेड क्रुझच्या इंडियन मुस्लिम वरूनही त्याला मूर्ख म्हणणारे ट्विट आले आहेत. खरे तर टेडने पण दोनदा वेगवेगळे उदाहरण देऊन ट्रंप जे काय म्हणतो त्याचा सटल उच्चार केला आहे.
its not lack of competence that is preventing Obama administration from stopping these attacks. It is political correctness is killing people"
Being GOP तो गन कंट्रोल बद्दल बोलत नसावा.
तसेच त्याचे FDR चे ऑल हॉर्स थिव्हस आर डेम बट नॉट ऑल डेम्स आर हॉर्स थिव्ह्स चा उच्चार सरळ सरळ " ऑल टेररिस्टस आर मुस्लीम" असा आहे हे कुणालाही कळेल.
ट्रंप जोकर आहे, पण तो तेथील "ठाकरे" आहे आणि सध्याचे सेंटिमेंट पाहता आणि जर चुकून २०१६ मध्ये एखाद दोन अॅटक झाले ( इंटर्नल) तर तो निवडून येऊ शकतो.
गॉड ब्लेस अमेरिका.
It is political correctness
It is political correctness is killing people >>> ओबामा व इतर लोक रॅडिकल इस्लामिक टेररिझम असे म्हणायला नकार देतात म्हणून त्यावर ती कॉमेण्ट असावी. त्यामुळेच ऑल्मोस्ट प्रत्येक कॅण्डीडेट ती फ्रेज मुद्दाम वापरत होता.
ट्र्म्प च्या कायम रिपब्लिकनच राहीन या ग्यारण्टीवर एक जबरी कॉमेन्ट वाचली - what is said in Vegas remains in Vegas![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
करेक्ट. तसेच रॅडिकल इस्लामिक
करेक्ट. तसेच रॅडिकल इस्लामिक टेररिझम असे नाव द्यायला हवे. टेडच नंतर म्हणाला की ऑल डेम्स वगैरे. त्यावेळी योग्य तो भर दिला असता ( इस्लामिक टेररिझम) तर तो ही रेटिंग मध्ये पुढे जाईल.
बाकी टेड ने प्रोफाईल मस्त बनवले आहे. - मॅरिड टू, आयफोन प्लेअर वगैरे - म्हणजे सगळे बेस पक्के करतोय तो.
what is said in Vegas remains in Vegas स्मित >![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
एकंदरित सगळ्या कॉमेंट्स वाचून
एकंदरित सगळ्या कॉमेंट्स वाचून असा भास झाला की निवडणूका ह्या कुठल्यातरी मराठी मालिकेसारख्या आहेत आणि पब्लिक टाईमपास सारखा बघून आप आपली कॉमेंट्री सांगतय. (कोणताही मराठी मालिकेचा धागा पाहावा उदाहरणार्थ).
खालिद - निवडणुका नव्हेत. फक्त
खालिद - निवडणुका नव्हेत. फक्त डीबेट्स. आणि टीआरपी बद्दल बरोबर आहे. सध्या चॅनेल्स तसेच हॅण्डल करत आहेत ते.
एकूण ओबामा हा अमेरिकेचा नेहरू होणार अशी चिन्हे दिसत आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नमस्कार खालिद. सध्या कुठे
नमस्कार खालिद. सध्या कुठे मुक्काम?
>>एकूण ओबामा हा अमेरिकेचा
>>एकूण ओबामा हा अमेरिकेचा नेहरू होणार अशी चिन्हे दिसत आहेत<<![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा हा; टर्मच्या बाबतित नेहरु, कामाच्या बाबतित देवेगौडा...
निवडणूका , पक्ष आणि चॅनल्स
निवडणूका , पक्ष आणि चॅनल्स लोकांना घाबरवून टाकण्याच्या मागे लागले आहेत. आणि मला तरी हे सगळे वाईट वाटते आहे. त्यात एक मुद्दा म्हणजे भारतीयांवर सरसकट ब्राऊन दिसतात म्हणून हल्ले वाढण्याची शक्यता आहे परत. न्युयॉर्क मध्ये एक तसा झाला आहेच.
