क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मालिकावीर रोहीत शर्माने मात्र दिलखुश केले एकंदरीतच..
आजच्या घडीच्या खेळाडूंमध्ये एकदिवसीय फॉर्मेटमधील माझा सर्वाधिक आवडता खेळाडू...
जागला माझ्या आवडीला .. जिओ रोहीत शर्मा !!!
सर्वाधिक १५०-२०० करायचा विक्रम करणार हा खेळाडू

खरेच मॅन ऑफ द मॅच सारखे मुजरिम ऑफ द मॅच हेही जाहीर करावे. अर्थात तो हरले ल्या संघातूनच निवडला जाईल::फिदी:

कुक वरुन आठवले भारतिय संघाला व्यवसायावरुन नांव असलेल्या खेळाडूंनी आजवर खुप छळलयं. कुक, स्मिथ, टेलर, स्टुअर्ट, क्लार्क इत्यादी... Wink

कृष्णा Happy हे सही आहे. अजून असतील.

मात्र ऑस्ट्रेलिया हा एकच देश असेल ज्यांना लॅम्ब ने, बुचर ने व कुक ने ही छळले आहे Happy

<< चंदरपॉलने रिटायरमेंट घेतली. >> आजच्या 'इंडियन एक्सप्रेस'मधे या गुणी खेळाडूच्या २२ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीचा आढावा घेणारा अप्रतिम लेख आहे. << काही काही खेळाडू भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरायचे..त्यातला तो एक होता. >> याचाही खास उल्लेख त्या लेखात आहेच. केवळ लाराचा समकालीन म्हणून वे. इंडीजसाठीची त्याची भरीव कामगिरी कांहींशी झाकाळली गेली. लेखाचा शेवटही खूप भावणारा- an unassuming, unsung, and at times underestimated, presence at crease !
सलाम व शुभेच्छा, चंदरपॉल !

चंदरपॉल जेंव्हा क्रिझ वर येऊन गार्ड घेऊन बेल्स ठोकायचा भरभक्कम पाया खंदायचा जणू मोठ्या लांबलचक इनिंगचा... स्क्वेअरचे फटके लाजवाब असायचे...
सलाम चंदरपॉल..

<<.. ऑस्ट्रेलिया हा एकच देश असेल ज्यांना लॅम्ब ने, बुचर ने व कुक ने ही छळले आहे >> तरीही अनेक तपं ज्याच्या जवळ जायलाही कोणी धजत नाही, असा एकमेव व्यावसायिक नांव असलेला फक्त ऑस्ट्रेलियाचाच आहे - डॉन !!! Wink

भाऊ Happy

टी-२० - १८८-३ [ कोहली- नाबाद ८८ !]
कोहलीचं अप्रतिम फलंदा़जीचं प्रदर्शन. बघूं आज तरी आपले गोलंदाज ऑसीजना १८८च्या आंत रोखतात का .

बुमराह ' चेंज ऑफ पेस' व 'यॉर्कर' यांचा चांगला उपयोग करतो असं जाणवतं. एक शुभदायी लक्षण भारतासाठी !

मस्त जिंकलो!! सही वाटलं. बुमराह चा यॉर्कर चांगला आहे. कोहली जबरदस्त खेळला. त्याचे मनगटातून मारलेले शॉट्स लक्ष्मण / अझहर ची आठवण करून देतात.

कोहली पेटलाय!
शर्माने सावचितपणा दाखवायला हवा. आपण फॉर्ममध्ये आहोत तर तुटून पडूया. साधारण असा पवित्रा वाटला त्याचा. त्यापेक्षा त्याने त्याच्या नेहमीच्या शैलीत इनिंग बिल्ड करायला हवी.
रैना देखील बरा वाटला. तो आपला २०-२० चा की बॅटसमन आहे. झटपट कामाला लागतो.
धवन, रहाणे, मनीष पांडे, पांड्या, युवराज.. २०-२० च्या वर्ल्डकपला आपली फलंदाजी भारी असणार.
स्पिनर आश्विन आणि जडेजाच असणार..
दोन वेगवान गोलंदाज कोण ते आता बघायचेय..
बाकी जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा खुश केलेय..

थोडासा उशीर झालाय, पण ५व्या वनडे मध्ये २४ वर असताना शर्माने मारलेला कव्हर ड्राईव्ह/पंच हायलाईट्स मध्ये दिसला तर जरूर बघा. अगदी किंचीत गॅप होती पण परफेक्ट बायसेक्ट केली त्याने. अँगल्स कसे क्रीएट करावे ह्याचा पुस्तकी नमुना अगदी!

