Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गावसकर चे मला आठवणारे काही
गावसकर चे मला आठवणारे काही आक्रमक डाव. लिन्क मिळतील तशा देतो
दिल्ली चे विंडीज विरूद्ध शतक (२९ वे). १९८३ मधले
लगेचच्याच टेस्ट मधे अहमदाबाद ला विंडीज विरूद्ध ९०
मद्रास टाय टेस्ट मधे चौथ्या डावात ३४८ चेस करताना मारलेले ९०
वर्ल्ड कप १९८७ मधे न्यू झीलंड विरूद्ध मारलेले एकमेव वन डे शतक
१९८६ च्या ऑस्ट्रेलियातील तिरंगी लढतीत न्यूझीलंड विरूद्ध २५५ चेस करताना १७ बॉल्स मधल्या २७. हे रन्स संख्येपेक्षा इफेक्ट साठी जास्त गाजले. सुरूवातीलाच भारताने जो वेग घेतला तो जिंकूनच थांबले.
अजूनही असतील आधीचे पण मी पाहिलेले नाहीत. हे वरचे सगळे मी लाइव्ह पाहिलेले आहेत.
१९८३ च्या सिरीज बद्दल मी लिहीलेल्या लेखाची रिक्षा
http://www.maayboli.com/node/11612
रेकॉर्ड चेस होता होता
रेकॉर्ड चेस होता होता राहिलेली त्यात द्विशतक आहे ते पण. (त्याचेच आहे ना?)
हो ते ओव्हलवरचे ना? ते किती
हो ते ओव्हलवरचे ना? ते किती आक्रमक होते माहीत नाही. मी पाहिलेले नाही. तशा कदाचित विंडीज मधल्या खेळी सुद्धा असाव्यात पण नक्की माहीत नाही.
छान चर्चा चालू आहे. आपल्या
छान चर्चा चालू आहे. आपल्या आधीच्या पिढीतील खेळाडूंबद्दल वाचणे आणि आपल्या बालपणातील क्रिकेटपटूंचा उल्लेख दिसणे हे मजेशीर असते.
त्या विजय भारद्वाजला आमच्याकडे आप्पा म्हणायचे. कारण आमच्यायेथील एक आप्पा नावाचा मुलगा त्याची सेम डुप्लिकेट कॉपी होता. म्हणून तो विशेष लक्षात.
शंतनू सुगवेकर वगैरे उल्लेख झालेय ते बहुतेक फॅब फोर ठिय्या मारून बसल्याने संधीविना सडले अशी माझ्या एका फॅब फोर वर राग असणार्या मित्राची ओरड असते.
करंट पद्धत आमच्यातही असायची. आमच्यात त्याला कनेक्शन म्हणायचे. बाहेरच्या पोरांशी मॅच घेताना कनेकशन आऊट ठेवायचे की नाही हे ठरवले जायचे. त्याचप्रमाणे जसे ट्री कॅच आऊट ठेवायचे की नाही ठरवले जायचे
अरे हो. आणि ओवरथ्रोचे रन पकडायचे की नाही हे देखील एका वयापर्यंत ठरवलेच जायचे. कंपलसरी नसायचे. कारण कित्येकांची फिल्डींग गचाळ. अगदी सुरुवातीला अंडर आर्म वरून ओवर आर्म खेळायला सुरुवात केली तेव्हाही वाईड बॉलचेही रन मोजायचो नाही कारण प्रत्येकाचे ओवरला तीन वाईड असायचे आणि गल्लीत जर मुश्कीलने वीस पंचवीस धावा बनत असतील तिथे टोटल स्कोअरमध्ये वाईडचा एवढा वाटा कसा परवडणार..
रेकॉर्ड चेस होता होता
रेकॉर्ड चेस होता होता राहिलेली त्यात द्विशतक आहे ते पण. >>>>
हो २२१!! ओव्हलवर!