पॉल इम्प्रेसिव्ह होता अस
पॉल इम्प्रेसिव्ह होता अस वाटल. esp. त्याची spending वरची कमेंट जबरी होती.
पण परवा क्क्रुज रुल्ड . एकूनच त्याचा पॉलिटिकल एक्स्पेरिअन्स कामाला येतोय.फक्त लीगल इमिग्रेशनवर चक्क ठोकत होता अस वाट्ल. एनी वेज तसेही सगळेजणच इमिग्रेशन वर थापाच मारत असतात.
कार्ली भारी आहे . हुशार आहे पण एक्सपिरिअन्स मध्ये कमी पडते अस वाटल.
खरतरं दोन्ही डिबेटा मध्ये तिचा पर्फॉर्मनस चांगला आहे. पण ती नको तिथे woman's card वापरती आहे. हिलरी बाईंना women votes ,just ती बाई आहे म्हणुन मिळणार आहेत. कार्ली बहुदा त्यामुळ ते woman card वापरत आहे. she doesn't need to. बाई म्हणुन नव्हे तर एक व्यक्ती म्हणुन तिचे कर्तुत्व वादातीत आहे.
एवढ करूनही पर्सनली ,Rubio कम्स अहेड फॉर मी.
एकुणच Rubio, Cruz, Christy and Fiorina फुल्ल रेस मध्ये आहेत अस वाटल. पर्सनली rubio आणि Fiorina जोडी फायनली येईल अस वाटत.
ट्रंप : No comments .
>पण तो अमेरिकन लोकांना आवडू
>पण तो अमेरिकन लोकांना आवडू लागला आहे.
तो रिपब्लिकन पक्षाच्या व्होटर्स ना आवडू लागला आहे इतकेच.
त्याला नॉमिनेशन मिळाले तर हिलरी समोर तो हरणार हे नक्की असल्याने रिपब्लिकन नेत्यांनाही तो नको आहे.
हिलरी बाईंना women votes
हिलरी बाईंना women votes ,just ती बाई आहे म्हणुन मिळणार आहेत. >>> I don't think so.. झालाच तर बाई असण्याचा तोटाच होईल. तिला काय आणि कार्लीला काय...
मधे कोठेतरी "निवडणुकीच्या या
मधे कोठेतरी "निवडणुकीच्या या टप्प्यावर" म्हणजे सुमारे एक वर्ष/११ महिने आधी कोण कोण पोल्स मधे लीड वर होते हे आधीच्या काही निवडणुकांच्या बाबत प्रसिद्ध झाले होते. बहुतेक ठिकाणी भलतेच उमेदवार पोल्स मधे जोरात होते.
मला लक्षात आहे तो म्हणजे २००४ साठी सुरूवातील हॉवर्ड डीन चा किती बोलबाला होता ते.
आता १९ ला बहुधा डेम्स चे आहे. त्यानंतर जानेवारीत एक दोन होतील. मग फेब मधे आयोवा आणि न्यू हॅम्पशायर च्या प्रायमरीज झाल्या की चित्र कदाचित बदलू लागेल.
These Two Great Leaders will
These Two Great Leaders will restore balance in the World-War 3
---- A FaceBook Post
अस्स होय आम्हाला वाटलं हे जग
अस्स होय
आम्हाला वाटलं हे जग सुधारणार आहेत म्हणून !!!
बाई म्हणुन नव्हे तर एक
बाई म्हणुन नव्हे तर एक व्यक्ती म्हणुन तिचे कर्तुत्व वादातीत आहे. >> HP मधले तिचे कर्तुत्व वादातीतच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Rubio, Cruz च्या इमिग्रेशन रूटबद्दल जेंव्हा चर्चा होणार आहे तेंव्हा मजा येणार आहे. आता सगळेच GOP मधले असल्यामूळे खपून जातेय.
