क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑफकोर्स असामी. धोणी हेच कारण आहे. (लेखाप्रमाणे) पण आय वुडन्ट गिव्ह दॅट लेम लॉजिक. जर भारताला गरज असेल तर त्याने तिथे उभे टाकून धावा काढणे जरूरी आहे. धोणीला पटो वा ना पटो. नीट बॅटिंग करणे हे त्याचा हातात आहे. त्याने फक्त एकदाच ( इंग्लंड टेस्ट मध्ये) थोडीफार ठोकाठोकी केली आहे. अन्यथा तो अनेकदा इनफॅक्ट त्याच्यामुळे विजयी होताना देखील आपण पराभूत झालो. दोन उदा. ( पहिले त्यांनीच लिहिलेले टि २० चे, ) दुसरे सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्ध १७५ धावा केल्यावर सर्व २०-२५ धावात आउट झाले तेंव्हा. जडेजा वॉज अ‍ॅन्ड इज हॉरिबल.

मला आजही जडेजा आवडत नाहीच. तो इंटरनॅशनल लेवलचा बॅट्समन आहे ह्यावर माझा विश्वास नाही. Happy

(मी लेखाला चांगला म्हणालो, त्याला नाही. Happy ) तो गरिबीतून वर आला हे माहिती होते, पण इतक्या हे नव्हते.

Happy He is fielder first, bowler second and batsman last. Why rush to judge him in reverse order ?

There are hardly any chances that he is thinking about second. In the process it lifts his bat. >>> व्हॅलिड पॉइंट असामी. माझ्या दृष्टीने हा रन आउटच आहे. हे जरा एलबीडब्ल्यू सारखे ठरवायला हवे - if the umpire is certain that the batsman, after having reached his crease safely, had no intention to leave the crease for a run he should be given not out. येथे दादाच्या उदाहरणात ते तितक्या स्पष्टपणे कळणार नाही, म्हणून आउट.

जेथे क्लिअर आहे तेथे तरी नॉट आउट द्या. बाकी वेळेस आत्ताचा नियम आहेच.

ही सब्जेक्टिविटी क्रिकेट मधे भरपूर आहे-
- डेलिबरेट पॅडिंग होते का, की चुकून शॉट मारताना किंवा बाउन्सर चुकवताना पायाला/शरीराच्या भागाला लागून गेला. यावर लेग बाय द्यायची का नाही हे ठरते
- ऑफ स्टंप च्या लाईनच्या बाहेर बॉल पायाला लागला. इथे खेळण्याचा उद्देश होता का पॅडिंग होते यावर एल्बीडब्ल्यू ठरतो
- मुळात बॉल टाकण्याची दिशा पाहून पायाला लागलेला बॉल स्टंपच्या लाईन मधे होता का, हे ठरवणे हेच सब्जेक्टिव्ह आहे.

" ह्याबद्दल त्या लेखात ओझरता उल्लेख आहे नि त्याचे कारण धोनी हे आहे हे लक्षात आले का ?" - असामी, का वादाला आमंत्रण देता? Wink

"तो इंटरनॅशनल लेवलचा बॅट्समन आहे ह्यावर माझा विश्वास नाही" - केदार - सहमत.

He is fielder first, bowler second and batsman last. >>

Now, that is what I called confused status. दॅट कुड हॅव बिन अ टॅगलाईन इन दादाज इरा. जेंव्हा लोकं पळत नसत. आजचे बहुतेक सगळे सर्कल मधील प्लेअर्स चांगले फिल्डर्स आहेत. रहाणे, कोहली, रैना, धवण वगैर वगैरे मग फिल्डर फर्स्ट असून काही फायदा नाही. Happy

अ‍ॅन्ड bowler second ओन्ली इन इंडियन कंडिशन्स.

राहिले बॅट्समन - दॅट ही इज नॉट. ते अगदी तू ही मान्य करतोयस अन लेखातही तेच मांडले आहे.

