Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाबु, पण जुन्या टवका शब्दा चा
बाबु, पण जुन्या टवका शब्दा चा अर्थ वेगळा होता बहुतेक.. टवके टाकणे म्हणजे बघणे (डोळ्यात बदाम टाईप)
त्या काळात फडके रोड वर टवके टाकत फिरायचो
ते टवके टाकणे होय? मला वाटलं
ते टवके टाकणे होय? मला वाटलं त्याला टप्पे टाकणं म्हणायचे
मला वाटलं त्याला टप्पे टाकणं
मला वाटलं त्याला टप्पे टाकणं म्हणायचे >>> असं पण म्हणतात. मी कालेजात असताना "कासरा ओढणे" हा शब्द्प्रयोग प्रचलित झाला होता.
फडके रोड, डोंबिवलीचा का
फडके रोड, डोंबिवलीचा का शान्की.
दोन्ही शब्दाबद्दल ज्ञान नाही,
दोन्ही शब्दाबद्दल ज्ञान नाही, (टवका आणि टप्पा) टवका इथेच D३ मध्ये कळला.
अन्जू, फडके रोड हा फक्त
अन्जू, फडके रोड हा फक्त डोंबिवलीचाच प्रसिध्द आहे (हे वाकय वै आणि अवै) अश्या चालीवर वाचावे
हो नक्कीच, तरी एकदा विचारले.
हो नक्कीच, तरी एकदा विचारले.
त्या रोडवर मला मात्र दुकाने, भाज्या. फुले, आधी लायब्ररी होती तिथे, modern कॅफे आणि तिथून गणपतीच्या देवळात जाता येतं एवढंच दिसतं. अरेरे असं होईलना वाचून ज्यांना माहितेय त्याचं ;).
आज अॅनाने मजा आणली.
आज अॅनाने मजा आणली.
फडके रोड म्हटलं की मला फक्त
फडके रोड म्हटलं की मला फक्त 'संगम' स्नॅक्स कॉर्नर आणि त्यातला पनीर चाट आठवतं हो... ( आणि टॉपलर्समधील सिझलर्स पण..)
अरे वा, डोंबिवलीवाल्यांचा
अरे वा, डोंबिवलीवाल्यांचा अवचित संगम संगमच्या फॅन मंडळात मीसुद्धा ... पाणीपुरी फेवरिट आहे माझी. (टवके टाकणं हल्लीच बंद झालंय.)
अन्जु, खरच अरेरे.. काय ग तु..
अन्जु, खरच अरेरे.. काय ग तु..
सुनीधी कसली टव्का दिसत होती
सुनीधी कसली टव्का दिसत होती
हो सुनिधी गोड होती :जेलसः
हो सुनिधी गोड होती :जेलसः
ही सुनिधी कोण आलीय
ही सुनिधी कोण आलीय सिरियलमध्ये? फार दिवस बघायलाच नाही मिळालीय सिरियल.
आणि रिया, तु का जेलस झालीयस?
मुगु काय करणार. सातच्या आत
मुगु काय करणार.
सातच्या आत घरात ऑर्डर होती आईची त्यामुळे तेव्हा फडके रोडला जाणे व्हायचेच नाही.
आता भाजी काय करायची ह्या विचाराचे वय झालंय. संगम पाणीपुरी मी कशी नाही खाल्ली अजून. आता खाईन.
रिया ही सिरीयल बऱ्याचदा तू का
रिया ही सिरीयल बऱ्याचदा तू का बघत नाहीस आणि त्या केयूला बघितल्यावर मी तुझी आठवण काढत असते. .
रात्री १ ला रिपीट असते ही शिरेल.
हो ती सुनिधी मस्त.
केयु नाही तो केवु आहे. इति
केयु नाही तो केवु आहे. इति प्रगल्भा
भावनाओको समझो ना रिया, त्याला
भावनाओको समझो ना रिया, त्याला बघितल्यावर तुझी आठवण येते हे महत्वाचं नाही काय? नामको जाने दो.
