क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी प्रिन्सिपली असे दिसते की ब्याट ही फलंदाजाच्या शरीराचा भाग समजली जाते . आणि फलंदाज बेल्स उडताना क्रीजशी अ‍ॅटॅच पाहिजे. फलंदाज बाहेर असेल आणि ब्याट आत टेकलेली असेल तर ब्याट त्याच्या शरीराचा भाग असल्याने तो क्रीजमध्ये आहे. बेल्स उडताना त्याचे शरीर बाहेर असेल अन ब्याट क्रीजच्या आत आणि हवेत असेल तर क्रीजमधल्या जमिनीशी त्याच्या शरीराचा कॉन्टॅक्ट रहात नाही सबब तो बाद मग बेल उडण्याच्या आधी भलेही त्याची ब्याट जमिनीस स्पर्शून वर उचलली गेली असली तरी.
शिवाय तो क्रीजमध्ये उभा/पोचला असेल आणि ब्याट जमिनीस टच नसेल तरी त्याच्या पायाचा कॉन्टॅक्ट क्रीजमधल्या जमिनीशी असल्याने तो नाबाद असेल. हाच न्याय बाऊंड्रीवर फील्डिंग करताना घसरून बाहेर गेलेल्या फील्डरचा स्पर्श बाऊन्ड्रीच्या आत असलेल्या बॉलला असेल तर बॉल त्याच्या शरीराचा भाग झालेला असल्याने तो बाऊन्ड्रीच्या बाहेर म्हणजे चौकार आणि त्या बाहेर घसरलेल्या फील्डरचा स्पर्श आतच राहिलेल्या बॉलला नसेल तर पळून काढलेल्या धावा ... Happy

खेळाडू धावताना क्रिजकडे उडी घेतो. त्याची बॅट क्रीजच्या पुढे जाते, जमिनीवर आपटते नि परत हवेत उडते नि नेमके त्यावेळी स्टंप उडवले तर तो बाद धरला जातो कि नाही ? बहुधा धरला जातो. >> हो धरला जातो. ती वरची सचिन ची क्लिप बघ. तसेच आहे तेथे. त्याची बॅट आधी टेकली होती पण धडके मुळे परत हवेत गेली.

मला वाटते अशा वेळेस ती पुन्हा जर उचलली गेली असेल तर ती रन काढण्याकरता उचलली होती का यावरून ठरवले पाहिजे. एकदा क्रीज मधे बॅट टेकली की त्याने रन पूर्ण केला. म्हणजे त्या रन करता तो आउट होउ शकत नाही. त्यानंतर पुन्हा आणखी रन काढण्याकरता बॅट उचलली तर तो आउट असेल पण पुन्हा रन काढण्याचे इंटेन्शन नसेल तर नुसती बॅट वर उचलली म्हणून आउट नसायला हवा. अर्थात अशा बहुतांश वेळेत तो ऑलरेडी क्रीज मधे पोहोचलेला असेल, त्यामुळे मुळातच आउट होणार नाही. सचिन च्या बाबतीत तो अजूनही बाहेर होता.

बॅट शरिराच्या भागाच्या बाबतीत पादुकानन्दांच्या पॉईण्टशी सहमत. तसेच स्विच हिट बद्दलही.

तो बाउन्ड्रीचा रूल सर्वात अनफेअर आहे असे मला वाटते. ज्याप्रमाणे कॅच घेतल्यावर बॉल जमिनीला टेकला नाही एवढे पुरेसे असते, ज्या हातात बॉल आहे तो जमिनीला टेकला तरी चालतो (लहानपणी हा एक मोठा गैरसमज होता, की हात सुद्धा टेकलेला चालत नाही) तसेच जोपर्यंत बॉल बाउण्ड्रीच्या आत आहे तोपर्यंत फोर नाही दिली पाहिजे. मग अडवणारा फिल्डर बाहेर असला, रोप्स वर असला तरी चालेल. मुळात हा स्पेसिफिक नियम गेल्या काही वर्षांत आलेला असावा. पूर्वी तेथे कॅमेरेच नसत त्यामुळे एवढे कळणे अवघड होते.