ट्रंपला पाठिंबा देणार्या लोकांची एक मुलाखात आज yahoo वर आहे ती ऐकण्यासारखी आहे.
ट्रंप नि आफ्रिकन हुकुमशाह ह्यांची वक्त्यव्ये किती सारखी आहेत ह्यावर डेली शो मधे ट्रेव्हर नोआ ने जो कार्यक्रम केलाय तो अफलातून आहे. ट्रंपच्या चाहत्यांनी अजिबात चुकवू नका. अजून तरी ट्रंपचा हा मास्टर पीस आहे असे मला वाटते. आशा आहे कि तो ह्यापुढेही जाईल.
“I would certainly be open to closing areas where we are at war with somebody,” Trump said. “I sure as hell don’t want to let people that want to kill us and kill our nation use our Internet.”
कार्ली फिओरिना जाम खडूस आणि
कार्ली फिओरिना जाम खडूस आणि दुष्ट वाटते. अजिबात लाइकेबल नाही.
ट्रंपच्या विरोधात असणारे सर्व एन आर आय पब्लिक मोदींच्या पण विरोधात आहे का? आणि का? किंवा का नाही अशी चर्चा इथे रंगत होती परवा पण असं ठरलं की अशा खमंग चर्चेबरोबर निदान बियर तरी हवीच व्हॉट्सअॅप किंवा इमेलीवर निबंध टाएप करण्यात काहीच मजा नाही...
बर्याचदा असे होते की स्वतःला
बर्याचदा असे होते की स्वतःला बुद्धीवादी समजणारे उच्चभ्रू लोक ट्रंपसारख्या सनसनाटी बोलणार्या लोकांची टर उडवतात. त्यातून लोकांची करमणूक होते. पण एखाद्याची भरपूर टिंगल करता येते म्हणून तो तथाकथित बावळट उमेदवार निवडणुक हरेलच असे सांगता येत नाही.
ह्याचे एक मोठे उदाहरण म्हणजे जॉर्ज डब्ल्यू बुश. हा ह्या उच्चभ्रू लोकांच्या नाकावर टिच्चून दोनदा निवडून आला. त्याच्या आणि त्याच्या मूर्खपणाच्या विनोदांनी आजवरचे सगळे विक्रम मोडले असतील. पण त्यामुळे त्याचे काही अडले नाही आणि अमेरिकन लोकांनी त्याला निवडून दिलेच.
ट्रम्पचेही तसेच होईल अशी शक्यता आहे. कितीही विनोदवीर त्याच्यावर सर्वशक्तीनिशी तुटून पडले तरी त्याचे मुद्दे सामान्य लोकांना भावतात. उदा. सॅन बर्नार्डिनोची खलनायिका तश्फिन मलिक ही बाई इतकी जहाल पार्श्वभूमी असताना परराष्ट्र विभागाच्या गलथानपणामुळे आणि ढिसाळपणामुळे बिनबोभाट व्हिसा मिळवून अमेरिकेत दाखल होऊ शकली. असे का झाले? ह्या प्रकाराचा उलगडा होईपर्यंत मुस्लिम लोकांना देशात यायला बंदी घालावी असे म्हणणे इतके आततायी आहे का? मला वाटत नाही. अनेक अमेरिकन लोकांनाही तसे वाटत नाही.
तीच गोष्ट बेकायदेशीररित्या अमेरिकेत येणार्या (बहुतांशी) मेक्सिकन लोकांबद्दल. कुणाही राजकीय नेत्याकडे ह्याविरुद्ध बोलण्याची हिंमत नाही आणि ह्या लोकांना कायदेशीर रित्या अमेरिकन सीमा खुल्या करुन द्यायचीही हिंमत नाही. हा दुटप्पीपणा ट्रंपने उघड दाखवला आणि हे मी थांबवेन असे म्हणण्याची हिंमत दाखवली जी लोकांना आवडली.
