क्रिकेट - ३

Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30

क्रिकेटवरील पहिले दोन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुमरो पहिली मैच पाकिस्तान विरूध्द
१८ चेंडू पैकी १६ निर्धाव
२ चौकार १विकेट २ निर्धाव षटक ८ रन्स

तर लोकहो, त्या क्रिकेट रसिकाचा षटकार लेखातील मॅच बद्दल एक तांत्रिक एरर आहे. शोधा Happy

काही म्हणा, असल्या लो स्कोअरींग मॅच बघायला मजा नाही येत. शेवटपर्यंत असेच पीच राहील तर बोअर होणार ही मालिका..

"तर लोकहो, त्या क्रिकेट रसिकाचा षटकार लेखातील मॅच बद्दल एक तांत्रिक एरर आहे. शोधा" - कुठला लेख?

यस :). तो एक भाग झाला. आणि ते बरोबर आहे. पण एक पॉइंट असा आहे की तो एरर शोधायला त्या दिवशी नक्की कोणती मॅच होती हे बघायची गरज नाही Happy

<< काही म्हणा, असल्या लो स्कोअरींग मॅच बघायला मजा नाही येत. शेवटपर्यंत असेच पीच राहील तर बोअर होणार ही मालिका..>> असं 'जनरल' विधान नाहीं करतां येणार; काल आपली एखादी आणखी एक विकेट लवकर गेली असती, तर तोच सामना अविस्मरणीयही होऊं शकला असता ! [ शिवाय, इथल्या 'पाटा ' खेळपट्ट्या आहेतच ना येता विश्वचषक मजेशीर करायला ! Wink ]

सध्या आझाद काश्मीरचा अभ्यास करतोय. कालची म्याच मिरपूरला होती म्हटल्याव्र आश्चर्य वाटले. बरेच दिवसापासून आझाद कश्मीर डोक्यात घोळ्त असल्याने एक्दम वाटले अरे मिरपूरला म्याच कशी? मिरपूर अझाद जम्मू आणि कश्मीर मध्येही आहे !

युवराज सिंगची कालची इनिंग्ज ही तंबूमे घबराट या स्वरूपाचीच होती. अजिबात कॉन्फिडन्स तिच्यात नव्हता . कोणत्याही बॉलवर तो आउट होइल असे वातत होते. युवराजला काढून पांडेला संधी देणे आवश्यक आहे आता.

लोकहो, त्या क्रिकेट रसिकाचा षटकार लेखातील मॅच बद्दल एक तांत्रिक एरर आहे. शोधा >>>>>>>
नाय सापडली
काय आहे एरर

भाऊ,
मला लो स्कोअरींग सामना अटीतटीचा झाला तरी बोअरच होतो. पण अटीतटीचा सामना एखाद्या चांगल्या स्कोअरला झाला तर मजा येते.
जसे दोन अडीज दिवसांत टेस्ट संपली आणि ती क्लोज एनकाउंटर झाली तरी तितकी मजा येत नाही पण तोच थरार पाचव्या दिवशी अनुभवायला मिळाला तर क्या बात. अविस्मरणीय होते टेस्ट.
लो स्कोअरींग सामने बरेचदा मला जुगार वाटतात. वन बॅड डे ईन ऑफिस एण्ड गेम ओवर.. आणि सर्वात महत्वाचे कोणी काहीही बोला, क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे. फटके बघण्याची मजा लुटता आली पाहिजेच..

आजच्या बांग्लादेशच्या विजयाने जराही चकीत केले नाही..
महेला आणि संगकारानंतर कमजोर झालेली फलंदाजी आणि मलिंगाच्या अनुपस्थितील गोलंदाजी, समोर बांग्लादेश त्यांच्या घरात.. माझ्यासाठी बांग्लादेशच फेव्हरेट होती..
माझे दोन दोन अज्ञानी मित्र जे अजूनही बांग्लादेशला कच्चा लिंबूच समजतात अश्यांशी आज पैश्याची पैज जिंकलो Happy

अजून कोणीच नाही त्या एरर बद्दल? आदित्य सिंग ने लिहील्याप्रमाणे भारत वि इंग्लंड सामना होता. पण ते न पाहताही कळणारी चूक कोणती? Happy

अजून एक दोन तासांत अमेरिकेतील शौकीन सुद्धा वाचतील तोपर्यंत थांबतो Happy

ओके :). त्यात तारीख ३१ जानेवारी आहे. ऑस्ट्रेलिया जानेवारी मधे नेहमी होम सिरीज खेळते. गेली जितकी वर्षे मी क्रिकेट फॉलो करत आहे तितक्या वर्षांत मला जानेवारी मधे ऑस्ट्रेलिया कधीही बाहेर खेळल्याचे लक्षात नाही. एखाद्या मोठ्या टूर्नामेण्टचा अपवाद करत असतील (पण तसेही उदाहरण नाही लक्षात माझ्या), पण एखादी जनरल सिरीज भारतात येउन खेळली असेल हे जवळजवळ अशक्य आहे Happy

बाकी त्या २००१ च्या प्रसिद्ध सिरीज नंतर ऑस्ट्रेलिया २००३ च्या उत्तरार्धात भारतात आली होती (वन डे टूर्नामेण्ट) वगैरे डीटेल्स आहेतच. पण ते बघायची गरजच नाही.