रन आउट च्या बाबतीत गांगुलीचा मजेदार रन आउट. ऑस्ट्रेलियाविरूद्ध शतक मारल्यावर, एवढी मेहनत केल्यावर केवळ बॅट टेकली नाही म्हणून राजेशाही रन आउट Happy
https://www.youtube.com/watch?v=d3xwYOfJgKw&t=6m36s

क्लिप बघितली तर दिसेल की बॅट क्रीज च्या वरती होती. म्हणजे घासत गेला असता तर सेफ होता.

गांगुलीचा रन ऑट मजेशीर असेल पण चुकीचा अथवा नियमबाह्य नाही. घासत गेला असता तर त्याच्या शरीराचा भाग ब्याटच्या रूपाने क्रीजच्या जमिनीशी कॉन्टॅक्टमध्ये असता. स्टंपिंगच्या बाबतीत हेच लॉजिक आहे ना. स्तंपिम्ग म्हणजे रन काढण्याचा प्रयत्न न करता झालेला- एक प्रकारचा - रन आउट म्हणता येईल. ( खरे तर तो रन काढण्यासाठी च बाहेर पडला होता हे मानणे त्यामागचे गृहीतक असावे). क्ष फलंदाज खेळला , रन काढली नाही . बॉल वीकेटकीपरने गॅदर केला . क्ष क्रीजमध्ये आहे पण समोरचा य फलंदाज क्रीजच्या बाहेर असेल तर विकेटकीपर त्याला समोरून थ्रो करून रन आउट करू शकत असावा असे मला वाटते. कारण बॉल डेड झालेला नसतो.कारण दोन्ही फलंदाजानी क्रीजमध्ये राहून बेल्सचे ( विकेटचे ) रक्षण नियमानुसार करणे आवश्य असते. की फक्त स्ट्रायकरची बाजूच अलाईव्ह असते. ?

गांगुलीचा रन ऑट मजेशीर असेल पण चुकीचा अथवा नियमबाह्य नाही. >> तो लीगल ही आहे आणि फेअर ही. मी फक्त इथल्या चर्चेत मजेदार उदाहरण म्हणून दिला.

के श्रीकांत एका मॅचमध्ये बावळटसारखा अभावितपणे क्रीजच्या बाहेर बॅटला टेकून आरामात उभा असताना स्टम्प आउट झालेला आहे. तेव्हा त्याच्यावर खूप टीका झाली होती. गल्लीतले फलंदाजही अशा चुका करीत नाहीत वगैरे...

ही इथली गंमत पहा... रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्त....

https://www.youtube.com/watch?v=w8JiLfoWng0

यातला कपिलने पीटर कर्स्टनला कसा बाद केलाय पहा. कपिल बॉल टाकण्यापूर्वीच नॉन स्ट्रायकर कर्स्टन क्रीजच्या बाहेर गेला होता कपिलने बॉल न टाकता त्याच्या बेल्स उडवल्या आणि पंचांनी कर्स्तनला बाद दिले. त्यामुळे नॉन स्ट्रायकरने क्रीजबाहेर जाणे हे सदैव धोकादायक असतेच ( बॉलरने स्टार्ट घेतल्यावर)

की फक्त स्ट्रायकरची बाजूच अलाईव्ह असते. ? >> दोघांपैकी कोणीही आउट केला जाउ शकतो.

रन आउट च्या बाबतीत बहुधा दोनच कारणाने एकदा टेकवलेली बॅट परत हवेत जाउ शकते, रन काढायचा उद्देश नसूनही
- फील्डर ला धडकून, जसे सचिन चे झाले
- पोहोचण्याकरता डाइव्ह मारत क्रीझमधे एकदा पोहोचलेली/टेकलेली बॅट त्याच फ्लो मधे पुढे जाताना परत किंचित उंचावली जाणे - हे अनेकदा होते.
या दोन्ही बाबतीत आउट योग्य वाटत नाही.