तसेही अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणुक ही काही राज्यातील काही भागापुरतीच असते (जसे ओहायो, फ्लोरिडा, पेन्सिल्व्हेनिया इ.) कारण अशा अनिश्चित राज्यात कुणाला कौल मिळेल ते शेवटपर्यंत कळत नाही. कॅलिफोर्निया वा टेक्सससारख्या महाकाय राज्यात काय होणार ते कधीच बदलत नाही त्यामुळे त्यांचा लढाई निर्णायक करण्यात काहीच सहभाग नसतो.
जो कुणी उमेदवार असेल त्याने वा तिने ह्या मोजक्या ठिकाणी आघाडी घेतली तर त्याचा वा तिचा विजय नक्की. मग तो वा ती किती स्फोटक विनोदांचा बळी होता वा होती ह्याला काही अर्थ उरत नाही.
पॉलिटिको ने काही भन्नाट
पॉलिटिको ने काही भन्नाट कार्टून्स त्यांच्या साईटवर प्रकाशित (कदाचित इतरत्र आधी प्रकाशित झालेली संकलित) केलेली आहेत. त्यातली काही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रिपब्लिकन्स चे "फियर माँगरिंग"
http://www.politico.com/gallery/2015/12/the-nations-cartoonists-on-the-y...
लॅटिनो वोट्स शिवाय कोणी निवडून येउ शकत नाही हे समजलेल्या हार्डकोअर रिपब्लिकन्स चे प्रयत्न, आणि "स्टॉर्मिंग" ट्रम्प
http://www.politico.com/gallery/2015/12/the-nations-cartoonists-on-the-y...
रूढ अर्थाने कॅम्पेन किलर ठरू शकणार्या कोणत्याही गोष्टीने ट्रम्प ची लोकप्रियता उलटी वाढणे याबद्दल
http://www.politico.com/gallery/2015/12/the-nations-cartoonists-on-the-y...
प्लॅन्ड पेरेण्टहूड विरोधात असलेले कॉन्झर्वेटिव्ज, जे स्वतः महिलाविरोधी असल्याची टीका सतत होत असते
http://www.politico.com/gallery/2015/12/the-nations-cartoonists-on-the-y...
आणि हे निवडणूकीशी संबंधित नसलेले, पण तितकेच जबरी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.politico.com/gallery/2015/12/the-nations-cartoonists-on-the-y...
तिकडे डेमोक्रॅटिक प्रायमरीही
तिकडे डेमोक्रॅटिक प्रायमरीही इंटरेस्टिंग झाली आहे.
पुढचं डिबेट कधी आहे?
पुढचं डिबेट कधी आहे?
येत्या रविवारी म्हणे. डिबेट
येत्या रविवारी म्हणे. डिबेट ची प्रसिद्धी ( जाणून बुजून ?) जास्त केलेली नाही असे दिसते. सॅंडर्स आला तर फार बरे होईल. हिलरी म्हणजे जुनाच खेळ.
फा, कार्टून भारी आहेत.
फा, कार्टून भारी आहेत.
बंदुकीवालं जबरीच.
शेंडेनक्षत्र, रॉमनी स्त्रिया, इमिग्रंटस, फिलिपिनो, कडवा ज्यू सपोर्ट आणि तरुणांमुळे हरला ना? तसच नाही होणार का? वेडगळपणाचा प्रश्न असेल तर सोडून द्या.
येत्या रविवारी डेम्स चे.
येत्या रविवारी डेम्स चे. रिपब्लिकन्स चे गुरूवारी आहे बहुधा.
रॉमनी स्त्रिया >>> सलग वाचल्याने हे काय आहे विचारात पडलो. त्यांना अनेक लग्ने मान्य असल्याने आणखीनच :).