Happy

प्लेअर्स चांगले फिल्डर्स आहेत.>> चांगले is the keyword. He is an exceptional fielder. He is probably only Indian fielder who actually throws in horizontal position, kind of like Jonty used to do. There are not too many at his level. That particular quote actually is acknowledgement to his fielding ability.

अ‍ॅन्ड bowler second ओन्ली इन इंडियन कंडिशन्स. >> agreed, but how many left arm orthodox Indian spinners can you name who has shown that wizardy in Indian conditions ?

राहिले बॅट्समन - दॅट ही इज नॉट >> मी हे मान्य करतोय कि तो International matches मधे garbage batting करतो पण I believe he is better batsman than that and his 3 triple centuries for Saurashtra (Again I challenge you to name last Indian player who has done this, even if you take into account that these runs are from first class domestic competitions, from matches in Indian conditions and 2 of them are on his homeground. It is unbelievable feat to achieve - even Ranji run machines like Jafar, Ajay Sharma, Amol muzumdar have not been able to do so.) proves that he has much to offer as a batsman. He may not be an all-rounder that will win matches single handed with his batting, but he will be extremely useful lower order batsman.

असामी, का वादाला आमंत्रण देता? >> Happy अहो आपण नुस्तके धोनी लिहिले तरी वाद होणारच. Wink

ही सब्जेक्टिविटी क्रिकेट मधे भरपूर आहे- >> हो म्हणूनच ती शक्य तेव्हढी कमी केली पाहिजे असेही मला वाटते.

जाडेजाच्या फलंदाजीने लॉर्ड्स कसोटी जिंकवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती, हे विसरून चालणार नाही. ११-१२ च्या भारतातल्या सीरीजमध्ये त्याने मायकेल क्लार्कला बहुतांशी सर्व कसोट्यांमध्ये बाद करून ४-० मध्ये महत्वाचा वाटा उचलला होता, तेव्हापासून मी त्याला अगदी वाईट लेखत नाही. आय थिंक ही इज बेटर मॅनेज्ड इन द टीम दीज डेज. लेफ्ट आर्म स्पिनर हवाच तसाही आजकालच्या संघात. आता दरबानसारख्या ठिकाणी सेहवागसारख्याचे (टेस्ट) अ‍ॅव्हरेज १६.२५ आहे, तर जाडेजाकडून किती अपेक्षा ठेवणार?

ओह. केदारने म्हटले आहे इंग्लंड कसोटीबद्दल. Happy पण सचिनचा किस्सा २००९ चा आहे. आता तो जास्त बरा खेळायचा प्रयत्न करतो असे मला वाटते.

हो म्हणूनच ती शक्य तेव्हढी कमी केली पाहिजे असेही मला वाटते. >>> यस. नोटेड. पण एकूण चर्चेला मजा आली. तसेही उद्देश दोन्ही बाजू समजावून घेण्याचा होता. नाहीतरी आयसीसी काही माझी सजेशन वाचून नियम बदलायला निघालेली नाही Happy

टीप : सेहवागचे दरबानचे अ‍ॅव्हरेज मला पाठ नाही. कमी आहे हे लक्षात होते. बाकी सब स्टॅट्सगुरू का कमाल है. Wink

आयसीसी काही माझी सजेशन वाचून नियम बदलायला निघालेली नाही> हो नि माझे ऐकून होणार आहे जणू Happy

बाकी सब स्टॅट्सगुरू का कमाल है. > > Happy

राहिले बॅट्समन - दॅट ही इज नॉट. ते अगदी तू ही मान्य करतोयस अन लेखातही तेच मांडले आहे>>>>

असे काय करताय ? त्याला ''सर'' म्हणतात! रणजी का राजा! त्रिशतके मारलीत त्याने! Wink

ज्या मांकडिंग वरुन चर्चा सुरु झाली तो अशोक मांकड सुद्धा रणजीचा राजा समजला जायचा मुंबईकडुन खोर्‍याने धावा करणारा हा फलंदाज कसोटीत क्वचितच चांगला खेळला!