स्तंपिम्ग म्हणजे रन काढण्याचा प्रयत्न न करता झालेला- एक प्रकारचा - रन आउट म्हणता येईल. ( खरे तर तो रन काढण्यासाठी च बाहेर पडला होता हे मानणे त्यामागचे गृहीतक असावे). >>> नाही, जेव्हा स्टंपिंग होते ते बॉल च्या पिच पर्यंत जायला पुढे जाउन मारताना बॅट्समन फसला व परत क्रीज मधे पोहोचू शकला नाही तर. एरव्ही रन काढायला निघाला व विकेटकीपरने स्टंप उडवले तर ते रीतसर 'रन आउट' धरतात व बोलर च्या नावावर ती विकेट जात नाही, जशी स्टम्पिंग मधे जाते. बहुतांश स्टंपिंग मधे बोलरचा हात असतो.

कोणत्याही रन आउट मधे एकदा रन पूर्ण केलेला आहे व पुढचा रन काढण्याचा उद्देश नाही हे क्लिअर आहे. अशा बाबतीत थ्रो स्टंप ला लागताना (ऑलरेडी आधी एकदा टेकून मग) बॅट हवेत असेल तर रन आउट धरला जाउ नये.

अशा बाबतीत थ्रो स्टंप ला लागताना (ऑलरेडी आधी एकदा टेकून मग) बॅट हवेत असेल तर रन आउट धरला जाउ नये.
>> फलंदाज बाहेर असेल आणि बॅट हवेत असेल 'त्या ' क्षणी तर धावेचा इरादा असो नसो बाद धरायला हवेच. कारण क्रीजचा काही काँटॅक्ट च राहात नाही बॉडीशी.

होय, तो सध्याचा नियम आहे. मी म्हणतोय की रन त्याने ऑलरेडी पूर्ण केलेला आहे. बॅट इतर कारणाने हवेत गेली आहे.

कपिल ची क्लिप आहे तीच वरच्या एक दोन पोस्ट मधे फेअर चान्स देउन केलेल्या उदाहरणातली.

Fa, I think "ball being in play" is well-defined, but intention of running is not. After all, not all stumpings are a result of batsmen going for a run. They are caught out of their crease when the ball is in play. The same should hold true for run-outs.

भास्कराचार्य,
Fa, I think "ball being in play" is well-defined, but intention of running is not. >> हे बरोबर आहे. सहमत, पण
After all, not all stumpings are a result of batsmen going for a run. >> हे तर none of the stumpings are a result of a batsmen going for a run असे आहे. स्टम्पिंग चा रन काढण्याशी काहीच संबंध नाही.

आणि मी जे म्हणतोय ते स्टम्पिंग च्या बाबतीतही आहे. एकदा परत येउन बॅट टेकवली की झाले असे असायाला हवे आयडियली.

एनीवे, सध्याचा नियम जो आहे तो ही सर्वांना माहीत असतो त्यामुळे इट्स ओके.

none of the stumpings are a result of a batsmen going for a run >> I think this is correct. If run is involved then it is considered as run-out.

कोणत्याही रन आउट मधे एकदा रन पूर्ण केलेला आहे व पुढचा रन काढण्याचा उद्देश नाही हे क्लिअर आहे. अशा बाबतीत थ्रो स्टंप ला लागताना (ऑलरेडी आधी एकदा टेकून मग) बॅट हवेत असेल तर रन आउट धरला जाउ नये. > > इथे 'उद्देश' हा भाग भयंकर subjective आहे. समजा, मी रन पूर्ण केला, बॅट टेकवली नि परत वळून बघतोय (अशा वेळी मी पुढचा रन काढण्याच्या द्रुष्टीने चाचपडून पाहातोय कि फक्त माझा पार्टनर पोहोचला कि नाही हे बघतोय, किंवा नुस्ताच परत फिरलोय) अशा वेगवेगळ्या शक्यता उद्भवू शकतात. त्यामूळे ह्या वेळेस बाद केले तर ते नक्की कोणत्या category मधे धरायचे हा प्रश्न येऊ शकेल. आहे तो बॅट हा बॅट्समनच्या शरीराचा भाग नि म्हणून काहितरी भाग जमिनीच्या contact मधे हवा हे जास्त safe ठरतेय.

