क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< सोलकर म्हणजे jonty Rhodes चे वडील ना? >> बहुधा भाऊ असावेत; राज्याच्या वाटणीनंतर, सोलकर 'फॉर्वर्ड शॉर्ट लेग' व ' सिली-मिडॉन'चा बादशाह झाला तर जाँटी ' मिडफिल्ड व आऊटफिल्ड'चा ! अर्थात, क्षेत्ररक्षणात अत्यंत 'ग्रेसफुल अँड फास्ट पीक-अप अँड थ्रो' असलेल्या अझरुद्दीनला ह्या वाटणीत डावललं गेलं; त्याला त्याच्या फलंदाजीच्या कौतुकावरच समाधान मानावं लागलं !!!

जाँटी ने क्षेत्ररक्षणाचा चेहरामोहरा बदलून टाकला. अचुक टायमिंग, दुखपातीची चिंता नसणे, चेंडू कितीही वेगात असला तरी त्याला अडवणार हा जो विश्वास त्याने क्षेत्ररक्षणामधे दिला आहे तो अफाट आहे. त्यावेळच्या द. आफ्रिकेचा सगळाच संघ फिल्डींगमधे जबरदस्त होता. भारतात एक अझरुद्दीन स्लिप मधे आणि अजय जाडेजा आउटफिल्ड मधे सोडला तर सगळा आनंदी आनंदच होता. अधुन मधून कपिल ने कॅचेस पकडले होते पण सातत्य नव्हते. रॉबिन सिंग ने बहुदा भारतात सुर मारून चेंडू अडवणे वगैरे सुरु केले होते नंतर सचिन युवराज कैफ सारखे फिल्डर्स ३० यार्डात उभे राहणारे मिळू लागले.

आज दिन विशेष

अनिल कुंबळे (जंम्बो) याने पाकिस्तानाविरुध्द कसोटीमधे एका डावात १० विकेट घेण्याचा भीमपराक्रम केला होता.

दिन विशेष

आजच्या दिवशी अहमदाबाद टेस्ट मधे श्रीलंके विरुध्द खेळताना कपिल देव ने हसन तिलकरत्नेला आउट करून सर्वाधिक विकेट (४३२) घेण्याचा हेडलीचा वर्ल्ड रिकोर्ड मोडला.

खेळत असलेल्या संघातील ११ खेळाडुंत नसणे आणि बदली खेळाडु म्हणुन येवुन ७ झेल घेवुन सामनावीराचा पुरस्कार मिळ्वीण्याचा पराक्रम jonty Rhodes ने केला आहे..

.

भारत सर्वबाद १०१. हे ईथे टंकायचं की 'दु:खद घटना' मधे ह्याचा निर्णय होत नव्हता.

'अहो, ती पानपतची लढाई म्हणतात ती पुण्यात कुठंशी झाली हो' - ह्या पु. लं. च्या प्रश्नाचं उत्तर मिळालं - गहुंजे

ऑन द फ्लिप साईडः अंडर १९ संघाचं अभिनंदन! वर्ल्डकप च्या अंतीम फेरीत दाखल. प्रशिक्षक झाल्यापासून द्रविड च्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ (ए संघ, एज ग्रूप) अपराजित.

ऑस्ट्रेलियाच्या पाटा खेळपट्ट्यानंतर आता भारताच्या तेजतर्रार खेळपट्ट्यांवर ...

मस्त हारले एकदम भारतीय असल्याचा फिल झाला.
जिगरा पाहीजे जिगरा असे दणदणीत हारायला. पिच फास्ट असो या काही असो मी तर हवेत हाणणारच जबरदस्त स्पिरिट होते.

पुखेशू

सगळे चुकीचे शॉट खेळून आउट झाले>>>>

पण पुण्यात भारतिय संघाला पराभव बर्‍याचदा पत्करावा लागलाय!!!