<< अँगल्स कसे क्रीएट करावे ह्याचा पुस्तकी नमुना अगदी! >> खरंय, भास्कराचार्यजी. पूर्वापारपासून चांगल्या भारतीय फलंदाजांची ही खासियतच असावी. अझर, सौरव, द्रविड, सचिन इ.इ. तर यांत माहीरच होते. अत्तांच्या चौथ्या वन-डेमधलं कोहलीबद्दलचं हें निरीक्षणही यालाच पुष्टी देतं- <<स्मिथने त्याच्या ९० झाल्यावर 'ऑफ-साईड ट्रॅप' लावून ऑफ स्टंपबाहेर मारा ठेवला [ व गोलंदाजानीही त्याला अचूक साथ दिली, हें महत्वाचं]. तो सापळा भेदूनही कोहलीने कांही अप्रतिम कव्हर ड्राईव्ह मारले, हेंही कौतुकास्पद !!>> कदाचित, ताकदीपेक्षां 'टायमिंग' व मनगटी लवचिकता याचा अधिक वापर करण्यामुळें भारतीय फलंदाजांत हें कसब बळावत असावं. [ इतर देशांतले कांही सन्मान्य अपवाद वगळतां, मला तरी याचमुळें भारतीय शैलीदार फलंदाजी अधिक भावते.]

ताकदीपेक्षां 'टायमिंग' व मनगटी लवचिकता याचा अधिक वापर करण्यामुळें भारतीय फलंदाजांत हें कसब बळावत असावं.>>>>

गुंडप्पा विश्वनाथ ह्यात मेरुमणी! ह्या माणसाला पळून धावा काढतात हे माहिती नसावे असे खेळायचा पण नांवावर धावांचा डोंगर! मद्रास येथे केलेले द्विशतक २२२ आजही डोळ्यासमोर! आमच्या लहान वयात पाहिलेली ती विलोभनिय फटकेबाजी आजही रुजुन बसलिये मनात! Happy तेंव्हा टीव्ही दुर्मिळ आणि इतके सुबक प्रक्षेपणही नव्हते ५ किमी जाऊन पाहिलेला तो सामना टीव्हीवर! Happy

विशेष म्हणजे ह्या माणसाने १४ शतके केली त्या पैकी एकाही वेळी भारत कसोटी हरला नाही! Happy

काल उशीरा highlights आपली बॉलिंग पाहिली. बुमरा चा यॉर्कर जबरा होता.
कोहली-स्मिथ चं नेमकं काय फाटलं होतं ? स्मिथ चा कॅच घेतल्यावर कोहली खूपच बडबडत होता, शेवटी धोनी ने त्याला जरा शांत केल्यासारखं वाटलं.

कदाचित, ताकदीपेक्षां 'टायमिंग' व मनगटी लवचिकता याचा अधिक वापर करण्यामुळें भारतीय फलंदाजांत हें कसब बळावत असावं. [ इतर देशांतले कांही सन्मान्य अपवाद वगळतां, मला तरी याचमुळें भारतीय शैलीदार फलंदाजी अधिक भावते.] > मलाही भाऊ! मजा येते बघायला! फक्त पाँटिंगच्या 'पुल'सारखा किंवा वेस्ट इंडियन ग्रेट्सच्या 'हुक'सारखा शॉर्ट बॉलवरही आपल्याकडे ताकदीचा एखादा फटका असता तर ते आवडले असते. भारतीय खेळपट्ट्यांवर तसा डेव्हलप होणे अवघड असावे.

<< गुंडप्पा विश्वनाथ ह्यात मेरुमणी! >> कृष्णाजी, सहमत. मीं अझरच्याही पूर्वीच्या काळात गेलों नाही कारण यादी खूपच लांब झाली असती; तीन-चार क्षेत्ररक्षकाना चकवून जाणारी, जगांतल्या अतिवेगवान गोलंदाजाना मारलेली विश्वनाथची नजाकतभरी, सहजसुंदर स्क्वेअर कट, हा त्याने क्रिकेटला सादर केलेला अनमोल नजराणाच !! क्षेत्ररक्षणाचे कुटील चक्रव्यूह सफाईने भेदणारे आणखीही कित्येक शैलीदार भारतीय शिलेदार होतेच - विजय मांजरेकर, दिलीप सरदेसाई, सलीम दुराणी, वेंगसरकर, गावसकर , मोहिंदर अमरनाथ इ.इ. .. !!!

हो भाऊ अगदी अगदी!!

विना ताकद क्षेत्ररक्षणाचे कडे भेदून जाणारी ह्या लोकांची फटकेबाजी खरोखर विलोभनिय.

एखादी लिंक असेल तर द्या ना.>>> लिंक नाहिये मज जवळ कुणाकडे तरी असेल!

Pages