भारी चर्चा चालू आहे. मजा आली वाचायला. आज कणेकरांची 'फटकेबाजी' ऐकायला लागणार ज्यात त्यांनी जुन्या काळातल्या काही भन्नाट घटनांचा उल्लेख केलाय.
रच्याकने, रन आउट चा विषय निघाल्यावर गल्ली क्रिकेटचे दिवस आठवले. त्या वेळी दोन्ही कडे ३-३ स्टंप्स आणि त्यावर साग्रसंगीत बेल्स वगैरे लाड नव्हते. त्यामुळे दगड, भिंत, काठ्या, ड्रम अश्या अनेक चटकन उपलब्ध असलेल्या वस्तू स्टंप्स बनायचे. आणि नॉनस्ट्रायकर एंड ला फक्त १ दगड असायचा... स्टंप म्हणून. रन आउट करायचं असेल, तर फिल्डर ने दिलेला थ्रो, बॉलर ने एक पाय त्या दगडावर ठेवून झेलायचा (बेल्स/स्टंप्स उडवायची भानगडच नाही). बॉलर ने कॅच त्या अवस्थेत व्यवस्थित झेलला, आणि त्या वेळी रनर ची बॅट क्रिजच्या बाहेर असेल तर आउट!!!

<< ज्या मांकडिंग वरुन चर्चा सुरु झाली तो अशोक मांकड सुद्धा रणजीचा राजा समजला जायचा मुंबईकडुन खोर्‍याने धावा करणारा हा फलंदाज कसोटीत क्वचितच चांगला खेळला! >> तो अशोक मांकड नसून त्याचे वडील विनू मांकड असावेत [ ज्यानी , मला वाटतं, ब्रॅडमनला अशा तर्‍हेने बाद केलं होतं ].
अशोक मांकड हा अत्यंत अभ्यासू व गुणी खेळाडू. सलामीचा तंत्रशुद्ध फलंदाज. पण वाडेकराच्या संघाबरोबर इंग्लंडच्या दौर्‍यावर असताना स्विंग गोलंदाजी खेळताना तो नाहीं जम बसवूं शकला व तिथंच त्याची कारकिर्द फार दु:खद तर्‍हेने संपली.

तो अशोक मांकड नसून त्याचे वडील विनू मांकड असावेत [ ज्यानी , मला वाटतं, ब्रॅडमनला अशा तर्‍हेने बाद केलं होतं ].>>> असावे कदाचित! मला नक्की नाही आठवत तो किस्सा!

हो अशोक मांकड म्हणजे मुंबईकडून खेळताना धांवाचे डोंगर उभे करायचा!

भाऊ मला वातते तेव्हा रणजी क्रिकेट काही ठिकाणी तर काथ्याच्या मॅटच्या विकेटवरही खेळले जायचे. रनजीतले अनेक वाघ आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ढेपाळतात हा इतिहास आहे. अजूनही ती परम्परा चालूच आहे.

विनू मंकड च . ब्रॅडमन बहुधा टीम मधे होता पण तो ऑट झाला नव्हता.

त्याने मंकडच समर्थनच केल होत .
An inch gained on either side is same अस काहितरी Happy

<< रनजीतले अनेक वाघ आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ढेपाळतात हा इतिहास आहे. अजूनही ती परम्परा चालूच आहे.>> मला वाटतं अशोक मांकड हा अगदींच त्या पंक्तीत बसणारा नव्हता; खरंच वरच्या दर्जाची गुणवत्ता असल्याशिवाय त्या वेळच्या मुंबईच्या संंघातून खेळणं अशक्य होतं. मुंबईचे अनेक नामवंत फलंदाज, .गावसकरसहीत, अशोक मांकडचा सल्ला घेत, हें सत्य आहे. तो अकाली क्रिकेटमधून बाद झाला , यांत दुर्दैवाचाही मोठा भाग असावा. [ आपण फक्त यशस्वी खेळाडूंच गुणगान करतों पण अशा तर्‍हेने, कोणत्याही कारणाने कां होईना, कारकिर्द न बहरलेले अगणित गुणवान, मेहनती खेळाडूही क्रिकेटसाठी आपलं आयुष्य अर्पित करतच असतात; केवळ या जाणीवेतून अशोक मांकडबद्दल ही माहिती ]