छोटी टोटल डिफेण्ड करताना मुख्य स्पिनर दहाव्या ओव्हरनंतर येणे, त्याच्या आधी पांड्या सारख्या नवोदित (अन धुतल्या जाणार्‍या) बोलर ला ओव्हर्स मिळणे, बोलर्सनीही विकेट काढण्यावर भर देण्यापेक्षा रन रोखण्याचा प्रयत्न करणे... धोनी काय खाऊन कॅप्टन्सी करत होता देव जाणे.
आपलं मुख्य स्किल बॅटिंग, जर तेच फेल गेलं तर बोलर्सनी गेम काढून देणं जवळपास अशक्य. वर्ल्डकप मधे ऑपोझिशन याचाच फायदा उठवणार हे नक्की.

फलंदाजी काल ढासळली हें नक्की. पण इतरांपेक्षां चिंतेची बाब म्हणजे- युवराज; आंखूड टप्प्याचा चेंडू हेल्मेटवर आदळल्यावर तो इतका हादरलेला वाटला व पुढच्याच चे़ंडूवर सरळ विकेट फेंकूनच गेल्यासारखा वाटला. विश्वचषकापर्यंत त्याचा आत्मविश्वास व पूर्वीचा फॉर्म येणं खूपच कठीण वाटतंय.
बुमराह मर्यादित षटकांच्या सामन्यांत तरी खूप उपयुक्त ठरेल असं वाटतंय.
<< अहो, ती पानपतची लढाई म्हणतात ती पुण्यात कुठंशी झाली हो' >> पानिपत कसलं, पाणीकपातच आहे सध्यां पुण्यात; आणि तरीही खेळपट्टीवर मात्र हिरवळ ? Wink
'अंडर १९' भारतीय संघाचं अभिनंदन. हा संघ अतिशय समतोल,प्रभावी वाटतोय. श्रेय द्रविडच्या प्रेरणादायी मार्गदर्शनालाही असावं. क्षेत्ररक्षण वयानुरूप चांगलंच असलं तरीही कांहीं वेळचा ढिसाळपणा मात्र बुचकळ्यात टाकणारा होता.

अँकी नं.१, कमी धावसंख्या डिफेंड करताना चं किंवा टेस्ट मधे मोठी पार्ट्नरशिप तोडण्याचं स्किल धोनी च्या कॅप्टन्सी मधे क्वचितच दिसलय. (किंबहूना मला आठवत नाही, पण अपवादाला जागा ठेवण्यासाठी 'क्वचित' म्हटलय Wink ).

"पण पुण्यात भारतिय संघाला पराभव बर्‍याचदा पत्करावा लागलाय!!!" - पुण्यात (गहूंजे आणी नेहरू स्टेडियम) भारताचा विजयाचा स्ट्राईक रेट ५४.५% आहे (वन-डे आणी टी-२० मिळून ११ पैकी ६ सामन्यात विजय).

ते पिच domestic सामन्यांच्या वेळी फ्लॅट असते मग ह्यावेळी एकदम बदलले का ? MCA सध्या सत्तेत आहे कि. मागे नागपूरला २००४ मधे सूड घेतला होता फास्ट पिच बनवून तसा काही प्रकार का ?

इतरांपेक्षां चिंतेची बाब म्हणजे >> +१ त्याचे बघितल्यावर रैनाची इनिंग एकदम गावस्कर खेळतो अशी म्हणायची वेळ आली Wink

कमी धावसंख्या डिफेंड करताना चं किंवा टेस्ट मधे मोठी पार्ट्नरशिप तोडण्याचं स्किल धोनी च्या कॅप्टन्सी मधे क्वचितच दिसलय. > बरोबर आहे. झहीरसारखा हुशार बॉलर स्वतःच्या विचाराने हे करू शकत असे, पण धोनीची कॅप्टन्सी ह्या बाबतीत बँकरप्ट्सी कडे झुकते.

I think Dhoni/India is treating this series as strictly prep for world cup.
That might be the reason why Dhoni wanted new bowlers like Pandya bowling early and late.