Jan 2002
Wed 2 - Sun 6 Australia v South Africa Sydney Cricket Ground 3rd Orange Test
Thu 10 (D/N) Australia 'A' v South Africa Adelaide Oval Tour match
Sun 13 (D/N) Australia v South Africa Melbourne Cricket Ground VB Series
Tue 15 New Zealand v South Africa Bellerive Oval, Hobart VB Series
Sat 19 (D/N) New Zealand v South Africa Brisbane Cricket Ground VB Series
Sun 20 (D/N) Australia v South Africa Brisbane Cricket Ground VB Series
Tue 22 (D/N) Australia v South Africa Sydney Cricket Ground VB Series
Sun 27 (D/N) New Zealand v South Africa Adelaide Oval VB Series
Feb 2002
Fri 1 New Zealand v South Africa W.A.C.A. Ground, Perth VB Series
Sun 3 Australia v South Africa W.A.C.A. Ground, Perth VB Series

--------------

फारएंड बरोबर आहे तेव्हा न्युझिलंड आफ्रिका ऑस्ट्रेलियाची व्हीबी सिरिज चालू होती

<< जसे दोन अडीज दिवसांत टेस्ट संपली आणि ती क्लोज एनकाउंटर झाली तरी तितकी मजा येत नाही ... >> टेस्ट्पुरतं १००% सहमत. पण टी-२०मधे 'लो स्कोअरींग' सामनाही रंगतदार होवूं शकतो. असो, यावर आपला प्रामाणिक मतभेद आहे असं समजूं, झालं. !

<< युवराज सिंगची कालची इनिंग्ज ही तंबूमे घबराट या स्वरूपाचीच होती. अजिबात कॉन्फिडन्स तिच्यात नव्हता >> विशेषतः आंखूड टप्प्याच्या चेंडूंवर तो बावचळतो ; त्याच्यावर अशाच चेंडूंचा मारा होणार हें निश्चित.

'विश्वचषकाच्या तयारीसाठी आशिया कपच्या विकेटस सोईच्या नाहीत ', असं आज धोनीने विधान केलं आहे. कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही दुसर्‍या कोणत्यातरी स्पर्धेच्या तयारीसाठी खेळणं, हेंच मला जाम खटकतं व तसं जाहीरपणें सांगणं, हें तर अधिकच !! शिवाय, खूप शिकतां येतं कोणत्याही स्पर्धेतून ,हें तर आहेच. उदा., युएई सारखा नवोदित संघ बांगलादेश, श्रीलंका याना १२५- १३० धांवांत केवळ यॉर्कर व नेटक्या गोलंदाजीवर गुंडाळतो, यांतून खूप शिकतां येण्यासारखं आहे !

काल बांग्लादेश विरुध्द श्रीलंकाची मॅच ज्या खेळपट्टीवर होती ती वेगळी आहे. सपाट हिरवळ नसलेली. याउलट भारत-पाक ज्या खेळपट्टीवर झाली ती हिरवीगार होती. पहिल्या बांग्लादेश भारत मधे पण सपाट हिरवळ नसलेली होती म्हणून नंतर रोहीत खेळून गेला.
आता ही पाकिस्तान-युएई मधे हिरवीगार खेळपट्टी ठेवली आहे.

नविन किडे बांग्ल्यांनी चालू केले का?

गुड गोईंग युएई. पाकिस्तानच्या बॉलिंग समोर बर्‍यापैकी स्कोर केला. आता २ विकेट्स उडवल्या २ ओवर्स मधे !

मला तर लो-स्कोरींग मॅचेस वाईट्ट आवडतात. मजा येते मॅच चं पारडं झुलताना पाहून.

बाकी धोनी च्या पीच, अंपायर वगैरे च्या टीकेविषयी बोलण्यात काहीही अर्थ नाही. सठीया गया है वह|

माझे मत याबाबत भिन्न आहे.
धोनीच्या मागे सध्या मिडीया हात धुवून लागलीय. मध्यंतरी टीम ऑस्ट्रेलियात हरत होती तेव्हा तो शांत होता. पण जिंकू लागलो तसे तो त्याच टिकाकारांची शाळा घेऊ लागलाय.. हा बिनधास्त काहीही बोलतोय आणि ते छापतायेत.

धोनीने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात व्हाईटवॉश द्यायचा पराक्रम केला.
श्रीलंकेला मायदेशात पराभूत केले.
आशिया चषकमध्ये पाकिस्तानची जिरवली.
अंतिम फेरीत भारत-पाक आमनेसामने येत तिथे पुन्हा आपणच बाजी मारायची शक्यता तुर्तास जास्त वाटतेय.
पाकिस्तानला लोळवणे म्हणजे भारतात हिरो बनणे.
त्यानंतरच्या विश्वचषकात भारत भारतात चमकदार कामगिरी करणार हे निश्चित.
कर्णधार म्हणून धोनी लवकरच पुन्हा एकदा आपला नावलौकिक मिळवणार जे मध्यंतरी कसोटी पराभवांनी गमावला होता.
त्यावेळी हिच मिडीया त्याचा उदो उदो करून त्याला सुपरमॅन बनवणार हे वेगळे सांगायला नको.
आयपीएलमध्ये नवीन संघ घेऊनही तो आपली कमाल दाखवू शकतो. कारण या फॉर्मेटमधील तो बाप कर्णधार आहेच.
आता जर साडेसाती आणि फिरलेली ग्रहदशा असा काही प्रकार अस्तित्वात असेल तर तेच येत्या काळात धोनीची घोडदौड रोखू शकेल..

Pages