१९७९ च्या त्या दौर्यावर वेंकट कर्णधार. सैद किरमाणीला बसवून भारत भूषण सॉरी भारत रेड्डी ला नेलेले कीपर म्हणून!! त्यावेळी सर्व जण आश्चर्य चकीत झालेले नेमकी ह्या सामन्याच्या वेळी सर्वांना किरमाणी ची प्रकर्षाने उणिव भासली!
त्यावेळी जिंकायला ९ धावा कमी पडल्या ८ बाद ४२९ सामना अनिर्णित!
नंतर हा भारत बहुतेक भारतिय संघात दिसला नाही!
<< विंडीज मधल्या खेळी सुद्धा
<< विंडीज मधल्या खेळी सुद्धा असाव्यात पण नक्की माहीत नाही.>> सचिनच्या पहिल्याच दौर्यावरच्या पाकिस्तान विरुद्धच्या खेळी व सुनीलच्या पहिल्याच दौर्यावरच्या वे.इंडीजमधील खेळी ह्या प्रकाशित होवूं घातलेल्या भव्य, दिव्य सिनेमाच्या 'ट्रेलर'सारख्याच होत्या; या पहांटेच्या किरणांआडच तळपणारा सूर्य दडला आहे, याची स्पष्ट चाहूल देणार्या खेळी होत्या त्या - 'रेकॉर्ड बुक'मधें त्यांचा दिमाख नाहीं बंदिस्त करतां येणार !!!
लगेचच्याच टेस्ट मधे अहमदाबाद
लगेचच्याच टेस्ट मधे अहमदाबाद ला विंडीज विरूद्ध ९०>>>>
हा सामना दोघांमुळे गाजला जरी आपण हरलो तरी!
सुनिल गावस्कर मार्शल च्या गोलंदाजी वर अक्षरशः तुटुन पडलेला सुरवातीला स्लिपच्य डोक्यावरुन सचिन सेहवाग जसे मारायचे तसे चौकार नंतर सणसणित स्ट्रेट ड्राईव्ह! आजही तो डाव डोळ्यापुढे दिसतोय!
तेंव्हा माल्कम मार्शलची गोलंदाजी एवढी भेदक होती की, आम्ही मजेने "मला काय मारशील' असे म्हणायचो!
स्ट्रेट ड्राईव्ह गावस्करचा पहताना डोळ्याचे पारणे फिटायचे! गोलंदाचा फोलोथ्रु पुर्ण होऊन तो वळुन पहायच्या आत चेंडू समोरच्या स्टंपला जणू ओझरत्या चुंबनाची आस दाखवत सिमापार जायचा! एकदमअफालातून!
त्याच सामन्यात कपिलने दुसर्या डावात एका बाजूने सतत २९ षटके बॉलिंग करुन ९ बळी मिळविलेले!
सचिनच्या पहिल्याच
सचिनच्या पहिल्याच दौर्यावरच्या पाकिस्तान विरुद्धच्या खेळी व सुनीलच्या पहिल्याच दौर्यावरच्या वे.इंडीजमधील खेळी ह्या प्रकाशित होवूं घातलेल्या भव्य, दिव्य सिनेमाच्या 'ट्रेलर'सारख्याच होत्या; या पहांटेच्या किरणांआडच तळपणारा सूर्य दडला आहे, याची स्पष्ट चाहूल देणार्या खेळी होत्या त्या - 'रेकॉर्ड बुक'मधें त्यांचा दिमाख नाहीं बंदिस्त करतां येणार !!!>>>>>
भाऊ!! एक नंबर वाक्य!!! तुम्ही माझ्या मनातले बोललात!
त्या ७१ च्या दौर्यात वेस्ट इंडीज च्या अवाढव्य संघासमोर २१ वर्षाच्या ह्या छोट्या चणीच्या मुलाने ४ कसोट्यात ८ डावात ३ वेळा नाबाद रहात ७७४ धावा केल्या!