"ते पिच domestic सामन्यांच्या वेळी फ्लॅट असते मग ह्यावेळी एकदम बदलले का ?" - असामी, मी महाराष्ट्राच्या ज्या रणजी मॅचेस फॉलो केल्या आहेत, त्यात अपवाद वगळता गहूंजे च्या विकेट ने नेहेमीच सीम गोलंदाजांना मदत केली आहे. म्हणूनच तर महाराष्ट्राचे फल्ला, संकलेचा, मुंढे, मुथ्थुस्वामी वगैरे मिडियम पेसर्स तिथे वर्चस्व गाजवतात. महाराष्ट्राचा डावखुरा फिरकी गोलंदाज (असं लिहायला मजा येते) अक्षय दरेकर, गहूंजे ला शेवटची मॅच मार्च २०१५ मधे खेळलाय. नंतर तो पुढच्या सातही मॅचेस अवे खेळलाय.

फे.फे. , मी इथे पण फ्लॅट पिच म्हणूनच वाचलेले
http://www.espncricinfo.com/india-v-sri-lanka-2015-16/content/story/9709...
So it was that in the unlikeliest of places, at a ground that can justifiably claim to have the flattest pitch in India, former Maharashtra tearaway Pandurang Salgaoncar, the head groundsman in Pune, laid out a rare fast and bouncy pitch that tested the fabric of T20 cricket.

कदाचित २ वेगळे ग्राऊंड्स असतील का ?

एकच ग्राऊंड आहे आणी 'फ्लॅटेस्ट पीच' वगैरे सिद्धार्थ मोंगा चे 'मना'चे श्लोक (मोंगाचे श्लोक का म्हणू नये?) आहेत. तसंही २०११ च्या ४-०, ४-० नंतर रणजी मधे हिरव्या विकेट्स बनवतात, ज्यामुळे सामान्य मिडीयम पेसर्स सुद्धा भेदक वाटतात.

ह्या गेल्या काही रणजी मॅचेस ची स्कोरकार्ड्स आणी मध्यमगती गोलंदाजांच्या विकेट्स बघा.

http://www.espncricinfo.com/ranji-trophy-2015-16/engine/match/901881.html

http://www.espncricinfo.com/indian-domestic-2014-15/engine/match/775843....

http://www.espncricinfo.com/indian-domestic-2014-15/engine/match/775711....

आजची वे. इंडीज वि. बांगलादेश मॅच [ अंडर १९- सेमि ] छान झाली. वे. इंडीज वि. भारत अंतिम सामना १४ फेब.ला.
वे. इंडीजने आज आपली परंपरा मोडून चिकाटीने फलंदाजी करत सामना जिंकला ! स्प्रीन्गर व हेटमायर ह्या दोन फलंदाजांपासून भारताने सावध राहिलेलं बरं. सलामीचा फलंदाज पोप नांवानुसार शांतीदूत नसून अतिरेकी असला तरीही तो आत्मघातकी पंथातला असल्याने फार त्रासदायक ठरूं नये, असं वाटतं. [ सामन्याचा विजयी फटका मारल्यावर स्प्रींगरने केलेला नाच 'हायलाईटस'मधे जरूर पहावा !] बांगलादेशने शेवटच्या चेंडूपर्यंत दाखवलेल्या झुंजार वृत्तीचंही कौतुक वाटलं.

रुन्मेश नामक प्रकार अजुन आहे ? Uhoh Light 1

पराभवाचे उट्टे फेडले. हार्दिक पांड्याला गोलंदाजी न देता लवकर फलंदाजीला पाठवावे (लगा तो तीर वरना फकिर)

युवराज सिंग हा अत्यंत ओव्हर हाईप्ड आणि निरुपयोगी खेळाडू आहे . पुनरागमन केल्यावर त्याने काय कुठे तीर मारले आहेत ते कळेल का जरा? आय पी एल चे सांगू नका ते जाहीरातदारानी फिक्स केले सामने असतात.

Pages