कालच NBC वर ट्रंपची मुलाखत
कालच NBC वर ट्रंपची मुलाखत ऐकली. त्याचा सडेतोडपणे विषयाला हात घालण्याचे कसब जबरदस्त आहे. दुर्दैवाने ते तेव्हढ्यापुरतेच मर्यादित आहे. मुलाखात घेणारा अधिक खोलात शिरला, कि 'असे expert नी सांगितले आहे, मी असे ऐकलेले आहे, माझ्या कँपेनला हजेरी लावणार्या लोकांना विचारून बघा, मी अमका करतोय ते नक्कीच करणार नाही' अशी थातूर मातूर उत्तरे देऊन वेळ मारून दिली जात होती. अर्थात एव्हढे पुढचे ऐकायला वेळ कोणाकडे आहे हा कळीचा प्रश्न.
इराण बरोबर केले गेलेले दील किती घातक आहे ह्याचे उत्तर देताना ट्रंपने पहिले वाक्य हे घेतले 'इराणने आपले न्यूक्लियर मटेरियल रशियाच्या स्वाधीन केले. पहा किती घोळ आहे तो'. त्याच्या आधीच्या प्रश्नामधे स्वतःच पुतीन ची स्तुती करत होता हे तो विसरला. मुलाखतकर्त्याने त्याला ही आठवण करून दिली. दोन क्षण तो गांगरला. चेहरा लाल झाला. पण लगेच 'But that does not mean deal is good' असे म्हणून 'पुढचा प्रश्न' वर सरकला.
खरच 'गॉड ब्लेस अमेरिका.' म्हणायची वेळ आलेली आहे.
सडेतोडपणे विषयाला हात
सडेतोडपणे विषयाला हात घालण्याचे कसब जबरदस्त आहे. >> अरे तो रियालिटी टि व्ही स्टार आहे त्यामुळे ते असणारच रे. पण मुख्य मुद्दा म्हणजे बरेच मतदार चिडलेले आहेत आणि त्यांच्या रागाला वाट करून देणारा ट्रंप जरी मुद्दे नसतील तरी त्यांना आपला तारणहार वाटतो आहे.
ट्रंप प्रत्येक प्रश्नाकडे
ट्रंप प्रत्येक प्रश्नाकडे कॉर्पोरेट स्टाइल पाहातो त्याच्या त्या प्रोग्राममध्ये असायचा तसा, उच्चासनावर बसून..म्हणून असामी म्हणतोय तसं होतंय. म्हणजे सीआयो किंवा पोर्टफोलियो मॅनेजरला कसं अख्खा प्रोगाम आयडीयली चालला पाहिजे ते (साधारण ;)) ठाउक असतं पण डिटेल्स वगैरे विचारले तर मग ते खाली पी एम्स, बीए इ. कडे पाठवतात थोडं तसं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>इराण बरोबर केले गेलेले दील![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आज एकंदरीत दिलाचा दिवस दिसतोय
पुढचं डिबेट कधी आहे?...
पुढचं डिबेट कधी आहे?... रिपब्लिकन्स चे गुरूवारी आहे . साउथ कॅरोलिना मध्ये आहे. बहुतेक ह्या वेळी फक्त ५ मेन उमेदवार असणार आहेत.
पण कन्व्हेन्शनल कॅम्पेन
पण कन्व्हेन्शनल कॅम्पेन फायनान्स नसलेला पण इतका मेनस्ट्रीम उमेदवार पहिल्यांदाच आला आहे का? आधी कोणी असा असेल तर माहीत नाही. त्याचे डोनर्स कोणी लॉबीवाले नसल्याने तो बिनधास्त बोलू शकतो काहीही.
राॅस परो होता बहुतेक, सेल्फ
राॅस परो होता बहुतेक, सेल्फ फंडेड. हि वाज सम कॅरेक्टर...
आजच्या डिबेट बद्दल काय मत
आजच्या डिबेट बद्दल काय मत लोखो? मला तरी बोअर झाले. स्वतःच्या वोटर्स ला आवडेल ते बोलण्याबाबत क्रूज, ट्रम्प, रुबिओ आणि बुश - या क्रमाने यशस्वी झाले असते वाटतेल. आधीच्या उत्तेजनार्थ डिबेट बद्दल माहीत नाही.
Pages