रॉहू, @" म्हणजे प्रिन्सिपली अडचण काय आहे?" switch hit बद्दल बहुतेक बॉलर त्यांचा बॉल लाईन लेंग्थ वगैरे बॅट्समन डाव्खुरा आहे कि उजवा ह्यावर ठरवतात नि त्याप्रमाणे fielding placement करतात. बॉल टाकल्यावर बॅटसमन ने आपला पवित्रा बदलला तर त्याबद्दल काही करता येत नाही (मूळात तसा बदलणे फार कठीण आहे). बॉलर delivery stride मधे जायच्या आधी बदलला तरी बॉलर adjustment करू शकतो. पण delivery stride मधे जेंव्हा बदलला जातो तेंव्हा बॅट्स्मनला फायदा होतोय. बॉल टाकण्यापूर्वी काही स्टेटस को कायम ठेवला जाणे अपेक्षित असते. उदा. बॉलर कुठल्या बाजूने नि कुठल्या हाताने बॉल टाकणार हे declare करतो नि अंपायर त्याची अमलबजावणी करतो. बॉलरचा रन अप सुरु झाला की फिल्डर आपल्या जागा एका लिमिटपर्यंतच बदलू शकतात (to and fro w.r.t. to batsman) switch hit मधे नेमका असाच भाग बॅट्समन ला apply होत नाहीये. मूळात बॉलरवर बरेच निर्बंध आहेत जे बॅट्समन वर नाहित. १. अमकेच शॉर्ट बॉल टाकू शकतो. २. अमूक एक फिल्ड ३० मी. मधे असले पाहिजेत. ३. लेग स्टम्पच्या बाहेर बॉलचा टप्पा पडला तर अगदी बॅट्समन प्लम असेल तरीही नाबाद ठरतो (I can understand where this rule came from, but LBW is itself subjective and hence there is no need to have such arcane rule.) बॅटस्मन वर असे काही निर्बंध नाहित. स्विच हिट हा त्यातलाच एक प्रकार.

काहितरी भाग जमिनीच्या contact मधे हवा हे जास्त safe ठरतेय. >>

अरे तेच त्यामुळे जमिनीशी कॉन्टॅक्ट हवा असणे जरूरी आहे.

धावा काढताना वळून पाहून अंदाज घेण्याचा माणस असला तरी जर त्या क्षणी तिथे स्टम्पवर बॉल फेकला तर तो आउटच होतो. त्यामुळे वळून पाहिल्यावर लगेच ( धाव नसली तर) लोकं क्रिझ मध्ये परत येतात.

Nahi mi ideally ch mhantoy. Cricket's philosophy for a batsman should be to protect his or her wicket as long as the ball is in play. Both stumpings and runouts follow the same general principle in that regard.

With stumpings, it is even harder to differentiate. It could happen that the batsman falls over after first attempt of stumping instead of bat being in air and gets stumped. Will you declare that as a not-out? To me it is the responsibility of the batsman to maintain his status in the crease and losing of his balance represents that he could not protect his wicket successfully. Happy

Double post.

To me it is the responsibility of the batsman to maintain his status in the crease and losing of his balance represents that he could not protect his wicket successfully. >>

करेक्ट म्हणूनच स्ट्म्पीग आणि रन आउट वेगळे आहेत ना? व्हाय आर वि कम्पेरिंग बोथ टूगेदर.

Cricket's philosophy for a batsman should be to protect his or her wicket as long as the ball is in play. Both stumpings and runouts follow the same general principle in that regard. ..... it is the responsibility of the batsman to maintain his status in the crease>> I think Mankad ensured that same is extended to the runner as well Wink

Double post.

@kedar, Because they follow the same principle - a fielder can disturb the wicket with the ball if the batsman is not in the crease. Jar stumping chya veles ball slip fielder kade gela, aani tyane bail udavlya instead of wicket keeper, tar aapan run kadhnyacha uddesh navhta mhanun not-out denaar ka?

इंटरेस्टिंग आहेत पॉइण्ट्स. मला का ते अनफेअर वाटते ते लिहीतोय.

बॅट टेकवली नि परत वळून बघतोय (अशा वेळी मी पुढचा रन काढण्याच्या द्रुष्टीने चाचपडून पाहातोय कि फक्त माझा पार्टनर पोहोचला कि नाही हे बघतोय, किंवा नुस्ताच परत फिरलोय) >>>
धावा काढताना वळून पाहून अंदाज घेण्याचा माणस असला तरी जर त्या क्षणी तिथे स्टम्पवर बॉल फेकला >>>

ही उदाहरणे मला तरी 'रन काढण्याच्या इण्टेन्शन' चीच वाटतात. याउलट मी दिलेली दोन उदाहरणे क्लिअर अशी आहेत की ज्यात पुन्हा रन काढण्याचे इण्टेन्शन नाही.

