दिल दोस्ती दुनियादारी मालिका

Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25

नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!

बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.

चु. भु. दे. घे.

हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाबु, पण जुन्या टवका शब्दा चा अर्थ वेगळा होता बहुतेक.. टवके टाकणे म्हणजे बघणे (डोळ्यात बदाम टाईप) Happy

त्या काळात फडके रोड वर टवके टाकत फिरायचो Wink Happy

मला वाटलं त्याला टप्पे टाकणं म्हणायचे >>> असं पण म्हणतात. मी कालेजात असताना "कासरा ओढणे" हा शब्द्प्रयोग प्रचलित झाला होता. Lol

अन्जू, फडके रोड हा फक्त डोंबिवलीचाच प्रसिध्द आहे Happy (हे वाकय वै आणि अवै) अश्या चालीवर वाचावे Wink Lol

हो नक्कीच, तरी एकदा विचारले. Lol

त्या रोडवर मला मात्र दुकाने, भाज्या. फुले, आधी लायब्ररी होती तिथे, modern कॅफे आणि तिथून गणपतीच्या देवळात जाता येतं एवढंच दिसतं. अरेरे असं होईलना वाचून ज्यांना माहितेय त्याचं ;).

फडके रोड म्हटलं की मला फक्त 'संगम' स्नॅक्स कॉर्नर आणि त्यातला पनीर चाट आठवतं हो... Happy ( आणि टॉपलर्समधील सिझलर्स पण..)

अरे वा, डोंबिवलीवाल्यांचा अवचित संगम Wink संगमच्या फॅन मंडळात मीसुद्धा ... पाणीपुरी फेवरिट आहे माझी. (टवके टाकणं हल्लीच बंद झालंय.)

ही सुनिधी कोण आलीय सिरियलमध्ये? फार दिवस बघायलाच नाही मिळालीय सिरियल. Sad

आणि रिया, तु का जेलस झालीयस?

मुगु काय करणार.

सातच्या आत घरात ऑर्डर होती आईची त्यामुळे तेव्हा फडके रोडला जाणे व्हायचेच नाही.

आता भाजी काय करायची ह्या विचाराचे वय झालंय. संगम पाणीपुरी मी कशी नाही खाल्ली अजून. आता खाईन.

रिया ही सिरीयल बऱ्याचदा तू का बघत नाहीस आणि त्या केयूला बघितल्यावर मी तुझी आठवण काढत असते. Sad .

रात्री १ ला रिपीट असते ही शिरेल.

हो ती सुनिधी मस्त.

काल तो मनगणं एपिसोड पाहताना वाटलं कि मायबोली वर येऊन शोधा ना ! शैलजा ने मस्त रेसिपी दिली आहे. पण या लोकांच भलतच Sad

1) Reshma recipe banavtana sahitya samor thevun, hatware karat, ektyane badbadat hoti. Ase kharech karat asel koni naveen recipe kartana?
2) Kaiwalya chya Aai cha " Avataar" veglach hota kal. Kesanche curls gayab zalele. Smart, sundar & garbhshrimant asa "feel" denya sathi to look hota na? Mag ata achanak badalala kashasathi?

कैवल्यला सेंटी अ‍ॅक्टिंग अजिबात जमत नाही.
त्या अ‍ॅनाच्या एपिसोड मधे कालच्या एपिसोड मधे बोअर केलं त्याने मला.

Reshma recipe banavtana sahitya samor thevun, hatware karat, ektyane badbadat hoti. Ase kharech karat asel koni naveen recipe kartana?
>>
+१
मी पण हेच म्हणत होते. इतकंच नाही तर ती रेसीपी मोजत होती की काय देव जाणे. पण जे काही करत होती ते बोअर होतं Uhoh

रेश्मा आता अजीबात आवडेनाशी झालीय. डोक्यात जायला लागलीय.:अरेरे: कालचे ते वेड्यासारखे हातवारे बघवेना तिचे. रेसेपी लक्षात ठेवत होती की गरब्याच्या स्टेप्स? ती किन्जल बरी वाटायला लागलीय तिच्यापुढे.

त्या किन्जल्चे खरे नाव कोणाला माहीत आहे का? मी नेटवर बघीतले सापडले नाही.

रेश्माचे कॅरेक्टर पण गंडलेले वाटते. लग्न मोडल्यामुळे घरच्यांना न सांगता भूमीगत होऊन राहिलेली मुलगी वाटतच नाही ती. उलट युपी बिहारमधील घुंघट घेतल्याशिवाय बाहेर न जाउ शकणार्‍या मुली पुण्यामुंबईकडे आल्यावर जश्या उधळतात तशी उधळलेली वाटते. अ‍ॅना व मिनल मुलांच्याबरोबर मस्त कंफर्टेबली वागतात पण ही मोकळेपणाने वागते असे न वाटता जरा अतीच अंगाअंगाशी करते आहे सगळ्यांच्या असे वाटते.

मेधा मेधा काय करु ग तुझे. अगदी माझ्या मनातले बोललीस बघ. त्या पानवाल्या एपिसोड मध्ये ती कैवल्यच्या जास्त अन्गाशी करत होती. बिलगुन काय बसत होती, लाडे लाडे रडत होती. लहान मुले परवडली. कुठलिही लग्न झालेली मुलगी परक्या पुरुषासोबत असे वागत नाही. हे ध्यान काय विचीत्रच आहे.

Pages