केयु नाही तो केवु आहे. इति
केयु नाही तो केवु आहे. इति प्रगल्भा»
नाही पागलभा इति आशू
Ag kam asatat g gharat
Ag kam asatat g gharat
सुंदर एपिसोड होता,
सुंदर एपिसोड होता, सोमवारचा.
कैवल्य, आना दोघांनी छान काम केलं.
काल तो मनगणं एपिसोड पाहताना
काल तो मनगणं एपिसोड पाहताना वाटलं कि मायबोली वर येऊन शोधा ना ! शैलजा ने मस्त रेसिपी दिली आहे. पण या लोकांच भलतच
ए काये तो मनगण प्रकार? मी
ए काये तो मनगण प्रकार? मी झोपले काल ते बघता बघता..
1) Reshma recipe banavtana
1) Reshma recipe banavtana sahitya samor thevun, hatware karat, ektyane badbadat hoti. Ase kharech karat asel koni naveen recipe kartana?
2) Kaiwalya chya Aai cha " Avataar" veglach hota kal. Kesanche curls gayab zalele. Smart, sundar & garbhshrimant asa "feel" denya sathi to look hota na? Mag ata achanak badalala kashasathi?
कैवल्यला सेंटी अॅक्टिंग
कैवल्यला सेंटी अॅक्टिंग अजिबात जमत नाही.
त्या अॅनाच्या एपिसोड मधे कालच्या एपिसोड मधे बोअर केलं त्याने मला.
Reshma recipe banavtana sahitya samor thevun, hatware karat, ektyane badbadat hoti. Ase kharech karat asel koni naveen recipe kartana?
>>
+१
मी पण हेच म्हणत होते. इतकंच नाही तर ती रेसीपी मोजत होती की काय देव जाणे. पण जे काही करत होती ते बोअर होतं
रिया आणि कधी नव्हे तो मला
रिया आणि कधी नव्हे तो मला कैवल्य तेव्हा आवडला.
कालचा बोअर.
रेश्मा आता अजीबात आवडेनाशी
रेश्मा आता अजीबात आवडेनाशी झालीय. डोक्यात जायला लागलीय.:अरेरे: कालचे ते वेड्यासारखे हातवारे बघवेना तिचे. रेसेपी लक्षात ठेवत होती की गरब्याच्या स्टेप्स? ती किन्जल बरी वाटायला लागलीय तिच्यापुढे.
त्या किन्जल्चे खरे नाव कोणाला माहीत आहे का? मी नेटवर बघीतले सापडले नाही.
रेश्माचे कॅरेक्टर पण गंडलेले
रेश्माचे कॅरेक्टर पण गंडलेले वाटते. लग्न मोडल्यामुळे घरच्यांना न सांगता भूमीगत होऊन राहिलेली मुलगी वाटतच नाही ती. उलट युपी बिहारमधील घुंघट घेतल्याशिवाय बाहेर न जाउ शकणार्या मुली पुण्यामुंबईकडे आल्यावर जश्या उधळतात तशी उधळलेली वाटते. अॅना व मिनल मुलांच्याबरोबर मस्त कंफर्टेबली वागतात पण ही मोकळेपणाने वागते असे न वाटता जरा अतीच अंगाअंगाशी करते आहे सगळ्यांच्या असे वाटते.
मेधा मेधा काय करु ग तुझे.
मेधा मेधा काय करु ग तुझे. अगदी माझ्या मनातले बोललीस बघ. त्या पानवाल्या एपिसोड मध्ये ती कैवल्यच्या जास्त अन्गाशी करत होती. बिलगुन काय बसत होती, लाडे लाडे रडत होती. लहान मुले परवडली. कुठलिही लग्न झालेली मुलगी परक्या पुरुषासोबत असे वागत नाही. हे ध्यान काय विचीत्रच आहे.
+१ अरे मी हा धागा पहिल्या
+१
अरे मी हा धागा पहिल्या पासून वाचत होते आत्ता. आपले प्रेडिक्शन्स चुकले की
Pages