<< तुम्ही माझ्या मनातले
<< तुम्ही माझ्या मनातले बोललात! >> ह्या मागचं माझ्या मनातलं -
नविनच झालेल्या वानखेडे स्टेडियमच्या हिरवळीवर गावसकरचा सत्कार झाला त्यावेळींच मला वाटतं त्याच्या वे.इंडीजमधील पहिल्या दौर्यातील कांही खेळी मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आल्या होत्या. युनिव्हर्सिटीतून तडक वे.इंडीजसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळण्यासाठी त्याला सलामीचा फलंदाज म्हणून नेण्यात आलं होतं. हा कोवळा, बुट्केलासा पोरगा हेल्मेट न वापरतां वे. इंडीजच्या राक्षसी तुफान गोलंदाजाना ज्या आत्मविश्वासानं, दिमाखानं , अचूकतेनं शैलीदार फटके मारत होता , तें पाहून ऊर अभिमानानं भरून आला होता . वे. इंडीजमधील रांगडे व कांहींसे पक्षपाती प्रेक्षकही भारावून जावून त्या फटक्याना नाचून दाद देत होते ! त्याला कांहीशी अडचण वाटत होती ती फक्त लंबू, तगड्या लान्स गिब्सच्या 'ऑफ-स्पिन'चीच. मग दिलीप सरदेसाईनं [ द्विशतक होतं त्या सामन्यात दिलीपचं !] हें जाणून स्वतःकडे स्ट्राईक घेत गिब्सला कसं खेळायचं याचं प्रात्यक्षिकच सुनिलला दाखवलं. सुनिल नंतर तंत्रशुद्ध, शैलीदार खेळाचीं प्रात्यक्षिकं देतच जगभर गाजत राहिला.
संजय मांजरेकर > >Aus Media
संजय मांजरेकर > >Aus Media च्या नादी लागून भारतीय मिडीया ने बुडवायला मदत केलेला आगरकर च्या आधीचा एक खेळाडू.>>>
खरे तर ९६ च्या इंग्लंड दौर्यात दुसर्या सामन्यात अंग काढून घेऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला..
त्या सामन्यात द्रविड आणि गांगुली दोघांनी झोकात पदार्पण केले एकदम आणि ह्या मांजरेकरांच्या फलंदाजी च्या जागेवर गदा आली!
नंतर तर "ओपनिंग करतो किपींग करतो पण मला संघात ठेवा रे!! " असे म्हणायची वेळ आली!
चांगला फलंदाज पण असा वाया गेला!
<< चांगला फलंदाज पण असा वाया
<< चांगला फलंदाज पण असा वाया गेला! >> समालोचक म्हणून बोलताना एकदां संजय मांजरेकरने स्वतःच तंत्रशुद्धता व बचावात्मक खेळाच्या फारच आहारी गेल्याने आपली कारकिर्द अकाली संपली, हें मान्य केल्याचं मीं ऐकलंय .
मा़जरेकर हा एक उद्धट आणि जळाउ
मा़जरेकर हा एक उद्धट आणि जळाउ खेळाडू आहे. सचिन निवृत्त व्हावा म्हणून देव पाण्यात घालून बसला होता. सचिनवर तोंड सोडण्याची एकही संधी त्याने सोडली नाही.
वरती स्ट्राईक रोटेशनच्या
वरती स्ट्राईक रोटेशनच्या बद्दल काही पोस्ट होत्या... त्यात मायकेल बेव्हनला विसरणे अशक्य आहे.. जो पर्यंत बेव्हन पीच वर आहे तोपर्यंत ऑस्ट्रेलिया मॅच हारणे अशक्य वाटायचे... सहा नंबरला येऊन त्यानी काही जबरी खेळी केल्या...