It could happen that the batsman falls over after first attempt of stumping instead of bat being in air and gets stumped. Will you declare that as a not-out? >> इथेही, जर ऑलरेडी एकदा बॅट टेकवून झाली असेल तर नॉट आउट असायला हवे. मात्र इथेच तो जर तेवढ्यात पुन्हा रन काढण्याचा चान्स आहे का हे बघायला बाहेर गेला तर आउट आहे.

Fakta pudhe yeun spinner la maarayla gela asel aani WK chya aivaji first slip vaalyakade ball spin houn tyane WK saarkhach stumping ghadvun aanla tar tyaat run kadhayche intention ka asel? Run kadhayche intention he kon stumps udavtoy hyavar dependent nahi.

Fa, I think we will have to agree to disagree to some extent here. Happy I certainly understand your intentions, but I think rules should be as less subjective as possible.

फा असे समज तात्पुरते कि, दादा (or someone who is reluctant to run) नि कोहली (someone who can rotate strike at will and very fast runner) एकत्र खेळत आहे. दादा taps the ball towards a fielder (say Ponting or Abe or Rhodes - someone who is most likely to score direct hit) extra cover and scrambles for a single. KohalI responds to dangerous call and is now running towards danger end. Other the other hand Dada is going to safe end. Since he called for a run, it is possible that he will simply turn around after he completes the run to check if Kohli reached safely or not. There are hardly any chances that he is thinking about second. In the process it lifts his bat. Meanwhile, Ponting realizing that he has better chance to get non striker, throws and breaks the wicket. आत्ता दादा बाद कि नाबाद हे निर्विवाद्पणे ठरवायला bat has to be grounded when ball hit the stump हवे का नको ?

माझ्या मते subjective म्हणजे 'रन काढण्याचे intention आहे कि नाही' हे ठरवण्याचे काम आले कि त्यात संदिग्धता येणारच. ह्यालट ' batsman has to maintain his status in the crease when ball hits the stumps' हे सगळ्या जर-तर ला निकालात काढतेय.

बायदवे ह्या वेळच्या मासिकात रविंद्र जडेजाबद्दल लेख आला आहे. मला आवडला लेख. >> केदार ह्या प्रिंट घेऊन जाडेजाला पाठवू का ? ;). मी काल वाचलेला लेख, मला ठिक ठाक वाटला होता. जडेजा as a cricketer म्हणून कसा बदलत गेला हे अजिबात cover केले नाही. त्यातला एक मुद्दा ज्याबद्दल तुला मी मागे म्हटले होते कि 'सौराष्ट्रा कडून बॅटींग करणारा जाडेजा नि भारताकडून करणारा जाडेजा ह्यांच्या approach मधे प्रचंड फरक आहे' ह्याबद्दल त्या लेखात ओझरता उल्लेख आहे नि त्याचे कारण धोनी हे आहे हे लक्षात आले का ?

मला मंकडिंग बेसबॉल मधे जसं सेकंड किंवा थर्ड बेस वरच्या बॅटरला पिच करायच्या आधी आऊट करतात, तसं वाटतं.

मला मंकडिंग NFL मधे situational football म्हणतात तशा प्रकारचे वाटते. One needs to be on guard at all time.

भास्कराचार्य, ओके Happy

आता त्या स्टम्पिंग च्या उदाहरणाबद्दलः
तेथे रन काढायचा उद्देश नसतो आणि तरीही फलंदाज रन आउट होतो. पण तेथेही फलंदाज मुळात क्रीजच्या बाहेर असतो व आत एकदा सेफली आलेला नसतो. असे फिल्डर्स नी रन आउट केल्याची उदाहरणे अनेक आहेत, विशेषतः सिली पॉइंट किंवा फॉरवर्ड शॉर्ट लेग ने.
उदा:
https://www.youtube.com/watch?v=wBpzmA8TTR0&t=0m35s

Pages