विनू मंकड च . ब्रॅडमन बहुधा टीम मधे होता पण तो ऑट झाला नव्हता.>>>

होय १३ डिसेंबर १९४७ बिल ब्राऊन ला ऑट केलेले सापडले विकिवर. ब्रॅडमननी पाठिंबा दिलेला आणि दोन वेळा ह्याच फलंदाजाला आऊट केले असे माहिती आहे तिथे!

असे खुप चांगले खेळाडूही होते ज्यांना संधी नाही मिळाली योग्यवेळी!

त्यात राजिंदर गोयल, पद्माकर शिवलकर जे बेदी संघात असल्याने येऊ शकले नाहीत!

तसेच अनेक फलंदाज ही होते!

वरील स्विच हिट चर्चेवरून आठवले, आपल्या डोमेस्टीक २०-२० मध्ये एक दोन्ही हातांनी बॉलिंग करणारा गोलंदाज उगवला आहे, त्या दिवशी बातम्यात पाहिले. एक बॉल उजवा तर पुढचा डावा तर लगेच नंतरचा उजवा ..

(लहानपणी हा एक मोठा गैरसमज होता, की हात सुद्धा टेकलेला चालत नाही)
>>
फारेण्ड हो... Proud
आमच्याकडे मनगटाच्या वरचा भाग चालतो पण त्या खालचा हात टेकला नाही पाहिजे असे वाटायचे.. अर्थात, जरा अक्कल येताच आणि ईंटरनॅशनल क्रिकेट बघायला सुरुवात करताच गैरसमज दूर झाला..

दादाचा तो रन आऊट बघायची गरज नाही, अजूनही तो धक्का आठवतोय. बहुधा सचिनही दुसरा रन घेताना रन ऑट झालेला त्या सामन्यात.. पण मग दादाचे शतक झाले, आता तो मारून रिक्वायर्ड रेट उतरवेल आणि आपण एक दुर्मिळ विजय मिळवू वगैरे स्वप्न क्षणात भंग झालेले..

तसेही तो धावताना बरेचदा आधी आपले अंग वाचवायचा मग विकेट ..

भाऊ मला आठवतेत्याप्रमाणे अशोक मनकड ( असे त्यावेळी उच्चारले जायचे ) हा कप्तान म्हणून खूप वरच्या दर्जाचा होता उत्तम स्ट्रॅटेजिस्ट. त्यामुळे मुम्बैने अनेक विजय मिळवले. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये त्याला संधी उशीरा मिळाली. त्यावेळी जाहिरात कंपन्यांचा शिरकाव झाला नसल्याने अपयशी खेळाडूंना दीर्घकाळ खेळवण्याचे लॉबींग नसे. हल्ली काही खेळाडू जाहिरात कंपन्यांच्या दबावाखाली संघात ठेवले जातात. त्यामुळे पहिल्या काही सामन्यात आश्वासक करिश्मा न दाखवणार्‍या खेळाडूंची खैर नसे. मंकडने २२ कसोटीत अवघ्या ९९१ धावा काढल्या. तरी त्याला २२ कसोट्या म्हणजे बरीच संधी मिळाली. त्या काळातली टेस्ट्सची फ्रेक्वेन्सी पाहता.
त्याचे कप्तान म्हणून योग्यता एवढी होती की काहीनी त्याला टेनिसप्रमाणे नॉन प्लेईंग कॅपटन म्हणून ठेवावे अशी सूचना मांडली होती .

Pages