महाराष्ट्राच्या भारतीय टीम
महाराष्ट्राच्या भारतीय टीम मध्ये न निवडल्या गेलेल्या खेळाडूंच्या यादीत संतोष जेधेचे नाव पण घालायला लागेल.. महाराष्ट्रासाठी काही चांगल्या खेळी खेळला आणि बॉलिंग पण बरी करायचा...
http://www.thecricketmonthly.
http://www.thecricketmonthly.com/story/962291 - इंझमाम उल हक वर एक मस्त लेख.. विशेषत: त्याच्या रन आऊट होण्या संदर्भात..
संतोष जेधे नाव लक्षात आहे पण
संतोष जेधे नाव लक्षात आहे पण किती खेळला ते फारसे माहीत नाही. वरती मिलिंद गुंजाळ बद्दल पादुकानन्दांनी म्हंटले आहे तो एक खूप काळ महाराष्ट्राकडून गाजत होता. तो स्वतः किती रन्स काढायचा लक्षात नाही, पण बहुधा सुगवेकर आणि भावे त्याच्याच कप्तानपदाखाली गाजले. तो कप्तान असताना महाराष्ट्र लीग मधे खूप जिंकत असे.
एक रणजी फायनल की सेमी, शास्त्रीने ही गाजवली ना? दिल्ली का कर्नाटक ला चेस साठी फारसे मोठे टार्गेट नव्हते, आधी आरामात चालले होते व मग शास्त्रीने एकदम विकेट्स काढून मुंबईला जिंकून दिले.
ऋन्मेष, सुगवेकर भावे फॅब फोर एस्टॅब्लिश व्हायच्या आधीचे बहुतेक. पण तेव्हा आपले सगळे बॅट्समन मिडल ऑर्डरचेच होते म्हणून संधी मिळाली नसेल. सिद्धू, श्रीकांत व अरूण लाल हे अधूनमधून असत ओपनिंगला. बाकी वेंगसरकर, मांजरेकर, शास्त्री, अझर, अमरनाथ व नंतर तेंडुलकर हे असताना मधल्या फळीत कोणाला चान्स मिळणे अवघड होते.
मनिष पांडे याला शेवटी घेतले
मनिष पांडे याला शेवटी घेतले नाही. युवीला मात्र घेतले.
युवी अत्यंत बेभरवशाचा आहे.
युवी अत्यंत बेभरवशाचा आहे. बहुधा क्रिकेटबाह्य कारणां मुळे घेतला असेल.
डीन जोन्स, डेव्हिड बून्स,
डीन जोन्स, डेव्हिड बून्स, अर्जुना रणतुंगा आठवतात राव. >>>>> अगदी अगदी ! हॅन्सी क्रोनिए, मायकेल बेव्हन.. (हिम्याची पोस्ट आत्ता वाचली. )
बघता बघता ५०ची पार्टनरशिप कधी होऊन जायची कळायचंही नाही! बून भारी होता एकदम.. तो आणि मर्व्ह ह्युज दोन्ही मुच्छड प्लेयर्स सही होते एकदम.
फॅब फोरच्या पिढीतला एक रणजी बॅट्समन ज्याला संधी मिळायला हवी होती तो म्हणजे अमोल मुजुमदार. खूप गुणी होता तो. काहितरी पॉलिटिक्स होऊन तो नाकारला गेला असं ऐकलं.
भाऊ, अफलातून व्यक्त केली आहे
भाऊ, अफलातून व्यक्त केली आहे तुम्ही सगळ्यांचीच भावना! मस्त!! (शब्द्तांतून'ही' छान व्यक्त करता तुम्ही )
संतोष जेधे, मिलिंद गुंजाळ ही नावं राहून गेली. सुगवेकर वगैरे मंडळी फॅब फोर च्या आधीची.
सितांषु कोटक ला एकदा चुकून घेतले होते. तसं त्याला कळवलं पण गेलं आणी मग नंतर, 'अरे तु का तो, आम्हाला तो हा वाटला' वगैरे घोळ घालून काढला होता (तो तेव्हा ३०+ होता म्हणून). (सं: क्रिकईन्फो)
मुजुमदार विषयी एक वदंता अशी आहे (ह्या गोष्टी कधीच खरं खोटं करता येत नाहीत), की त्याने कुठल्या तरी सिलेक्टर ला नको त्या अवस्थेत पाहीलं होतं. संझगिरी ने त्याला हा प्रश्न एकदा विचारला होता (यु-ट्यूब वर व्हिडीओ आहे), पण अर्थातच त्याने टाळला.
बून विषयी (तो आऊट व्हायचाच नाही, हे वगळून) एक आठवण म्हणजे १९९२ च्या दौर्यात शतक पूर्ण झाल्यावर एकदा रमत गमत लेग बाय काढायच्या नादात चंद्रकांत पंडीत ने त्याला नॉन-स्ट्राईकर एण्ड ला डायरेक्ट हिट करून रनआऊट केलं होतं. मुळातच तेव्हा डायरेक्ट हिट प्रकरण अप्रूपाचं होतां. त्यातून भारतीय फिल्डींग ही झाडाच्या अवतीभवती फिरणार्या हिंदी नायकांना आदर्श मानणारी होती. आणी बून वगैरे मंडळी आपल्याच्यानी आऊट होतील असं वाटायचच नाही (ह्या यादीत नंतर बरेच आले - कलिनन, जिमी अॅडम्स, बासीत अली, चंदरपॉल, मायकल क्लार्क आणी लेटेस्ट म्हणजे स्टीव्हन स्मिथ). त्यामुळे तो थ्रो चांगलाच लक्षात आहे.
हिम्या - त्या लिन्कवर खूप
हिम्या - त्या लिन्कवर खूप सुंदर लिहीले आहे इंझमाम बद्दल, बरेचसे पटले. मजेदारही आहे. मी पूर्वी त्याच्या मजेदार रन आउट क्लिप्स एकत्र टाकल्या होत्या कोठेतरी. त्यात या सगळ्या होत्याच पण अजून एक दोन इतर होत्या. मात्र या क्लिप्स चे वर्णन या लेखकाने फार सुरेख केले आहे. मजा आली वाचायला.
यातून भारतीय फिल्डींग ही
यातून भारतीय फिल्डींग ही झाडाच्या अवतीभवती फिरणार्या हिंदी नायकांना आदर्श मानणारी होती. >>>
कलिनन, जिमी अॅडम्स, बासीत
कलिनन, जिमी अॅडम्स, बासीत अली, चंदरपॉल, मायकल क्लार्क आणी लेटेस्ट >>>> + अरविंद डिसिल्वा.. थोड्याफार प्रमाणात सलिम मलिक, हल्लीचा कुक
हे जसे आपल्याला कायम नडणारे बॅट्समन होते, तसे बॉलर्स आठवतात का?
मलाआआठवतात त्यातले अकिब जावेद, मुरलिधरन, चमिंडा वास, बर्याच प्रमाणात मॅकग्रा.
संझगिरी ने त्याला हा प्रश्न एकदा विचारला होता (यु-ट्यूब वर व्हिडीओ आहे), पण अर्थातच त्याने टाळला. >>>> हे खुपते तिथे गुपते मध्ये होतं बहुतेक. बघितल्याचं आठवतय.
अकिब जावेद वरून आठवले ह्याला
अकिब जावेद वरून आठवले ह्याला सचिन ने एकदा सलग ४ फोर मारले ५ वा चेंडू टाकताना पाय दुखतो म्हणून तंबूत गेला वाचला तेंव्हा एका षटकात ६ चौकारापासून..
बाबू विलीस ला संदीप पाटलांनी मारलेले ६ चौकार अजून स्मरणात तेही इंग्लंड मध्ये.. तेंव्हा हा बाबू जगातला सर्वात तेज बॉलर होता..
संदीप पाटील खेळताना भारी एकदम फिल्डिंग ला मात्र लापाववा लागायचा..
एकदा दिलीप वेंगसरकरला बांगडा बाधला म्हणून ह्याला तडक विमानाने कलकत्त्याला नेले
मला वाटते हेलिकॉप्टरने
मला वाटते हेलिकॉप्टरने नागपूरला नेले होते. हा सकाळी घरात मॅच पाहण्यासाठी टीव्हीशी खटपट करीत होता आणि त्याला चक्क मैदानावर उतरवण्यात आले हेलिकॉपटरने . त्याने बहुधा ६ रन काढल्या होत्या तेव्हा
पाहण्यासाठी टीव्हीशी खटपट
पाहण्यासाठी टीव्हीशी खटपट करीत होता आणि त्याला चक्क मैदानावर उतरवण्यात आले हेलिकॉपटरने . त्याने बहुधा ६ रन काढल्या होत्या तेव्हा स्मित>>>
असेल पण असेच काहीसे झालेले
There was a small problem:
There was a small problem: Patil was in another city, and there was no way he could make it on time. Wadhwaney narrated: “In arrived Nagpur’s most influential politician. He revealed that after a lot of effort, he had been able to convince the Maharashtra Government that Sandeep Patil might be provided state plane to arrive in Nagpur for the match.”
While all this was happening, Patil had no idea of the goings-on, and could not be contacted. His family sent his kit to the airport. The aircraft waited till Patil reached Santa Cruz Airport, and took off only in late afternoon.Patil arrived just before stumps. India lost Gaekwad and Dilip Vengsarkar, and finished the day on 92 for 2 with Gavaskar and Yashpal Sharma at the crease. Patil had a good night’s rest, but it did not matter. He played “an exquisite drive to get off the mark”, but was too late in playing a bouncer from Azeem Hafeez, edged it, and was caught by Raja.
सॉरी हेलिकॉपटरने नाही प्लेननेच.
कलिनन, जिमी अॅडम्स, बासीत
कलिनन, जिमी अॅडम्स, बासीत अली, चंदरपॉल, मायकल क्लार्क आणी लेटेस्ट >>>> + अरविंद डिसिल्वा.. थोड्याफार प्रमाणात सलिम मलिक, हल्लीचा कुक >> अँडी फ्लॉवर पण घाला त्या यादीत. ह्यातले बरेच जण दर्जेदार फलंदाज होते पण काही काही जण फक्त भारताबरोबर खेळण्याच्या नशिबावर टिकून गेले.
एकदा दिलीप वेंगसरकरला बांगडा बाधला >> त्या बांगडा प्रेमाच्या भरात ८७ चा World Cup घालवला होता अर्थात खरा मत्स्यप्रेमी त्या बांगड्याला दोष न देता, शेफला किंवा मनिंदर सिंग नि शास्त्रीच्या बिनडोक बॉलिंग ला देईल
त्यातून भारतीय फिल्डींग ही झाडाच्या अवतीभवती फिरणार्या हिंदी नायकांना आदर्श मानणारी होती >> महिनाभरापूर्वीच्या aus दौर्यामधे काहि भारतीय फिल्डरना असेच टार्गेट केलेले.
या पहांटेच्या किरणांआडच तळपणारा सूर्य दडला आहे, याची स्पष्ट चाहूल देणार्या खेळी होत्या त्या - 'रेकॉर्ड बुक'मधें त्यांचा दिमाख नाहीं बंदिस्त करतां येणार >> क्या बात है भाऊ ! अजून थोडे गावस्करचे नि विश्वनाथचे किस्से येऊ द्या
माझा एक अविस्मरणीय क्षण एकनाथ
माझा एक अविस्मरणीय क्षण एकनाथ सोलकर यांच्या सोबत....
भारतीय क्षेत्ररक्षणातला चित्ता...
सोलकर म्हणजे jonty Rhodes
सोलकर म्हणजे jonty Rhodes चे वडील ना?
Pages